Search This Blog

Friday 26 January 2018

चंद्रपूरातील अत्‍याधुनिक बसस्‍थानक 18 महिन्‍यात जनतेच्‍या सेवेत रूजु होणार – ना. सुधीर मुनगंटीवार






16 कोटी रू. किंमतीचे बसस्‍थानकाच्‍या कामाचा भुमीपूजन सोहळा संपन्‍न

चंद्रपूर, दि.26 जानेवारी- सन 2015 चा अर्थसंकल्‍प सादर करताना एसटी बसस्‍थानकांचा चेहरामोहरा बदलण्‍याची घोषणा अर्थमंत्री म्‍हणून मी केली होती. या घोषणेला अनुसरून चंद्रपूरातील मुख्‍य बसस्‍थानकाचे आधुनिकीकरण व नुतनीकरणासाठी 16 कोटी रू. निधी मंजूर केला. आज या कामाचे भूमीपूजन पाच सेवानिवृत्‍त कर्मचा-यांच्‍या शुभहस्‍ते करताना मला मनापासुन आनंद होत आहे. बल्‍लारपूर आणि मुल या ठिकाणच्‍या बसस्‍थानकांचे आधुनिकीकरण व नुतनीकरणाचे काम सुध्‍दा सुरू करण्‍यात आले आहे. यापुढील काळात पोंभुर्णानागभीडचिमूरगोंडपिपरीकोरपनाघुग्‍गुस सर्वच ठिकाणची बसस्‍थानके देखणी होतील. बसेसच्‍या खरेदीसाठी विशेष निधी आपण उपलब्‍ध केला आहे. नव्‍या बसेस मधील 10 टक्‍के नव्‍या बसेस चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्‍हयांमध्‍ये देण्‍याबाबत आपण परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना सांगीतले आहे. चंद्रपूरातील बसस्‍थानक आधुनिक स्‍वरूपात 18 महिन्‍यांच्‍या कालावधीत नागरिकांच्‍या सेवेत रूजु होईलअसे प्रतिपादन राज्‍याचे वित्‍तनियोजन आणि वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक 26 जानेवारी रोजी चंद्रपूर येथील मुख्‍य बस स्‍थानकाच्‍या आधुनिकीकरण व नुतनीकरणाच्‍या कामाचे भुमीपूजन पाच सेवानिव़त्‍त एसटी कर्मचा-यांच्‍या शुभहस्‍ते करण्‍यात आले. यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री ना. हंसराज अहीरआमदार नानाजी शामकुळेवनविकास महामंडळाचे अध्‍यक्ष चंदनसिंह चंदेलजिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळेमहापौर सौ. अंजली घोटेकरबल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मामनपाचे स्‍थायी समितीचे सभापती राहूल पावडेएसटीचे विभाग नियंत्रक कार्तीक सहारेविभागीय अभियंता राहूल मोडकवार आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ना.सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणालेहजारों, लाखो शहीदांच्‍या बलिदानानंतर स्‍वातंत्र्याचा मंगलकलश आपल्‍या हाती आला. हा मंगलकलश चिरंतन काळ अबाधित ठेवण्‍याची जबाबदारी भारतीय नागरीक म्‍हणून आपली आहे. नुकत्‍याच झालेल्‍या कृषी महोत्‍सवात आपण वनावर आधारित कौशल्‍य विकास केंद्र जिल्‍हयात आणण्‍याची घोषणा मी केली होती. यासंदर्भात मी नुकतीच केंद्रीय कौशल्‍य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. आपले सादरीकरण पाहुन त्‍यांनी कौशल्‍य विकास केंद्रासाठी 70 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. टाटा ट्रस्‍ट सोबत झालेल्‍या करारानुसार 90 कोटी रू. किंमतीचे कॅन्‍सर हॉस्‍पीटल जिल्‍हयात आपण उभारत आहोत. शासकीय वैद्यकिय महाविद्यालयबॉटनिकल गार्डनसैनिकी शाळापोलिस प्रशिक्षण केंद्र अशी विकासकामांची मोठी मालिका आपण तयार केली आहे. 200 एकर जागेत गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र उभे राहत आहे. बल्‍लारपूरमुल येथे स्‍टेडियमची बांधकामे सुरू होत आहेत. चंद्रपूरात पाच मोकळया जागांचा विकास करून त्‍यासाठी उद्याने निर्माण करण्‍यात आली आहे. पोंभुर्णा येथे भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या नावाने इको पार्क निर्माण करण्‍यात आले आहे. विकास प्रक्रिया सर्वसमावेशक असावी यावर आपला नेहमीच भर राहिला आहेअसेही ना. सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.

सबका साथ सबका विकास या ब्रीदानुसार पालकमंत्र्यांचे कार्य
– ना. हंसराज अहीर
उत्‍तम रस्‍तेस्‍टेडियमपिण्‍याचे पाणीबसस्‍थानकेपुलइमारती अशा विविध पायाभूत सुविधांना अग्रक्रम देत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्‍हयाच्‍या विकासाला गती देत आहेत. मा. पंतप्रधानांच्‍या सबका साथ सबका विकास या ब्रीदानुसार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार या जिल्‍हयाला विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर करीत आहे. गेल्‍या तीन दिवसांपासुन विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पणाचा धडाका त्‍यांनी सुरू केला आहे. येत्‍या काळात या जिल्‍हयाचा चेहरामोहरा बदलेल व हा जिल्‍हा राज्‍यातला प्रमुख विकसित जिल्‍हा म्‍हणून नावारूपास येईलअसे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

ना.  सुधीर मुनगंटीवार हे खरे विकासपुरूष – आमदार नानाजी शामकुळे

चांदा ते बांदा ही संकल्‍पना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली व त्‍याला अनुसरून चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या विकासाला वेग दिला. वनविभागाला नवी ओळख त्‍यांनी मिळवून दिली. कधीकाळी 25 कोटी रूपये या जिल्‍हयाच्‍या विकासासाठी मिळणे कठीण जात होते. त्‍या जिल्‍हयात आज 600 कोटी रू. किंमतीचे मेडीकल कॉलेज उभे राहते65 कोटी रू. किंमतीचा दाताळा येथील पुलाचे बांधकाम मंजूर होते16 कोटी रू. किंमतीचे बसस्‍थानकाचे बांधकाम मंजूर होते. ना. सुधीर मुनगंटीवार हे ख-या अर्थाने विकासपुरूष असल्‍याचे प्रतिपादन आ. शामकुळे यांनी यावेळी बोलताना केले.

जिल्‍हा विकासाच्‍या वाटेवर अग्रेसर – देवराव भोंगळे

गेल्‍या तीन दिवसांपासुन कोटयावधींच्‍या विकासकामांची भुमीपूजने व शुभारंभाचे कार्यक्रम सुरू आहेत. महाराष्‍ट्रामध्‍ये चंद्रपूर हा जिल्‍हा विकासाचे आदर्श उदाहरण म्‍हणून पुढे येत आहे. आरोग्‍यशिक्षणपर्यावरणपिण्‍याचे शुध्‍द पाणीरोजगार या सर्व बाबींना प्राधान्‍य देत पुढील 50 वर्षांचा दृष्‍टीकोन ना.  सुधीर मुनगंटीवार यांनी पुढे ठेवून या जिल्‍हयाला विकासाच्‍या वाटेवर पुढे आणले आहेअसे प्रतिपादन जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.
यावेळी स्‍वातंत्र्य संग्राम सैनिक शंकरलाल लांजेवार यांचा सत्‍कार करण्‍यात आला. ज्‍यांनी या बसस्‍थानकाचे संकल्‍पचित्र तयार केले आहे ते आर्कीटेक्‍ट  किशोर चिददरवार यांचेही स्‍वागत करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग नियंत्रक कार्तीक सहारे यांनी केले. आभार प्रदर्शन विभागीय अभियंता राहूल मोडकवार यांनी तर संचालन शीतल गौड यांनी केले. निवृत्‍त एसटी कर्मचा-यांचे स्‍वागत या कार्यक्रमादरम्‍यान करण्‍यात आले. एसटी कर्मचारी संघटनाबसस्‍टॅन्‍ड कर्मचारी संघटनाऑटोरिक्षा संघटनाग्रामीण पत्रकार संघ आदी संघटनांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्‍कार केला. कार्यक्रमाला शहरातील नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.
                                                            000

पोलिस कल्‍याणासाठी शासन पोलिसांच्‍या भक्‍कमपणे पाठिशी – ना. सुधीर मुनगंटीवार



चंद्रपूरात अत्‍याधुनिक पोलिस व्यायाम शाळेचे लोकार्पण

चंद्रपूर, दि.26 जानेवारी- सुदृढ शरीरात उत्‍तम मन वास करते. पोलिसांना उत्‍तमनिरामय आरोग्‍य आवश्‍यक आहे. समाजात मनभेद निर्माण करणा-यांना वठणीवर आण्‍ण्‍याचे काम पोलिस कर्मचारी करतात. पोलिस कल्‍याणशी संबंधित नस्‍ती कधी आली व ती निगेटीव्‍ह असली तर ती मी पॉझीटीव्‍ह करतो. सायबर क्राईम लॅब प्रथमतः चंद्रपूरात सुरू झाली. 2015 मध्‍ये ही सुरूवात करणारा चंद्रपूर हा पहिला जिल्‍हा ठरला. त्‍यानंतर इतर जिल्‍हयांमध्ये सायबर क्राईम लॅब सुरू झाल्‍या. पोलिस भरतीमध्‍ये जिल्‍हयाचे प्रमाण अधिक वाढावे यासाठी पोलिस प्रशिक्षण केंद्र,पोलिसांसाठी निवासस्‍थाने आम्‍ही तयार करीत आहोत. निवृत्‍त पोलिस कर्मचा-यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्‍या माध्‍यमातून घरे देण्‍याचा आमचा मानस असल्‍याचे प्रतिपादन राज्‍याचे वित्‍तनियोजन आणि वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोलिस कल्‍याणासाठी शासन पोलिसांच्‍या पाठिशी भक्‍कमपणे उभे असल्‍याचे त्‍यांनी यावेळी बोलताना स्‍पष्‍ट केले.
दिनांक 26 जानेवारी रोजी चंद्रपूरात पोलिस जीम च्‍या लोकार्पण सोहळयात ना.सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आ.नानाजी शामकुळेजिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळेमहापौर सौ.अंजली घोटेकरउपमहापौर अनिल फुलझेलेपोलिस अधिक्षक नियती ठाकर,अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी सचिन कलंत्रे, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ना.सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणालेपोलिस दल अधिक सक्षम करण्‍याच्‍या दृष्‍टीने आम्‍ही जिल्‍हयात 102 कोटी रूपये खर्च करून पोलिसांसाठी क्‍वॉर्टरचे बांधकाम केले. बल्‍लारपूर येथे 10 कोटी रू. निधी खर्चून नव्‍या पोलिस स्‍टेशनचे बांधकामदुर्गापूर येथे नविन पोलिस स्‍टेशनचे बांधकाम आपण करीत आहोत. राज्‍यात काहीच ठिकाणी असणारी अशी सीसीटिव्‍ही मोबाईल व्‍हॅन चंद्रपूरात आपण घेतली. पोलीसांना सुविधा देण्याबाबत हात आखडता घेणार नाही. जिल्हा दारुबंदी करतांना जिल्हयाच्या सदृढ आरोग्याचाच आम्ही विचार केला होता. पोलिसांनी या घोषणेला उत्तम प्रतिसाद दिला असून जिल्‍हा व्‍यसनमुक्‍त करण्‍याच्‍या प्रक्रियेमध्‍ये योगदान देण्‍याचे आवाहन ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
1.36 कोटी रू. खर्चून बांधण्‍यात आलेल्‍या या पोलिस जीम चे लोकार्पण ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक पोलिस अधिक्षक नियती ठाकर यांनी केले. या पोलिस जीमच्‍या माध्‍यमातून पोलिसांच्‍या आरोग्‍याला आकार देण्‍याचे काम होणार असल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या. पुण्‍यामध्‍ये असणा-या व्‍यायामाच्‍या मशीन्‍स याठिकाणी आहेत. सरकारी यंत्रणेतील ही पहिली अदयावत यंत्रणा आहे. यातील काही आधुनिक यंत्रे चेन्‍नईहुन मागविण्‍यात आली आहेत. पोलिसांच्‍या आरोग्‍यवर्धनाच्‍या दृष्‍टीने ही व्‍यायामशाळा अतिशय महत्‍वाची ठरणार असल्‍याचे नियती ठाकर म्‍हणाल्‍या. अतिरिक्‍त पोलिस अधिक्षक हेमराज राजपुत यांनीही यावेळी मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक विकास मुंडे यांनी केले. कार्यक्रमाला जिल्‍हयातील पोलिस अधिकारी व कर्मचा-यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. 
                                                            00000

विकास प्रक्रियेत माझाही महत्‍वपूर्ण सहभाग राहील हा संकल्‍प प्रत्‍येक नागरिकाने करावा – ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन





 चंद्रपूरमध्ये प्रजासत्ताक दिनाला उल्लेखनीय कार्य करणा-यांचा सत्कार

चंद्रपूर, दि.26 जानेवारी- चंद्रपूर जिल्‍हा विकासाचे विविध टप्‍पे अनुभवत आहे. या जिल्‍हयाला विकासाच्‍या वाटेवर अग्रेसर करताना विकास प्रक्रियेत सर्वांनी सहभागी होण्‍याची आवश्‍यकता आहे. प्रजासत्‍ताक दिनी सिमेवर लढताना प्राणांची आहूती देणा-या वीरांचे स्‍मरण करताना आपण धर्मभेदजातीभेद न करता देशाप्रती आपले दायित्‍व पूर्ण करण्‍याची आवश्‍यकता आहे. प्रजासत्‍तादिनी जिल्‍हयाच्‍या विकासाला गती देण्‍याचा संकल्‍प करताना विकास प्रक्रियेत माझाही महत्‍वपूर्ण सहभाग राहील हा संकल्‍प प्रत्‍येक नागरिकाने करण्‍याचे आवाहन राज्‍याचे वित्‍तनियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक 26 जानेवारी प्रजासत्‍ताक दिनी चंद्रपूर येथे शासकीय ध्‍वजवंदन कार्यक्रमात ना.सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी गृह, कृषी, क्रीडा, शिक्षण आदी विभागात उल्लेखनीय कार्य करणा-यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय अर्थ राज्‍यमंत्री शांतारामजी पोटदुखेआ.नानाजी शामकुळे, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळेमहापौर सौ. अंजली घोटेकरमनपाचे स्‍थायी समिती सभापती राहूल पावडेउपमहापौर अनिल फुलझेलेजि.प. उपाध्‍यक्ष कृष्‍णा सहारेअतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी सचिन कलंत्रेपोलिस अधिक्षक नियती ठाकरजिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकार जितेंद्र पापळकर, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, स्वातंत्र्य सैनिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना.सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणालेचंद्रपूर जिल्हा महाराष्‍ट्रात विकास प्रक्रियेत अग्रणी जिल्हा म्‍हणून लौकीक प्राप्‍त ठरण्‍याच्‍या दृष्‍टीने वाटचाल करीत आहे. मोठया प्रमाणावर विकासकामे जिल्‍हयात सुरू आहे. चंद्रपूर,बल्‍लारपूरमुल येथील बसस्‍थानकांचे आधुनिकीकरण व नुतनीकरणचंद्रपूर शहरात अमृत पाणीपुरवठा योजनाटाटा ट्रस्‍टच्‍या सहाय्याने कॅन्‍सर हॉस्‍पीटलजल साक्षरता केंद्रदुग्‍धव्‍यवसाय व कुक्‍कुट पालनाचे प्रकल्‍पचंद्रपूर आणि बल्‍लारपूर येथील हरीत रेल्‍वे स्‍थानके म्‍हणून विकसित करणेशासकीय वैद्यकिय महाविद्यालयसैनिकी शाळाबांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रबॉटनिकल गार्डनताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाला जागतिक दर्जाचे पर्यटन स्‍थळ  करणेचिचडोहचिचाळा,पळसगांव आमडी यासारखे सिंचन प्रकल्‍प असे अनेक विकासकामे व प्रकल्‍प मंजूर झाले असून काही प्रगतीपथावर आहेत. हॅलो चांदा सारखा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेचा अभिनव प्रयोग देशात चंद्रपूरमध्ये सुरु आहे. हा जिल्‍हा राज्‍यासाठी विकासाचे मॉडेल ठरेल याचा मला विश्‍वास आहेअसेही ते यावेळी बोलताना म्‍हणाले.
ध्‍वजवंदन कार्यक्रमानंतर विविध शाळांचे संचालनपथकदंगानियंत्रण पथकॲम्ब्युलन्ससीसीटिव्‍ही व्‍हॅन, मोबाईल फॉरेंसिक लॅब, जिल्‍हा विकास स्‍वच्‍छता मिशन आदीं‍ विषयीचे चित्ररथांना मानवंदना देण्यात आली. यामध्ये सर्वांचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कौतुक केले. यावेळी विविध शाळांच्‍या विद्यार्थ्‍यांनी कवायती व प्रात्‍याक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे संचालन अशोक सिंह उपाख्य मोंटू सिंग यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील गणमान्‍य नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. 
          यावेळी  चंद्रपूर येथील न्यु.इंग्लिश हायस्कूल, सिटी हायस्कूल, जनता हायस्कूल, नेहरु विद्यालय, लोकमान्य टिळक कन्या विद्यालय, एफ.ई.एस.गर्ल्स हायस्कूल. छोटूभाई  पटेल हायस्कूल.रफी अहमद किदवाई हायस्कूल. स्व.बापुरावजी वानखेड विद्यालय, सिध्दार्थ विद्यालय,  हिंदी माध्यमिक विद्यालय, मातोश्री विद्यालय, भवानजीभाई चव्हाण हायस्कुल व नुतन माध्यमिक विद्यालय, हिंदी सिटी हायस्कुल, लोकमान्य टिळक विद्यालयाच्या मुला-मुलींनीच्या चमुनी सामुहिक कवायत, लेक्षीम प्रात्यक्षिके व सामूहिक बांबूड्रिल सादर केलीत. तर फेरिलॅड इंग्लिश स्कुल भद्रावतीच्या मुलांनी खडीमास पिटी बँड सादर केली.
          या कार्यक्रमामध्ये पोलिस उपनिरीक्षक विनोद तिवारी (राष्ट्रपती पदक प्राप्त), सतिश सोनेकर (विशेष सेवा पदक प्राप्त), विनित घागे (विशेष सेवा पदक प्राप्त), आणि सीटीएनएस कार्यप्रणातील उत्कृष्ट काम केल्याबद्दल चंद्रकांत लांबट, पोलीस शिपाई गोपाल पिंपळशेंडे, पोलीस क्रीडा स्पर्धेतील उल्लेखनीय कामासाठी चेतन जाधव, अमृता चक्रे, मिलींद आत्राम, वैशाली पाटील, लतिका मिसार, प्रिती महाजन, दिव्या कलीये यांना पोलीस दलामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी गौरवान्वित केले. तर वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार दत्तात्रय गणपतराव गुंडावार मु.चिंचाळा, गुणवंत जिल्हा क्रीडा पुरस्कार चैताली कन्नाके, अनिल ददगाळ, सुरेश अडपेवार यांना पालकमंत्री याच्याहस्ते प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. याशिवाय स्वच्छ भारत मिशन वक्तृत्व स्पर्धोसाठी पायल पिलारे, प्रशिक मानके यांना पुरस्कार देण्यात आला. तर माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या विभागीय स्पर्धेतील निवडीसाठी पायल वाळके, पायल मेश्राम, ललिता शिंदे, सोनुताई जाधव, निखिता मेश्राम यांचा गौरव करण्यात आला.
                                                          000

बल्लारपूर मतदार संघात पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारणार – ना.सुधीर मुनगंटीवार



पोभूर्णा येथे इको पार्क, आरो मशीन चे लोकार्पण व तलावाच्या सौंदर्यीकरणाचे भुमीपूजन

चंद्रपूर, दि.25 जानेवारी - शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी व रोजगार बल्लारपूर मतदार संघातील नागरिकांना उपलब्ध व्हावे यासाठी विविध विकास कामे मोठया प्रमाणात करीत आहोत. तसेच या परिसरातील युवकांना मोठया प्रमाणात सैन्य भरती, पोलीस भरती यासाठी आवश्यक असणारे शारिरीक प्रशिक्षण मिळावे, तसेच बल्लारपूर मतदार संघातील युवकांचे प्रतिनिधीत्व पोलीस भरतीमध्ये ठळकपणे उमटावे यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
        बल्लारपूर मतदार संघातील पोंभूर्णा येथे विविध विकासकामांचे उदघाटन, लोकार्पण, शुभारंभ कार्यक्रमासाठी ते आज पोंभूर्णा नगरात दाखल झाले होते. आज त्यांनी प्रथम पाटबंधारे विभागाच्या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे भूमीपुजन केले. त्यानंतर पोंभूर्णा नगर पंचायत येथे शुध्द पिण्याच्या पाण्याच्या एटीएम मशीनचे लोकार्पण व डस्टबीन वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्‍यानंतर पोंभूर्णा येथे तयार करण्यात आलेल्या इको पार्कचे लोकार्पण त्यांनी केले.
            यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार ॲड.संजय धोटे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, पोंभूर्णा नगर पंचायतचे अध्यक्ष गजानन गोरंटीवार, उपाध्यक्ष ईश्वर नैताम, पंचायत समिती सभापती अल्काताई आत्राम, उपसभापती विनोद देशमुख, पंचायत समिती सदस्य ज्योतीताई बुरांडे, गंगाधर मडावी, पोंभूर्णा नगर पंचायत सभापती पुष्पाताई बुरांडे, नेहाताई बघेल, किशोर कावळे, गटनेता अतिक कुरेशी, नगर सेवक विजय कस्तूरे, मोहन चलाख, श्वेताताई वनकर, सुनिता मॅकनवार, रजियाताई कुरेशी,शारदा कोडापे, अमरसिंह बघेल, कल्पनाताई गुरनुले, सविता गेडाम, जयपाल गेडाम, माधुरी चांदेकर,मुख्याधिकारी विपीन मुध्दा, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सोनोने,प्रमोद कडू आदी उपस्थित होते.  
यावेळी आरो मशीनचे लोकार्पण करताना त्यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगार, पिण्याचे पाणी या संदर्भात सर्व योजना राबविण्यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे यावेळी सांगितले. पोंभूर्णा नगर पंचायतीच्या विकासासाठी गेल्या तीन वर्षात केलेल्या विविध कामाचा आढावा त्यांनी घेतला. या मतदार संघाने मला मतरूपी आशिर्वाद दिल्यामुळे पाचव्यांदा मी विधानसभेत गेलो. तुमच्या आशीर्दाने मंत्री झालो. तुमच्यामुळे मला महाराष्ट्रभर सन्मान मिळत आहे. याची जाणीव ठेवून या मतदार संघातील प्रत्येक शहर व गावातील विकासासाठी मी प्रयत्न करीत आहे. पोंभूर्णा ही सुंदर नगर पंचायत म्हणून महाराष्‍ट्रात या शहराचे नाव व्‍हावे, अशी माझी इच्छा आहे. या मतदार संघातील तरुणांना मार्गदर्शन करतांना ते म्हणालेजिल्हयाच्या व तालुक्याच्या ठिकाणी मोठया प्रमाणात आपण अभ्यासिका निर्माण करतो आहे. या ठिकाणचे तरुण वेगवेगळया ठिकाणी महत्वाच्या पदावर जावेत अशी आपली इच्छा आहे. या भागातील उमेदवारांनी सैन्य दल, पोलीस दल व अन्य विभागात भरती व्हावे, यासाठी लवकरच आपण पोलीस प्रशिक्षण केंद्राची सुरुवात या मतदार संघात करीत आहोत. प्रत्येक सैन्य भरतीत व पोलीस भरतीत या भागातील तरुणांची निवड व्हावी यामागची आपली भूमिका असून रोजगार निर्मितीसाठी चांगल्या प्रशिक्षण संस्था उभारत असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूर येथे सैनिकी शाळेसोबत बल्लारपूर मतदार संघातील पोलीस प्रशिक्षण केंद्र या भागातील तरुणांसाठी महत्वाचे ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
                                                            000

Monday 15 January 2018

चंद्रपूरमधून महाराष्ट्रभर जाऊ दया जलसाक्षरतेचा संदेश - ना. सुधीर मुनगंटीवार



·        महाराष्ट्रातील पहिल्या जलसाक्षरता केंद्राचे उद्घाटन
·        कृषी प्रदर्शनी, बचत गटांच्या विक्री प्रदर्शनीला सुरूवात
·        15 ते 19 जानेवारी चांदा क्लबवर भेट देण्याचे आवाहन

         चंद्रपूर, दि.15 जानेवारी-  भारत हा कृषीप्रधान देश आहे. हे केवळ निबंधात लिहायचे वाक्य न राहता आता शेती ही आमच्या जीवनमानाचा, प्रगतीचा, अर्थार्जनाचा आणि प्रतिष्ठेचा विषय झाला पाहिजे. त्यासाठीच राज्य शासन जल, जमीन, जंगल या जीवनचक्राला बळकट करण्यासाठी प्रयत्न करीत असून जलसाक्षरता ही या श्रृखंलेतील महत्वाची कडी आहे. महाराष्ट्रातील पहिल्या जलसाक्षरता केंद्राचे आज उद्याटन झाले आहे. चंद्रपूर मधून जलसाक्षरतेचा हा संदेश महाराष्ट्रभर जाऊ दया, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
               चंद्रपूर येथील चांदा क्लबवर आजपासून कृषी महोत्सव,  बचत गटांच्या विक्रीचा व प्रदर्शनीचा शुभारंभ झाला. याच कार्यक्रमाच्या उद्घाटनात विभागीय जलसाक्षरता केंद्राचा शुभारंभही करण्यात आला. 15 ते 19 जानेवारी या काळात जिल्हाभरातील शेतकऱ्यांना जल, जमीन, जंगल यांच्या बळकटीकरणाला उभारी देणारे विविध मार्गदर्शन सत्र, कार्यशाळा, प्रदर्शनी व विक्री अनुभवायला मिळणार आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जलसंपदा विभागाअंतर्गत विभागीय जलसाक्षरता केंद्र चंद्रपूर यांच्यावतीने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन भव्य मार्गदर्शन हॉल, योजना व माहिती, कृषी तंत्रज्ञान, कृषी निविष्ठा, सेंद्रीय शेती, बिगर सेंद्रीय शेती, यांचे दालन, शेतमाल विक्री माहिला बचत गटांचे विक्री प्रदर्शनी, पशुसंवर्धन विकासांची प्रदर्शनीचे एकूण चार वेगवेगळे दालन अशी चांदा क्लबला व्यापणारी भव्यता यामध्ये आहे. याच व्यासपीठावर विदर्भातील वैनगंगा, वर्धा, वेणा, प्राणहीता, कन्हान, बाघ आणि इरई नदीतील सात कुंभाचे पाणी जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह यांना अर्पण करण्यात आले. त्यांनी हा जलकुंभ वन प्रशासन, विकास, संशोधन व व्यवस्थापन प्रबोधीनीत आजपासून सुरू करण्यात आलेल्या विभागीय जलसाक्षरता केंद्राला अर्पण केला. यासोबतच महाराष्ट्रातील पहिला जलसाक्षत्ता केंद्राचे उद्घाटन झाले.
               या कार्यक्रमाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह देशाचे गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, रमन मैगसेसे पुरस्कार विजेते, जलपुरूष, राजेंद्र सिंह, आमदार नानाजी शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, यशदा पुणेचे उपमहासंचालक नरेश झुरमुरे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, वन व्यवस्थापन विकास प्रबोधिनी संचालक अशोक खडसे, मुख्य अभियंता ब.श स्वामी, अधिक्षक अभियंता के.सु. वेमुलकोंडा, कार्यकारी अभियंता राजेश सोनोने, प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर, रविंद्र शिवदास, उपमहापौर अनिल फुलझले, उपाध्यक्ष कृष्णा सहारे, कृषी सभापती अर्चना जिवतोडे, यांच्यासह जलसंपदा, कृषी, तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, जलसाक्षरता केंद्र, यशदा व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
    यावेळी बोलताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेती या विषयावर सरकार अतिशय गंभीर असल्याचे प्रतिपादन केले. राज्यशासनाने 2017-18 चा अर्थसंकल्पात 63 हजार कोटीची तरतूद केली. शेतीचा थेट संबंध हा पाण्याशी आहे. त्यामुळे देशाचे विख्यात जलतज्ञ ,जलपुरूष राजेंद्र सिंग यांनी जलसाक्षरता हा विषय मांडल्यावर त्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करून त्याची सुरूवात आज त्यांच्या उपस्थितीत होत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. जल, जंगल आणि जमीन यामध्ये पाण्याच्या साठयाची आवश्यकता सर्वाधिक असून जलसाक्षरता अभियानातील हजारो स्वयंसेवकामार्फत पाण्याचे महत्व गावोगावी कळणार आहे. चंद्रपूर मधून त्याची सुरवात होत असल्याचा मला आनंद आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कृषी वाचनालयाचा प्रायोगिक प्रकल्प 21 गावांमध्ये सुरू केला आहे. 125 पुस्तके याठिकाणी देण्यात आली आहे. शेतीबद्दल आत्मियता वाढावी हा यामागील उद्देश आहे.उथलपेठमध्ये मशरुमचा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगाला कसा प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष ठेवून आहोत. जिल्हात पंजाब नॅशनल बँकेच्या मदतीने समुद्रपूर येथे शेती प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे सुरू आहे. चंद्रपूर मध्ये सुरू करण्यात आलेले बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून यामाध्यमातून शेकडो कुटुंबाना रोजगार मिळत असून त्यामध्ये वृद्धी करण्याचा आमचा संकल्प आहे. लवकरच या विभागात कृषीवर आधारीत राष्ट्रीय दर्जाच्या कौशल्य विकास केंद्राचे निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी केली आहे. जिल्हात मदर डेअरीचा प्रकल्प सुरू होत असून मोठ्या प्रमाणात दुध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढवणे आमचे उद्दिष्ट आहे. मात्र हे सर्व करतांना यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
               देशाचे गृह राज्य मंत्री हंसराज अहीर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या योजनांबाबत गंभीरतेने लक्ष देणे सुरू केले आहेत. महाराष्ट्रातील त्यातही विदर्भातील सिंचनाचा बॅकलॉग भरून निघावा यासाठी  विदर्भातील सिंचन प्रकल्पाला गती दिली आहे. त्यांचा संदेश घेवून जिल्हयात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार मोठया उमेदीने अनेक प्रकल्प राबवित असून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देणारे हे सरकार आहे. केवळ दान अनुदान, कर्जमाफी या लोकप्रिय घोषणांमध्ये न अडकता शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करणे आमचे ध्येय आहे. त्यामुळेच वृक्ष लागवड, जलसंधारण, जलयुक्त शिवार, जलसाक्षरता, शेतीचा बाजार, शेतमाल विक्री, आयात निर्यात धोरणात बदल आणि वातावरणातील बदल याबाबत शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात अवगत केल्या जात आहे. प्रत्येक गावातील नाला खोलीकरण हे अभियाण झाले पाहीजे. प्रत्येक गावाचे सिंचनाचे धोरण ठरले पाहिजे. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सरपंच यांनी आपल्या गावातील पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. पाणी साठे वाढविले पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांनी देखील आता स्वताहून पुढे येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.      
               जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी जलयुक्त शिवार सारखी योजना महाराष्ट्राने यशस्वी केली आहे. या अभियानाला आजच्या जलसाक्षरता अभियानाने बळकटी येणार असून सुधीर मुनगंटीवार हे कृषी क्षेत्रासाठी  अतिशय सकारात्मक असणारे मंत्री असल्याचे प्रतिपादन केले. राज्यात जलयुक्त शिवारने जमिनिखालील पाण्याच्या पातळीत दीड ते दोन मिटर पाण्याची पातळी वाढली आहे. जलयुक्त शिवार लोकचळवळ झाले असून कृषी जलसंधारण या साठी अर्थसंकल्पात तरतूद करणारे जागरूक अर्थ मंत्री असल्याने नविन प्रकल्प यशस्वी होत असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. शेतकऱ्यांना हजारो कोटींची कर्ज माफी देतांना मुनगंटीवार यांनी जलयुक्त शिवार योजनेला कोणतीही कपात सुचवली नाही. ‘जल है तो कल है’ याची जाणीव ठेवणारा वन मंत्री महाराष्ट्राकडे असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना त्यांनी आपल्या घराघरातील वर्षाच्या, महिन्याच्या आर्थिक बजेट प्रमाणे पाण्याचे देखील नियोजन करा, असे आवाहन केले.
               जलपुरूष डॉ.राजेंद्र सिंग यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पाऊस पाण्याचा बदल लक्षात घेवून पिकाचे नियोजन करा असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. भारतातील पहिले जलसाक्षरता केंद्र चंद्रपूर येथे सुरू होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. अशा पद्धतीचे शेतकऱ्यांना नियोजन सांगणारे, त्यांना जलसाक्षर करणारे केंद्र सुरू करण्याबाबत वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा झाली होती. देशभरातील अन्य नेत्यांप्रमाणे ते देखील चर्चा करतील व विसरून जातील असे वाटत होते. मात्र त्यांनी दोन वर्षात या विषयाचा पाठपुरावा केला, अर्थ संकल्पात तरतुद केली. यशदा, वनविभाग व महसूल विभाग यांना या मध्ये सहभागी केले. हे अभियान सुरू करण्यासाठी  स्वत: संपर्कात  राहून प्रत्यक्ष यंत्रणा उभी केली. गावागावात स्वयं सेवेत काम करणारे जलदूत उभे केलेत. आता ग्रामसभांना आपल्या गावाचे जल आराखडा तयार करण्याचे आपल्या मार्फत सांगावे असे आवाहनही त्यांनी केले.
               या कार्यक्रमामध्ये जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या आयोजनाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, विभागीय जलसाक्षरता केंद्राच्या शुभारंभाचे प्रास्तावीक विदर्भ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालन अविनाश सुर्वे, कृषि महोत्सवाचे प्रास्ताविक कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती विद्या मानकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन ऐश्वर्या भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन सुमन पांडे यांनी केले. 19 जानेवारी पर्यंत कृषी प्रदर्शनी चालणार असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
000

Tuesday 2 January 2018

‘ पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे प्रशासनातील बदल नागरिकांना जाणवतो ’


