Search This Blog

Friday 30 April 2021

गत 24 तासात 1415 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात 1415 कोरोनामुक्त,

1667  पॉझिटिव्ह तर 28 मृत्यू

Ø  आतापर्यंत 42,823 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 16,584

चंद्रपूर, दि. 30 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 1415 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1667 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 28 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 60 हजार 312 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 42 हजार 823  झाली आहे. सध्या 16 हजार 584  बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 76 हजार 722 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 11 हजार 662 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील रामनगर येथील 70 वर्षीय महिला व 74 वर्षीय पुरुष, छत्रपती नगर येथील 49 वर्षीय पुरुष, 37 व 61 वर्षीय पुरुष, विश्वकर्मा नगर येथील 52 वर्षीय महिला, म्हाडा कॉलनी परिसरातील 62 व 72 वर्षीय पुरुष, रयतवारी कॉलनी परिसरातील 43 वर्षीय पुरुष, इंदिरा नगर येथील 27 वर्षीय पुरुष, दुर्गापूर येथील 55 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 62 वर्षीय महिला, बोर्डा चंद्रपूर येथील 70 वर्षीय महिला,  भिवापूर येथील 78 वर्षीय पुरुष. वरोरा तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष, जिवती तालुक्यातील 63 वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील 48 वर्षीय पुरुष, खापरी येथील 76 वर्षीय महिला, मासळ येथील 50 वर्षीय पुरुष. नागभीड तालुक्यातील 50 वर्षीय पुरुष, तळोधी येथील 65 वर्षीय पुरुष, गडचांदूर येथील 58 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्या नगर येथील 75 वर्षीय महिला, राजुरा तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष, यवतमाळ येथील 75 वर्षीय पुरुष व  65 वर्षीय महिला, भंडारा येथील 58 वर्षीय महिला, सावर्ला-पवनी येथील 40 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 905 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 836, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 27, यवतमाळ 27, भंडारा नऊ, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1667 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 381, चंद्रपूर तालुका 81, बल्लारपूर 119, भद्रावती 177, ब्रम्हपुरी 69, नागभिड 88, सिंदेवाही 57, मूल 58, सावली 26, पोंभूर्णा 19, गोंडपिपरी 49, राजूरा 107, चिमूर 60, वरोरा 205, कोरपना 142,  जिवती 11 व इतर ठिकाणच्या 18 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000000

'ब्रेक दी चेन' अंतर्गत निर्बंधास 15 मे पर्यंत मुदतवाढ

 

'ब्रेक दी चेन' अंतर्गत निर्बंधास 15 मे पर्यंत मुदतवाढ

चंद्रपूर दि. 30 एप्रिल : कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सूचनेनुसार  'ब्रेक दि चेन' अंतर्गत जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध व सूचनांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि.1 मे 2021 रोजीचे सकाळी 7:00 वाजेपासून ते दि. 15 मे 2021 रोजीचे सकाळी 7:00 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

 सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी उपरोक्त आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता तसेच साथरोग कायदा  यातील कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

0000000

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर दि. 30 एप्रिल: राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार दि. 1 मे 2021 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि. 1 मे 2021 रोजी सकाळी 5:00 वाजता कमलाई निवास, रामदास पेठ, नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 7:30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन. सकाळी 8:00 वाजता महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहतील.

दुपारी 12:00  वाजता चंद्रपूरवरून सिंदेवाहीकडे प्रयाण करतील. दुपारी 1:30 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन व राखीव राहतील. दुपारी 2:00 वाजता सिंदेवाही येथील कोविड केअर सेंटरला अधिकाऱ्यांसमवेत भेट देतील. दुपारी 2:15 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे कोविड-19 संदर्भात अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतील.

सायंकाळी 4:00 वाजता सिंदेवाही येथून नागपूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6:00 वाजता कमलाई निवास, रामदास पेठ, नागपूर येथे आगमन व मुक्काम राहतील.

0000000

बेरोजगार उमेदवारांनी वैफल्यग्रस्त परिस्थितीतून बाहेर यावे : अमोल यावलीकर

 बेरोजगार उमेदवारांनी वैफल्यग्रस्त परिस्थितीतून बाहेर यावे

: अमोल यावलीकर

37 उमेदवारांनी घेतला वेबिनारचा लाभ

चंद्रपूर दि. 30 एप्रिल:  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि. 28 एप्रिल 2021 रोजी वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जवळपास 37 उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला.

 कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता प्रत्येकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच बेरोजगार उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगारबाबत अनिश्चितता असणे स्वाभाविक आहे. परंतु उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे उमेदवारांना वैफल्यग्रस्त होऊ नये व आलेल्या संकटांना योद्ध्याप्रमाणे सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असे मार्गदर्शन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले.ऑनलाइन वेबिनार प्रसंगी ते बोलत होते.

जातीनिहाय, विविध आर्थिक विकास महामंडळाच्या स्वयंरोजगाराकरिता कर्ज योजना, स्पर्धा परिक्षेची तयारी व समाज कल्याण विभागाच्या योजनांबाबत वेबिनारच्या माध्यमातून उमेदवारांना मार्गदर्शन केले.

 उमेदवारांच्या अंगी उपजत कौशल्याच्या विकास करून त्यामधून अर्थाजन करण्याकरिता केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त, भैय्याजी येरमे  यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली. तर पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रम 3.0,प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान, रोजगार मेळावा या संदर्भात सुद्धा त्यांनी  मार्गदर्शन केले.

 कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांनी आदिवासी उमेदवारांना केंद्र व अभ्यासिकांबाबत योग्य माहिती देत मार्गदर्शन केले. कौशल्य विकास विभाग, चंदपूर तर्फे आयोजित वेबिनारचा  बेरोजगार उमेदवार, कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थेचे संचालक व प्रशिक्षणार्थी, बचत गटाच्या महिला उमेदवार तसेच अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधीचा लाभ घेतला.

 सहायक आयुक्त, अमोल यावलीकर यांनी बेरोजगार उमेदवारांना येणाऱ्या अडचणी व प्रश्नाबाबत समाधानकारक उत्तरे दिली. ऑनलाईन वेबिनारमध्ये सहभागी होत मार्गदर्शन घेतलेले व उपस्थिती नोंदविलेल्या उमेदवारांचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी शैलेश भगत यांनी आभार व्यक्त केले.

0000000

Thursday 29 April 2021

लसिकरणासाठी सुक्ष्म नियोजनासह तयार राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 

लसिकरणासाठी सुक्ष्म नियोजनासह तयार राहण्याचे

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Ø जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक संपन्न

Ø कोरोना उपाययोजना व लसीकरणाबाबत घेतला आढावा

 चंद्रपूर दि. 29 एप्रिल :   राज्य शासनातर्फे 18 वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाबाबत लवकरच विस्तृत सूचना प्राप्त होतील, मात्र तोपर्यंत  लसीकरणाबाबत जिल्हा स्तरावर सूक्ष्म नियोजन करून तयारीत राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी  टास्क फोर्सच्या बैठकीत दिल्यात.

 जिल्ह्यात वाढत असलेली रुग्ण संख्या व त्या संदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच नागरिकांच्या लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक पार पडली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड,उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, अधिष्ठाता डॉ.अरुण हुमणे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की जिल्ह्यात कोरोना सदृश्य परिस्थितीत व्हेंटिलेटर, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, उपलब्ध औषध साठा तसेच कोविडच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी जसे की जम्बो सिलेंडर, ऑक्सीजन प्लांट, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरयासारख्या गोष्टींची कमतरता असल्यास त्वरित उपलब्ध करून घ्याव्यात. 

कोविड काळात रुग्णांना विहित वेळेत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी व्हेंटिलेटर, औषध साठा, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ऑक्सीजन प्लांट, जंबो सिलेंडर इत्यादी आवश्यक साधन सामुग्रीच्या उपलब्ध साठ्याची माहिती तयार करून ठेवावी, असेही ते म्हणाले.

