Search This Blog

Saturday 30 November 2019

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घ्यावा : डॉ. कुणाल खेमनार


चित्ररथांच्या माध्यमातून होत आहे शेतीविषयी योजनांची जनजागृती
चंद्रपूर, दि. 30 नोव्हेंबर : जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय चंद्रपूर मार्फत योजना शेतकऱ्यांच्या दारी या अभियानाची सुरुवात 26 नोव्हेंबरला झाली या अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनामार्फत शेतीच्या संदर्भात विविध योजना थेट शेतकऱ्यांच्या दारी पोहोचता यावे व या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी चित्ररथ  चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यामधील गावांमध्ये जाऊन जनजागृती करीत आहे.
या चित्ररथाच्या माध्यमातून शेतीच्या विकासाच्या संदर्भातील विविध योजनेचा लाभ घेता यावा यासाठी प्रसिद्धी होत आहे तसेच शेतकऱ्यांना शेती संदर्भातील योजनांची नोंदणी तालुका कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे करावी यासाठी मार्गदर्शनात्मक ठरत आहे.
असे असणार चित्ररथाचे मार्ग
आज दिनांक 1 डिसेंबर रोजी राजुरा तालुक्यातील राजुरा आठवडी बाजार येथे चित्ररथ येणार आहे. चंद्रपुर तालुक्यातील देवाडा, शिवणीचोर,हिंगनाळा,मार्डा या गावांमध्ये तर भद्रावती तालुक्यातील पानवडाळा, नंदोरी, बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता, कोर्टीतुकुम, मूल तालुक्यातील जानाळा,कांतापेठ,टोलेवाही,चिरोली (बाजार), सावली तालुक्यामधील केरोडा,पेटगाव,घोडेवाही, नागभीड मधील कोदेपार,वासाळा मेंढा,वासाळामक्ता,किटाळी मेंढा,मिंडाळा, चिमूर तालुक्यातील ब्राह्मणगाव, तळोधी,मासळ, जिवती तालुक्यातील पाटण, कोरपना तालुक्यातील तामसी,कुर्ला, तांबडी, ब्रह्मपुरी तालुक्यांमधील तोरगांव, देऊळगाव कोलारी, पोंभूर्णा तालुक्यातील डोंगरहळदी, वरोरा मधील वरोरा, सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही (आठवडी बाजार), कारघाटा, गोंडपिंपरी तालुक्यांमधील गोंडपिंपरी, विठ्ठलवाडा या तालुक्यातील गावांमध्ये चित्ररथ येणार असून या माध्यमातून शेतीच्या विकासासंदर्भातील अनेक योजनांची माहिती मिळणार आहे. या शेतीच्या विकासासंदर्भातील अनेक योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ .कुणाल खेमनार यांनी केले आहे
00000

No comments:

Post a Comment