Search This Blog

Monday 22 March 2021

रेतीघाटाचे लिलाव नियमानुसारच - अपर जिल्हाधिकरी विद्युत वरखेडकर

 रेतीघाटाचे लिलाव नियमानुसारच

-         अपर जिल्हाधिकरी विद्युत वरखेडकर

चंद्रपूर, दि. 22 मार्च : महाराष्ट्र शासनाचे रेती निर्गती धोरणान्वये तालुका तांत्रिक समितीने निश्चित केलेल्या रेतीघाटाचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाद्वारे राज्यस्तरीय समितीकडे सादर केल्यानंतर समितीने ज्या रेतीघाटांना पर्यावरन मंजूरी प्रदान केली त्याच रेतीघाटाची लिलाव प्रक्रिया जिल्ह्यात राबविण्यात आली आहे.

रेतीघाट लिलावाच्या 15 दिवसापूर्वी राज्यस्तरीय दोन वर्तमानपत्रात जाहिरात प्रकाशीत करण्यात आली. तद्नंतर लिलाव प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली व सदर लिलावामध्ये सर्वोच्च बोली बोलणाऱ्या लिलावधारकास रेतीघाट देण्यात आलेला आहे.

रेतीघाट लिलावाकरिता मौजा-काग रेतीघाट ता. चिमुर येथील महिला बचतगटला देण्यात यावे याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास माहे ऑक्टोंबर 2020, मध्ये निवेदन देण्यात आले होते, तथापी वाळू/रेती निर्गती धोरण 2019 मध्ये असे कुठलीही तरतूद नसल्याने सबंधीत महिला बचत गटाला रेतीघाट देण्यात आलेला नाही, असे अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी कळविले आहे.

00 0

No comments:

Post a Comment