घड्याळी तासिका तत्वावर शिक्षक पदाकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित
Ø 15 मे पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
चंद्रपूर,दि. 04: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय शाळांमध्ये सत्र 2023-24 करीता घड्याळी तासिका तत्वावर उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक व पदवीधर प्राथमिक शिक्षकांची शासन निर्णयानुसार नेमणूक करावयाची आहे. याकरीता इच्छुक अहर्ता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. 15 मे 2023 पर्यंत राहील.
उच्च माध्यमिक शिक्षक या पदाकरीता इंग्रजी, मराठी, गणित, भौतिक, रसायन, जीवशास्त्र या विषयासह एम.ए., एम.एससी, बी.एड शैक्षणिक अहर्ता धारण केलेली असावी. माध्यमिक शिक्षक पदाकरीता विज्ञान, गणित, इंग्रजी व मराठी विषयासह बी.एससी बी.एड, प्राथमिक शिक्षक पदाकरीता सर्व विषय घेता यावे यासह बी.ए. डि.एड तर पदवीधर प्राथमिक शिक्षक पदाकरीता मराठी व इंग्रजी विषयासह बी.ए. डी.एड शैक्षणिक अहर्ता धारण केलेली असावी. मानधन शासन निर्णयानुसार देय राहील.
पदाकरीता अटी व शर्ती:
आश्रमशाळेच्या 20 किलोमीटर परिसरातील स्थानिक उमेदवारांना शैक्षणिक अहर्ता व अनुभवानुसार प्रथम प्राधान्य देण्यात येईल. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांच्या पत्रानुसार, आवश्यकतेनुसार भरावयाची पदे कमी/अधिक करण्याचे तसेच इतर बाबतीत वेळेवर बदल करण्याचे, भरती प्रक्रिया रद्द करण्याचे तसेच पदे संपुष्टात आणण्याचे संपूर्ण अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांना राहील. असे सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) एस.जी.बावणे यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment