Search This Blog

Sunday 31 December 2023

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे गुरुकुंज आश्रमाला विशेष बाब म्हणून ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

 


ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे गुरुकुंज आश्रमाला विशेष बाब म्हणून ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

Ø श्री. मुनगंटीवार यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे केला होता पाठपुरावा

 

चंद्रपूरदि. ३१ : लाखो गुरूदेव भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गुरूकुंज आश्रमाला विशेष बाब म्हणून ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी ग्रामविकास मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.

अमरावती येथील गुरूकुंज आश्रम जगाच्या कानाकोपऱ्यातील गुरूदेव भक्तांसाठी महत्त्वाचे स्थान आहे. थोर विभूती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची येथे समाधी आहे. राष्ट्रसंतांनी राष्ट्रभक्तीजागृतीअंधश्रद्धा-जातीभेद निर्मूलनग्रामविकास यासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांच्याद्वारे लिखित ग्रामगिता अनेकांना जीवन कसे जगावे यासाठी प्रेरणा देते. मध्यप्रदेश व महाराष्ट्र शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून गौरविले आहे. १९३५ मध्ये गुरूकुंज मोझरी येथे राष्ट्रसंतांनी आश्रम स्थापन केले. हा केवळ आश्रम नसून गुरूदेव भक्तांसाठी ऊर्जास्रोत आहेअसे श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले होते.

राष्ट्रसंतांच्या या कार्याला वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावाअशी आग्रही मागणीही त्यांनी ग्रामविकास मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून केली होती. त्यानुसार ग्रामविकास विभागाने २८ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे महासमाधी स्थळ श्रीक्षेत्र गुरूकुंज आश्रमाला ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान केला आहे. शासनाला यासंदर्भात विशेष बाब म्हणून तीर्थक्षेत्राला 'दर्जा  मिळवून दिल्याबद्दल गुरूकुंज आश्रम व गुरूभक्तांकडून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त होत आहेत.

गुरूदेव भक्तांमध्ये आनंद

यापूर्वी राष्ट्रसंतांचे नाव नागपूर विद्यापीठाला देण्यासाठी माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी विविध संसदीय आयुधांचा वापर करत सातत्यपूर्ण प्रयत्न विधिमंडळात आणि बाहेरही उभारत मोठी लढाई यशस्वी केली होती. हे सर्व गुरुदेव भक्तांच्या स्मरणात आहेत आणि आता गुरुकुंज आश्रमाला 'तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने जगभरातील गुरुदेव भक्तामध्ये आनंद व्यक्त होत आहे.

श्री. मुनगंटीवार यांचा पाठपुरावा

गुरुकुंज आश्रमाला 'वर्ग तीर्थक्षेत्राच्या दर्जा मिळावा म्हणून राज्याचे वनसांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरुवातीपासून पाठपुरावा केला. ऑगस्ट 2023 पासून त्यांनी यासाठी ग्रामविकास विभागाकडे पत्रव्यवहार गेला. त्यांच्या पत्रव्यवहारानंतर ग्रामविकास विभागाने प्रधान सचिवांना या संदर्भात तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 'वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाला प्रस्ताव सादर केला.

अंतिम मंजुरीसाठी पत्र

अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव शासनाला सादर केल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी ग्रामविकास विभागाचे या संदर्भात लक्ष वेधले. त्यानुसार 28 डिसेंबर 2023 रोजी ग्रामविकास विभागाने गुरुकुंज आश्रमाला 'वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान केला.

०००००००

केरळ अव्वल तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

 





                    केरळ अव्वल तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

Ø राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा समारोप

Ø  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात यशस्वी आयोजन

चंद्रपूर दि. 31 : बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत केरळच्या संघाने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकाविले तर महाराष्ट्राला दुसरे आणि तर हरयाणाच्या संघाला तिसरे स्थान मिळाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बल्लारपूर तालुका क्रीडा संकूल येथे 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

केरळच्या संघाला 11 सुवर्ण, 5 रौप्य व 6 कास्य अशी एकूण 22 पदके मिळाली तसेच 60 वैयक्तिक व 36 रिले मिळून 96 गुण मिळाले. महाराष्ट्राच्या संघाने 9 सुवर्ण, 3 रौप्य व 7 कास्य अशी एकूण 19 पदके जिंकून 53 वैयक्तिक व 36 रिले असे एकूण 69 गुण मिळवले. तर हरयानाच्या संघाने 6 सुवर्ण, 9 रौप्य व 1 कास्य पदकासह एकूण 16 पदकांची कमाई केली. हरयाणाच्यया संघाला 55 वैयक्तिक व 6 रिले असे 61 गुण प्राप्त झाले.

राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून प्रथमच तालुका स्तरावर राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत एकूण 34 संघांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी 11 संघांनी 40 सुवर्ण पदकांची कमाई केली तर 19 संघांनी पदकतालिकेत स्थान मिळवले. केरळ, महाराष्ट्र व हरयाणा यांच्यानंतर उत्तरप्रदेश 3 सुवर्ण, 5 रौप्य व 4 कास्य पदकासह एकूण 35 गुण, तामिळनाडू 2 सुवर्ण, 2 रौप्य व 6 कास्य पदकासह एकूण 24 गुण, राजस्थान 2 सुवर्ण, 2 रौप्य व 4 कास्य पदकासह एकूण 20 गुण, छत्तीसगड 2 सुवर्ण व 1 रौप्य पदकासह एकूण 13 गुणभारतीय शालेय परिषद 2 सुवर्ण व 1 कास्य पदकासह एकूण 11 गुणमध्य प्रदेश 1 सुवर्ण व 2 रौप्य पदकासह एकूण 11 गुण, झारखंड 1 सुवर्ण व 1 कास्य पदकासह एकूण 6 गुण, लक्षद्विप 1 सुवर्ण पदकासह एकूण 5 गुण, कर्नाटक 6 रौप्य व 5 कास्य पदकासह एकूण 27 गुण, आंध्र प्रदेश 1 रौप्य व 1 कास्य पदकासह एकूण 4 गुण, तसेच केंद्रीय विद्यालय, उत्तराखंड, पश्चिम बंगाल व पंजाब यांनी प्रत्येकी 1 रौप्य पदकासह 3 गुण आणि दिल्ली व चंदीगड यांनी प्रत्येकी 1 कास्य पदकासह 1-1 गुण मिळवत पदक तालिकेत स्थान मिळवले आहे.

याशिवाय चंदिगड, बिहार, सी.बी.एस.सी. वेलफेअर स्पोर्ट्स, दादरा व नगर हवेली, दव कॉलेज मॅनेजिंग, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, इंटरनॅशनल बोर्ड, आय.पी.एस.सी., जम्मू काश्मिर, नवोदय विद्यालय, ओडिशा, पद्दूचेरी, तेलंगणा व विद्या भारतीच्या संघांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

विविध क्रीडा प्रकारात अव्वल स्थान प्राप्त केलेले महाराष्ट्रातील खेळाडू : 100 मीटर तसेच 200 मीटर धावणे जेसन जेम्स कॅस्टिलीनो (महाराष्ट्र), 110 मीटर अडथळ्याची शर्यत संदीप विनोदकुमार (महाराष्ट्र), 400 मीटर अडथळ्याची शर्यत अली समिर शेख (महाराष्ट्र), 6 कि.मी. क्रॉस कंट्री दशरथ तुकाराम (महाराष्ट्र), 110 मीटर अडथळ्याची शर्यत अलिझा आफताब मौला (महाराष्ट्र), थाळी फेक भक्ती तानाजी गावडे (महाराष्ट्र), 4 कि.मी. क्रॉस कंट्री साक्षी भास्कर भंडारी (महाराष्ट्र)

एकापेक्षा अधिक सुवर्ण पदके प्राप्त करणारे खेळाडू : मोहम्मद मुहास्सीन (केरळ) याने उंच उडी, लांब उडी आणि तिहेरी उडीमध्ये तीन सुवर्ण मिळवले. तसेच जेसन जेम्स कॅस्टिलीनो (महाराष्ट्र), शहारुख खान (उत्तरप्रदेश), सिया अभिजित सावंत (भारतीय शालेय परिषद), सोनिका राजवाडे (छत्तीसगड) यांनी देखील प्रत्येकी दोन सुवर्ण पदके प्राप्त करत आपला ठसा उमटविला.

मुलांच्या गटातून विविध क्रीडा प्रकारात अव्वल स्थान प्राप्त केलेले खेळाडू : 400 मीटर धावणे अभिराम पी. (केरळ), 800 मीटर व 1500 मीटर धावणे शहारुख खान (उत्तरप्रदेश), 3000 मीटर धावणे बलजीत सिंग (हरयाणा), उंच उडी, लांब उडी आणि तिहेरी उडीत मोहम्मद मुहास्सीन (केरळ), बांबू उडी कवीन राजा एस. (तामिळनाडू), गोळा फेक निखलेश (हरयाणा), थाळी फेक तनिष्क शेवरन (हरयाणा), हॅमर थ्रो नरपत सिंह (राजस्थान), भाला फेक आदित्य (हरयाणा)4X100 रिले (महाराष्ट्र), 4X400 रिले (केरळ), 5000 मीटर चालण्याची शर्यत सचिन (हरयाणा),

मुलींच्या गटातून विविध क्रीडा प्रकारात अव्वल स्थान प्राप्त केलेले खेळाडू : 100 मीटर आणि 200 मीटर धावणे सिया अभिजित सावंत (भारतीय शालेय परिषद), 400 मीटर धावणे आणि 400 मीटर अडथळ्याची शर्यत ज्योथीका एम. (केरळ), 800 मीटर धावणे आशा किरण बरला (झारखंड), 1500 मीटर आणि 3000 मीटर धावणे सोनिका राजवाडे (छत्तीसगड), उंच उडी ॲलिस देवा प्रसन्ना एस (तामिळनाडू), बांबू उडी तनु यादव (मध्य प्रदेश), लांब उडी मुबासिना मोहम्मद (लक्षद्विप), तिहेरी उडी जेनिस ट्रीसा रेगी (केरळ), गोळा फेक अनुप्रिया (केरळ), हॅमर थ्रो अनुष्का यादव (उत्तर प्रदेश), भाला फेक वर्षा (हरयाणा), 4X100 रिले आणि 4X400 रिले दोन्ही स्पर्धेत केरळ, 3000 मीटर चालण्याची शर्यत खुशबू यादव (राजस्थान).

०००००००

देशाच्या प्रगतीसाठी गाव विकसीत होणे गरजेचे

                     



            

                देशाच्या प्रगतीसाठी गाव विकसीत होणे गरजेचे

Ø  कोंडेखल (ता. सावली) येथे संकल्प यात्रेत जिल्हाधिका-यांचा गावक-यांशी संवाद

चंद्रपूर, दि. 31 : केंद्र सरकारने सुरू केलेली विकसीत भारत संकल्प यात्रा चंद्रपूर जिल्ह्यात गावागावात जावून लोकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देत आहे. गावक-यांनीसुध्दा या योजनांचा लाभ घेऊन आपल्या गावाच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करावे. गाव विकसीत झाले तरच आपला देश प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

सावली तालुक्यातील कोंडेखल येथे विकसीत भारत संकल्प यात्रेत गावक-यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी तहसीलदार परीक्षित पाटील, गटविकास अधिकारी मधुकर वासनिक, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, तालुका आरोग्य अधिकारी धनश्री अवगड, गटशिक्षणाधिकारी संध्या कोनपतिवार, विस्तार अधिकारी  संजीव देवतळे, सरपंच सरला कोटांगले, उपसरपंच बबन बावनवाडे, ग्रामसेवक आनंद देवगडे आदी उपस्थित होते.

        गावक-यांसोबत संवाद साधतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, विकसीत भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत शासकीय योजना पोहचविणे, योजनांपासून वंचित असलेल्यांना लाभ मिळवून देणे, ज्यांना लाभ मिळाला आहे, अशा नागरिकांचे अनुभव इतरांपर्यंत पोहचविणे, यासाठी ही संकल्प यात्रा एक महत्वाचे व्यासपीठ आहे. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी पहिले स्वत:मध्ये बदल करावा, त्यानंतरच आपण आपल्या गावामध्ये बदल घडवू शकतो. तुमचे उत्पन्न, मुलांचे शिक्षण, आरोग्याच्या सुविधा यासाठीसुध्दा गावक-यांनी आग्रही राहावे. विकसीत भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, कारण गाव विकसीत तरच देश विकसीत होईल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला जिल्हाधिका-यांनी विविध विभागांच्या स्टॉलला भेट दिली. तसेच या स्टॉलच्या माध्यमातून लाभार्थ्यांना काय माहिती दिली जाते, हे जाणून घेतले. यावेळी वैयक्तिक लाभाच्या योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर, आयुष्मान कार्ड, मोदी आवास योजना घरकुल मंजुरीचे पत्र आदींचे लाभार्थ्यांना वाटप केले. 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक गटविकास अधिकारी श्री. वासनिक यांनी तर आभार तहसीलदार परिक्षीत पाटील यांनी मानले. यावेळी राजू परसावार, बंडू मुरकुटे, तालुका अभियान व्यवस्थापक कल्पना देवडाळकर, शुभम श्रीकोंडावारसहाय्यक कार्यक्रमाधिकारी भक्तदास आभारे, प्रशांत भोयर, संजय दुधबळे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००००

जिल्हा कृषी महोत्सवात पशु प्रदर्शन, चर्चा व परिसंवाद

 


जिल्हा कृषी महोत्सवात पशु प्रदर्शन, चर्चा व परिसंवाद

Ø  चांदा क्लब ग्राऊंड येथे 3 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान आयोजन

चंद्रपूर, दि. 31 : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने 3 ते 7 जानेवारी 2024 या कालावधीत चांदा क्लब ग्राऊंड येथे जिल्हा कृषी महोत्सवाचे (चांदा ॲग्रो 2024) आयोजन करण्यात आले आहे. यात शेतीविषयक तंत्रज्ञानासोबतच पशु प्रदर्शनी, चर्चा व परिसंवाद, आदींचा समावेश आहे.

कृषी विषयक प्रदर्शन व शासकीय योजना शेतक-यांपर्यंत पोहचविणे, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार विपणन साखळी सक्षम करणे, समुह / गट स्थापित करून शेतकरी उत्पादन कंपन्यांचे सक्षमीकरण करणे, कृषी विषयक शेतकरी संवाद आयोजित करून शेतक-यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता ते खरीददार संमेलनाचे आयोजन करून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास चालना देणे या उद्देशाने जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

कृषी प्रदर्शन : शासकीय दालने, विविध कंपन्या, खाद्यपदार्थ व प्रात्याक्षिके यांचा समावेश. परिसंवादमध्ये कृषी, कृषी प्रक्रिया व पुरक व्यवसाय आधारीत चर्चासत्रांचे आयोजन, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री करणे, धान्य महोत्सवाचे आयोजन, विक्रेता खरेदीदार संमेलनाचे आयोजन, जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त तसेच उल्लेखनीय काम केलेल्या शेतक-यांचा सन्मान करणे.

350 च्या वर स्टॉल: दि.3 ते 7 जानेवारी या कालावधीत आयोजित होणा-या जिल्हा कृषी महोत्सवामध्ये प्रदर्शनासाठी 350 च्या वर स्टॉलची उभारणी करण्याचे नियेाजन आहे. यात शासकीय योजनांची माहिती व तंत्रज्ञान, कृषी विद्यापीठ तंत्रज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, मत्स्यव्यवसाय तंत्रज्ञान, बियाणे / निविष्ठा तंत्रज्ञान इत्यादी, कृषी व सिंचन तंत्रज्ञान, बँकिंग सेक्टर, मायक्रो स्मॉल ॲन्ड मिडीयम एंटरप्राईझेस (एम.एस.एम.ई), कृषी यांत्रिकीकरण, अवजारे, उपकरणे, धान्य, फळे व भाजीपाला, पौष्टिक तृणधान्य, शेतकरी उत्पादक कंपनी, उमेद संलग्नित महिला गट व इतर, माविम संलग्नित महिला गट व इतर नाबार्ड संलग्नित उपक्रम, फूडस्टॉल व पशुप्रदर्शनीकरीता विविध स्टॉलची उभारणी होणार आहे.

०००००००

Saturday 30 December 2023

जिल्हाधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रांवरील सुविधांची पाहणी चंद्रपूर व मूल तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट



 

जिल्हाधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रांवरील सुविधांची पाहणी

चंद्रपूर व मूल तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट

चंद्रपूर दि. 30 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज चंद्रपूर व मूल तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट देवून मतदार नोंदणी प्रक्रीयेचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी श्री गौडा यांनी चंद्रपूर विधानसभा मतदार क्षेत्रातील मतदान केंद्र क्रमांक 129 व 131 तसेच मूल येथील मतदान केंद्र क्रमांक 102 व 103 येथील मतदान केंद्रावरील सुविधांचे निरिक्षण करून आवश्यक किमान सुविधा उपलब्ध करण्याचे व या कामात येणाऱ्या अडचणींबाबत अहवाल देण्याचे सांगितले. याप्रसंगी त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून मतदाराचे छायाचित्र व नावांची अचूक नोंदणी होत आहे का याबाबत भौतिक पडताळणी करून खात्री करण्याच्या सूचना दिल्या व पात्र व्यक्ती मतदार नोंदीपासून वंचित राहू नये व मतदार यादी अचूक करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी श्री गौडा यांचेसोबत, सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., तहसीलदार विजय पवार नायब तहसीलदार किशोर साळवे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते.

000

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा : दुसऱ्या दिवसाअखेर महाराष्ट्र 5 सुवर्ण पदकासह आघाडीवर

 














राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा :

दुसऱ्या दिवसाअखेर महाराष्ट्र 5 सुवर्ण पदकासह आघाडीवर

चंद्रपूर दि. 30 : बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलात सुरू असलेल्या 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत 28 व 29 डिसेंबर या पहिल्या दोन दिवसाच्या खेळात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पाच सुवर्ण पदक, दोन रौप्य व दोन कास्य असे एकूण नऊ पदकांची कमाई करत पदक तालिकेत आघाडी घेतली आहे. तर केरळचे खेळाडू चार सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्य असे एकूण 12 पदकासह दुसऱ्या स्थानावर आणि हरियाना 3 सुवर्ण, 4 रौप्य व 1 कास्य पदकासह तीसऱ्या स्थानावर आहेत.

आतापर्यंत एकूण 10 संघानी सुवर्ण पदकांची कमाई केली

तर 15 संघांनी पदक तालिकेत स्थान मिळवले आहे.  

कालपर्यंतच्या निकालानुसार उत्तरप्रदेश एकूण 8 पदके, राजस्थान 6 पदके, तामिळनाडू 5, छत्तीसगड 1, भारतीय शालेय परिषद 1, लक्षद्विप 1, मध्य प्रदेश 1, कर्नाटक 6, आंध्र प्रदेश 2, केंद्रीय विद्यालय 1, उत्तराखंड 1 पश्चिम बंगालने 1 पदक प्राप्त करून पदक तालिकेत स्थान मिळवले आहे. अद्याप एक दिवसाचा खेळ बाकी असल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0000