Search This Blog

Sunday 7 March 2021

महिलादिनाला महिलांकरिता पाच कोरोना लसीकरण केंद्र आरक्षीत

 


महिलादिनाला महिलांकरिता पाच कोरोना लसीकरण केंद्र आरक्षीत

 जिल्ह्यात 13 नवीन लसीकरण केंद्र सुरू

चंद्रपूर, दि. 7 मार्च : जागतिक महिला दिनानिमित्त चंद्रपूर शहरातील जिल्हा सामान्य रूग्णालय व मातोश्री नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच  ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर, भद्रावती व मुल या पाच लसीकरण केंद्रावर केवळ महिलांचेच कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. दि. 8 मार्च करिता ही पाचही केंद्रे महिलांकरिता आरक्षीत करण्यात आली असून आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशानातर्फे महिलांच्या कोरोना लसीकरणासाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात 13 नवीन लसीकरण केंद्रही सुरू करण्यात येत आहेत.

जिल्ह्यात लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून दि. 8 मार्च पासून 13 नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यात पीएचसी विसापूर बल्लारपूर ब्लॉक, आयुध कारखाना रुग्णालय भद्रावती ब्लॉक,  पीएचसी मजारी भद्रावती ब्लॉक,  पीएचसी गंगालवाडी ब्रम्हपुरी ब्लॉक, पीएचसी ताडाली चंद्रपूर ब्लॉक,  पीएचसी माधेली वरोला ब्लॉक, पीएचसी नेरी चिमूर ब्लॉक, पीएचसी ढाबा गोंडपिपरी ब्लॉक, पीएचसी मारोदा मुल ब्लॉक, पीएचसी तळोधी नागभीड ब्लॉक, पीएचसी काढोली वरोरा ब्लॉक, पीएचसी पठारी सावली ब्लॉक व पीएचसी नवरगाव सिंदेवाही ब्लॉक या लसीकरण केंद्राचा समावेश असून या सर्व केंद्रावर पात्र नागरिकांना कोविशिल्ड लस मोफत देण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment