सामाजिक न्याय पर्व उपक्रमातंर्गत दिव्यांग हक्क अधिनियम व दिव्यांग शाळा संहिता विषयावर कार्यशाळा
चंद्रपूर,दि. 03 : समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या प्रेरणेतून दि. 1 एप्रिल ते 1 मे 2023 पर्यंत सामाजिक न्याय पर्व उपक्रम साजरा करण्यात आला. याअंतर्गत दिव्यांग हक्क अधिनियम 2016 व दिव्यांग शाळा संहिता 2018 या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा राबविण्यात आली.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपील कलोडे, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी अशोक मातकर, नागपूर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प समन्वयक अभिजीत राऊत, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. हिरुडकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी कार्यशाळेत उपस्थित दिव्यांग शाळा कर्मचारी व दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेतील दिव्यांग व्यक्तींना 4 टक्के आरक्षणाबाबत तसेच 5 टक्के दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत व शासकीय योजनांचा लाभ दिला जाईल व दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण संगणकीय प्रणाली विकसीत करुन करण्याबाबत मार्गदर्शन केले.
नागपूर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प समन्वयक अभिजीत राऊत यांनी दिव्यांग हक्क अधिनियम 2016 मधील कायदे व अधिकार संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. त्यासोबतच शासनाच्या दिव्यांग व्यक्तींसाठी असलेले विविध कायदे व धोरणांसंदर्भात सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर संजय पेचे यांनी दिव्यांग शाळा संहिता 2018 मधील तरतुदी, नियम व शासन निर्णयाबाबत सविस्तर माहिती दिली.
सदर कार्यशाळेला जिल्हा परिषद व समाज कल्याण विभागातील कर्मचारी, जिल्हयातील दिव्यांग शाळेतील कर्मचारी व इतर दिव्यांग बांधव उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रस्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांनी तर आभार आनंद मुकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भसारकर यांनी मानले.
००००००
No comments:
Post a Comment