पहिल्याच दिवशी 336 खेळाडूंना मोफत ताडोबा सफारी
Ø वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या केल्या होत्या सुचना
Ø राष्ट्रीय स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंनी मानले वनमंत्र्यांचे आभार
चंद्रपूर, दि. 25 : राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या पुढाकाराने बल्लारपूर तालुका क्रीडा संकूल येथे राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून देशभरातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशातून जवळपास 3 हजार खेळाडू जिल्ह्यात दाखल होत आहे. वाघांच्या भुमीत येणा-या विविध राज्यातील खेळाडूंना जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची मोफत टायगर सफारी करण्याच्या सुचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार पहिल्याच दिवशी विविध राज्यातील 336 खेळाडूंनी मोफत टायगर सफारीचा मनसोक्त आनंद लुटला.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने पर्यटन समिती स्थापन करण्यात आली असून वनविभागाच्या वतीने खेळाडूंना मोफत टायगर सफारीचे नियोजन करण्यात आले आहे. यात सोमवारी सकाळच्या सत्रात 169 खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, व्यवस्थापक तर दुपारच्या सत्रात 167 खेळाडू अशा एकूण 336 जणांना मोफत सफारी घडविण्यात आली.
सकाळच्या सत्रात केंद्रीय विद्यालय संघटनचे 55 खेळाडू, महाराष्ट्राचे 63 आणि पश्चिम बंगालचे 51 तर दुपारच्या सत्रात हिमाचल प्रदेशचे 46 खेळाडू, पंजाब 65, जम्मू काश्मिर 41 आणि ओडीसाचे 15 अशा एकूण 336 खेळाडूंनी मोफत ताडोबा सफारीचा आनंद लुटला. यावेळी सर्व खेळाडूंना वनविभागाच्या वतीने वेलकम किट देण्यात आली. यात टी-शर्ट, कॅप, किचन, ताडोबा डायरी मॅगझीन व ताडोबाची माहिती पुस्तिकेचा समावेश होता. तसेच सर्वांना सकाळी उत्तम नाश्ता व दुपारी जेवण देण्यात आल्याचे वनविभागाने कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment