जिल्हा क्रीडा संकुलातील भंगार साहित्याचा जाहीर लिलाव
Ø 7 डिसेंबरपर्यंत दरपत्रक आमंत्रित
चंद्रपूर दि. 4: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथील खराब अवस्थेत असलेल्या भंगार साहित्याचा जाहीर लिलाव करण्यात येत आहे. त्याकरीता खरेदीदारांकडून 7 डिसेंबर 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत जाहीर लिलावाचे दरपत्रक मागविण्यात येत आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सचिव अविनाश पुंड यांनी कळविले आहे.
भंगार लिलाव साहित्य:
मोडकळीस आलेले फिल्टर प्लँट, लोखंडी रॉड, जलतरण तलावातील स्टील रॉड, सळी/सळाकी, खराब बॅटरी, टिनपत्रा व इतर भंगार साहित्याचा लिलाव करण्यात येत आहे.
00000
No comments:
Post a Comment