Search This Blog

Wednesday 31 May 2023

सर्वसामान्याच्या प्रश्नाला भिडणारा नेता – पालकमंत्री मुनगंटीवार








 

सर्वसामान्याच्या प्रश्नाला भिडणारा नेता  – पालकमंत्री मुनगंटीवार

चंद्रपुरचा ढाण्या वाघ व लढवय्या नेत्याला मानाचा मुजरा – प्रतिभा धानोरकर

 

चंद्रपूर दि.३१: चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज वरोरा मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्ली येथील खाजगी इस्पीतळात उपचार घेत असतांना त्यांचे काल (30 मे) निधन झाले होते. शासनाच्या वतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर लोकसभेच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार मुकुल वासनीक व आमदार सर्वश्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे, चंद्रशेखर बावनकुळे, नितीन राऊत, सुनिल केदार, अनिल देशमुख, आशिष देशमुख, किशोर जोरगेवार आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

 यावेळी आपल्या शोकभावना व्यक्त करताना पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरचे युवा लोकनेते खासदार बाळू धानोरकर सर्वसामान्याच्या प्रश्नाला भिडणारे नेते होते. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी आक्रमकपणे काम केले. आपसात चांगला संवाद असलेल्या या नेत्याचे अकाली निधन हे दु:खद व वेदनादायी असून यामुळे चंद्रपूरची मोठी हानी झाली आहे. ते आपल्याला सोडून गेले याचे सर्वांच्या मनात प्रचंड दुःख आहे. धानोरकर परिवाराच्या दु:खात आपण सहभागी असून त्यातून त्यांना सावरण्याची प्रार्थना इश्वरचरणी करत असल्यांचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

दिवंगत खासदार धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी बाळु धानोरकर यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी हाणी झाली असून चंद्रपुरच्या या ढाण्या वाघाला, दिलदार व्यक्तमत्व व लढवय्या नेत्याला मानाचा मुजरा करत असल्याच्या शोकाकुल भावना व्यक्त केल्या.

याप्रसंगी संपूर्ण शासकीय इतमामात दिवंगत धानोरकर यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. पार्थिवावर लपेटण्यात आलेला राष्ट्रध्वज धानोरकर परिवाराकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी दिवंगत खा. धानोरकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन, जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रकुमार परदेशी, उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे,  तसेच सामाजिक व राजकीय पदाधिकारी नरेशबाबू पुगलिया, शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे, रामू तिवारी, प्रकाश देवतळे, देवराव भोंगळे यांच्यासह राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील नागरीकांनी पुष्पचक्र अर्पण केले. अंतयात्रेला हजारोंच्या संख्यने नागरिक उपस्थित होते.

अन्न व औषध मंत्री संजय राठोड यांनी आज सायंकाळी वरोरा येथे धानोरकर कुटूंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. त्यांनी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

000

शासन आपल्या दारी : - ओबीसी महामंडळाची शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

 


शासन आपल्या दारी : - 

ओबीसी महामंडळाची शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

 

चंद्रपूर, दि. 29: आर्थिक वर्ष 2023-24 करीता इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी नवीन शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरू आहे. शैक्षणिक हिताच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, त्यांना शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्जावरील व्याज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यास शासनाने डिसेंबर 2021 पासून मान्यता दिली आहे.

 

उच्च शिक्षणासाठी राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनींना बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रकमेवरील व्याजाचा परतावा करणे, उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी रुपये 10 लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी रुपये 20 लक्ष पर्यंत कर्ज अदा करण्यात येते. यासाठी विद्यार्थ्याचे वय 17 ते 30 वर्ष असावे व तो इतर मागास प्रवर्गातील महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरिता रुपये 8 लाखापर्यंत व शासनाच्या सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमीलेअरच्या मर्यादित असावी. अर्जदार इयत्ता बारावी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा.

 

राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमात आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन अभ्यासक्रम, कृषी, अन्न प्रक्रिया व पशुविज्ञान अभ्यासक्रमाचा समावेश राहील. राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता बँकेने उपलब्ध करून दिलेल्या कर्जामध्ये शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदी व अर्जदाराच्या राहण्याचा व भोजनाच्या खर्चाचा समावेश राहील. तर परदेशी अभ्यासक्रमात आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन, विज्ञान व कला या अभ्यासक्रमांचा समावेश असून परदेशी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता बँकेने उपलब्ध करून दिलेल्या कर्जामध्ये फक्त शैक्षणिक शुल्क, पुस्तके व  साहित्य खरेदीचा समावेश राहील.

 

या आहेत योजनेच्या अटी व शर्ती :

 परदेशी अभ्यासक्रमासाठी क्यूएस रँकिंग/ गुणवत्ता निकषानुसार संस्थेचे स्थान 200 पेक्षा आतील असावे, तसेच जी.आर.ई., टी.ओ.इ.एफ.एल. या पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांनी या बाबीसह संबंधित आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालात संपर्क करावा.  

00000

Monday 29 May 2023

दिव्यांगांचा सुधारित सर्व्हे करा - जिल्हाधिकारी


 

दिव्यांगांचा सुधारित सर्व्हे करा -         जिल्हाधिकारी

Ø  दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी जागा निवडीवर चर्चा

 

चंद्रपूर दि. 29 मे : जिल्ह्याला मंजूर झालेले दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी सुयोग्य जागेची निवड करून ते तातडीने सुरू करावे. तसेच दिव्यांगांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी घरोघरी जावून दिव्यांगांचा सुधारित सर्व्हे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज दिले.

केंद्र शासनाची जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र ही योजना राबविण्यासाठी केंद्राच्या सामाजिक न्याय विभागामार्फत जिल्ह्यात दिव्यांग पुनर्वसन केंद्र मंजूर करण्यात आले आहे. हे केंद्र सुरू करण्यासाठी जागा निवड करण्याबाबत आज जिल्हास्तरीय व्यवस्थापन संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपिन पालिवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरूण गाडेगोणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चिंचोळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी संग्राम शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत तसेच दिव्यांग प्रतिनिधी निलेश पाझारे याप्रसंगी उपस्थित होते.

   केंद्र शासनाकडून दिव्यांग पुनर्वसन केंद्राकरिता मंजूर करण्यात आलेल्या सुविधेव्यतिरिक्त इतर आवश्यक बाबींच्या मागणीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.

   जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातर्फे सर्व वयोगटातील दिव्यांग व्यक्तींचा शोध घेवून त्यांचेसाठी आधुनिक कृत्रिम अवयव व साहित्य साधने पुरविणे, चिकित्सालयीन सोयी-सुविधा पुरविणे, दिव्यांग प्रमाणपत्र, बस पासेस, रेल्वे सवलत व इतर सेवा प्रदान करणे, शिक्षण व प्रशिक्षण देणे, व्यवसाय स्वयंरोजगारासाठी वित्तीय सहाय्य मिळवून देण्यात सहाय्य करणे व इतर सहाय्यभूत व पुरक सुविधा प्रदान करण्यात येणार आहे.

बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित होते.

000

शासन आपल्या दारी : - प्रधानमंत्री कुसुम योजनेतून 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप

 

शासन आपल्या दारी : -

प्रधानमंत्री कुसुम योजनेतून 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप

शासनाने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक धोरणे जाहीर केली आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्यांचे विद्युतीकरण सौर ऊर्जेद्वारे करण्यासाठी राज्य शासन गेल्या काही वर्षांपासून स्वयंअर्थसहाय्यित तसेच केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यातून विविध योजना राबवत आहे.  त्याअंतर्गत केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियानाला (पीएम-कुसुम) राज्यात गती देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत पाच वर्षात राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांना सौरपंपांचे वाटप करण्यात येत आहे.  सदर योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के  अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप मंजूर करण्यात येत आहे.

कुसुम योजनेंतर्गत 3, 5 आणि 7.5 हॉर्स पॉवर (HP) क्षमतेचे सौर पंप या योजनेतून दिले जातात. 3 एच.पी. पंपाची जीएसटीसह एकूण किंमत एक लाख 93 हजार 803 रुपये आहे. कुसूम योजनेंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याला यासाठी 90 टक्के अनुदान वगळता 10 टक्के प्रमाणे केवळ 19 हजार 380 रुपये तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 95 टक्के अनुदान वगळता पाच टक्केप्रमाणे केवळ 9 हजार 690 रुपये भरावे लागणार आहे.  तसेच 5 एचपी पंपासाठी एकूण 2 लाख 69 हजार 746 किंमतीच्या 10 टक्के प्रमाणे 26 हजार 975 रुपये आणि  पाच टक्के प्रमाणे 13 हजार 488 रुपये भरावे लागतील. आणि 7.5 एचपी पंपासाठी एकूण 3 लाख 74 हजार 402 रुपये किंमतीच्या 10 टक्के प्रमाणे  37 हजार 440 रुपये आणि पाच टक्के प्रमाणे 18 हजार 720 रुपये भरावे लागणार असून उर्वरित रकमेचे अनुदान शासनाकडून देय राहणार आहे.

 

उपरोक्त सौर कृषीपंप प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर देण्यात येणार आहे.  यासाठी महाऊर्जा मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्विकरण्यासाठी 17 मे 2023 पासून कुसुम योजनेचे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या संकेतस्थळावर अर्ज करावा. योजनेबाबत सर्व माहिती www.mahaurja.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून पोर्टलचा दररोज आढावा घेऊन जिल्हानिहाय कोटा वाढवून देण्यात येत आहे. तरी शेतकऱ्यांनी कोटा उपलब्ध नसल्यास, वाट पाहून कोटा उपलब्ध झाल्यावर अर्ज करावा. ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या अडचणींसाठी 020-35000456 / 020-35000457 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदविण्याची सुविधादेखील महाऊर्जा चे महासंचालक रविंद्र जगताप यांनी उपलब्ध करून दिली आहे.

-         जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर.

मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन

 मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 29 : माजरी रेल्वे स्टेशन, रेल्वे रनिंग रुम जवळ 1 किमी  उत्तर परिसरात एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 30 ते 35 वर्षे मृत अवस्थेत आढळून आला आहे.  सदर मृत  इसमाची  ओळख  पटविण्याचे  आवाहन  माजरी, पोलीस स्टेशनमार्फत करण्यात आले आहे.

सदर व्यक्तीचा बांधा सडपातळ असून उंची 5 फूट 4 इंच, रंग गोरा, नाक सरळ, केस काळे बारीक,  कपाळ उंच, चेहरा चाप्पट पसरट,  अंगात आकाशी रंगाची हाफ टीशर्ट व  निळ्या रंगाचा फुलपॅन्ट परिधान केलेला आहे. या वर्णनावरून सदर मृतक अनोळखी व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर पोलीस स्टेशन, माजरीचे ठाणेदार अजितसिंग देवरे 9921781289, पोलीस नियत्रंण कक्ष,चंद्रपूर 07172-251200 तसेच पोलीस स्टेशन, माजरी येथील 07175-299263 दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

00000

Saturday 27 May 2023

शासन आपल्या दारी : मनरेगाचा आधार ; मजुरांना नियमित रोजगार

 







शासन आपल्या दारी :

मनरेगाचा आधार मजुरांना नियमित रोजगार

चंद्रपुर :- दि.२७:  मनरेगा कामांची नियोजनपूर्वक आखणी करून प्रभावी अंमलबजावणी केल्याने यावर्षी चंद्रपुर जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सुरु असलेल्या कामावर मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील मजुरांनी हजेरी लावली आहे. मजुर उपस्थितीमध्ये चंद्रपुर जिल्हा आज राज्यात द्वितीय स्थानांवर तर ग्रामपंचायत अंतर्गत कामाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यातंर्गत सर्व तालुक्यामधील नरेगाच्या विविध कामावर आज रोजी ७१ हजार ६४३ एवढे मजुर काम करीत आहे.

शेतीमधील कामे संपल्यावर शेत मजुरांकडे कोणतीही कामे उपलब्ध राहत नाही. अशा वेळी त्यांना रिकामे राहावे लागते. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी येते. अशा बिकट प्रसंगी ग्रामीण मजुरांना  काम उपलब्ध करुन देण्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना चंद्रपुर जिल्ह्यात महत्तवाची भुमिका बजावत असून ग्रामीणांच्या उदरनिर्वाहास हातभार लावत आहे.

मनरेगा अंतर्गत वैयक्तीक व सार्वजनिक अशा दोन्ही प्रकारची कामे हाती घेतल्या जातेयामध्ये भूमिहीन शेतमजुर व अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी सिंचन विहीरशेततळेमजगीफळभागशेतबांध बंदीस्तीबोळी खोलीकरणनॉडेपशौषखड्डेगुरांचे गोठेबॉयोगॉसशेळी निवाराकुकुटपालन शेड अशी विविध वैयक्तीक स्वरुपाची कामे व तसेच सार्वजनिक भौतिक सुविधांची मालमत्ता निर्माण करणारी कामे जसे गोडावुनग्रामपंचायत भवनग्रामसंघ भवनशेत पांदन रस्तेतलावतील गाळ काढणेवृक्ष लागवड अशी अनेक कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत घेतली जातात. याकरिता ग्रामपंचायती अंतर्गत सर्व कामाचे नियोजन अर्थिक वर्ष सुरु व्हायच्या आधीच करण्यात येते. सदर वार्षीक नियोजन आराखडा सर्वव्यापक व सर्वंकश बनविण्यावर जिल्हा परिषद चंद्रपुर प्रशासनांकडुन विशेष प्रयत्न केल्या जात आहे.

 जास्तीत-जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे तसेच जिल्ह्यात नविन्यपुर्ण कामे करण्यावर जिल्हा परिषदेने भर दिला आहे.  यावर्षी ग्रामीण भागात खेळ प्रवृत्तीचा विकास करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील युवकांना सैनिक भरतीपोलीस भरती व इतर स्पर्धापरीक्षेची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागात क्रिडांगण उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी प्रती तालुका पाच क्रिडांगणाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देवुन एकूण ७५ कामे जिल्हयात एकाच वेळी मनरेगामधुन सुरु केली आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात एक गोडावुन व ग्रामसंघ भवन तयार करण्याचे नियोजन केले आहे.

 जिल्ह्याला मागील वर्षी केंद्रशासनाने ३५.२३ लक्ष मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट दिले असतांना जिल्ह्याने  ४९.६१ लक्ष मनुष्यदिवस निर्मिती केली होती. चालु वर्षाकरिता केंद्राने ३७.५८ लक्ष मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट दिले असतांना  जिल्हा परिषदेतर्फे ५० लक्ष मनुष्यदिवस निर्मितीचा प्रयत्न आहे. एकंदरीत मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन आपल्या दारी हजर राहून  प्रभावी उपाययोजना राबवित असल्याचे  दिसून येते.

 

जिल्हयात सर्व तालुक्यात मनरेगा योजनेतुन नाविण्यपुर्ण कामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती  उप मुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा)कपिल कलोडे यांनी दिली आहे.

 

 

चंद्रपुर जिल्हयांतुन मोठ्या प्रमाणात मजुरीसाठी होणारे स्थलांतरण मनरेगा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे कमी करणे शक्य झाले असून क्रिडांगणगोडावुन इत्यांदीसारख्या मत्ता ग्रामीण भागात या योजनेमुळे उभ्या राहत असल्याच्या भावना विवेक जॉनसन यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

मजुरांना कठीण काळातही नियमित रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मनरेगाअंतर्गत जास्तीत जास्त कामे घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या आहेत.

 

 

-- जिल्हा माहिती कार्यालयचंद्रपूर..

00000

Friday 26 May 2023

मजूरांना नियमित रोजगारासाठी मनरेगाची कामे वाढवा

 

मजूरांना नियमित रोजगारासाठी मनरेगाची कामे वाढवा

भद्रावती तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांनी केली मनरेगा कामाची पाहणी

चंद्रपूर दि. २६ : मजुरांना मनरेगा कामाच्या माध्यमातून  नियमितपणे रोजगार प्राप्त  होण्यासाठी मनरेगाअंतर्गत जास्तीत जास्त कामे घेऊन मजुर उपस्थिती वाढविण्याचे  निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी अधिकाऱ्यांना दिले.

 जिल्हाधिकारी यांनी आज  भद्रावती तालुक्यातील मुधोली, कोंढेगाव व टेकाडी येथे मनरेगा अंतर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. त्यांनी मजुरांशी संवाद साधला व मनरेगाच्या कामाची माहिती तसेच मजुरांच्या समस्या जाणुन घेतल्या.

याप्रसंगी  उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, कृषी अधिकारी सुशांत गादेवार,  शंकर भांदक्कर, श्री. चौले, जयंत टेंभुरकर,  विक्रांत जोशी, सुरज खोडे, अतुल खंडाळे, सुनिल पारोधी उपस्थित होते.

00000

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण व्हावी


पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण व्हावी

पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे मनपा आयुक्तांना निर्देश

चंद्रपूर, दि. २६ : पावसाळ्यापूर्वी चंद्रपूर शहरातील नालेसफाईची सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी महानगरपालिका आयुक्त यांना दिले आहेत.

चंद्रपूर शहरातील मोठे व छोटे  नाले आणि गटारीमध्ये  पावसाचे पाणी तुंबल्यास ते नागरिकांच्या घरात साचून नागरिकांची गैरसोय होऊ शकते. ही बाब टाळण्यासाठी युद्धस्तरावर या सर्व नाल्यांची सफाई करणे, त्यातील गाळ काढणे, प्रसंगी नाल्यांचे रुंदीकरण करणे ही कामे करण्याचे निर्देश ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मनपा आयुक्तांना दिलेत.

मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी जेसीबी यंत्राचा वापर करावा, नाल्यातील पाणी नागरिकांच्या घरांमध्ये कोणत्याही परिस्थितीत शिरणार नाही यासाठी नाल्यांचा प्रवाह सुस्थितीत ठेवण्याची सूचनाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी केली. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बरेचदा दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होण्याचा धोका असतो. विशेषत: नाल्यांच्या शेजारून गेलेल्या जलवाहिनींमध्ये गळती असल्यास हा धोका अधिक वाटतो. त्यातून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नाले, गटारी यांचे निर्जंतुकीकरण करावे. अशा सूचना पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मनपा आयुक्त यांना दिले आहेत.