केंद्र शासनाने 18 वर्षावरील सर्व नागरिकांना १ मे पासून लस देण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी  याबाबत राज्य शासनातर्फे  विस्तृत मार्गदर्शन प्राप्त झाल्यावरच प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सध्या लसीकरणासाठी सहा खाजगी लसीकरण केंद्र सुरू असून जिल्ह्यात लसीकरणासाठी 194 टीम कार्यरत आहे. तसेच ग्रामीण भागात आणखी 40 टीम वाढविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी लसीकरण अधिकारी डाॅ.संदीप गेडाम यांनी दिली.

यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तालुक्याचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याशी जिल्हाधिकारी यांनी संवाद साधला. जिल्ह्यात आढळणारे दैनंदिन बाधित रुग्ण, दैनंदिन मृत्यू, होम आयसोलेशन मधील रुग्ण, डिस्चार्ज  झालेले  रुग्ण त्यांची उपलब्ध माहिती पोर्टलवर दैनंदिन अपडेट करावी असे निर्देश दिलेत.

आरटीपीसीआर तपासणी नमुन्यांच्या वाहतुकीसाठी नऊ वाहने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तालुकास्तरावर वाहनांची आवश्यकता असल्यास उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांनी मागणी करून घ्यावी व तसे प्रस्ताव सादर करावे असेही ते म्हणाले.

तालुकास्तरावर ब्रह्मपुरी, मूल, वरोरा या ठिकाणी नव्याने कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये मनुष्यबळ वाढविण्याचे नियोजन करणे. तसेच कोविड केअर सेंटर मधील उपलब्ध बेड, शिल्लक बेड, उपलब्ध मनुष्यबळ, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ऑक्सीजन प्लांट याचा चार्ट तयार करून ठेवावा तसेच तालुकास्तरावर तालुका आरोग्य अधिकारी व तहसिलदार यांनी स्वतः लक्ष घालून कोविड केअर सेंटर तयार करून घ्यावे.

तालुकास्तरावर प्रत्येक ग्रामपंचायतीला आयसोलेशन सेंटर तयार करण्याकरिता निधी उपलब्ध करून दिला आहे, त्या निधीचा अनुषंगिक वापर करावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या. कोरोना संकटाच्या काळात मनुष्यबळाची फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. त्यामुळे तालुकास्तरावर एएनएम पुढे येऊन सेवा द्यावी. त्यांना त्यांच्या तालुक्याच्या कोविड केअर सेंटर मध्येच सेवा उपलब्ध करून देण्यात येईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी म्हटले.

रुग्णांच्या तपासणीसाठी अँटीजेन तपासणी किटची कमतरता असल्यास त्या त्वरित उपलब्ध करून घ्याव्यात. पुढील काळात कार्यालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करण्यात आली आहे त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी इतर विभागाकडून कर्मचारी घेऊन नवीन टीम तयार करून घ्यावी.  टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर द्यावा, रेमंडेसिविर इंजेक्शन,आवश्यक औषध साठा यावर लक्ष केंद्रित करणे अशा सूचना सदर बैठकीत उपस्थितांना देण्यात आल्या.

यावर सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिल्या. बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0 0 0

गत 24 तासात 1064 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात 1064  कोरोनामुक्त,

1741 पॉझिटिव्ह तर 29 मृत्यू

Ø  आतापर्यंत 41,408 जणांची कोरोनावर मात

Ø   ॲक्टीव पॉझिटिव्ह 16,360

चंद्रपूर, दि. 29 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 1064 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1741 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 29 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 58 हजार 645 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 41 हजार 408  झाली आहे. सध्या 16 हजार 360  बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 73 हजार 004  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 9 हजार 565 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील नगीनाबाग येथील 63 वर्षीय पुरुष, 53,60  व 68 वर्षीय पुरुष, लालपेठ कॉलनी परिसरातील 50 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 45,55  व  67 वर्षीय महिला, रामनगर परिसरातील 55 वर्षीय महिला, अरविंद नगर येथील 84 वर्षीय महिला, सरकार नगर येथील 50 वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील 68 वर्षीय पुरुष, वायगाव येथील 60 वर्षीय पुरुष, 70 व 87 वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील 55 वर्षीय महिला,विसापूर येथील 60 वर्षीय महिला. 65 वर्षीय पुरुष,

कोरपना तालुक्यातील 45 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील 50 ‌व 52 वर्षीय महिला, चिमूर तालुक्यातील 58 वर्षीय पुरुष, सरडपार येथील 65 वर्षीय महिला, आडेगाव येथील 43 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील 49 व 57 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील 68  वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 877 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 812, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 27, यवतमाळ 25, भंडारा सात, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1741 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 497, चंद्रपूर तालुका 142, बल्लारपूर 104, भद्रावती 106, ब्रम्हपुरी 121, नागभिड 39, सिंदेवाही 116, मूल 123, सावली 39, पोंभूर्णा 11, गोंडपिपरी 45, राजूरा 98, चिमूर 50, वरोरा 128, कोरपना 87,  जिवती 15 व इतर ठिकाणच्या 20 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0 0 0

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ब्रह्मपुरी येथे ऑक्सीजन प्लांट उभारण्यास मान्यता



 पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ब्रह्मपुरी येथे ऑक्सीजन प्लांट उभारण्यास मान्यता

 तालुक्यात दोन महिन्यात आत 80 टक्के लसीकरण

पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांनी दिले निर्देश

 चंद्रपूर दि. 29 एप्रिल:  ब्रह्मपुरी तालुक्यात मोबाईल व्हॅनच्या व लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ग्रामिण भागातील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचे नियोजन करावे. तसेच येत्या दोन महिन्यात ब्रम्हपुरी तालुक्यातील  80 टक्के नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेऊन काम करण्याचे  निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी येथील कोविड आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत.

तालुक्यात ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनची कमी पडणार नाही याचेही नियोजन करण्यात येत आहे. ऑक्सिजन व रेमडिसिव्हर इंजेक्शन अभावी रुग्ण दगावणार नाही याची सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दक्षता घ्यावी अशा सूचना दिल्या.

ब्रम्हपुरी येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित कोविड विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासमवेत आमदार अभिजित वंजारी, तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस अध्यक्ष राऊत, सिंदेवाही तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोंढे, नगरपरिषद बांधकाम सभापती विलास विखार, नगरसेवक नितीन उराडे, तहसीलदार पवार, ठाणेदार इंगळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. खिलारे, उपविभागीय अभियंता कूचनकर, गट विकास अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात तसेच तालुक्याचे ठिकाणी रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवरील रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे ऑक्सिजन कमी पडू लागल्याने चिंता वाढली आहे. ही ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी या तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सीजन प्लांट उभारणीस मान्यता दिली आहे. येत्या काही दिवसात हे प्लांट उभे राहणार असून याठिकाणी रुग्णांना ऑक्सिजन मिळणे सोयीचे होईल. तसेच तालुक्याच्या ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे व गरजू व आवश्यक रुग्णाला हे इंजेक्शन त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या.

तालुकास्तरावर लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून गावागावात जाऊन नागरिकांना लस देण्याचे काम युध्द पातळीवर करण्यात यावे, नागरिकांनी लसीकरणा दरम्यान गर्दी करू नये व नियमांचे पालन करत लस टोचून घ्यावी,लस सुरक्षित व प्रभावी आहे. तसेच लस ही कोरोना विरोधातील लढ्यात एक मोठं शस्त्र आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी उस्फूर्तपणे सामोरे येऊन लस टोचून घ्यावी असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले.

यावेळी त्यांनी खेड येथील कोविड केअर सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून व्यवस्थेची माहिती घेतली. त्यानंतर शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालय ब्रम्हपुरी येथिल कोविड केअर सेंटरला भेट देत करण्यात आलेल्या उपाययोजना, उपलब्ध ऑक्सिजन बेड, उपलब्ध औषध साठा याची माहिती जाणून घेतली.

0 0 0

राज्याचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे अनावरण

 


राज्याचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे अनावरण

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते संपन्न

चंद्रपूर दि. 29 एप्रिल:- राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक (Index of Industrial Production) तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते आज ऑनलाईन  पद्धतीने संपन्न झाले.

याप्रसंगी उद्योग मंत्री सुभाष देसाई, नियोजन व वित्त राज्य मंत्री श्री शंभूराज देसाई, उद्योग राज्य मंत्री श्रीमती आदिती तटकरे, नियोजन विभाग व उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव, केंद्रिय सांख्यिकी कार्यालयाचे अधिकारी, उद्योग आयुक्त, अर्थ व सांख्यिकी संचालक, इंडस्ट्री असोसिएटचे प्रतिनिधी, अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग संचालनालयाचे सर्व अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

 राज्याच्या औद्योगिक विकासाचे उद्दीष्ट्य साध्य करणे, राज्याचे औद्योगिक धोरण निश्चित करणे, औद्योगिक विकासाच्या योजना ठरविणे यासाठी औद्योगिक क्षेत्रातील चढउताराचे मोजमाप आवश्यक असते. महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये तसेच एकूण उत्पन्नामध्ये राज्याचा हिस्सा मोठा आहे. सदर निर्देशांक राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय उत्पन्न काढणे, देशातील/राज्यातील औद्योगिक प्रगती मोजणे यासाठी तसेच नियोजन करण्याच्या उद्देशाने शासनास अत्यंत उपयुक्त आहे. उद्योग जगतास, या क्षेत्रातील संशोधन तसेच उत्पादन करणाऱ्या संस्था यांना नेहमी याची आवश्यकता भासते.

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील अर्थ व सांख्यिकी संचालनालय, व उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय, यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यामधील निवडलेल्या 568 कारखान्यांकडून दरमहा विहित कालावधीत माहिती व वेब पोर्टलवर नोंद करण्याची जबाबदारी उद्योग संचालनालयाच्या महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांचेवर सोपविण्यात आली आहे. माहितीवर संस्करण करून राज्याचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक अर्थ व सांख्यिकी संचालनालय प्रकाशित करणार आहे.

0 0 0

सिटी स्कॅन व लसीकरण केंद्रावर कोरोनाचे नियम पाळा - जिल्हाधिकारी

 

सिटी स्कॅन व लसीकरण केंद्रावर कोरोनाचे नियम पाळा

 - जिल्हाधिकारी

 चंद्रपूर दि. 29 एप्रिल:- जिल्ह्यात कोरोना तपासणीसाठी आरटीपीसीआर तपासणी केंद्र तसेच सिटीस्कॅन केंद्र व लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, या ठिकाणी संबंधितांनी एकमेकांपासून योग्य अंतर राखत मास्कचा वापर करावा व  कोरोनाचे नियम पाळावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना बाधितांना सिटी स्कॅन करण्याची आवश्यकता नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सिटीस्कॅन करू नये व त्या ठिकाणी रुग्ण व नातेवाईकांनी विनाकारण गर्दी करू नये. तसेच सिटीस्कॅन करणाऱ्या डॉक्टरांनी देखील नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांचे प्रिस्क्रीप्शन असल्याशिवाय केवळ रुग्णांचे विनंती वरून सिटीस्कॅन करू नये, याबाबत संबंधित केंद्रचालकांनी  योग्य खबरदारी घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

0 0 0

ग्रामपंचायतींना विलगीकरण कक्षासाठी मिळणार 1 कोटी 88 लाखचा निधी - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

 

ग्रामपंचायतींना विलगीकरण कक्षासाठी मिळणार

1 कोटी 88 लाखचा निधी - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

चंद्रपूर दि. 29 एप्रिल:- जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधीतांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांकरिता गृह विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध आहे, मात्र ग्रामीण भागातील घरात पुरेशा जागेअभावी गृह विलगीकरणात राहणे शक्य होत नाही किंवा गृह विलगीकरणाचे नियम पाळणे शक्य होत नाही. अशा ग्रामस्थांची योग्य देखभाल व्हावी यासाठी त्यांचेकरिता ग्रामपंचायत स्तरावरच शाळा,  समाजभवन, अथवा ग्रामपंचायतीच्या सोयीनुसार योग्य ठिकाणी विलगीकरण कक्ष उभारून गावातच सोय करण्यासाठी एक कोटी ८८ लाख ३० हजार रुपये अनुदानाचा प्रस्ताव जिल्हा खनिज निधीतून मंजूर करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले.

गावात विलगीकरण कक्ष उभारणे व त्यात प्राथमिक सुविधा निर्माण करणे, गावातील नागरिकांची व बाहेरून आलेल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना वैद्यकीय सेवा पुरवणे, गावात फवारणी करणे, आवश्यक साहित्य खरेदी करणे यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला  खनिज निधीतून अनुदान  उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी पाच हजारावरील लोकसंख्या असलेल्या २२  ग्रामपंचायतीला प्रत्येकी रुपये ५० हजार, दोन हजार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या १६३ ग्रामपंचायतीला प्रत्येकी रु. ३० हजार तर दोन हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ६४३ ग्रामपंचायतीला रु. २० हजार याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण ८२७ ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येणार आहे.

वरील निर्णयामुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांना गावातच विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांनी कोवीड केअर सेंटर मध्येच दाखल व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे..

0 0 0

1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

केवळ जिल्हा मुख्यालयी साधेपणाने सकाळी 8 वाजता होणार ध्वजारोहण कार्यक्रम

चंद्रपूर, दि. 29 : महाराष्ट्र राज्य स्थापनेला 1 मे 2021 रोजी 61 वर्षे पूर्ण होत आहे. कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम केवळ जिल्हा मुख्यालयी अत्यंत साधेपणाने व कमीत कमी उपस्थित आयोजित करण्याच्या शासनाच्या सुचना प्राप्त झाल्या आहे. त्यानुसार शनिवार दि. 1 मे रोजी सकाळी 8 वाजता राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमीन विकास विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न होणार आहे.

0 0 0

Wednesday 28 April 2021

गत 24 तासात 1026 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात 1026  कोरोनामुक्त,

1224 पॉझिटिव्ह तर 20 मृत्यू

Ø  आतापर्यंत 40,344 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 15,712

चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 1026 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1224 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 20 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 56 हजार 904 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 40 हजार 344  झाली आहे. सध्या 15 हजार 712 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 68 हजार 438  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 6 हजार 641 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील जयराज नगर, तुकुम येथील 53 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला,फुले चौक परिसरातील 72 वर्षीय पुरुष, ऊर्जानगर येथील 40 वर्षीय पुरुष, 67 वर्षीय पुरुष, बिनबा वार्ड येथील 34 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, घुगुस येथील 58 वर्षीय पुरुष, वडगाव येथील 70 वर्षीय पुरुष. राजुरा तालुक्यातील विरुर येथील 67 वर्षीय महिला, मुल तालुक्यातील 80 वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील 63 वर्षीय पुरुष, कोरपना तालुक्यातील वनसडी येथील 68 वर्षीय पुरुष. गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील 45 वर्षीय महिला, चिमूर  तालुक्यातील जामगाव येथील 48 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील हनुमान नगर येथील 68 वर्षीय पुरुष. नागभीड तालुक्यातील 70 वर्षीय महिला, भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील 75 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील 51 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 848 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 783, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 27, यवतमाळ 25, भंडारा सात, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1224 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 424, चंद्रपूर तालुका 65, बल्लारपूर 95, भद्रावती 143, ब्रम्हपुरी 50, नागभिड 42, सिंदेवाही 22, मूल 00, सावली 44, पोंभूर्णा 04, गोंडपिपरी 27, राजूरा 59, चिमूर 94, वरोरा 109, कोरपना 26, जिवती 07 व इतर ठिकाणच्या 13 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000000

रुग्णवाहिकांचे भाडेदर जाहीर जादा दर आकारल्यास गुन्हा नोंदविणार

 


रुग्णवाहिकांचे भाडेदर जाहीर

    जादा दर आकारल्यास गुन्हा नोंदविणार

- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे

चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्चित करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या सुचनांच्या अनुषंगाने व परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निर्देशाप्रमाणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेऊन रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्चित केले  आहेत. यानुसार पहिले 25 किलोमीटर अंतर अथवा 2 तास यासाठी मारूती व्हॅन करिता 800 रुपये व त्यापुढील प्रत्येक किलोमीटर साठी 15 रुपये, टाटा सुमो व मॅटॅडोर सदृष्य वाहनाकरिता पहिल्या 25 किलोमीटरसाठी  900 रुपये व त्यापुढील प्रत्येक किलोमीटर साठी 15 रुपये, टाटा 407, स्वराज माझदा इ. साठी रु. 1200 व रु. 18 प्रती कि.मी., आय.सी.यू. अथवा वातानुकूलित वाहनाकरिता रु. 2000 व रु.25 प्रती कि.मी. याप्रमाणे रुग्णवाहिकेचे दर ठरविण्यात आले आहेत.

  जे वाहन चालक व मालक विहीत भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणी करतील, त्यांचेवर पहिल्या गुन्ह्यासाठी रुपये पाच हजार, दुसऱ्या गुन्ह्यासाठी रुपये दहा हजार व तिसऱ्या गुन्ह्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद घेण्यात येईल.

नागरिकांनीही उपरोक्त ठरविलेल्या दरापेक्षा अधिक भाडे देऊ नये व याबाबत काही तक्रारी असल्यास उप प्रादेशिक परिवहन कार्यालयास लेखी स्वरूपात किंवा mh३४@mahatranscom.in या ई-मेल पत्त्यावर तक्रार सादर करण्यात यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

0000000

कोविड लसिकरण हेल्पडेस्क सेंटरचे उद्घाटन

 

कोविड लसिकरण हेल्पडेस्क सेंटरचे उद्घाटन

लसिकरण संदर्भात नोंदणी, मार्गदशन, शंकांचे करणार समाधान

चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : जिल्हयातील सर्व नागरिकांकरिता कोविड लसिकरणाबाबत काही शंका तथा माहिती व मार्गदर्शन करिता जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे कोविड लसिकरण हेल्पडेस्क सेंटर सुरु करण्यात आले असुन सदर केंद्राचे हेल्प लाईन क्र. 07172-254208 आहे.

 

आज दिनांक 28 एप्रिल 2021 रोजी जिल्हा शल्य चिकीत्सक तथा कोविड-19 इंसिडंट कमांडर डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशिक्षण केंद्र रुम क्र. 8, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे कोविड लसिकरण हेल्पडेस्क सेंटर चे उद्घाटन जिल्हा लसिकरण अधिकारी डॉ. सदिप गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले.

 राज्यात कोविड-19 आजारावर नियंत्रण व उपाययोजना म्हणुन वयोगट 45 व त्यावरील सर्व वयोगटातील व्यक्तींना कोविड लसिकरण करण्यात येत असुन दिनांक 1 मे 2021 पासुन वयोगट 18 व त्यावरील सर्व वयोगटातील व्यक्तींना कोविड लसिकरण करण्यात येणार आहे. सर्व जनतेकरिता कोविशिल्ड व कोव्हॉक्सीन असे दोन्ही लसिचे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. कोविशिल्ड व कोव्हॉक्सीन ह्या दोन्ही लसींना भारत सरकारची मान्यता असुन दोन्ही लस पुर्णपणे सुरक्षीत व प्रभावी आहेत, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये व कोणत्याही प्रकारची शंका किंवा भीती बाळगता लस घ्यावी.

तसेच कोविड लसिकरण संदर्भात नोदंणी करिता मार्गदशन, शंका तथा काही समस्या उद्भवल्यास उपरोक्त हेल्पलाईन क्रमांकावर  सकाळी 9 ते सायंकाळ 6 या कालावधी दरम्यान संपर्क साधुन माहिती व मार्गदर्शन प्राप्त करुन घ्यावी, असे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम यांनी यावेळी सांगितले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिष मोटे, सल्लागार रामेश्वर बारसागडे, तसेच आशा बावणे, अश्विन सावलीकर, योगेंद्र इंदूरकर व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

0000000

सावली येथील कोविड केअर सेंटरला पालकमंत्री ना.वडेट्टीवार



 सावली येथील कोविड केअर सेंटरला पालकमंत्री ना.वडेट्टीवार

यांची भेट ; ग्रामीण रुग्णालयाचीही केली पाहणी

Ø  कोरोना संकटाच्या काळात रुग्णांना वेळेत उपचार देण्याचे आरोग्य विभागाला निर्देश

Ø  कोणत्याही रुग्णाचा ऑक्सिजन तसेच रेमडेसिविर अभावी मृत्यू होता कामा नये.

Ø  तालुक्यासाठी 4 खाजगी रुग्णवाहिका देणार

चंद्रपूर दि.28 एप्रिल: जिल्ह्यात ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत. त्यावर पर्याय म्हणून सावली येथे 39 ऑक्सिजन काॅन्संट्रेटर लावण्यात येणार असून आवश्यकता पडल्यास ऑक्सिजन प्लांट सुद्धा  उभारण्यात येईल. त्यामुळे तालुक्यातील कोणताही रुग्ण ऑक्सीजन तसेच रेमडेसिविर इंजेक्शन अभावी दगावणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश देत ऑक्सिजनची सोय तालुक्याच्या ठिकाणी वेळोवेळी उपलब्ध करून दिल्या जात असून पुढेही दिली जाईल अशी ग्वाही राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी दिली.

पालकमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून सावली तालुक्यातील तहसील कार्यालय येथे आयोजित कोविड विषयक आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार  तहसीलदार परिक्षित पाटील, नगरपंचायत, मुख्याधिकारी मनीषा वाजळे, सिंदेवाही नगरपंचायतचे उपाध्यक्ष स्वप्नील कावळे, नगरपंचायतचे माजी उपाध्यक्ष नितीन दुधावर तालुका आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्ह्यात तसेच तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाधित पुढे येत आहे. जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ते प्रयत्न केल्या जात आहे. ग्रामीण भागात सुद्धा रुग्ण वाढत चाललेले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत चालला असून  तो काही प्रमाणात कमी करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेले असून त्यामाध्यमातून कोविड रुग्णाची तालुकास्तरावरच योग्य वेळी, योग्य उपचार तातडीने करण्यात येत आहे. असे असतांनाही काही रुग्णांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला न्यावे लागत असते मात्र येथे एकच रुग्णवाहिका असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय लक्षात घेता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या स्वखर्चाने सावली येथे खाजगी तत्वावर चार रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येत असून रुग्णाना विनामूल्य सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे.  लसीकरणाचे काम सुरू असले तरी सुध्या 45 वर्षावरील नागरिकांना लस देण्याचे काम युध्द पातळीवर करण्यात यावे तसेच 1 मे पासून 18 वर्षावरील सर्व व्यक्तींना विनामूल्य लस देण्यात येणार असल्याने लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांनी दिलेत.

जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. रुग्णाचा मृत्यू ऑक्सिजन अभावी होऊ नये त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अतिरिक्त ऑक्सीजन बेड कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले असून याचे ही काम युध्द पातळीवर सुरू आहे. तसेच माझ्याही विभागाकडून कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी लागणारे रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन प्लॅंट यासह साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे.

कोविड केअर सेंटरची पाहाणी:

आज पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांनी तालुक्यातील राष्ट्रपिता महात्मा गांधी शाळा येथे उभारण्यात आलेल्या कोविड  केअर सेंटरला भेट देत पाहणी केली व रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सोयी-सुविधांची माहिती जाणून घेतली.

याठिकाणी 48 आयसोलेशन बेड तर दोन ऑक्सीजन बेड असे एकूण 50 बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे.

ग्रामीण रुग्णालयाला भेट:

तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाला भेट देत उपलब्ध खाटांची संख्या, औषध साठा, रुग्णालयाची स्वच्छता, कर्मचाऱ्यांची उपस्थिती याची माहिती घेत या संकटाच्या काळात रुग्णांना योग्य उपचार वेळेत द्यावे अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या.

सांत्वनपर भेट:

तसेच सावली तालुक्यातील चक विरखल येथे श्री. तांगडे यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट दिली.

0000000