Search This Blog

Wednesday 20 November 2019

सोयाबीन विक्रीसाठी शासनाकडून १५ डिसेंबरपर्यत मुदतवाढ जिल्हा प्रशासनाकडून पाठवलेल्या प्रस्तावाला मान्यता

चंद्रपूर दि. १८ नोव्हेंबर : सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करण्यास्तव देण्यात आलेली मुदत वाढून देण्यात यावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती. चंद्रपूर जिल्हा प्रशासन मार्फत करण्यात आलेल्या या मागणीला मान्यता देण्यात आली असून मूग उडीद व सोयाबीन नोंदणीसाठी आता 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
            शासकीय खरेदी केंद्रांवर सोयाबीन विकण्यासाठी यापूर्वी देण्यात आलेली मुदत ही 15 नोव्हेंबर पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली होती. तथापिजिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे मागणी केली होती. आज झालेल्या गट शेती बैठकीत जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांनी देखील या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे मागणी केली होती. या बैठकीत उंच जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. त्यानुसार आता मुदतवाढ मिळाली आहे.
            राज्य शासनाच्या सहकारपणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. 2019 - 20 च्या हंगामामध्ये हे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मुगउडीद व सोयाबीन नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांची होती. पाऊस लांबल्यामुळे अनेकांना सोयाबीन काढता आले नाही. त्यामुळे शासकीय खरेदीचा दिनांक वाढविण्यात यावा अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत होती. यासंदर्भात 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहकार व पणन विभागामार्फत यापूर्वी जारी केलेल्या हमी भावानुसार मूग उडीद व सोयाबीन खरेदीसाठी आता 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात असल्याचे आदेशात जाहीर केले आहे. यापूर्वी १५ सप्टेंबर २०१९  ते १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत हमीभावाने मुंगउडीद व सोयाबीन खरेदी करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले होते.तथापिअनेकांचे सोयाबीन शेतातच असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. या आदेशाने आता पुढील महिनाभर शासकीय दरात खरेदी केली जाणार आहे.
0000

No comments:

Post a Comment