Search This Blog

Wednesday 31 March 2021

गत 24 तासात 208 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात 208 कोरोनामुक्त

280 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू

Ø  आतापर्यंत 25,270 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 2061

चंद्रपूर, दि. 31 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 208 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 280 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 27 हजार 757 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 25 हजार 270 झाली आहे. सध्या 2061 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 73 हजार 750 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 42 हजार 144 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

            आज मृत झालेल्यामध्ये बाबुपेट, चंद्रपूर येथील 58 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 426 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 386, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 280 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 100, चंद्रपूर तालुका 34, बल्लारपुर 24, भद्रावती सात, ब्रम्हपुरी 32, नागभीड 34, सिंदेवाही तीन, मूल एक, गोंडपिपरी पाच, राजूरा सात, चिमूर नऊ, वरोरा सहा, कोरपना 13, जीवती एक व इतर ठिकाणच्या चार रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0 0 0

बल्लारपूर तहसिल कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

 बल्लारपूर तहसिल कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

दुरध्वणी क्रमांक 07172-241398 यावर मिळेल तालुक्याशी संबंधीत माहिती

 

चंद्रपूर, दि. 31 मार्च : तहसिल कार्यालय बल्लारपूर येथे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे निर्देशावरून सर्वकश नियंत्रण कक्ष 17 मार्च 2021 पासुन कार्यान्वित करण्यात आलेला आहे. तालुक्यातील जनतेला बल्लारपुर तालुक्याशी संबंधीत विविध माहिती नियंत्रण कक्षातील दुरध्वणी क्रमांक 07172-241398 या एकाच क्रमांकावर उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

तालुका नियंत्रण कक्षाद्वारे तालुक्यातील पर्जन्यमानाची दैनंदिन माहिती, तालुक्यात घडणारे मानवनिर्मित व नैसर्गीक आपत्तीची, रस्ते अपघात इ. माहीती तसेच कोविड -19 च्या अनुषंगाने तालुक्यातील कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व कोविड रुग्णालये व त्यामध्ये उपलब्ध खाटांची संख्या, गृह विलगीकरण व संस्थात्मक विलगीकरण याबाबत शासनाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश व नियमावली, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग टिमची माहीती, कोविड -19 चे लसीकरण केंद्रांची माहिती अद्यावत ठेवण्यात येईल.

आग लागल्यावर नियंत्रण कार्यवाही, पुरपरिस्थितीत करावयाची कार्यवाही,  रस्ते अपघात ( मोठया तिव्रतेचे ) घडल्यास करावयाची कार्यवाही तालुका नियंत्रण कक्षात ठेवण्यात येईल. तालुक्यातील सर्व विभागप्रमुखांची नावे व संपर्क क्रमांक व कार्यालयीन पत्ते, अग्निशमन विभाग असणाऱ्या शासकीय/निमशासकीय/खाजगी आस्थापनांची नावे, संपर्क क्रमांक व कार्यालयीन पत्ते, तालुक्यातील शासकीय /खाजगी रुग्णालये / प्राथमीक आरोग्य केंद्र येथील संपर्क क्रमांक व कार्यालयीन पत्ते, बोटचालक, क्रेनचालक, नदीत पट्टीचे पोहणारे यांची नावे इ. अद्ययावत माहिती नियंत्रण कक्षात राहील.

मान्सुन काळात पाण्याखाली जाणा-या पुलांची माहिती, तालुका स्तरावरील शोध व बचाव पथकातील सदस्य, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक यांची अद्ययावत माहीती नियंत्रण कक्षात उपलब्ध राहणार असल्याचे तहसिलदार संजय राईंचवार यांनी कळविले आहे.

0 0 0 0

5 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन

 

5 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन

               चंद्रपूर, दि. 31 मार्च :    सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे अध्यक्षतेखाली दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. 

            माहे एप्रिल महिन्याचा पहिला सोमवार हा 5 एप्रिल 2021 रोजी येत असून या दिवशी लोकशाही दिनाचे आयोजन नेहमीप्रमाणे दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे करण्यात येईल. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहीत नमुन्‍यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाच्या प्रतीसह अर्ज सादर करावे. त्यानंतरच सदर तक्रार अर्ज स्विकारण्यात येईल. या लोकशाही दिनात निवेदन स्विकारण्याची वेळ दुपारी 12.00 ते 1.00 वाजेपर्यंत राहील,  असे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तहसिलदार (सामान्य) यशवंत धाईत यांनी कळविले आहे.

0000

Tuesday 30 March 2021

गत 24 तासात 125 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात 125 कोरोनामुक्त

39 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू

Ø  आतापर्यंत 25,062 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 1990

चंद्रपूर, दि. 30 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 125 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 39 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 27 हजार 477 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 25 हजार 62 झाली आहे. सध्या 1990 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 71 हजार 655 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 40 हजार 731 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

            आज मृत झालेल्यामध्ये गाडीसुरला ता. मुल येथील 52 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 425 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 385, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 39 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 26, चंद्रपूर तालुका दोन, नागभीड एक, सिंदेवाही एक, राजूरा दोन, चिमूर एक, वरोरा तीन व इतर ठिकाणच्या तीन रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0 0 0

‘मिशन बिगीन अगेन’ आदेशाला सुधारित निर्बंधांसह 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ


 ‘मिशन बिगीन अगेन’ आदेशाला सुधारित निर्बंधांसह 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

Ø    रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीत पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये

Ø    सिनेमागृहे, हॉटेल्स, उपहारगृहे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद

Ø    सर्व खाजगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने तर अत्यावक्षक सेवा पुर्ण क्षमतेने सुरू

Ø    प्रत्येक आस्थापनेत मास्कशिवाय प्रवेश राहणार नाही

Ø    आदेशाचे उल्लघंन करणारी आस्थापने/कंपन्या कोविड महामारी सुरू असेपर्यंत बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येईल.

चंद्रपूर, दि. 30: कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावानुसार घोषित करण्यात आलेले लॉकडाऊन टप्पेनिहाय समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्याकरिता ‘मिशन बिगीन अगेन’ बाबत वेळोवेळी सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या आदेशांना राज्य शासनाच्या सूचनेनुसार 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून सर्व संबंधीत प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नुकतेच दिले आहेत.

सुधारीत आदेशानुसार सर्व सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी तसेच प्रवास करतांना प्रत्येक व्यक्तिने मास्क घालणे बंधनकारक राहील. सर्व प्रकारच्या सार्वजनिक स्थळी वाहतुकीच्या व कामाच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करावे. शक्य तेथे घरूनच काम करण्याची सुविधा देण्यात यावी. त्याकरीता कार्यालये, दुकाने, औद्योगिक क्षेत्र, वाणिज्यिक आस्थापना यांनी त्यांच्या कामाच्या वेळा निश्चित कराव्यात. सर्व प्रकारचे कार्यालये, दुकाने, आस्थापना यांनी कामाच्या ठिकाणी वारंवार निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीत पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, सर्व प्रकारची सार्वजनिक ठिकाणे उदा. उद्याने, बगिचे, पार्क आदी रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील. सर्व प्रकारची सिनेमागृहे, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्स, प्रेक्षकगृहे व हॉटेल्स, उपहारगृहे, खाद्यगृहे हे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील. या कालावधीत हॉटेल्स, उपहारगृहे, खाद्यगृहे मार्फत पार्सल सुविधेस रात्री 11 वाजेपर्यंत मुभा देण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम बंद राहतील. लग्न समारंभाकरीता 50 व्यक्ती व अंत्यविधीकरीता 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी राहील.

गृह विलगीकरणातील रुग्ण पॉझेटिव्ह असल्याबाबतचा फलक त्याच्या घरासमोर ठळकपणे दिसेल, असा लावण्यात यावा. तसेच त्याचा 14 दिवसांचा गृह विलगीकरणाचा कालावधी त्यात नमुद करावा. कोरोना पॉझेटिव्ह रुग्णाच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का मारावा. कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांनी अत्यावश्यक गरजेशिवाय बाहेर फिरणे टाळावे. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित रुग्णास तात्काळ कोव्हीड सेंटरमध्ये हलविण्यात येईल.

सर्व वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा पुर्ण क्षमतेने तर सर्व खाजगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. शासकीय व निमशासकीय कार्यालयात संबंधीत कार्यालयप्रमुख कोविड शिष्टाचाराचे नियमांची पुर्ततेच्या अधिन राहून कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत निर्णय घेतील. उत्पादन क्षेत्रातील कंपन्या पुर्ण क्षमतेने सुरू राहतील. तथापि कोविड नियमांची पुर्तता व सोशल डिस्टन्सचे पालन करणे त्यांना बंधनकारक राहील व यासाठी गरज पडल्यास त्यांनी कामगारांची उपस्थिती नियंत्रीत करावी.  तसचे प्रत्येक आस्थापनेत मास्कशिवाय प्रवेश राहणार नाही व प्रवेशद्वारावर आगंतुकाचे तापमान मोजणे व हात स्वच्छ करण्याकरिता हॅण्ड सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक राहील.

आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या संबंधीत सिनेमागृहे, हॉटेल्स, उपहारगृहे, खाद्यगृहे, मंगल कार्यालये व उत्पादन क्षेत्रातील कंपन्या कोविड महामारी सुरू असेपर्यंत बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येईल. नियमाचे पालन न केल्यास प्रत्येक व्यक्तिला स्थानिक प्राधिकरणाने एक हजार रुपये दंड करावा. कोणत्याही व्यक्तिने मास्क न वापरल्यास 500 रुपये दंड तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच संबंधीतांविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता, साथरोग कायदा व व इतर संबंधीत कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

0000

10 एप्रिलला राष्ट्रीय लोक अदालत

 10  एप्रिलला राष्ट्रीय लोक अदालत

 चंद्रपूर, दि. 30 मार्च : चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्या स्तरीय न्यायालयांमध्ये दिनांक  10 एप्रिल 2021 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असलेली प्रकरणे, तसेच नवीन प्रकरणे किंवा महत्त्वाची प्रकरणे लोक न्यायालय सारख्या यंत्रणेच्या माध्यमातून त्वरित निकाली काढून त्यांचे निवारण यावेळी करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये कोर्टातील समझोता योग्य फौजदारी प्रकरणे, अधिकोष वसुली प्रकरणे, मोटार अपघात दावा प्राधिकरणातील प्रकरणे, अपघात माहिती अहवाल व कौटुंबिक न्यायालयीन प्रकरणे, श्रमिकांचे वाद व त्यांच्या पुनर्नियुक्तीमधील जुन्या वेतनासंबंधीची प्रकरणे(कामगारांसंबंधी निस्तारणासंबंधीचे दावे, पॉलिसी, औद्योगिक कामगारांच्या वेतनासंबंधीचे आणि इतर प्रलंबित फायद्याची प्रकरणे), भू-संपादन प्रकरणे, विजेची आणि पाणी बिलाची (चोरीची) प्रकरणे, नोकरी संबंधी प्रकरणे ज्यामधील पैसे आणि भत्ते आणि सेवानिवृत्तीनंतरच्या फायद्यासंबंधी प्रकरणे, महसूल प्रकरणे, दिवाणी दावे-भाडेसंबंधी, वहीवाटसंबंधीचे दावे आणि दूरध्वनी प्रकरणे आपसी सामंजस्याने सोडविण्याकरिता ठेवण्यात येणार आहे.

अधिक माहितीकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर, येथे अथवा हेल्पालाईन क्रमांक 07172-271679, मोबाईल क्रमांक 9765628961, 9325318616 अथवा 8999954259  यावर संपर्क करावा.

या राष्ट्रीय लोक अदालत संधीचा सर्व संबंधित पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा  व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा न्या. कविता बि. अग्रवाल यांनी केले आहे.

0 0 0 0

Monday 29 March 2021

गत 24 तासात 127 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात 127 कोरोनामुक्त 

173 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू

Ø  आतापर्यंत 24,937 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 2077

चंद्रपूर, दि. 29 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 127 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 173 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 27 हजार 438 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 24 हजार 937 झाली आहे. सध्या 2077 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 71 हजार 557 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 40 हजार 133 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

  आज मृत झालेल्यामध्ये राजूरा येथील 73 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 424 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 384, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 173 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 76, चंद्रपूर तालुका आठ,  बल्लारपूर नऊ, भद्रावती 26, ब्रम्हपुरी चार, नागभीड एक, मूल चार, सावली एक, गोंडपिपरी एक, राजूरा सहा, चिमूर 13, वरोरा 21 व इतर ठिकाणच्या तीन रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0 0 0

Sunday 28 March 2021

गत 24 तासात 165 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात 165 कोरोनामुक्त  

341 पॉझिटिव्ह ; तीन मृत्यू

Ø  आतापर्यंत 24,810 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 2032

चंद्रपूर, दि. 28 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 165 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 341 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 27 हजार 265 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 24 हजार 810 झाली आहे. सध्या 2032 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 70 हजार 661 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 38 हजार 821 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

            आज मृत झालेल्यामध्ये सरकार नगर, चंद्रपूर, येथील 72 वर्षीय महिला, बोधली ता. नागभिड येथील 52 वर्षीय पुरूष व आलापल्ली जि. गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 423 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 383, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 341 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 113, चंद्रपूर तालुका 34,  बल्लारपूर 15, भद्रावती 16, ब्रम्हपुरी 10, नागभीड चार, सिंदेवाही 12, मूल नऊ, सावली चार, पोंभूर्णा एक, गोंडपिपरी तीन, राजूरा 36, चिमूर चार, वरोरा 50, कोरपना 19, जीवती पाच व इतर ठिकाणच्या सहा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0 0 0

पुढील लाटेसाठी अधिकचे ऑक्सीजन बेड निर्माण करा

 




पुढील लाटेसाठी अधिकचे ऑक्सीजन बेड निर्माण करा

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे चंद्रपूर जिल्ह्याच्या आढावा बैठकीत निर्देश

 

Ø  प्रत्येक तालुकास्तरावर 20 ते 25 ऑक्सीजन बेड तयार ठेवा

Ø  24 तासात स्वॅब तपासणीचा अहवाल मिळावा

Ø  शासकीय रूग्णालयावर लोकांचा विश्वास

Ø  रूग्णालयातील साफसफई, उत्तम जेवण, प्रसाधनगृह स्वच्छतेला सर्वाधीक महत्व द्या

Ø  नागरिकांनी अंगावर घरीच दुखणे काढू नये

Ø  लस कमी पडू दिली जाणार नाही

Ø  खाजगी रूग्णालयांनी वेळकाढूपणा न करता तातडीने रुग्णांचे स्वॅब नमुने पाठवावे

Ø  लोकप्रतिनिधींचे विचार, रिक्त पदभरती, कंत्राटी सेवकांचे प्रश्न याबाबत माहिती घेतली 

 

चंद्रपूर, दि. 28 मार्च : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांकरिता सद्या ऑक्सीजन बेडची संख्या पर्याप्त असली तरी पुढील लाटेत दररोजची रूग्णसंख्या 500 च्या वर गेल्यास आपत्तीजनक परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात अधिकचे ऑक्सीजन बेड निर्माण करण्याची गरज असून प्रत्येक तालुकास्तरावरदेखील 20 ते 25 ऑक्सीजन बेड तयार ठेवण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

            आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल रात्री व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, आ. सुधीर मुनगुंटीवार, आ. सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, प्र. जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ. प्रकाश साठे प्रामुख्याने उपस्थित होते.

आरोग्यमंत्री टोपे पुढे म्हणाले की शासनस्तरावरून आरोग्यसेवेतील रिक्त पदांपैकी 50 टक्के पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, मात्र कोरोना प्रतिबंधासाठी रिक्त पदांचा अडसर येऊ नये म्हणून शासकीय रूग्णालयाने 24 तास सेवा देणाऱ्या टेले-आयसीयु चा पर्याय स्विकारण्याचे तसेच खाजगी डॉक्टरांचे मानधन ठरवून आवश्यकतेप्रमाणे त्यांच्याही सेवा घेण्याच्या सूचना केल्या. कोणत्याही परिस्थितीत कोरोना आरटीपीसीआर तपासणीचा अहवाल 24 तासाचे आत मिळालाच पाहिजे असे सांगतांना यासाठी आवश्यकता पडल्यास खाजगी प्रयोगशाळेची मदत घेण्याचेही त्यांनी सांगितले

            नागरिकांनी अंगावर दुखणे काढू नये, ताप, सर्दी, खोकला अशी कोरोनाची लक्षणे दिसताच दवाखाण्यात तपासणीला आले पाहिजे यासाठी प्रशासनामार्फत आशा वर्कर व आरोग्य सेवकांमार्फत सारी, आयएलआय व व्याधीग्रसत रूग्णांचे सर्व्हे  व ट्रेसींग मोठया प्रमाणात सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

लोकं मोठया विश्वासाने शासकीय रूग्णलयात येतात त्यामुळे शासकीय रूग्णालय, सर्व कोविड केअर सेंटर व संस्थात्मक विलगीकरण कक्षात साफसफाई, उत्तम जेवणाची सोय व प्रसाधन गृहाची स्वच्छता ठेवणे गरजेचे असून रुग्णांकरिता उत्तम पद्धतीची व्यवस्था झाली पाहिजे असे निर्देश त्यांनी दिले. खाजगी रूग्णालये देखील त्यांचेकडील रुग्ण शेवटच्या क्षणी शासकीय रूग्णलयाकडे शिफारस करतात, कोरोनाबाधीतांवर वेळीच उपचार व्हावे म्हणून लक्षणे आढळून येणाऱ्या रूग्णाचे स्वॅब नमुने तातडीने तपासणीला पाठविने आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

            लसीकरणाचा आढावा घेतांना ना. टोपे यांनी सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या कार्यक्षेत्रातील 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. ज्या रुग्णालयात पुरेशी जागा, डॉक्टर व लस ठेवण्यासाठी कोल्डचेन उपलब्ध आहे, त्या सर्व शासकीय व खाजगी ठिकाणी लसीकरण केंद्र सूरू करून लसीकरणाचा वेग दुप्पट करावा. लस कमी पडू दिली जाणार नाही, आपल्या मागणीप्रमाणे लससाठा उपलब्ध करून देण्यात यईल, असे त्यांनी सांगतले.

            यावेळी आ. सुधीर मुनगुंटीवार, आ. सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार यांनी प्रातिनिधीक स्वरूपात जिल्ह्याच्या समस्या मांडल्या. जिल्हाधिकारी, अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी योग्य समन्वयाने काम करण्याची गरज तसेच वैद्यकिय सेवेतील रिक्त पदभरती, कंत्राटीसेवकांचे प्रश्न, उन्हाळ्यात लसीकरणाच्या वेळेत बदल, ग्रामीण भागात उपचाराची सोय, जिल्ह्यासाठी वाढीव लस साठा इ. बाबींकडे त्यांनी आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

            सुरवातीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोरोना प्रतिबंधाकरिता जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजना, सर्वाधिक ॲक्टीव पॉझेटिव्ह रुग्णसंख्येच्या 10 टक्के अधिक रूग्णसंख्या गृहीत धरून केलेले नियोजन, जिल्हा व तालुका स्तरावरील कोविड केअर सेंटरमधील बेड व ऑक्सीजन सुविधा, सुपरस्प्रेडच्या गटनिहाय टेस्टींग, 500 ते 600 वरून 3000 ते 4000 वर सुरू करण्यात आलेल्या रोजच्या कोरोना तपासण्या, नव्याने लावण्यात आलेले दोन लिक्वीड ऑक्सीजन टँक, तसेच दैनंदिन तपासण्या वाढविण्यासाठी अतिरिक्त व्हीआरडील लॅब मंजूर करण्यासाठी शासनाकडे सादर केलेला प्रस्ताव याबाबत तसेच जिल्ह्यात एक लाख लसीकरणाचे डोज दिल्याबाबत आरोग्यमंत्र्यांना माहिती दिली.

आरोग्यमंत्र्यांनी यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेशीदेखील चर्चा करून येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपायांबाबत चर्चा केली व आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले.

            बैठकीला जिल्हा लसीकरण अधिकरी संदिप गेडाम, डॉ. सुधीर मेश्राम, महानगरपालीकेचे आरोग्य अधिकारी अविष्कार खंडारे व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

0000

Saturday 27 March 2021

गत 24 तासात 103 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात 103 कोरोनामुक्त

 223 पॉझिटिव्ह  ;  तीन मृत्यू

Ø  आतापर्यंत 24,645 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 1859

चंद्रपूर, दि. 27 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 103 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 223 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 26 हजार 924 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 24 हजार 645 झाली आहे. सध्या 1859 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 68 हजार 393 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 36 हजार 611 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये सावरगाव, सिंदेवाही येथील 58 वर्षीय पुरूष, चंद्रपूर शहरातील 60 वर्षीय व  65 वर्षीय पुरूषांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 420 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 381, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 223 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 72, चंद्रपूर तालुका 21,  बल्लारपूर 14, भद्रावती 17, ब्रम्हपुरी सात, नागभिड 18, सिंदेवाही चार, मूल 10, सावली दोन, पोंभुर्णा एक, गोंडपिपरी एक, राजूरा नऊ, चिमूर 11, वरोरा 25, कोरपना पाच व इतर ठिकाणच्या सहा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0 0 0

कोव्हिडं 19 च्या पार्श्वभूमीवर होळी, धुलीवंदन व रंगपंचमी सण साधेपणाने साजरा करा...मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

 


कोव्हिडं 19 च्या पार्श्वभूमीवर होळी, धुलीवंदन व रंगपंचमी सण साधेपणाने साजरा करा...मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

Ø  घरी राहूनच सण साजरा करा

Ø  सोशल डिस्टन्स पाळा

Ø  प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा

चंद्रपूर, दि. 27 मार्च : गेल्या वर्षी प्रमाणेच होळी, धुलीवंदन व रंगपंचमीच्या सणावर कोविड-19चे सावट असल्याने होळी, धुलीवंदन व रंगपंचमीसाठी घराबाहेर पडू नका, घरातच राहून सण साजरा करा आणि शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले असून नागरिकाना होळी, धुलीवंदन व रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

होळी किंवा शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी 28 मार्च 2021 रोजी होळीचा सण आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही प्रकारे गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करुन हा सण साधेपणाने साजरा करावा. रंगपंचमी साजरी करताना दरवर्षी या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते. परंतू कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धूलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत असे पालकमंत्री वडेट्टीवार  यांनी सांगितले.

होळीचा सण साजरा करताना मोठ्या प्रमाणात जागोजागी होळी पेटवण्यात येत असते. लाकडे जाळणे तसेच यामुळे होणाऱ्या वायुप्रदूषणाचा विचार करता होळी पेटवण्यात येऊ नये. धूलिवंदनाच्या दिवशी रंगांचा वापर न करता पाण्याचा अपव्यय टाळावा, सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही, अशा धार्मिक / सांस्कृतिक कार्यक्रमांचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

होळीचा सण आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन येतो. विशेषत: लहान मुले या उत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात. होळीच्या उत्सवाची तयारी अनेक दिवस अगोदरच सुरू होते. परंतु, या वेळी होळी कोरोना काळात साजरी केली जाणार आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री वडेट्टिवार यांनी सांगितले.

कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत,  पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन युध्द पातळीवर काम करीत असनु त्यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री वडेट्टीवार यांनी नागरिकांना केले आहे. कोरोनावर लस आल्यामुळे कोरोनावर लवकरच आपण विजय मिळवू शकू असा विश्वास व्यक्त करत  काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर या षड्रिपूंवर आपण नियंत्रण मिळवून जीवन सुखी व समृद्ध करण्याचा प्रयत्न करू या, असे ना. वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

0 0 0

Friday 26 March 2021

सार्वजनिक ठिकाणी धुलीवंदन सण साजरा करण्यास मनाई

 सार्वजनिक ठिकाणी धुलीवंदन सण साजरा करण्यास मनाई

होळीदहनासाठी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमू नये

Ø सॅनीटायझर हातावर लावल्याबरोबर होळीच्या पुजनाकरीता आगीजवळ जाऊ नये

चंद्रपूर, दि. 26 मार्च : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खबरदारीची उपाययोजना म्हणुन नागरीकांची धुलीवंदन या सण निमीत्य होणारी गर्दी टाळण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसोर्ट, शेती, फार्म हाऊस, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळया जागा, सर्व गृहनिर्माण संस्था, रहिवासी क्षेत्रामधील मोकळया जागा या ठिकाणी दिनांक 29 मार्च 2021 रोजी साजरा होणारा धुलीवंदन हा सण उत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहेत.

            तसेच दि. 28 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या होळी सणानिमित्य सार्वजनिक ठिकाणी होळीचे दहन करीत असतांना 5 पेक्षा अधिक व्यक्ती एकावेळी एकत्र येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच सदर ठिकाणी नागरीकांनी सामाजिक अंतर राखणे व मास्क वापरणे बंधनकारक राहणार आहे.

होळी दहन स्थळी सॅनीटायझर ठेवले असल्यास सॅनीटायझर हातावर लावल्याबरोबर होळीच्या पुजनाकरीता आगीजवळ न जाता काही काळ आगीपासुन लांब उभे राहावे. शक्यतोवर नागरीकांनी सार्वजनिक ठिकाणी होळीचे दहन करु नये. वृध्द व्यक्ती आणि लहान बालके यांनी सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या होळी दहनाकरिता जाणे टाळावे, असे आवाहन देखीत जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी केले आहे.

            आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग कायदा, भारतीय दंड विधान व इतर संबंधीत कायद्यातील तरतुदीअन्वये कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

0000

गुणवंत खेळाडूंसाठी पेन्शन योजना


 

गुणवंत खेळाडूंसाठी पेन्शन योजना

चंद्रपूर, दि. 26 मार्च : क्रिडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत भारत सरकार युवा आणि  क्रिडा मंत्रालययांचे दि. 7 जुन 2018 रोजीच्या परिपत्रकनुसार गुणवंत खेळाडु करीता क्रिडा पेन्शनसाठी सुरक्षा पुर्ववत करणे सक्रीय क्रिडा करियरमधुन अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणे ही एक महत्वाची योजना केंद्र शासन राबवित आहे. ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या योजनेचा हेतु आहे.

            सदर योजनेसाठी अर्जदार खेळाडू हा भारताचा रहिवाशी असावा व त्यांने ऑलम्पिक ऑलम्पिक,पॅरा ऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स,  एशियन गेम्स व  वर्ल्डकप  (ऑलम्पिक व  एशियन गेम्स स्पर्धेतील समाविष्ट खेळप्रकार) या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य  पदक प्राप्त केलेले असावे. या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त गुणवंत खेळाडू़स मासिक मानधन देण्याची तरतुद करण्यात आली आहे. अशी पेन्शन लागु करताना खेळाडु सक्रिय क्रिडा करियरमधुन निवृत्त झाले असावे.

पेन्शन प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित पात्र खेळांडुनी आवश्यक त्या कागदपत्रांसह आपला प्रस्ताव केद्र शासनास सादर करावयाचा आहे. याबाबत अधिक माहिती जिल्हा क्रिडा कार्यालय तसेच  https://www.yas.nic.in/sports/scheme-sports-fund-pension-meritorious-sportspersons या लिंकवर  उपलब्ध आहे. चंद्रपूर जिल्हयातील जास्तीत जास्त खेळांडुनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी अब्दुल मुश्ताक यांनी केले आहे.

*****