सिध्दी 2017 संकल्प 2018 अभियानात
जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांचे प्रतिपादन
       चंद्रपूर, दि.2 जानेवारी  राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात गेल्यावर्षभरात चंद्रपूर जिल्हयाने प्रशासनातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये आघाडी घेतली आहे. सामान्य नागरिकाला प्रशासनाच्या योजना, उपक्रमाचा लाभ मिळत असून   दृष्टीक्षेपात येणारा बदल यावर्षभरात त्यांनी अनुभवला. हॅलो चांदा, संगणक प्रशिक्षण, ट्रकींग डॅशबोर्ड, कुक्कुटपालन क्लस्टर, 99 टक्क्यांवरील शौचालय निर्मिती, विविध आवास योजनेतून घरांची निर्मिती आणि शेतक-यांना महाकर्जमाफीतून मिळालेला दिलासा प्रमुख उपलब्धी ठरल्या आहेत. याशिवाय दारुबंदीची अंमलबजावणी आणि चंद्रपूर शहरातील नागरिकांना उत्तम नागरी सुविधा ही गेल्यावर्षीची सिध्दी असून येणा-या वर्षात महाराष्ट्रातील  सर्वोत्तम जिल्हयाचा संकल्प आम्ही करीत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी आज पत्रकार परिषदेत  केला.
            महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आयोजित “ सिध्दी 2017, संकल्प 2018  या उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आयोजित पत्रकार परिषदेत आशुतोष सलिल यांनी गेल्यावर्षभरातील उपलब्धी व 2018 मधील संकल्पाची माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक नियति ठाकर, महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे उपस्थित होते. जिल्हा प्रशासनातील या वरिष्ठ अधिका-यांनी यावेळी गेल्यावर्षभरात राज्य शासनांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली. यावेळी पत्रकारांना जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या कॉपीटेबल बुक व जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या तीन वर्षातील उपलब्धीची घडीपुस्तिका संदर्भासाठी देण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी प्रशासनाने राबविलेल्या अभिनव उपक्रमाचे आणि जिल्हयाने विविध योजनांमध्ये केलेल्या उल्लेखनिय कार्याचे सादरीकरण केले. चंद्रपूर जिल्हयामध्ये विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी टाटा ट्रस्टच्या मदतीने जिल्हयातील तीन तालुक्यामध्ये ट्रकींग डॅशबोर्ड ग्रामविकास योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गाव पातळीवरील प्रत्येक घटकाची नोंद घेतली जाते. त्यामुळे कोणती योजना कोणत्या गावामध्ये राबविणे आवश्यक आहे. त्या ठिकाणची नेमकी परिस्थिती काय आहे. याबाबतची संपूर्ण माहिती जिल्हा यंत्रणेकडे येत आहे. त्यामुळे दूर्गम भागातील सोयी सुविधा उपलब्ध करण्याबाबतचा रोडमॅप आखण्यामध्ये सुविधा होत असून जिल्हयाच्या नियोजनाच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. हॅलो चांदा या यशस्वी योजनेच्या कार्य पध्दतीची माहिती त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली. तर एक हजार आदिवासींच्या जिवनामध्ये परिवर्तनाला सुरुवात करणा-या पोंभूर्णा तालुक्यातील कुक्कुटपालन क्लस्टरची यशकथा त्यांनी पत्रकारांना सांगितली. यावेळी जिल्हा प्रशासनातील विविध बदल व अभिनव संकल्पनांचा झालेला लाभ त्यांनी पत्रकारांपुढे मांडला.
जिल्हा पोलीस अधीक्षक नियति ठाकर यांनी गेल्या वर्षभरात पोलीस प्रशासनाने केलेल्या कामगिरीचा आढावा सादर केला. चंद्रपूर जिल्हयामध्ये खुनासारख्या मोठया गुन्हयातील सर्व प्रकरणांचा तडा लावण्यात पोलीसांना यश आल्याने या घटकातील शंभर टक्के उपलब्धीचा आढावा त्यांनी मांडला. जिल्हयामध्ये दारुबंदी केल्यानंतर 56 कोटीवर मुद्देमाल जप्त करण्यात वर्षभरात यश आल्याचे त्यांनी सांगितले. 9 हजार 560 आरोपींना या प्रकरणात खटला दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. तर जिल्हयामध्ये पोलीसांसाठी मोठया प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होत असल्याची आकडेवारी त्यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हयामध्ये स्वच्छ भारत मिशनचे लक्ष 99 टक्क्यांवर पूर्ण झाले असून लवकरच जिल्हा स्वच्छतेमध्ये 100 टक्के यशस्वी झाल्याचे नजीकच्या काळात जाहिर करण्यात येईल, असे सुतोवाच केले. जिल्हयाची मॉडल हेल्थ डिस्ट्रीक्ट म्हणून भारतातून  निवड झाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हयातील 1540 शाळा डिजीटल झाल्या असून पालकमंत्री संगणक प्रशिक्षण अभियानामुळे संगणकीय क्षेत्रातील ज्ञानामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी चमकत असल्याचे त्यांनी सांगितले. 2 शाळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्दी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.
महानगरपालिका आयुक्त संजय काकडे यांनी शहराच्या पाणी पुरवठा योजनेमध्ये क्रांतीकारी ठरलेली अमृत पाणी पुरवठा योजना व स्वच्छता ॲपची उपलब्धी यावेळी मांडली. जिल्हयामध्ये यावर्षी पाणी उपलब्धता कमी असतांना देखील शहर वाशियांना मुबलक पाणी मिळेल असे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. उन्हाळा सुरु झाल्यानंतरच एक दिवस आड पाणी पुरवठा सुरु करण्याबाबत विचार केल्या जाईल, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शहरातील नागरिकांच्या मुलभूत सुविधा पुरवितांना अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या बाबुपेठ उड्डान पुलासारखा प्रश्न लवकरच निकाली लागणार असून शहरातील प्रमुख चौकांच्या सौंदर्यीकरणातून चंद्रपूरचे रुप पालटणार असल्याचे सांगितले.

2017  मधील जिल्हा प्रशासनातील महत्वाचे निर्णय

·        हॅलो चांदापालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेची यशस्वी सुरूवात
·        1800-266-4401 या क्रमांकावर तक्रारीचा ओघ वाढलाप्रशासनाची गती वाढली
·        टाटा ट्रस्टच्या मदतीने जिल्हयातील तीन तालुक्यातील ट्रकींग डॅशबोर्ड ग्राम विकास योजनेला सुरूवात
·        नेमक्या कोणत्या योजना कुठेकिती प्रमाणात आवश्यक आहे याची माहिती मिळायला सुरूवात
·        तीन तालुक्यातील प्रयोगाला लवकरच जिल्हाव्यापी करण्यासाठी सुरूवात करणार
·        जिल्हयात पालकमंत्री संगणक प्रशिक्षण अभियानाला सुरूवात
·        डिजीटल शाळांतील मुलांनाशिक्षकांना टाटा ट्रस्टच्या मदतीने डिजीटल साक्षरता अभियान
·        38,600 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार असून 942 शाळांमध्ये संगणक असणारी बस भेट देणार आहे.
·        जिल्हयात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये मोठया प्रमाणात शेतकऱ्यांना महाकर्जमाफी
·        जिल्हयामध्ये पोंभुर्णा तालुक्यात कुक्कुटपालन क्लस्टर तयार करण्यात आले आहे.
·        1 हजार आदिवासी कुटुंबांना पुढील 3 वर्षांसाठी या अभियानामध्ये सहभागी करण्यात आले आहे.
·        आर्थिक सुबत्तेची हमी असून या माध्यमातून नियमित अर्थाजनाची घडी बसवली जाणार आहे.
·        पोक्सो (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फॉर्म सेक्सुअल ओफेन्स ॲक्टया मुलांवरील लैगिक अत्याचार प्रतिबंद आयदयाची अंमलबजावणी करणारा पहिला जिल्हा.
·        महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत महिला बचत गटांच्या सहभागातून जिल्हयात सेतू केंद्राला सुरूवातमहिला सबळीकरणाला चालणा.
·        जिल्हयातील चंद्रपूर व बल्लारपूर रेल्वे स्थानकाचे पर्यटनाला चालणा देणारे सुशोभीकरण
·        जिल्हयामध्ये गरजूहोतकरू व अभ्यासू मुलांसाठी अभ्यासाठी व्यवस्था निर्माण करणाऱ्या अभ्यासिकांचे जाळे सुरू
·        प्रियदर्शनी इंदिरा गांधी प्रेक्षागृहाचे नूतनीकरण आणि या ठिकाणी प्राचीन नाणी संग्रालयाची सुरूवात.

जिल्हा परिषदेमार्फत वर्षभरातील उपलब्धी

·        प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 1282 घरांचे काम पूर्ण47.33 कोटी रूपयांतून 7851 घरे बांधण्याचे उद्दिष्टय
·        रमाई आवास योजनेतुन 349 घरे पूर्ण10.01 कोटी रूपयातून 1252 घरे बांधण्याचे उद्दिष्टय
·        शबरी आवास योजनेतून 191 घरे पूर्ण5 कोटी 63 लक्ष रूपयातून 788 घरांचे उद्दिष्टय.
·        स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 99.94 टक्के वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्टय पूर्ण.
·        99.64 टक्के गावे उघडयावरील शौच मुक्त झाली आहेत.
·        5 पैकी 14 तालुके उघडयावर शौच मुक्त करण्यात आली आहे.
·        जिल्हयात 53 कोटी 31 लक्ष रूपयाचा निधी सिंचन विहिरीसाठी मिळाला असून यातून 3 हजार 614 विहिरींचे निर्माण करण्यात येणार आहे.
·        जलयुक्त शिवार योजनेतून 136 कामे करण्यात येणार असून याव्दारे 1525 हेक्टर संक्षीत सिंचन क्षमता निर्मितीची हमी
·        मामा तलावासाठी 414 कामे मंजूर असून याव्दारे 7 हजार 780 हेक्टर सिंचन क्षमता वाढवण्याचे प्रयत्न आहेत.
·        राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत 12 नळ योजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहे.
·        जिल्हयात 35 ठिकाणी आरओचे शुध्द पाणी पोहचवण्याचे उदिष्ठय असून 9 ठिकाणी पूर्ण क्षमतेने योजना सुरू झाली आहे.
·        जिल्हयामध्ये 2017-18 साठी जिल्हा प्ररिषदमार्फत 70 कीमी रस्ता निर्मिती केली जाणार आहे.
·        मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत 280 की.मी.काम मंजूर आहेत.
·        जिल्हयात 1540 शाळा डिजीटल करण्यात आल्या आहेत.
·        जिल्हयामध्ये सध्या 2684 अंगणवाडी कार्यरत आहेत.
·        राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रमातंर्गत सर्वत निर्देशांकात चंद्रपूर जिल्हयाला प्रथम पुरस्कार.
·        भारतातून मॉडेल हेल्थ डिस्ट्रीक्ट म्हणून चंद्रपूर जिल्हयाची निवड.

पोलीस प्रशासनाची वर्षभरातील उपलब्धी

·        जिल्हयातील दारुबंदीनंतर 56 कोटीवर मुद्देमाल जप्त
·        24 कोटी रुपयांची दारु जप्त
·        अवैध दारुची विक्री व वहन करणा-यांवर 9 हजार 50 खटले दाखल 
·        खुनासारख्या गंभीर गुन्हयांचे 100 टक्के तटा
·        नकली ऐटीएम तयार करणा-या आंतरराज्यीय गॅगचा पडदाफाश
·        सायबर क्राईम सेलकडून आर्थिक फसवणूकीच्या गुन्हयांचा तपास
·        पोलीसांसाठी घरे व नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीला गती

महानगरपालिका प्रशासनाची वर्षभरातील उपलब्धी
·        केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत 231 कोटीच्या पाणी पुरवठा योजनेच्या कार्याला सुरुवात.
·        शहरात 8 ठिकाणी उंच पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम सुरु
·        अमृत योजनेअंतर्गत मलप्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी महाजनकोला देण्याबाबत प्रकल्प करणार.
·        रामाळा तलावाच्या विकासाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवात
·        झरपट नदी विकास कार्यक्रमातंर्गत अंचलेश्वर गेटजवळील सौंदर्यीकरणाला सुरुवात.
·        शहरातील खुल्या जागांचा विकास करणार
·        बाबुपेठ स्टेडीयमचे बांधकाम, कोनेरी स्टेडीयमचे नुतनीकरण करणार.
·        ऊर्जाबचतीसाठी नवे पथदिवे उभारण्याचे काम सुरु
·        नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मोठया प्रमाणात कामाला सुरुवात.
                                                            0000