Search This Blog

Monday 4 December 2023

7 डिसेंबरला ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ

 7 डिसेंबरला ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ

चंद्रपूर, दि. 4 : दरवर्षी 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन निधी म्हणून संपुर्ण देशात साजरा केला जातो. यानिमित्त  सशस्त्र सेना ध्वजदि निधी संकलनाची सुरवात जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत 7 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता नियोजन भवन येथे करण्यात येणार आहे. याप्रसंगी माजी सैनिक मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

            यावेळी ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना तसेच शहीद सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, शौर्यचक्र प्राप्त सैनिक यांचा भेटवस्तु, स्मृतिचिन्ह व प्रशस्ती पत्र देवून सन्मान करण्यात येणार आहे. त्यासोबतच माजी सैनिकांच्या पाल्यांना धनादेशाचे वाटप करण्यात येणार आहे.

            कार्यक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच निवासी उपजिल्हाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील माजी सैनिक व नागरिकांनी देखील यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment