Search This Blog

Wednesday 27 November 2019

शासनाकडून घरी येणाऱ्या प्रगणकाला योग्य माहिती द्या : उपजिल्हाधिकारी खलाटे


केंद्र शासनाच्या  व्या आर्थिक गणनेला सुरुवात
चंद्रपूर दि. २६ नोव्हेंबर : जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय व सेवा यांची गणना करण्यासाठी जिल्ह्यात आजपासून सातव्या आर्थिक गणनेला सुरुवात झाली आहे. केंद्र शासनामार्फत राष्ट्रव्यापी ही मोहीम असून यासाठी आपल्या घरापर्यंत येणाऱ्या प्रगणकाला योग्य माहिती द्याअसे आवाहन उपजिल्हाधिकारी एस. पी. खलाटे यांनी आज येथे केले.
            जिल्हा सांख्यिकी अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित या पत्रकार परिषदेला ते संबोधित करीत होते. यावेळी जिल्हा सांख्यिकी अधिकारी अमित सुतारवरिष्ठ सांख्यिकी अधिकारी दीपक मेश्रामसमन्वय अधिकारी शेख आदी उपस्थित होते.
            कृषी,खानकामवस्तू निर्माणपाणी पुरवठाबांधकामघाऊक व्यापारकिरकोळ व्यापारवाहतूक ,साठवणउपाहारगृहेहॉटेल माहिती व दळणवळण संदर्भातील सेवा ,वित्तीय व विमा सेवा स्थावर मालमत्तेसंबंधीचे कार्यव्यावसायिकवैज्ञानिक व तांत्रिक कार्यप्रशासकीय व आधार सेवा कार्य शैक्षणिक मानवी आरोग्य व सामाजिक कार्यकलाकरमणूकक्रीडामनोरंजन व अन्य कार्यात सहभागी असणाऱ्या आस्थापनाची व नियमित काम करणाऱ्या व्यक्तींची माहिती यामार्फत घेण्यात येते.
           कॉमन सर्विस सेंटर अर्थात सीएससी या यंत्रणेमार्फत आर्थिक गणनेचे काम करण्यात येत असून त्यांच्या मार्फतच प्रगणकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे प्रगणक आपले ओळखपत्र दाखवून जिल्हाभरातून घराघरातून माहिती गोळा करणार आहे. या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन खलाटे यांनी यावेळी केले. केंद्र शासनाकडे ही माहिती गोळा केली जाणार असून त्याआधारे देशाच्या समृद्धतेचा योजना तयार केल्या जातात. देशामध्ये जनगणनापशुगणना ज्या पद्धतीने केली जाते तशीच ही आर्थिक गणना आहे.
            देशाच्या आर्थिक आघाडीवर वेगवेगळे धोरण व योजना ठरवताना हि माहिती कामी येते. जनतेने या माहितीचा कुठलाही गैरवापर होणार नाहीयाबाबत आश्वस्त असावे. तसेच जनतेला कुठलाही त्रास होत नाहीकिंवा लक्ष्य केले जात नाही हे लक्षात घ्यावे. प्रगणक . अर्थात माहिती घ्यायला येणाऱ्याला सौजन्य दाखवावेमाहिती योग्य पद्धतीने द्यावी असे देखील खलाटे यांनी स्पष्ट केले.
            या गणनेसाठी जिल्हास्तरावर एक समिती गठीत करण्यात आली असून त्या समितीमार्फत या गणनेवर लक्ष ठेवले जाते. पुढील 90 दिवसाच्या आत ही गणना पूर्ण करण्यात येणार आहे. यापूर्वी 2013 मध्ये देखील ही गणना करण्यात आली होती. जनतेने या कामी सहकार्य द्यावेअसे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
00000

No comments:

Post a Comment