नक्षलग्रस्त भागातील शिक्षण व आरोग्य
सुविधांवर निधी खर्चास प्राधान्य
-
जिल्हाधिकारी
विनय गौडा
चंद्रपूर दि. 26 : नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी प्राप्त होणाऱ्या निधीपैकी 75 टक्के निधी अतिसंवेदनशील तालुक्यासाठी वितरीत करावा व त्यात शिक्षण, आरोग्य व पिण्याच्या पाण्यावर प्राधान्याने खर्च करण्याच्या सूचना
जिल्हाधिकारी विनय गौडा. जी.सी. यांनी आज दिल्या.
नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी विशेष कृती
कार्यक्रमांतर्गत निधी खर्चाचा आढावा जिल्हाधिकारी यांनी आज घेतला. याप्रसंगी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, जिल्हा नियोजन अधिकारी
राजू कळमकर, पोलिस उपअधिक्षक राधिका फडके, शिक्षणाधिकारी (प्राथमीक) राजकुमार हीवरे प्रामुख्याने उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण
नऊ तालुके नक्षलग्रस्त भागात येतात. यात जिवती, राजूरा, कोरपणा व गोंडपिंपरी हे तालुके अतिसंवेदनशील
असून चंद्रपूर,
बल्लारपूर, पोंभूर्णा,
मूल व सावली हे तालुके
नक्षल प्रभावीत संवेदनशील तालुके आहेत. या भागातील विकासासाठी विशेष कृती
कार्यक्रमांतर्गत उर्वरित निधीच्या मागणीसाठी पाठपूरावा करण्याच्या सूचना
जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
बैठकीला संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित
होते.
00000
No comments:
Post a Comment