Search This Blog

Saturday 7 December 2019

समाजाच्या उत्तम सेवेसाठी बँक व्यवस्थापन पुढे येत आहे : आर.सी. ठाकूर





v  बँक ऑफ इंडियाकडून एकाच दिवशी 35 कोटींचे वाटप
v  91 ऑटो चालकांना हक्काच्या घरांचे झाले वाटप
v  मुद्रा व अन्य योजनेतील लाभार्थ्यांचे सत्कार व स्वागत
चंद्रपूर दि 7 डिसेंबर : देशभरातील बँक समुदाय आता अतिशय ग्राहकाभिमुख होत असून समाजाच्या उत्तम सेवेसाठी बँक व्यवस्थापन पुढे येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अग्रणी बँक म्हणून काम करताना बँक ऑफ इंडियाने अतिशय उत्तम काम केले असून या भागातील सामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने पुढे यावे, असे आवाहन बँक ऑफ इंडियाचे महाप्रबंधक आर.सी. ठाकूर यांनी केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील अभिनव प्रयोग म्हणून ओळखल्या गेलेल्या ऑटोचालकांच्या घर वाटपाचे कर्ज मंजूरी आदेश देखील वितरीत केले.
चंद्रपूर जिल्हा प्रशासन, बँक ऑफ इंडिया अग्रणी बँक, जिल्हा परिषद, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था जिल्हा नियोजन विभाग मुद्रा बँक समन्वय समिती अशा अनेक आस्थापनांच्या उपस्थित बँक ऑफ इंडिया या स्टार आरसेटी चंद्रपूर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा अग्रणी बँक ऑफ इंडियाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला बँक ऑफ इंडियाचे महाप्रबंधक आर.सी.ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, बँक ऑफ इंडियाचे विभागीय प्रबंधक विनोद शेट्टीकर,उपविभागीय प्रबंधक सावंत देसाई, प्रेम कुमार कोडाली, यांच्यासह या कार्यक्रमाचे आयोजक व शिखर बँकेचे समन्वयक एस. एन. झा उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नियोजन केलेल्या ऑटोचालकांच्या हक्काच्या घरासंदर्भातील कर्ज मंजुरी आदेश 91 ऑटो चालकांना वितरित करण्यात आला. याशिवाय ब्युटी पार्लर पासून शेळीपालन, कुकुटपालन, दुचाकी वाहन दुरुस्ती, अगरबत्ती बनविणे, पापड, लोणचे ,मसाला पावडर बनविणे, कंप्यूटर अकाउंटिंग अशा विविध प्रशिक्षण कार्यक्रमातून पुढे आलेल्या उमेदवारांना कर्ज मंजुरी आदेश देण्यात आले. याशिवाय प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतील लाभार्थ्यांना देखील कर्ज मंजुरी आदेश देण्यात आले. यावेळी महादेव अशोक हेपट, अब्राहम बापूराव मोहितकर, सचिन शंकरराव चरडे, वर्षा तुळशीदास लांजेवार, रौनक रिजवान शेख, ताई सुधाकर केळवतकर आधी यशस्वी उद्योजकांनी बँक ऑफ इंडिया मार्फत मिळालेल्या कर्जातून उभारलेल्या उद्योगाची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी संबोधित करताना महाप्रबंधक आर.सी.ठाकूर यांनी बँकेचे स्वरूप बदलत असून अधिकाधिक ग्राहकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही बँकेचे आयुष्य कर्जदारांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावर अवलंबून असून त्यासाठी तात्काळ प्रतिसाद देणाऱ्या ग्राहकांच्या संख्येमध्ये आणि प्रत्येक योजनांमध्ये घेतलेले कर्ज परत करणाऱ्या वृत्तीमध्ये वाढ होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. योजनेतून एकाला मिळालेला लाभ दुसऱ्याला मिळण्यासाठी प्रत्येकाने वेळेत कर्ज परतफेड करण्याची सवय लावून घेतल्यास शासकीय योजना अधिक प्रभावीपणे राबविल्या जाऊ शकतात, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी एस.एन. झा यांच्या नेतृत्वात जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. सोबतच या परिसरात आता ॲग्रो -इंडस्ट्रियल अभियान सुरु करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही भागाच्या विकासाचे गमक हे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आर्थिक व्यवहारावर अवलंबून असते. त्यासाठी बँक व संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यावेळी संबोधित करताना बेरोजगारी आणि मंदीच्या काळात बँकांचे लोन मिळणे अतिशय आवश्यक असून त्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल एस.एन. झा व त्यांच्या टीमचे कौतुक केले. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उमेदच्या माध्यमातून महिला बचत गटांना बँकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी बँक व्यवस्थापनाचे देखील आभार मानले. लोकांना नवनवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात बँकेचे व्यवहार होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी यावेळी केले.
यावेळी एस.एन.झा यांनी गेल्या काही वर्षात बँक ऑफ इंडियाने शिखर बँक म्हणून जिल्ह्यांमध्ये केलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. विविध शासकीय उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात लोन वितरित केल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला विविध योजनांमधून उपक्रम सुरू केलेल्या लाभार्थी सोबतच शहरातील ऑटोचालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ऑटो संघटनेच्यावतीने बँकेचे महाप्रबंधक आर. सी. ठाकूर तसेच जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांचादेखील सत्कार करण्यात आला.
00000

Sunday 1 December 2019

आदिवासी विकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेचा शानदार शुभारंभ




आदिवासी मुलांनी क्रीडा कौशल्याचे दमदार प्रदर्शन करावे : संदिप राठोड
चंद्रपूर, दि. 1 डिसेंबर : आपल्या उपजत काटकपणातून व क्रीडा कौशल्यातून क्रीडा जगताला उत्तम क्रिडापटू मिळावेत. पुढील चार दिवस या मैदानावर नजरेत भरतील असे विक्रम व्हावेत, अशा शुभेच्छा श्री. संदीप राठोड अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर यांनी आज येथे दिल्या. चंद्रपूर येथे आदिवासी विकास विभागाच्या नऊ प्रकल्पाचा शानदार क्रीडा स्पर्धा महोत्सव आजपासून सुरू झाला. चार डिसेंबर पर्यंत हा विभागीय क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम येथील पोलीस ग्राउंडवर रंगणार आहे. हजारो विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि बहारदार संस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी प्रथा परंपरांचे दर्शन आणि विद्यार्थ्यांचे दर्जेदार पथसंचलन यामुळे या स्पर्धेच्या दमदार प्रारंभाला सुरुवात झाली.
या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आदिवासी विकास नागपूरचे अप्पर आयुक्त डॉ. संदीप राठोड, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चंद्रपूर व चिमूरचे प्रकल्प अधिकारी व या कार्यक्रमाचे आयोजक केशव बावनकर, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा भामरागडचे प्रकल्प अधिकारी राहुल गुप्ता, नागपूर येथील सहाय्यक आयुक्त दीपक हेडाऊ, सहाय्यक आयुक्त महेश जोशी, वरिष्ठ संशोधन अधिकारी सोनकुसरे, प्रकल्प अधिकारी,देवरी,श्री.जितेंद्र चौधरी,प्रकल्प अधिकारी,श्री.दिगंबर चव्हाण, सहायक प्रकल्प अधिकारी श्री.राचेलवार, श्री नितीन ईसोकार, चंद्रपूरचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी निलय राठोड, श्री. बावणे यांच्यासह चिमूर, चंद्रपूर, गडचिरोली, भामरागड, अहेरी, नागपूर, वर्धा, भंडारा, देवरी, येथील अधिकारी उपस्थित होते.
आदिवासी समाजातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांच्या भावी जीवनातील उत्कृष्ट वाटचालीकरिता आणि पारंपरिक कलागुणांच्या संवर्धनाकरिता आदिवासी विकास विभागातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या नागपूर विभागांतर्गत दिनांक 1 डिसेंबर 2019 ते 4 डिसेंबर 2019 या कालावधीत विभागी विज्ञान व चित्रकला प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपुर डॉ .संदीप राठोड यांनी यावेळी उपस्थित क्रीडापटूंना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यावेळी बोलताना पुढील चार दिवसाच्या कार्यक्रमांना शुभेच्छा दिल्यात  चंद्रपूर जिल्ह्याची या क्रीडा स्पर्धेसाठी निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच  या स्पर्धेतून  दर्जेदार क्रीडापटू प्राप्त व्हावेत व त्यांनी या देशाचे नावलौकिक वाढवावे, असे आवाहन देखील केले. 
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वेगवेगळ्या विभागातील मुलांच्या विज्ञान प्रदर्शनीचा देखील प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन चंद्रशेखर दंदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सहाय्यक प्रकल्प अधिकारी निलय राठोड यांनी केले. आजपासून सर्व क्रीडा प्रकाराच्या प्राथमिक फेरीला देखील सुरुवात करण्यात आली. सर्व विभागातील शिक्षकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती. पोलीस ग्राउंडवर यासाठी मोठ्या प्रमाणात चंद्रपूर प्रकल्प कार्यालयाने व्यवस्था केली असून अनेक विभागाचे अधिकारी देखील या ठिकाणी सहभागी झाले होते.
0000000

Saturday 30 November 2019

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घ्यावा : डॉ. कुणाल खेमनार


चित्ररथांच्या माध्यमातून होत आहे शेतीविषयी योजनांची जनजागृती
चंद्रपूर, दि. 30 नोव्हेंबर : जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय चंद्रपूर मार्फत योजना शेतकऱ्यांच्या दारी या अभियानाची सुरुवात 26 नोव्हेंबरला झाली या अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनामार्फत शेतीच्या संदर्भात विविध योजना थेट शेतकऱ्यांच्या दारी पोहोचता यावे व या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी चित्ररथ  चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यामधील गावांमध्ये जाऊन जनजागृती करीत आहे.
या चित्ररथाच्या माध्यमातून शेतीच्या विकासाच्या संदर्भातील विविध योजनेचा लाभ घेता यावा यासाठी प्रसिद्धी होत आहे तसेच शेतकऱ्यांना शेती संदर्भातील योजनांची नोंदणी तालुका कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे करावी यासाठी मार्गदर्शनात्मक ठरत आहे.
असे असणार चित्ररथाचे मार्ग
आज दिनांक 1 डिसेंबर रोजी राजुरा तालुक्यातील राजुरा आठवडी बाजार येथे चित्ररथ येणार आहे. चंद्रपुर तालुक्यातील देवाडा, शिवणीचोर,हिंगनाळा,मार्डा या गावांमध्ये तर भद्रावती तालुक्यातील पानवडाळा, नंदोरी, बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता, कोर्टीतुकुम, मूल तालुक्यातील जानाळा,कांतापेठ,टोलेवाही,चिरोली (बाजार), सावली तालुक्यामधील केरोडा,पेटगाव,घोडेवाही, नागभीड मधील कोदेपार,वासाळा मेंढा,वासाळामक्ता,किटाळी मेंढा,मिंडाळा, चिमूर तालुक्यातील ब्राह्मणगाव, तळोधी,मासळ, जिवती तालुक्यातील पाटण, कोरपना तालुक्यातील तामसी,कुर्ला, तांबडी, ब्रह्मपुरी तालुक्यांमधील तोरगांव, देऊळगाव कोलारी, पोंभूर्णा तालुक्यातील डोंगरहळदी, वरोरा मधील वरोरा, सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही (आठवडी बाजार), कारघाटा, गोंडपिंपरी तालुक्यांमधील गोंडपिंपरी, विठ्ठलवाडा या तालुक्यातील गावांमध्ये चित्ररथ येणार असून या माध्यमातून शेतीच्या विकासासंदर्भातील अनेक योजनांची माहिती मिळणार आहे. या शेतीच्या विकासासंदर्भातील अनेक योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ .कुणाल खेमनार यांनी केले आहे
00000

सैनिकी शाळेमध्ये मुलींना प्रथमच प्रवेश 6 डिसेंबरपूर्वी ऑनलाईन नोंदणीचे आवाहन


चंद्रपूर, दि. 30 नोव्हेंबर: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या सैनिकी शाळा चंद्रपूर येथे मुलींना वर्ग सहावी करिता प्रवेश देण्यात येणार असून त्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलींनी 6 डिसेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन प्राचार्य स्क्वार्डन लीडर नरेशकुमार यांनी केले आहे. केंद्र सरकारने मुलींसाठी प्रथमच सैनिकी शाळेत प्रवेश सुरू केला आहे. पश्चिम दक्षिण भारतात चंद्रपूरसैनिकी शाळेपासून हि सुरुवात होत आहे.
शैक्षणिक वर्ष 2020 करिता मुलींना सैनिकी शाळेचे शिक्षण मिळवण्याची दारे खुली झाली असून चंद्रपूर जिल्ह्यात नव्यानेच उभारण्यात आलेल्या सैनिकी शाळेमध्ये मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे. या शाळेत प्रवेश घेण्याकरिता प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून त्याची ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. 26 नोव्हेंबर 2019 पासून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून मुलींना वर्ग 6 वी करिता प्रवेश घेण्याकरिता साठी 6 डिसेंबर 2019 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलींनी सैनिकी शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरिता ऑनलाईन नोंदणी करावी, असे सैनिकी शाळेमार्फत आव्हान करण्यात आले आहे.
00000

Wednesday 27 November 2019

शासनाकडून घरी येणाऱ्या प्रगणकाला योग्य माहिती द्या : उपजिल्हाधिकारी खलाटे


केंद्र शासनाच्या  व्या आर्थिक गणनेला सुरुवात
चंद्रपूर दि. २६ नोव्हेंबर : जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय व सेवा यांची गणना करण्यासाठी जिल्ह्यात आजपासून सातव्या आर्थिक गणनेला सुरुवात झाली आहे. केंद्र शासनामार्फत राष्ट्रव्यापी ही मोहीम असून यासाठी आपल्या घरापर्यंत येणाऱ्या प्रगणकाला योग्य माहिती द्याअसे आवाहन उपजिल्हाधिकारी एस. पी. खलाटे यांनी आज येथे केले.
            जिल्हा सांख्यिकी अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित या पत्रकार परिषदेला ते संबोधित करीत होते. यावेळी जिल्हा सांख्यिकी अधिकारी अमित सुतारवरिष्ठ सांख्यिकी अधिकारी दीपक मेश्रामसमन्वय अधिकारी शेख आदी उपस्थित होते.
            कृषी,खानकामवस्तू निर्माणपाणी पुरवठाबांधकामघाऊक व्यापारकिरकोळ व्यापारवाहतूक ,साठवणउपाहारगृहेहॉटेल माहिती व दळणवळण संदर्भातील सेवा ,वित्तीय व विमा सेवा स्थावर मालमत्तेसंबंधीचे कार्यव्यावसायिकवैज्ञानिक व तांत्रिक कार्यप्रशासकीय व आधार सेवा कार्य शैक्षणिक मानवी आरोग्य व सामाजिक कार्यकलाकरमणूकक्रीडामनोरंजन व अन्य कार्यात सहभागी असणाऱ्या आस्थापनाची व नियमित काम करणाऱ्या व्यक्तींची माहिती यामार्फत घेण्यात येते.
           कॉमन सर्विस सेंटर अर्थात सीएससी या यंत्रणेमार्फत आर्थिक गणनेचे काम करण्यात येत असून त्यांच्या मार्फतच प्रगणकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे प्रगणक आपले ओळखपत्र दाखवून जिल्हाभरातून घराघरातून माहिती गोळा करणार आहे. या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन खलाटे यांनी यावेळी केले. केंद्र शासनाकडे ही माहिती गोळा केली जाणार असून त्याआधारे देशाच्या समृद्धतेचा योजना तयार केल्या जातात. देशामध्ये जनगणनापशुगणना ज्या पद्धतीने केली जाते तशीच ही आर्थिक गणना आहे.
            देशाच्या आर्थिक आघाडीवर वेगवेगळे धोरण व योजना ठरवताना हि माहिती कामी येते. जनतेने या माहितीचा कुठलाही गैरवापर होणार नाहीयाबाबत आश्वस्त असावे. तसेच जनतेला कुठलाही त्रास होत नाहीकिंवा लक्ष्य केले जात नाही हे लक्षात घ्यावे. प्रगणक . अर्थात माहिती घ्यायला येणाऱ्याला सौजन्य दाखवावेमाहिती योग्य पद्धतीने द्यावी असे देखील खलाटे यांनी स्पष्ट केले.
            या गणनेसाठी जिल्हास्तरावर एक समिती गठीत करण्यात आली असून त्या समितीमार्फत या गणनेवर लक्ष ठेवले जाते. पुढील 90 दिवसाच्या आत ही गणना पूर्ण करण्यात येणार आहे. यापूर्वी 2013 मध्ये देखील ही गणना करण्यात आली होती. जनतेने या कामी सहकार्य द्यावेअसे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
00000

संविधानाने निर्भयमुक्त समाज निर्माण केला : विमलताई गाडेकर



जिल्हा माहिती कार्यालयात संविधान दिन
चंद्रपूरदि. 26 नोव्हेंबरस्वातंत्र्यपूर्व काळामध्ये  भारतीय समाजामध्ये प्रचंड असमानता होतीत्या काळात फक्त श्रीमंतांना मतदान करण्याचा अधिकार होतापरंतु संविधानामुळे  भारतात समानता प्रस्थापित  होऊन सर्वांना समान अधिकार प्राप्त झालेतसेच समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय  मिळालेत्यामुळे  संपूर्ण समाज भयमुक्त झालाअशी प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिकसमाजसेविका विमलताई गाडेकर यांनी व्यक्त केलीजिल्हा माहिती कार्यालय चंद्रपूर मार्फत आयोजित संविधान दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना महिलांना अनेक अधिकार संविधानामुळे प्राप्त झाले असून  समाजातील प्रत्येक मागासवर्गीय वंचित घटकाला  समानतेचा अधिकार  प्राप्त झाला.  मानवतेची जाण असणारा  समाज निर्माण व्हावायाकरिता व्यवहार कसे असावेप्रत्येक व्यक्तीने स्वतःचे हित जोपासत असताना दुसऱ्याचे अहित होणार नाही याची काळजी काळजी घेण्याची जाणीव संविधान आपल्याला करून देतेप्रत्येकाला जगण्याचावावरण्याचा व आनंदमय जीवन जगण्याचा अधिकार असून त्याला तो प्राप्त करण्यासाठी संविधानाने  प्रत्येक गोष्टीची  नोंद केलेली आहेअशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी सहाय्यक प्रकल्प अधिकारी निलय राठोड यांनी मार्गदर्शन करताना देशातील जनतेला खरे स्वातंत्र्य संविधानाला मान्यता मिळाल्यानंतरच मिळाले,  असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केलेतसेच कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी विजय गराटे यांनी  संविधानाबद्दल माहिती सांगितलीसोबतच जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी संविधानाची उद्देशिका उपस्थितांना समजावून सांगितलीया कार्यक्रमाला जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन सचिन दळवी तर आभार सुरज साळुंके यांनी मानले.
00000

शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवा : देवराव भोंगळे



संविधान दिनाला जिल्हा माहिती कार्यालयामार्फत माहिती आपल्या दारी अभियानाला सुरुवात

चंद्रपूरदि. 26 नोव्हेंबर: शेतकरी बांधवांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र शासन तसेच राज्य शासनामार्फत अनेक योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आहे. शेतीच्या उपयोगी असलेले तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर पोचण्यासाठी प्रशासनाने कार्य करावे. आज संविधान दिवसासारख्या पवित्र दिवसाला जिल्हा माहिती कार्यालयाने शेतकऱ्यांच्या योजना शेतकऱ्यांच्या दारी या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. याचा चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल असा आशावाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी व्यक्त केला. दिनांक 26 नोव्हेंबर 2019 रोजी कृषी भवन येथे चित्ररथ अनावरण सोहळ्यात बोलत होते. 
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती अर्चनाताई जीवतोडेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटीलजिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडेजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश सोमनाथेकृषी विकास अधिकारी एस. किरवेअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल काळभोरकृषी उपसंचालक रवींद्र मनोहरेजिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके तसेच प्रगतिशील शेतकरी पांडुरंग कोकोडे, सिद्धार्थ फुलझेले, रोशन रामटेके, मौर्यकांत गोहने, विठ्ठल कोठे, पर्वतराव कुळमेथे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त प्रयत्नातून शेतकऱ्यांच्या योजना शेतकऱ्यांच्या दारी या अभियानाला सुरुवात झाली आहे. जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसिद्धी व प्रत्येक तालुका कृषी अधिकाऱ्याकडून योजनेची अंमलबजावणी असे या अभियानाचे स्वरूप आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या संपूर्ण योजनांची व्यापक स्वरूपात प्रसिद्धी करण्यात येणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता प्रोत्साहित केले जाणार आहे. यासाठी जिल्हा माहिती कार्यालय अंतर्गत 70 टक्के निधी शेतकरी योजनांच्या प्रसिद्धीसाठी वापरण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये 15 चित्ररथ गावोगावी फिरणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक चित्ररथ बहुतेक गावात जाऊन शेती संदर्भातील योजनांची प्रसिद्धी करणार आहे. या चित्ररथाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून त्यांना गावोगावी फिरण्यासाठी रवाना करण्यात आले. तसेच आठवडी बाजाराच्या ठिकाणी आणि आणि जास्तीत जास्त लोकसंख्येच्या गावांमध्ये हे पथनाट्याच्या माध्यमातून योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. शेतकऱ्यांना योजना संदर्भात संपूर्ण माहिती देता यावी. या दृष्टिकोनातून लाख पत्रकांचे जिल्हाभरातील प्रत्येक शेतकऱ्याला वितरण करण्यात येणार आहे. तसेच या आठवडाभर स्थानिक वृत्तपत्राच्या साह्याने प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. सोबतच जिल्हाभरात योजनांचे फलक लावण्यात आले आहे.

शेतकऱ्याच्या उन्नतीकरिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी उपयोगी असणाऱ्या विविध योजनांची प्रसिद्धी करण्यात येत आहे. याद्वारे शेतीसंदर्भात संदर्भातील योजनांची माहिती घेऊन शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा. तसेच योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची जिथे आवश्यकता आहे. तिथे डब्लूडब्लूडब्लू डॉट आपले सरकार डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा. चंद्रपूर जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र कमी असून जिल्ह्याला सिंचनक्षम जिल्हा बनवण्यासाठी कृषी विभागाच्या सिंचनासंदर्भातील योजनांचा लाभ घ्यावा. यात काही प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु केलेल्या हॅलो चांदा या हेल्पलाईनचा उपयोग करावाअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.


000

Wednesday 20 November 2019

नोकरी करण्यासाठी कुठेही जाण्याची तयारी ठेवणे आवश्यक : राहुल कर्डिले


v पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याला 810 उमेदवारांची उपस्थिती
v  11 प्रतिष्ठीत कंपन्यांनी घेतल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती
चंद्रपूर दि 20 नोव्हेंबर : शासकीय नोकरी किंवा कंपनीमधील नोकरी ही बहुतेक वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी मिळणे कठीण आहे. त्यामुळे  विद्यार्थीदशेतच नोकरी करायची असेल तर आपल्या घरापासून जिल्ह्यापासून दूर जाण्याची तयारी ठेवा. नोकरी मिळवणे ही एक प्रक्रिया असते. त्यासाठी सातत्यपूर्ण  प्रयत्न आणि चौकस असणे  गरजेचे असून त्यासाठी देखील मानसिक तयारी  विद्यार्थ्यांनी ठेवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कौशल्यम सभागृह या ठिकाणी आयोजित या मेळाव्याला मोठ्या संख्येने सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह  सहाय्यक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भैय्याजी येरमे, कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे, औद्योगिक विकास प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य सचिन नखाते, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांची उपस्थिती होती. 
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांची संवाद साधताना राहुल कर्डिले यांनी रोजगाराची सार्वत्रिक चिंता असल्याचे स्पष्ट केले. मात्र स्पर्धा परीक्षांपासून तर अन्य सर्वच क्षेत्रांमध्ये आज स्पर्धा असून त्यासाठी थोडा संयम व आपल्या आवडीची योग्य निवड करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदनगर सारख्या जिल्ह्यांमधून आयएएस अधिकारी बनण्याचा प्रवास देखील त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पुढे मांडला. इंजिनिअरिंग केल्यानंतर देखील आपले लक्ष स्पर्धापरीक्षा होते. त्यामुळे  कंपन्यांसोबत  संघर्ष वाट्याला आला नाही.  मात्र तांत्रिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना या संघर्षाची देखील तयारी करावी लागेल. अनेक कंपन्यांची दारे ठोठावी लागेल.
त्यासाठी प्रयत्नपूर्वक प्रयत्न  करावे लागतील. तांत्रिक शिक्षणामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग आहेत. त्या संख्येत जिल्ह्याच्या ठिकाणी देखील औद्योगिक संस्था मोठी कंपनी असेलच असे नाही. त्यामुळे तुमच्यासारखाच खेड्यातील एक विद्यार्थी असतानादेखील वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण घेण्याची अभिलाशा मी ठेवली होती. तुम्ही देखील अशाच पद्धतीने कुठेही जाण्याची तयारी ठेवून नोकरी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नोकरीतील कौशल्य हे देखील तुम्हाला नव्या ठिकाणी आणखी नवी नोकरी देण्यास मदत करत असते.त्यासाठी स्वतःला कायम अपडेट ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या समाज माध्यमांवर विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात वेळ जात असून या समाज माध्यमांचा आपल्या हातातल्या स्मार्टफोनचा सकारात्मक वापर करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. यावेळी औद्योगिक विकास प्रशिक्षण संस्थेचे सचिन नखाते यांनी तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने कंपन्यांमध्ये नोकरी मिळविणे आवश्यक आहे. याबाबतचे मार्गदर्शन केले तर सहाय्यक संचालक भैय्याजी येरमे यांनी देखील यावेळी संबोधित करून रोजगार मेळाव्याची पार्श्वभूमी सांगितली. कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांनी यावेळी प्रास्ताविक करताना विद्यार्थ्यांनी संघर्ष करून नोकऱ्यांमध्ये व कंपन्यांमध्ये मिळेल ती नोकरी करावी, असे आवाहन केले.
आज ज्या प्रतिष्ठित कंपन्यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या त्यामध्ये पीआयजिओ वेहिकल्स बारामती, समाधान पूर्ती सुपर बाजार चंद्रपुर, धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद, स्पंदन स्फूर्ती फायनान्स लिमिटेड चंद्रपूर, एबीएस इलेक्ट्रो प्लेट इंडिया लिमिटेड पुणे, थर्ड आय सेक्युरिटी सर्विस चंद्रपूर, एन. डी. जेम्स बल्लारपुर, आदी कंपन्यांनी आपल्या विविध विभागासाठी उमेदवारांची निवड केली. कार्यक्रमाचे संचालन राखी बुराडे यांनी तर आभार प्रदर्शन राहुल गुल्हाने यांनी केले.
000000

सैनिकी स्कूल येथे स्थानिक प्रशासकीय मंडळाची प्रथम बैठक


चंद्रपूर, दि. 20 नोव्हेंबर : देशातील 29 वी सैनिकी शाळा चंद्रपूर जिल्ह्यात सुरू करण्यात आली असून या शाळेच्या स्थानिक प्रशासकीय मंडळाची प्रथम बैठक दिनांक 21 नोव्हेंबर 2019 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला प्रामुख्याने एअर मार्शल आर. के. एस. शेरा, एअर वाईस मार्शल बी. मानिकंटन, खासदार सुरेश धानोरकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर व इतर सदस्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सैनिकी शाळेचे प्राचार्य स्क्वार्डन लीडर नरेश कुमार यांनी दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील  विसापूर येथे देशातील 29 वी सैनिकी शाळा स्थापन करण्यात आली असून या शाळेमध्ये एकूण 180 विद्यार्थ्यांना यावर्षी प्रथमच प्रवेश देण्यात आलेला आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून सैनिकी शाळेची भव्य दिव्य वास्तू व परिसर डोळ्याचे पाळणे फिटणारा आहे. या सैनिकी शाळेच्या प्रशासनिक मंडळाची प्रथम बैठक दिनांक 21 नोव्हेंबर 2019 या दिवशी पार पाडण्यात येणार असून या बैठकीला प्रमुख्याने एअरमार्शल आर. के. एस. शेरा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते विद्यार्थी तसेच सैनिकी शाळेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच स्थानिक प्रशासकीय मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे. यादरम्यान ते स्थानिक प्रशासकीय मंडळांच्या सदस्यासोबत शाळेच्या शैक्षणिक विकासासंदर्भात चर्चा करणार आहेत. सोबतच संपूर्ण शाळेचा फेरफटका मारून शाळेच्या बांधकामाविषयीचा आढावा घेणार आहेत.
00000

बालहक्क रक्षण बालविवाह प्रतिबंधासाठी जनजागृती

चंद्रपुर जिल्हयातील ४२ गावांचा समावेश२८ नोव्हेंबर पर्यंत चालनार कार्यक्रमचंद्रपूर, 19 नोव्हेंबरमहाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान आणि संयुक्त राष्ट्रांचा बाल आपत्ती निधी - युनिसेफ भारत शाखा यांच्या वतीने बालहक्क रक्षण  हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून एक विशेष मोहीम हाती घेतली आहे.महाराष्ट्राच्या २५ जिल्ह्यां तील ८५० गावांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ४२ गावामध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये  चालणारी ही मोहीम लोकांना बालहक्क रक्षणाचे आणि बालविवाह प्रतिबंधाचे महत्व याबद्दल माहिती देईल.  बालदिनाचे औचित्य साधत या मोहिमेचा तिसरा आणि शेवटचा टप्पा १४ नोव्हेंबरला सुरु होऊन २८ नोव्हेंबरला संपणार आहे.
            या दोन आठवड्यांच्या कालावधी मध्ये मुलांसाठी जिल्हास्तरावर वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळेमधील मुलांच्या गैरहजेरीबा बत आढावा घेण्यात
  येणार आहेविद्याथ्र्यांना शैक्षणिक माहितीपट दाखविण्यात येतीलगावातील बालगटकिशोरगटमहिला मंडळबालसभा यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.  तसेच या अंतिम टप्प्यात ग्रामस्थांना बालविवाह प्रथेचे अनिष्ट परिणाम समजावून सांगितले जातील आणि असे विवाह रोखण्यासा ठीच्या कायद्यांची आणि इतर उपाययोज नांची माहिती दिली जाईल. बालविवाह कसे घातक असतात आणि असा एखादा विवाह होत असेल तर त्याची माहिती सरकारी आणि प्रशासकीय यंत्रणेला कशी द्यायची याबद्दल ग्रामस्थांना प्रशिक्षित केले जाईल. या मोहिमेचा पहिला टप्पा १५ ऑगस्ट ला सुरु झाला. या टप्प्यात अगदी तळागाळा तील गावक-याना  समस्यांची माहिती दिली  व यासाठी ग्रामस भा भरविल्या गेल्या .अशा सभां मध्ये बालहक्कांचे प्रभावीपणे रक्षण करण्यासंबंधीचे ठराव संमत केले.   तर दुसरा टप्पा ११ ऑक्टोबर ला म्हणजे आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या दिवशी सुरु झाला. यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ‘ या योजनेच्या अमल बजावणीवर लक्ष केंद्रित केले गेले. बालविवाह या समस्येशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शाळांमध्ये बैठका घेतल्या  तसेच बचतगट कार्यकत्र्यांशी बालविवाह समस्येविषयी चर्चा केली. युनिसेफचे अधिकारीही या प्रक्रियेत सहभागी झाले आणि गावकèयांना याविषयीचे महत्व पटवून दिले.
0000

ओबीसी प्रवर्गातील युवकाकरिता कर्ज पुरवठा योजना

चंद्रपूर, 19 नोव्हेंबर: महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या वतीने लघुउद्योगाकरिता ओबीसी प्रवर्गातील युवक आणि युवतीसाठी स्वयंरोजगाराकरिता अत्यल्प व्याजदराने कर्जपुरवठा योजना सुरू करण्यात आली असून याचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे.
ओबीसी प्रवर्गाकरिता विविध कर्जपुरवठा योजना शासनाच्यावतीने राबविण्यात येत असून त्यामध्ये विना व्याज असलेली लक्ष रुपयेची थेट कर्जयोजना राबवली जात असून कर्ज परतफेडीची मुदत चार वर्षे आहे. तसेच बीज भांडवल योजनेअंतर्गत लाख पर्यंतचे प्रकल्पास मंजुरी देण्यात येत असून कृषी व संलग्न व्यवसायवाहतूक क्षेत्राची संबंधित व्यवसाय तसेच पारंपारिक लघुउद्योगासाठी कर्ज देण्यात येणार आहे. मंजूर कर्ज रकमेच्या टक्के लाभार्थी, 20 टक्के महामंडळ व 75 टक्के बँकेचा सहभाग असणार आहे.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबवली जात असून मागासवर्गीय प्रवर्गातील कुशल व्यावसायिक व्यक्तींना व्यवसायाकरिता 10 लक्ष रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत असून बचत गटभागीदारी संस्थासहकारी संस्थाकंपनीफार्मर प्रोड्यूसर कंपनी अशा संस्थांना बँकेमार्फत उद्योग उभारणीकरिता कर्जपुरवठा करण्यात येणार असून या योजनांचा लाभ मिळण्यासाठी ओबीसी प्रवर्गातील युवक-युवतींनी वित्त आणि विकास महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क करावाअसे आवाहन करण्यात आले आहे.
00000

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकात्मता दिन


चंद्रपूर, 19 नोव्हेंबर: भारताच्या माजी प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज दिनांक 19 नोव्हेंबर 2019 रोजी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त शपथ घेण्यात आली.
भारताच्या माजी प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरी केली जाते. आज जिल्हाधिकारी कार्यालयचंद्रपूर येथे राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकात्मतेची शपथ घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
0000

गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनाला नवा आयाम मिळते हे दाखवून द्या : जिल्हाधिकारी



  • प्रगतिशील शेतकऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांची दोन तास चर्चा 
  • सोयाबीन खरेदी पासून अनेक विषयांवर तातडीने घेतले निर्णय
  • शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन
चंद्रपूर दि. १८ नोव्हेंबर : जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांसोबत दोन तास चर्चा केली. गटशेतीला बळकटी देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नावर बैठकीतच त्यांनी निकाली काढले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना लगेच वाचा फोडली.        
            यावेळी शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचताना आर्थिक लाभाचा फायदा विलंबाने मिळणे हा मोठा अडथळा असल्याचे शेतकऱ्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे कृषी विभाग व अन्य विभागांनी शेतकऱ्यांच्या योजना राबविताना वेळेचे बंधन पाळावेअसे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले.
            कोणतीही योजना ही वेळेत मोबदला मिळाल्यास यशस्वी ठरते.मात्र अनेक योजनांच्या बाबतीत उशिराने शेतकऱ्यांना लाभ मिळत असेल तर ती योजना लोकप्रिय ठरू शकत नाही. त्यामुळे कृषी विभागाने काल मर्यादा आखून कामांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
            जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचे अध्यक्षतेखाली व विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांचे प्रमुख उपस्थितीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात गटशेती योजनेची ही सभा पार पडली. सभेस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटीलउपविभागीय कृषी अधिकारी चंद्रपूर रवींद्र मनोहरेउपविभागीय कृषी अधिकारी नागभीड दिगंबर तपासकरउपविभागीय कृषी अधिकारी वरोरा जाधव कृषी अधिकारी गणेश मादेवार व गटाचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.
            या सभेत जिल्हाधिकारी यांनी सर्व मंजूर गटांना गटशेतीमधून एकूण देय अनुदानाच्या 15 टक्के पर्यंत अनुदान गटांना तात्काळ वितरित करण्याच्या सूचना दिल्या. ज्या गटांचे सविस्तर प्रकल्प आराखडे मंजूर नाहीत अश्या गटांच्या संबंधित उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी दिवसात गटांचा आढावा घेऊन सुधारीत सविस्तर प्रकल्प आराखडे जिल्हा स्तरीय समितीस सादर करण्याचे सूचना दिल्यात.
            उपस्थित गटाच्या अध्यक्ष व सचिवांनी त्यांच्या कृषी विभागातील विविध योजनेच्या अनुषंगाने असलेल्या अडचणी सांगितल्या. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अडचणी सोडविण्याचा उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकतोहे आपण सर्वांनी दाखवून द्यावे ,असे आवाहन यावेळी उपस्थित प्रगतशील शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केले. 
            ज्या गटांनी कर्ज प्रकरणासाठी बँकेत प्रस्ताव सादर केला अश्या गटांनी ती माहिती कार्यालयास कळविण्यास सांगितले. जेणेकरून त्या संबंधात बँकांचा आढावा घेण्यात येईल. विभागीय कृषी सहसंचालक यांनी गटांना ज्या बाबी आवश्यक आहेत त्याच बाबी आराखड्यात घ्यावे व गरज वाटल्यास गटाचा आराखडा सुधारित करावा,अश्या सूचना उपस्थितांना दिल्यागटांना गट पुढे नेण्यासाठी आवश्यक सर्व प्रयत्न व मदत करण्याचे आश्वासन  जिल्हाधिकारी यांनी दिले.
            या बैठकीला युवक बिरादरी बहुउद्देशिय शेतकरी बचत गटमुलअशोक जैरामजी गायकवाडअध्यक्षअन्नपुर्णा स्वयंसहाय्यगिरगावमधुकर गोविंदा श्रीरामेसचिवअन्नपुर्णा स्वयंसहाय्यगिरगावपुरूषोत्तम दादाजी बोरकरसदस्यअन्नपुर्णा बचत गटसुनिल भोलानाथजी सोनवणेसदस्यअन्नपुर्णा स्वयंसहाय्य गिरगावरितेश येनप्रेड्डीवारयुवक बिरादरी शेतकरी गट मुलराजल्ला वाभिटकरशेतकरी मित्र बचत गट खिरडीसुधाकर जिवतोडेकिसानपुत्र शेतकरी स्वयंसहाय्य गट नंदोरीनरेंद्र नानाजी जिवतोडे,  किसानपुत्र शेतकरी स्वयंसहाय्य गट नंदोरीआबाजी ढुमणेकृषी मित्र बचत गट सिंदीपलिंद्र सातपुतेउमळपेठ फार्मर्स प्रा. कंपणी उधळपेठतात्यासाहेब रामराव मत्तेवंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामीण विकास गटकान्सा ता. भद्रावतीभाऊजी शंकर जाबोरअन्नदाता शेतकरी बचत गटसुब्बई ता. राजुराश्री. गुरूदेव ग्रामीण विकास संस्थानेदमापेठचिमुर फारर्मस प्रोडूसर कंपणी लिमी. चिमूरसंदीप कुटेमाटेउन्नती शेतकरी पुरूष बचत गट पिपरीहेमंत बोबडेउन्नती शेतकरी पुरूष बचत गटपिपरीए. एस. धनविजयसंजय एस येनुरकरकृषि विकास शेतकरी बचत गटगडिसुर्ला यांची उपस्थिती होती.
00000