Search This Blog

Saturday 31 July 2021

शनिवारी एकही मृत्यु नाही, 15 कोरोनामुक्त

 

शनिवारी एकही मृत्यु नाही, 15 कोरोनामुक्त, 11 पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि.31 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 15 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 11 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात शनिवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 11 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका 0,  बल्लारपूर 1, भद्रावती 3, ब्रम्हपुरी 1, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 1 सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 1, राजूरा 2, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 1 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 85 हजार 23 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 422 झाली आहे. सध्या 67 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 18 हजार 6 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 29 हजार 574 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1534 बाधितांचे मृत्यू  झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे

00000


जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा - खासदार धानोरकर


 

जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा - खासदार धानोरकर

Ø  विविध योजनांची अंमलबजावणी व कामासंदर्भात अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे

चंद्रपूर दि. 31 जुलै: जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्राच्या विविध योजना राबविल्या जातात. त्याची प्रभावी अंमलबजावणी करत लाभार्थ्यांना केंद्रीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा. तसेच प्रलंबित सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश खासदार बाळू धानोरकर यांनी यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. केंद्र शासनाची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दिनदयाल अंत्योदय योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना यासह विविध 29 योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी सदर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, सर्वश्री आमदार प्रतिभा धानोरकर, सुभाष धोटे, किशोर जोरगेवार जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक कपिल कलोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, वीज वितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता संध्या चिंवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी खासदार बाळू धानोरकर म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात फक्त 121 घरकुलाचे काम पूर्ण झाले आहे. ही फारच गंभीर बाब आहे. यासाठी पात्र लाभार्थ्यांना घरकुल अनुदान देऊन घरे बांधण्यास सहकार्य करावे तसेच आवास योजनेचा लाभ सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष घालावे. केंद्र शासनाची ही महत्त्वाची शासकीय योजना आहे, त्याची जनजागृती मोठ्या प्रमाणात केल्यास लाभार्थ्यांना सदर योजनेची माहिती मिळेल. यासाठी प्रयत्न करावे, असे सुचित करून अमृत योजनेचे उर्वरित दहा टक्के काम दोन महिन्यांमध्ये तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी मनपा आयुक्तांना दिले.

घरकुलाच्या बाबतीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत अनेकांना घरकुलाच्या शेवटच्या टप्प्यातील पैसे मिळाले नाही यामध्ये लाभार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे यासाठी काहीतरी मार्ग काढावा, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी संबंधित यंत्रणेच्या विभाग प्रमुखाला दिल्या.

अतिवृष्टीमुळे किंवा इतर पिकांच्या रोगराईमुळे बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळवून द्यावा व अतिवृष्टीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी मदत करावी, असे आमदार धोटे यांनी सुचविले.

प्रधानमंत्री पिक विमा योजने संदर्भात जिल्ह्यातील 1775 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसानीचा अहवाल जेव्हा सादर केला जातो त्याच्या 60 ते 90 दिवसांच्या कालखंडात शेतकऱ्यांना मदत देण्याचे करावे, अशा सूचना खासदार धानोरकर यांनी कृषी विभागाला दिल्या.

 प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राज्याला 6500 किमीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माहितीच्या आधारे चंद्रपूर जिल्ह्याला 176 किमी चे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी ज्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे त्या कामाची नावे सादर करावी, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद क्षेत्रात नरेगाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र वरोरा,भद्रावती तालुक्यात कामे अद्यापही सुरू झाली नाही यासाठी संबंधित अधिकाऱ्याने विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सदर बैठकीत दिल्या.

चिमूर व जिवती तालुक्यात इंटरनेट उपलब्ध राहत नाही. आज-काल सर्व कामे ऑनलाईन झाल्यामुळे अनेक कामे पूर्ण होत नाही व शासकीय कर्मचाऱ्यांना व तेथील नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतो. यासाठी टेलिकॉम विभागाला यापूर्वीच सूचना देण्यात आल्या होत्या ते कार्य कुठपर्यंत पूर्णत्वास आले याबाबत खासदार बाळू धानोरकर यांनी माहिती जाणून घेतली व सदर काम पूर्णत्वास नेण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.

या बैठकीमध्ये विविध विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली व लोकप्रतिनिधी मार्फत ज्या सूचना सदर बैठकीत देण्यात आल्या त्या पूर्णत्वास न्यावे, असे निर्देश खासदार धानोरकर यांनी दिल्या.

00000

Friday 30 July 2021

शुक्रवारी एकही मृत्यु नाही, 5 कोरोनामुक्त

 

शुक्रवारी एकही मृत्यु नाही, 5 कोरोनामुक्त, 8 पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि.30 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 8 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात शुक्रवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 8 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका 2,  बल्लारपूर 1, भद्रावती 1, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 1, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 1, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 1, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 85 हजार 12 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 407 झाली आहे. सध्या 71 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 16 हजार 94 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 27 हजार 643 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1534 बाधितांचे मृत्यू  झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे

00000

विकासकामात कुचराई करणाऱ्यांवर कारवाईचे पालकमंत्र्यांचे निर्देश



 

विकासकामात कुचराई करणाऱ्यांवर कारवाईचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Ø सावली तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा

चंद्रपूर दि. 30 जुलै : सावली तालुक्यात विविध विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सदर विकास कामे तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी गांभीर्याने काम करावे. स्थानिक लोकांच्या अड़ीअडचणी सोडविण्याला आपले प्राधान्य आहे. त्यामुळे जे अधिकारी - कर्मचारी कामात कुचराई करतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आढावा बैठकीत स्पष्ट केले. सावली तालुक्यातील विविध विकास कामासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी सभापती विजय कोरेवार, राकेश गड्डमवार, दिनेश चिटनुरवार, नितीन गोहणे, राजू सिदम, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार परिक्षित पाटील, गटविकास अधिकारी निखिल गावडे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. कटरे, विद्युत वितरणचे उपअभियंता श्री. खरकटे, जि.पचे बांधकाम उपअभियंता श्री. गोगंले प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले की ,जिल्ह्याच्या विकास कामात अडथळा निर्माण केल्यास त्यांची गय केली जाणार नाही. संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच पावसाळ्यात कोणताही अधिकारी गैरहजर राहत असेल किंवा सेवा बजावत नसेल व अशा कारणाने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असेल तर अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

पावसाळ्यात मोठमोठी झाडे उन्मळून पडतात. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो तसेच जिवितहानी सुद्धा होऊ शकते. यासाठी वीज वितरण विभागाने पावसाळ्यात सतर्क राहून काम करावे. तसेच जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीचे वाटप करण्यात आले होते. सदर कामांना दिलेला निधी, ठरावाअभावी खर्च होत नसेल तर ही बाब गंभीर आहे. त्यामुळे गट विकास अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून सदर कामे पूर्णत्वास न्यावी. विकास कामांना खिळ बसता कामा नये याची दक्षता घ्यावी. नागरिकांना तसेच गरजू निराधारांना अन्नधान्याचे वाटप वेळोवेळी करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पालकमंत्री पुढे म्हणाले, सावली तालुक्यात सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र रस्त्याच्या कडेची फिलिंग भरण्यात आली नाही. त्यामुळे अपघात होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेची फिलिंग तातडीने पूर्ण करून घ्यावी. तसेच पावसाळ्यात डेंगू मलेरिया यासारख्या साथरोगाचा प्रादुर्भाव अधिक असतो. त्यासाठी स्वास्थ केंद्रात उपलब्ध असलेल्या औषधसाठा, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची उपलब्धता त्यासोबतच कोरोना काळात सावली तालुक्यातील नागरिकांचे कितपत लसीकरण करण्यात आले, याची प्राथमिक माहिती जाणून घेतली.

यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. ज्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतील त्या जागेवर दुसरा अधिकारी किंवा कर्मचारी यांची नियुक्ति होईपर्यंत सदर अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करू नये, असेही आदेश पालकमंत्र्यांनी दिले.

00000

Thursday 29 July 2021

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 


पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर दि.29 जुलै : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि. 30 जुलै 2021 रोजी सकाळी 10 वाजता चंद्रपूर येथून  सावलीकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता तहसील कार्यालय, सावली येथे आगमन व तालुक्यातील विकास कामासंदर्भात आढावा बैठक. दुपारी 12.30 वाजता सिंचाई विश्रामगृह सावली येथे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. दुपारी 1.30 वाजता पाथरी ता.सावली येथे आगमन व सांत्वनपर भेट. दुपारी 2 वाजता व्याहाड (बु) मुराड ता. सावली येथे आगमन व सांत्वनपर भेट. दुपारी 2.20 वाजता वाघोली बुटी ता. सावली येथे आगमन व श्री. बाबुराव मशाखेत्री यांच्याकडे सदिच्छा भेट. दुपारी 2.45 वाजता वाघोली बुटी ता. सावली येथून गडचिरोलीकडे प्रयाण.

शनिवार दि. 31 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन व राखीव. सकाळी 11.15 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे तालुक्यातील विकास कामासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा. दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह सिंदेवाही येथे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. दुपारी 1.30 वाजता सिंदेवाही येथून ब्रह्मपुरीकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता ब्रह्मपुरी तालुक्यातील विकास कामासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा. सायंकाळी 4 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. सायंकाळी 5.30 ते 6.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. रात्री 6.30 वाजता ब्रह्मपुरी येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

सोमवार दि. 2 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वाजता टसर टुरिझम कॉरिडोर आगरझरी ( ताडोबा) येथे टसर टुरिझम कॉरिडोर आगरझरी, ताडोबा प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2 वाजता नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (डीपीडीसी) बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता नियोजन भवन येथे पत्रकार परिषद. सायंकाळी 6 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

00000

पालकमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी





 

पालकमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

चंद्रपूर,दि. 29 जुलै : जिल्ह्यात 23 आणि 24 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्याकरीता राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी बल्लारपूर तालुक्यातील चारवट, हडस्ती येथे भेट दिली.

शेतक-यांशी संवाद साधतांना पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कापूस आणि सोयाबीनचे नुकसान झाले आहे. अंदाजे 10 हजार हेक्टरला नुकसानीचा फटका बसला असून हा आकडा पुढे वाढूही शकतो. अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या जमिनी खरवडल्या गेल्या. त्यामुळे मदतीची शेतक-यांची मागणी आहे. नुकसानग्रस्त शेतक-यांना त्वरीत मदत करण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शासन शेतक-यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. पंचनाम्याचा अहवाल प्राप्त होताच शासन मदत जाहीर करेल.

विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, वाशिम व इतर ठिकाणी सोयाबीन आणि कापसाचे नुकसान झाले असून पंचनामे झाल्यानंतर जे देय आहे, अशी मदत शेतक-यांना देण्यात येईल. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर विदर्भातील शेतक-यांनासुध्दा नुकसान भरपाई मिळणार आहे, असे पालकमंत्र्यांनी आश्वस्त केले.

यावेळी हडस्ती येथील शेतकरी श्री. शेंडे यांनी पालकमंत्र्यांना माहिती देतांना सांगितले की, वर्धा नदीच्या पुलावरून येणा-या पाण्याच्या प्रवाहामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. समोरच इरईचा संगम असल्याने वर्धा नदी फुगली की बॅकवॉटर शेतात येते. यावेळी पालकमंत्र्यांनी इतरही शेतक-यांशी संवाद साधला.

पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, बल्लारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार, प्रकाश देवतळे यांच्यासह गावपातळीवरील कर्मचारी उपस्थित होते.

0000000

गुरुवारी एकही मृत्यु नाही, 13 कोरोनामुक्त

 

गुरुवारी एकही मृत्यु नाही, 13 कोरोनामुक्त, 14 पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि.29 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 13 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 14 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात गुरुवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 14 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 4, चंद्रपूर तालुका 2,  बल्लारपूर 2, भद्रावती 1, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 1, सावली 1, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 1, चिमूर 0, वरोरा 1, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 1 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 85 हजार 4 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 402 झाली आहे. सध्या 68 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 13  हजार 827 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 25 हजार 446 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1534 बाधितांचे मृत्यू  झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे

00000

अतिवृष्टीत नुकसान झालेल्यांना सर्वतोपरी मदत करणार - मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार




 

अतिवृष्टीत नुकसान झालेल्यांना सर्वतोपरी मदत करणार - मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर,दि. 29 जुलै : जिल्ह्यात 23 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिवती, राजुरा व कोरपना तसेच लगतच्या काही तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पूर परिस्थितीत शेती, घरे व जनावरांच्या गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आराखडे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच अतिवृष्टीत नुकसान झालेल्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित जिल्ह्यातील पूरग्रस्तांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेश सुरवाडे, राजुराचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, जिवतीचे तहसीलदार अमित बनसोडे, तहसीलदार (सामान्य) यशवंत धाईत, महसुल सहाय्यक प्रमोद गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.वडेट्टीवार पुढे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेती, घरे व इतर बाबींचे नुकसान झालेल्यांना तत्परतेने मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच भविष्यातील अतिवृष्टीच्या दृष्टीने किंवा पूर परिस्थिती हाताळण्याच्या संदर्भात नदी-नाले यांचे कायमस्वरूपी नियोजन करावे. जेणेकरून पूर परिस्थितिचा फटका बसणार नाही.

पालकमंत्री पुढे म्हणाले, सोयाबीन व कापूस ही नाजूक पिके असल्याने शेतात पाणी साचल्यामुळे पिके खराब होतात. नाले उथळ झाल्यामुळे नाल्याचे पाणी शेतात जाऊन शेतीचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतीलगत असलेल्या तसेच नुकसान होणाऱ्या भागातील नाल्यांची माहिती घ्यावी व नाला खोलीकरणाचे प्रस्ताव सादर करावे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण 1775 शेतकऱ्यांनी कापूस पिकाचा विमा काढला आहे. पण अतिवृष्टीमुळे 80 टक्के कापूस पिकाचेच नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांना दिली. तसेच ज्या ठिकाणची पिके वाहून गेली त्या ठिकाणी दुसरी पिके घेण्यासाठी बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कृषी विभागाला दिल्या.

*वेकोली म्हसाळा तुकुम येथील शेतजमीन भूसंपादित प्रकल्पग्रस्तांचा आढावा*

वेकोली म्हसाळा तुकुम येथील शेतजमीन भूसंपादित प्रकल्पग्रस्तांचा आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले की, कृषी अधिकारी, तहसीलदार व वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. तसेच परिसरातील नुकसानग्रस्त शेतजमिनीची पाहणी करावी. पाहणीअंती वेकोलिमुळे नुकसान होत असेल तर त्याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वेकोलिच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी वेकोली भटाळा गावच्या पुनर्वसनाबाबत आढावा घेतला व बेस लाइन सर्वे करण्यास गावकऱ्यांनी वेकोलि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

00000

Wednesday 28 July 2021

बुधवारी एकही मृत्यु नाही, 19 कोरोनामुक्त

 

बुधवारी एकही मृत्यु नाही, 19 कोरोनामुक्त, 5 पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि.28 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 19 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 5 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात बुधवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 5 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 3, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 0, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 1, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 1, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 990 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 389 झाली आहे. सध्या 67 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 11 हजार 679 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 23 हजार 515 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1534 बाधितांचे मृत्यू  झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे

00000

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर दि.28 जुलै : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि.29 जुलै 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांबाबत आढावा बैठक. दुपारी 1 वाजता वेकोली, म्हसाळा तुकुम येथील शेतजमीन भूसंपादित प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत आढावा बैठक. दुपारी 1.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात वेकोली भटाळा गावाच्या पुनर्वसनाबाबत आढावा बैठक. दुपारी 2 वाजेपासून वेळ राखीव. सायंकाळी 6 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

शुक्रवार दि. 30 जुलै 2021 रोजी सकाळी 9 वाजता नागपूर येथून सावली जि. चंद्रपूरकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता तहसील कार्यालय, सावली येथे आगमन व तालुक्यातील विकास कामासंदर्भात आढावा बैठक. दुपारी 12.30 वाजता सिंचाई विश्रामगृह सावली येथे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. दुपारी 2 वाजता सावली येथून गडचिरोलीकडे प्रयाण करतील.

शनिवार दि. 31 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन व राखीव. सकाळी 11.15 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे तालुक्यातील विकास कामासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा. दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह सिंदेवाही येथे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. दुपारी 1.30 वाजता सिंदेवाही येथून ब्रह्मपुरीकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता ब्रह्मपुरी तालुक्यातील विकास कामासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा. सायंकाळी 4 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. सायंकाळी 5.30 ते 6.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. रात्री 6.30 वाजता ब्रह्मपुरी येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

सोमवार दि. 2 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वाजता टसर टुरिझम कॉरिडोर आगरझरी ( ताडोबा) येथे टसर टुरिझम कॉरिडोर आगरझरी, ताडोबा प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2 वाजता नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (डीपीडीसी) बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता नियोजन भवन येथे पत्रकार परिषद. सायंकाळी 6 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

00000

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत विमा प्रस्ताव तात्काळ सादर करावेत

 


गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत

विमा प्रस्ताव तात्काळ सादर करावेत

चंद्रपूर दि. 28 जुलै : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी दरड कोसळून, पुराच्या पाण्यात वाहून किंवा अन्य अपघाताने शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा दुर्दैवी मृत्यू अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सदर कुटुंबियांच्या वारसदारांना आर्थिक मदत म्हणून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत 1 ते 2 लाखांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे. अपघातग्रस्तांच्या वारसदारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करून विमा प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन कृषी विभागाचे संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले आहे.

विमा प्रस्तावासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे संबंधित विभागांनी प्राधान्याने उपलब्ध करून द्यावीत. जेणेकरून बाधित कुटुंबास विमा संरक्षणाचा लाभ शीघ्रतेने देता येईल. विमा प्रस्ताव तयार करण्याकरीता ऑक्झीलियम इन्शुरन्स ब्रोकिंग कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींची मदत घ्यावी. या विमा सल्लागार कंपनीचा टोल फ्री क्रमांक 1800 220 812 असा आहे. अपघात ग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या वारसदारांनी युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक 1800 22 4030 किंवा 1800 200 40 30 यावर पूर्व सूचनेची नोंद करावी, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

Tuesday 27 July 2021

मंगळवारी एकही मृत्यु नाही, 16 कोरोनामुक्त

 

मंगळवारी एकही मृत्यु नाही, 16 कोरोनामुक्त, 6 पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि.27 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 16 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 6 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात मंगळवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 6 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 3, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 1, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 1, चिमूर 0, वरोरा 1, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 985 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 370 झाली आहे. सध्या 81 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 9 हजार 607 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 20 हजार 326 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1534 बाधितांचे मृत्यू  झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे

00000

Monday 26 July 2021

14 तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या शुन्यावर

 

14 तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या शुन्यावर

Ø 13 कोरोनामुक्त, 1 पॉझिटिव्ह, ॲक्टीव्ह रुग्ण शंभरच्या खाली

चंद्रपूर, दि.26 जुलै : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. सोमवारी 15 पैकी 14 तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या शुन्यावर आली असून केवळ वरोरा तालुक्यात एक पॉझेटिव्ह रुग्ण आढळून आला. तसेच गत 24 तासात 13 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सोमवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 1 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 0, चंद्रपूर तालुका 0,  बल्लारपूर 0, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 1, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 979 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 354 झाली आहे. सध्या 91 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 7  हजार 185 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 18 हजार 247 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1534 बाधितांचे मृत्यू  झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

ग्रामीण भागातील 322 गावांनी कोरोनाला रोखले


 

ग्रामीण भागातील 322 गावांनी कोरोनाला रोखले

Ø जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला टास्क फोर्सचा आढावा

चंद्रपूर, दि.26 जुलै : गत दीड वर्षांपासून कोरोना विषाणुने मानवी जीवन व्यापले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही पहिल्या आणि दुस-या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळला. मात्र असे असले तरी जिल्ह्यातील तब्बल 322 गावे अशी आहेत, ज्यात सुरवातीपासून ते आजपर्यंत (मार्च 2020 ते जुलै 2021)  एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसून या गावांनी गावाच्या सिमेवरच कोरोनाला रोखून धरले. तर सद्यस्थितीत जिल्ह्यातील जवळपास 1200 गावांत गत एक महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित टास्क फोर्सच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, पोलिस उपअधिक्षक शेखर देशमुख, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुंवर, जिल्हा पुरवठा अधिकारी शालिग्राम भराडी, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. खंडाते आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात ग्रामीण भागात अंदाजे 1600 गावे आहेत. यापैकी तब्बल 75 टक्के म्हणजे 1200 गावात गत एक महिन्यापासून कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. तर गत दीड वर्षात सुरवातीपासून ते आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसलेल्या गावांची संख्या 322 आहे. यात जिवती तालुक्यातील सर्वाधिक 98 गावे, बल्लारपूर तालुक्यातील 9 गावे, भद्रावती 12, चंद्रपूर 12, मुल 11, नागभीड 12, राजूरा 36, सिंदेवाही 27, वरोरा 11, पोंभुर्णा 9, कोरपना 25, ब्रम्हपूरी 13, चिमुर 22, गोंडपिपरी 17 आणि सावली तालुक्यातील 8 गावांचा समावेश आहे.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, जगातील काही देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे गाफिल राहू नका. संभाव्य तिस-या लाटेसंदर्भात सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे लोकांचा कल मास्क न वापरण्याकडे दिसत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी ‘नो मास्क नो एन्ट्री’ ची कडक अंमलबजावणी करावी. शहरी व ग्रामीण भागात दुकानांच्या वेळा ठरवून दिल्यानंतरही त्याचे उल्लंघन होत असल्यास त्वरीत कार्यवाही करा. चार वाजेनंतर संबंधित आस्थापने बंद झाली पाहिजे. त्यासाठी महानगर पालिका, नगर पालिका आणि तालुका प्रशासनाने आपापल्या टीम पुन्हा सक्रीय कराव्यात, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

 

नुकसान भरपाईचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश : जिल्ह्यात 23 व 24 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने शेतमालाचे नुकसान झाले असल्यास त्वरीत पंचनामा करावा. तसेच प्रशासनाकडे अहवाल सादर करून अनुदानाची मागणी करावी, अशा सुचना त्यांनी यंत्रणेला दिल्या. पीक विमा योजनेला 31 जुलैपर्यंत मुदवाढ मिळाली आहे. 23 जुलैच्या अतिवृष्टीत ज्या शेतक-यांचे नुकसान झाले असेल त्यांनी 72 तासांमध्ये सदर माहिती कळवावी, असेही आवाहन त्यांनी केले.

  बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, न.प. मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

000000

Sunday 25 July 2021

रविवारी एकही मृत्यु नाही, 8 कोरोनामुक्त, 6 पॉझिटिव्ह

 


रविवारी एकही मृत्यु नाही, 8 कोरोनामुक्त, 6 पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि.25 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 8 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 6 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात रविवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 6 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 2, चंद्रपूर तालुका 0,  बल्लारपूर 0, भद्रावती 1, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 0, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 1, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 1 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 978 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 341 झाली आहे. सध्या 103 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 6  हजार 293 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 17 हजार 240 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1534 बाधितांचे मृत्यू  झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. 

00000


Saturday 24 July 2021

शनिवारी एकही मृत्यु नाही, 17 कोरोनामुक्त

 


शनिवारी एकही मृत्यु नाही, 17 कोरोनामुक्त, 5 पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि.24 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 17 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 5 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात शनिवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 5 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका 1,  बल्लारपूर 0, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 1, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 0, चिमूर 2, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 972 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 333 झाली आहे. सध्या 105 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 4  हजार 759 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 15 हजार 669 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1534 बाधितांचे मृत्यू  झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. 

00000

Friday 23 July 2021

स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतक-यांनी पीक नुकसानीच्या पूर्वसूचना देण्याचे आवाहन

 स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतक-यांनी पीक

नुकसानीच्या पूर्वसूचना देण्याचे आवाहन

चंद्रपूर दि.23 जुलै : खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबविली जात आहे.  या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized Calamities) या जोखीमेच्या बाबीअंतर्गत गारपीटभूस्खलनविमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफूटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते.

माहे जुलै महिन्यामध्ये राज्यातील काही भागात अतिवृष्टीने तसेच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेत पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. पीक विमा संरक्षण घेतलेल्या अधिसूचित पिकांचे उपरोक्त बाबींमुळे नुकसान झाल्यास पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून 72 तासामध्ये विमा कंपनीस देणे आवश्यक आहे.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीमेअंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हे नंबर नुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इंश्युरंन्स ॲप, संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक, बँककृषि  महसूल विभाग यांना कळवावे. नुकसान कळवितांना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक असेल. या बाबी अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीबाबतची पूर्वसूचना शेतकऱ्यांनी 72 तासादरम्यान वैयक्तिकरित्या मोबाईल ॲपद्वारे, विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक अथवा लेखी स्वरुपात विमा कंपनीच्या तालुका,जिल्हा कार्यालयात किंवा कृषी,महसूल विभागास देणे आवश्यक आहे.

याबाबत अधिक तपशिलासाठी तात्काळ नजीकच्या विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

00000