00000

अवैध रेती वाहतूकीत जप्त वाहनांचा जाहीर लिलाव 7 जून रोजी

 अवैध रेती वाहतूकीत जप्त वाहनांचा जाहीर लिलाव 7 जून रोजी

चंद्रपूर, दि. 26: तहसील कार्यालय, चंद्रपूर येथील पथकाद्वारे अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतुक करताना आढळून आलेल्या वाहनांच्या वाहन मालकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली होती. परंतु, वाहन मालकांनी त्यांच्यावर ठोठाविण्यात आलेली दंडाची रक्कम त्यांना वाजवी संधी देऊनही अद्यापपर्यंत सरकार जमा केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या तरतुदींना अधीन राहून सदर दंडाची रक्कम जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करणे अपेक्षित आहे. त्यामुळे सदर वाहनांचा लिलाव करण्यात येत आहे.

वाहनांचा जाहीर लिलाव दि. 7 जुन 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता तहसिल कार्यालय,चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे. या लिलावामध्ये ट्रक 1, ट्रॅक्टर 10, तीनचाकी ऑटो 4 व  हाफटन 5 असे एकुण 20 वाहनांचा लिलाव करण्यात येत आहे. लिलावाबाबत सविस्तर माहिती तहसिल कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. असे चंद्रपूरचे, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी कळविले आहे.

00000

Wednesday 24 May 2023

26 ते 28 मे रोजी जी.डी.सी.ॲन्ड ए व सी.एच.एम.परीक्षा


26 ते 28 मे रोजी जी.डी.सी.ॲन्ड ए व सी.एच.एम.परीक्षा

चंद्रपूर दि. 24 :  सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकिय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.अॅण्ड .) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा दि. 26, 27 व 28 मे, 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 व दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत भवानजीभाई हायस्कुल, मुल रोड, चंद्रपूर येथे घेण्यात येणार आहे.

ज्या परीक्षार्थीनी 2023 च्या परीक्षेकरीता अर्ज केले आहेत, अशा परीक्षार्थीनी आपले ओळखपत्र युजर आयडीवापरुन संकेतस्थळावरुन काढुन घ्यावे. तसेच ज्या परीक्षार्थीचे ओळखपत्र मिळाले नाहीत अशा परीक्षार्थीनी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, निवडणुक ओळखपत्र, वाहन परवाना, कार्यालयाचे ओळखपत्र दाखवून प्रोव्हिजनल ओळखपत्र या कार्यालयाकडून दि. 25 मे 2023 पर्यंत बनवुन घेण्यात यावे. असे जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांनी कळविले आहे.

00000


केपीसीएल एम्प्टा प्रकल्पास जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट


केपीसीएल एम्प्टा प्रकल्पास जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट

Ø प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन

चंद्रपूर दि. 24 :   बरांज येथील केपीसीएल एम्प्टा खाण प्रकल्पास जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी नुकतीच भेट देवून तेथील कामाचा आढावा घेतला तसेच बरांज येथील प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. उर्वरित भूसंपादन, प्रकल्प विस्तार, शेतनुकसान, रोजगार व  व रहिवास याबाबतच्या समस्या लवकर मार्गी लावण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे, उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी, तहसिलदार अनिकेत सोनवणे, पोलिस निरीक्षक बिपिन इंगळे व कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

00000

29 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिर

 


29 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिर

चंद्रपूर, दि. 24: तहसील कार्यालय, चंद्रपूर व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरिय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिराचे आयोजन 29 मे रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे.

समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, महिलांच्या हक्काचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा.  तसेच शासकीय यंत्रणेकडून महिलांच्या अडचणींची सोडवणूक व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा मिळावी या उद्देशाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरास महानगरपालिका, तालुका वैद्यकीय अधिकारी, पोलीस विभाग, शिक्षण, कृषी, भूमि अभिलेख, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एसटी महामंडळ, पशुसंवर्धन, समाजकल्याण, उमेद, महावितरण, महिला व बालविकास, पुरवठा विभाग व तालुक्यातील इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून विविध योजनांची माहिती देणार आहे. त्यासोबतच जिल्हास्तरावरून वन स्टॉप सेंटर, चाईल्ड लाईन व बाल संरक्षण कक्ष या विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.

तरी, महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

00000

ओबीसी महामंडळाची एकरक्कमी परतावा योजना


ओबीसी महामंडळाची एकरक्कमी परतावा योजना

Ø  थकीत व्याजावर 50 टक्के सवलत

चंद्रपूर, दि. 24: ओबीसी थकीत कर्ज प्रकरणात महामंडळाच्या थकीत लाभार्थ्यांसाठी संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत देण्याची एकरक्कमी परतावा ओटीएस योजना दि. 31 मार्च 2024 पर्यंत राबविण्यात येत आहे.

त्याअनुषंगाने, महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे महाराष्ट्र राज्य, इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

00000

कृषी विद्यापीठाच्या दैनंदिनीतील शिफारशीनुसारच शेतक-यांना खते, बियाणे व किटकनाशके वापराबाबत कृषी केंद्रानी सल्ला द्यावा

 


कृषी विद्यापीठाच्या दैनंदिनीतील शिफारशीनुसारच शेतक-यांना खते, बियाणे व किटकनाशके वापराबाबत कृषी केंद्रानी सल्ला द्यावा

Ø कृषी केंद्रधारकांना कृषी विद्यापीठाची दैनंदिनी ठेवणे बंधनकारक

चंद्रपूर, दि. 24: जिल्हयातील सर्व कृषी केंद्रधारकांना कृषी विद्यापीठाची  दैनंदिनी ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. कृषी विद्यापीठाच्या  दैनंदिनीचा अभ्यास करून शेतक-यांना खते, बियाणे व किटकनाशके कसे व किती वापरावे याबाबत मार्गदर्शन करावे. पिकावर किडीच्या तीव्रतेनुसार औषधाची फवारणी करावी. अगोदर जैविक, बायोलॉजीकल नंतर किडीची नुकसानीची  पातळी किती आहे. यावरून हिरवा, निळा, पिवळा व लाल चिन्ह असलेली औषधी फवारणीबाबत मार्गदर्शन करावे.

कृषी शास्त्रज्ञांनच्या अहवालानुसार गरज नसतांना शेतक-यांना अनावश्यक किटकनाशके दिल्या जात असल्यामुळे  शेतक-यांचा उत्पादनाचा खर्च वाढून  निव्वळ उत्पन्न कमी होत आहे. तसेच रासायनिक औषधाच्या जास्त वापरामुळे पिकासाठी उपयुक्त असे जिवजंतू व मित्र किडीची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे कृषी विदयापिठाच्या दैनंदिनीमधील शिफारसीनुसार खते, बियाणे व औषधी दिल्यास शेतक-यांचा उत्पादनाचा खर्च कमी होवून निव्वळ उत्पन्न वाढेल व पर्यावरणाचे होणारे नुकसान कमी होवून त्याचा समतोल साधला जाईल.  

जिल्हयात रासायनिक किटकनाशकाच्या अनावश्यक व अतीवापरामुळे रू. 100 पेक्षा ज्यादा कोटीची गरज नसतांना किटकनाशके वापरली जातात. रासायनिक किटकनाशकाऐवजी, जैविक किटकनाशकांचा वापर केला तर मित्र किडीची संख्या वाढून पर्यावरण सुधारेल. त्यामुळे कृषीकेंद्रानी जैविक निविष्ठा ठेवणे गरजेचे आहे. तसेच बियाणे खरेदीच्या वेळी शेतक-यांना बियाणे उगवणक्षमतेचे प्रात्यक्षिके दाखवण्यात यावी. यावरून बियाण्याची उगवणक्षमता किती आली हे लक्षात येते. 100 दाण्यापैकी सरासरी  70 किंवा त्यापेक्षा जास्त उगवणक्षमता आलेले बियाणे शेतक-यांनी पेरणी करावे. याबाबत त्यांना मार्गदर्शन करावे.  कृषी  विद्यापीठाच्या  दैनंदिनीनुसार खते, बियाणे व औषधे कृषीकेंद्र धारकांनी शेतकऱ्यांना दयावी. तसे न केल्यास कृषीकेंद्राचे परवाने रद्द करण्यात येईल. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी  कळविले आहे.

00000


Tuesday 23 May 2023

पर्यावरणपूरक जीवन पध्दती अभियानांतर्गत कार्यशाळा संपन्न


पर्यावरणपूरक जीवन पध्दती अभियानांतर्गत कार्यशाळा संपन्न

चंद्रपूर, दि. 23: संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाईफस्टाईल फॉर द एन्व्हायरमेंट (युएफई) अभियानाची घोषणा केली. हवामान बदलांच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, हे या अभियानाचे ध्येय आहे. या मोहिमेअंतर्गत दि. 22 ते 28 मे या कालावधीत जिल्हा तसेच तालुका पातळीवर यासंबंधी प्रशिक्षण कार्यशाळा, किसान गोष्टी आदी कार्यक्रमांचे आयोजन  करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या अनुषंगाने 22 मे रोजी आत्मा सभागृह, चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली. 

सदर कार्यशाळेमध्ये हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञान वापरातील शेतकऱ्यांपुढील आव्हाने, हवामानातील बदलास प्रतिकारक्षम पीक काढणीपूर्व व काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा अवलंब, जसे भरड धान्याच्या व कडधान्याच्या पेरा क्षेत्रात वाढ तसेच अन्य पिकांच्या विशिष्ट वाणांचा वापर, हवामान बदलावर मात करून उत्पादकता वाढवता येईल असे तंत्रज्ञान, हवामान बदलावर मात करण्यासाठी मृद संधारणाच्या मशागत पद्धती, पीक संरक्षण तंत्रज्ञानासह शाश्वत कृषी उत्पादन पद्धती, पीक वैविधता आणि पीक पद्धतीत बदल करून भविष्यातील शाश्वत अन्न सुरक्षेसाठी वापरावयाचे उपरोक्त बाबी साध्य करण्यासाठी ऊर्जा व पाणी बचत आणि पौष्टिक तृणधान्याचा वापर या घटकावर भर देणे आदी बाबींचा प्रामुख्याने समावेश करण्यात येत असल्याचे आत्माच्या प्रकल्प संचालक, प्रिती हिरुळकर, यांनी जिल्हास्तरीय कार्यशाळेत मत  व्यक्त केले.

कार्यशाळेत कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, राजुऱ्याचे उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश पवार, चिमुरचे तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे, पोंभूर्णाचे तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड तसेच गणेश मादेवार, मंडळ कृषी अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक व शेतकरी उपस्थित होते.

000000

स्वाधार योजनेवर 25 मे रोजी कार्यशाळा


 स्वाधार योजनेवर 25 मे रोजी कार्यशाळा

चंद्रपूर, दि. 23: अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जातीच्या विद्यार्थ्यांकरीता शासनाने वसतिगृहाची योजना आणली. तथापि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत वसतिगृहाची क्षमता कमी पडत असल्याने विद्यार्थ्यांकरीता शासनाने स्वाधार योजना लागू केली. सदर योजनेच्या प्रचार, प्रसार व जनजागृती करीता सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातर्फे 25 मे रोजी सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 11 वाजता एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यशाळेचे उद्घाटन समाज कल्याण विभागाचे नागपूर येथील प्रादेशिक उपायुक्त यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यशाळेला जात पडताळणीचे उपायुक्त तसेच संशोधन अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच जिल्ह्यातील समान संधी केंद्र स्थापीत सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित राहणार आहेत.

तरी, अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.

000000

मका खरेदी नोंदणीसाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ

 


मका खरेदी नोंदणीसाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ

चंद्रपूर, दि. 23: पणन हंगाम 2022-23 रब्बी (उन्हाळी) मधील शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मका खरेदी नोंदणीकरिता 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच नोंदणी करताना ज्या शेतकऱ्याचा सातबारा आहे, त्याच शेतकऱ्याचे प्रत्यक्ष छायाचित्र अपलोड करणे आवश्यक करण्यात आले आहे. तरी ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे, त्याच शेतकऱ्यांनी लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वतः खरेदी केंद्रावर उपस्थित राहून नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांनी केले आहे.

ही आहेत खरेदी केंद्रे:

सावली तालुक्यातील सेवा सहकारी संस्था पाथरी, कृषी उत्पन्न बाजार समिती मुल, व कृषी उत्पन्न बाजार समिती पोंभुर्णा ही खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली आहे.

00000

 

Saturday 20 May 2023

नवेगाव-नागझिरा पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास





 

नवेगाव-नागझिरा पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

Ø नवेगाव प्रकल्पात दोन नव्या पाहुण्याचे आगमन

Ø अभयारण्यात वाघिणीचे स्थानांतरण

गोंदियादि. २०:- संशोधनपर्यटनसंवर्धन व ईन ब्रिडिंग या चार मुद्यांवर आधारित कार्य वनविभागाने हाती घेतले असून त्या अंतर्गत आज नवेगाव-नागझिरा अभयारण्यात वाघिणीचे स्थानांतरण करण्यात आले. नैसर्गिक अधिवासासाठी येथील जंगल उपयुक्त आहे. वाघिणीच्या आगमनामुळे नवेगाव नागझिरा अभयारण्य वन्यजीव प्रेमीअभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प नैसर्गिक अधिवासासाठी उत्तम ठिकाण असून आज सोडण्यात आलेल्या वाघिणींच्या प्रजननातून वाघांची पुढील पिढी दर्जेदार निर्माण होण्यास सहाय्यभूत ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 ब्रम्हपुरी भूभागातून आणण्यात आलेल्या वाघीण नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सोडण्यात आल्या. या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार सुनील मेंढेअशोक नेतेआमदार विजय रहांगडालेमनोहर चंद्रिकापुरेप्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्तामुख्य वनसंरक्षक प्रादेशिक रंगनाथ नाईकडेमुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी प्रकल्प डॉ. रामगावकरविशेष पोलीस महासंचालक संदीप पाटीलउपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक नवेगाव नागझिरा जयरामेगौडा आर.निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रेउपसंचालक पवन जेफविभागीय वन अधिकारी प्रदीप पाटील व राजेंद्र सदगीर यावेळी उपस्थित होते.

 जगात चौदा देशात वाघांचा अधिवास आहे. वाघांची सर्वाधिक संख्या ही भारतात व त्यातही महाराष्ट्र विदर्भात आहे. महाराष्ट्रात २०१४ मध्ये १९० वाघ होते ते २०१९ च्या गणनेत ते ३१२ झाले आणि आता ५०० च्या वर वाघांची संख्या आहे. यात सर्वाधिक वाघ विदर्भात आहेत. याचाच अर्थ विदर्भ हे जगाचे टायगर कॅपिटल झाले आहे असे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. भारत सरकारने पहिल्या टप्प्यात पाच वाघांचे स्थानांतरण करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार आज नवेगाव नागझिरा प्रकल्पात वाघिणीचे स्थानांतरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी ११ वाघ असून वीस वाघ अधिवास क्षमता असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले कीवन्यजीव प्रेमीअभ्यासक व पर्यटकांसाठी नवेगाव नागझिरा आकर्षण केंद्र ठरणार आहे.

  पुढील टप्प्यात तीन वाघांचे स्थानांतरण करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. नवेगाव नागझिरा प्रकल्पात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. स्थानिक ४०० युवकांना प्रशिक्षण तसेच शंभर वाघमित्र नेमले आहेत. वाघमित्रांना दोन हजार रुपये सन्माननिधी देण्यात येत येतो. तसेच पर्यटकांसाठी अत्याधुनिक सहा वाहने देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  सारस संवर्धनासाठी ६२ कोटींचा आराखडा बनविण्याच्या न्यायालयाच्या सुचना आहेत त्यावर काम सुरू असल्याचे मंत्री म्हणाले.

पाच वाघांचे स्थानांतरण गेली दहा महिने वन विभाग या विषयावर काम करत होते. माळढोक व गिधाड पक्षी संवर्धन सुद्धा गरजेचे असून त्यासाठी वनविभाग आराखडा बनवित असल्याचे त्यांनी सांगितले. चिमण्या आता कमी दिसतात. येणाऱ्या पिढीला चिमणी केवळ कथा कवितेतूनच समजू नये म्हणून चिमण्यांचे संवर्धन आवश्यक आहे असे ते म्हणाले. कुरण विकास करणे व पाणवठे वाढविणे यावरही काम सुरू आहे.

नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र  महाराष्ट्रातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात स्थित असून 2013 मध्ये अधिसूचित करण्यात आलेला हा व्याघ्र प्रकल्प आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र हा देशातील 46 वा व राज्यातील 5 वा व्याघ्र प्रकल्प असून प्रोजेक्ट टायगर अंतर्गत स्थापना करण्यात आलेला आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे गाभा क्षेत्र 656.36 चौ.कि.मी. आहे तसेच 1241.24 चौ. कि.मी. बफर क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. ऑल इंडिया टायगर ईस्टिमेशन 2022 च्या अहवाल नुसार नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रा मधे किमान 11 प्रौढ वाघ असल्याचे नमूद आहे. सध्यस्थितीत व्याघ्र क्षेत्र हा कमी व्याघ्र घनतेचा भूभाग असूननवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात 20 प्रौढ वाघ वास्तव्य करण्याची क्षमता आहे.

वाघांचे संवर्धन व स्थानांतर (Conservation Translocation of Tigers) या उपक्रमा अंतर्गत एकूण 4-5 मादी वाघिणींना ब्रह्मपुरी भूभागातून नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात स्थानांतरीत करणे प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यात 2 मादी वाघिणीचे नागझिरा वन्यजीव अभयारण्य येथे आज स्थलांतर करण्यात आले आहे. दोन्ही वाघिणींना नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या गाभा भागात सोडण्यात आले. वाघिणींना सोडल्या नंतर सॅटेलाईट जीपीएस कॉलर व व्हिएचएफ (Satellite GPS collar व VHF) च्या सहाय्याने दोन्ही वाघिणींचे 24 x 7 सक्रियपणे सनियंत्रण केले

जाईल. संपूर्ण सनियंत्रणाचे कार्य हे कमांड आणि कंट्रोल रूम साकोली येथून नियंत्रीत केले जाणार आहे. या दोन स्थलांतरित वाघिणींच्या निरीक्षणानंतर व उर्वरित घटक लक्षात घेऊन इतर मादा वाघांना टप्प्याटप्प्याने स्थानांतरीत केले जाईल.

  या उपक्रमामुळे नवेगाव-नागझिरा व्याघ राखीव क्षेत्रात भविष्यात वाघाच्या संखेत वाढ होवून प्रकल्पात पर्यटनाला चालना मिळू शकते. स्थानिकांना उपजीविकेच्या संधी निर्माण होतील तसेच जास्त व्याघ्र संख्या असलेल्या ब्रह्मपुरी भूभागातील मानवी वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय ठरू शकतो.

00000