Search This Blog

Wednesday 20 November 2019

गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनाला नवा आयाम मिळते हे दाखवून द्या : जिल्हाधिकारी



  • प्रगतिशील शेतकऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांची दोन तास चर्चा 
  • सोयाबीन खरेदी पासून अनेक विषयांवर तातडीने घेतले निर्णय
  • शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन
चंद्रपूर दि. १८ नोव्हेंबर : जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांसोबत दोन तास चर्चा केली. गटशेतीला बळकटी देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नावर बैठकीतच त्यांनी निकाली काढले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना लगेच वाचा फोडली.        
            यावेळी शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचताना आर्थिक लाभाचा फायदा विलंबाने मिळणे हा मोठा अडथळा असल्याचे शेतकऱ्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे कृषी विभाग व अन्य विभागांनी शेतकऱ्यांच्या योजना राबविताना वेळेचे बंधन पाळावेअसे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले.
            कोणतीही योजना ही वेळेत मोबदला मिळाल्यास यशस्वी ठरते.मात्र अनेक योजनांच्या बाबतीत उशिराने शेतकऱ्यांना लाभ मिळत असेल तर ती योजना लोकप्रिय ठरू शकत नाही. त्यामुळे कृषी विभागाने काल मर्यादा आखून कामांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
            जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचे अध्यक्षतेखाली व विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांचे प्रमुख उपस्थितीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात गटशेती योजनेची ही सभा पार पडली. सभेस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटीलउपविभागीय कृषी अधिकारी चंद्रपूर रवींद्र मनोहरेउपविभागीय कृषी अधिकारी नागभीड दिगंबर तपासकरउपविभागीय कृषी अधिकारी वरोरा जाधव कृषी अधिकारी गणेश मादेवार व गटाचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.
            या सभेत जिल्हाधिकारी यांनी सर्व मंजूर गटांना गटशेतीमधून एकूण देय अनुदानाच्या 15 टक्के पर्यंत अनुदान गटांना तात्काळ वितरित करण्याच्या सूचना दिल्या. ज्या गटांचे सविस्तर प्रकल्प आराखडे मंजूर नाहीत अश्या गटांच्या संबंधित उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी दिवसात गटांचा आढावा घेऊन सुधारीत सविस्तर प्रकल्प आराखडे जिल्हा स्तरीय समितीस सादर करण्याचे सूचना दिल्यात.
            उपस्थित गटाच्या अध्यक्ष व सचिवांनी त्यांच्या कृषी विभागातील विविध योजनेच्या अनुषंगाने असलेल्या अडचणी सांगितल्या. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अडचणी सोडविण्याचा उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकतोहे आपण सर्वांनी दाखवून द्यावे ,असे आवाहन यावेळी उपस्थित प्रगतशील शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केले. 
            ज्या गटांनी कर्ज प्रकरणासाठी बँकेत प्रस्ताव सादर केला अश्या गटांनी ती माहिती कार्यालयास कळविण्यास सांगितले. जेणेकरून त्या संबंधात बँकांचा आढावा घेण्यात येईल. विभागीय कृषी सहसंचालक यांनी गटांना ज्या बाबी आवश्यक आहेत त्याच बाबी आराखड्यात घ्यावे व गरज वाटल्यास गटाचा आराखडा सुधारित करावा,अश्या सूचना उपस्थितांना दिल्यागटांना गट पुढे नेण्यासाठी आवश्यक सर्व प्रयत्न व मदत करण्याचे आश्वासन  जिल्हाधिकारी यांनी दिले.
            या बैठकीला युवक बिरादरी बहुउद्देशिय शेतकरी बचत गटमुलअशोक जैरामजी गायकवाडअध्यक्षअन्नपुर्णा स्वयंसहाय्यगिरगावमधुकर गोविंदा श्रीरामेसचिवअन्नपुर्णा स्वयंसहाय्यगिरगावपुरूषोत्तम दादाजी बोरकरसदस्यअन्नपुर्णा बचत गटसुनिल भोलानाथजी सोनवणेसदस्यअन्नपुर्णा स्वयंसहाय्य गिरगावरितेश येनप्रेड्डीवारयुवक बिरादरी शेतकरी गट मुलराजल्ला वाभिटकरशेतकरी मित्र बचत गट खिरडीसुधाकर जिवतोडेकिसानपुत्र शेतकरी स्वयंसहाय्य गट नंदोरीनरेंद्र नानाजी जिवतोडे,  किसानपुत्र शेतकरी स्वयंसहाय्य गट नंदोरीआबाजी ढुमणेकृषी मित्र बचत गट सिंदीपलिंद्र सातपुतेउमळपेठ फार्मर्स प्रा. कंपणी उधळपेठतात्यासाहेब रामराव मत्तेवंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामीण विकास गटकान्सा ता. भद्रावतीभाऊजी शंकर जाबोरअन्नदाता शेतकरी बचत गटसुब्बई ता. राजुराश्री. गुरूदेव ग्रामीण विकास संस्थानेदमापेठचिमुर फारर्मस प्रोडूसर कंपणी लिमी. चिमूरसंदीप कुटेमाटेउन्नती शेतकरी पुरूष बचत गट पिपरीहेमंत बोबडेउन्नती शेतकरी पुरूष बचत गटपिपरीए. एस. धनविजयसंजय एस येनुरकरकृषि विकास शेतकरी बचत गटगडिसुर्ला यांची उपस्थिती होती.
00000

No comments:

Post a Comment