Search This Blog

Monday 28 February 2022

सोमवारी जिल्ह्यात 1 कोरोनामुक्त तर 1 बाधित

 

सोमवारी जिल्ह्यात 1 कोरोनामुक्त तर 1 बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 32

चंद्रपूर दि. 28 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात एकाने कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 नवीन रुग्ण बाधीत झाला आहे. जिल्ह्यात सोमवारी मृत्यु संख्या शुन्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये पोंभूर्णा येथे 1 रुग्ण आढळून आला असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली,

गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 932 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 333 झाली आहे. सध्या 32 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 77 हजार 652 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 77 हजार 29 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

जिल्हयातील तलाठी व मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

 


जिल्हयातील तलाठी व मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

चंद्रपूर, दि. 28 फेब्रुवारी : शासनसेवेत सर्व स्तरावर कार्यक्षमता वाढवून गतिमान प्रशासन होण्याकरिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याकरिता दि. 23 सप्टेंबर 2011 च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्याचे प्रशिक्षण धोरण निश्चित करण्यात आले आहे. तसेच सेवेतील विविध टप्प्यावर प्रशासनिक व सेवाअंतर्गत प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. त्यास अनुसरून दि. 18 व 19 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्ह्यातील एकूण 273 तलाठी, 51 मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांची प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह,चंद्रपूर येथे कार्यालयीन कामकाजाच्या अनुषंगाने प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले होते.

दि. 18 फेब्रुवारी रोजी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली. प्रशिक्षण देण्याकरिता जिल्ह्यातील कार्यरत उपजिल्हाधिकारी यांची व्याख्याता म्हणून निवड करण्यात आली. दि. 18 व 19 फेब्रुवारी रोजी, मंडळ अधिकारी व तलाठी संवर्गातील नियमित कामकाजाच्या अनुषंगाने 7/12 चे संगणकीकरण व त्याचे महत्त्व, गाव नमुना 1 ते 21 अद्यावत करून त्यासंबंधीची कार्यपद्धती, शर्तभंग प्रकरणे, भोगवटदार वर्ग 2 मधून 1 करणे, एनएपी-34/36 ची कार्यपद्धती व तलाठी यांची भूमिका, पांदण रस्ते मोकळे करणे व विहीर नोंदीबाबत माहिती, ई- फेरफार, ई- चावडी, ई-हक्क प्रणाली , शासकीय जमीन सार्वजनिक प्रयोजनार्थ वाटप कार्यपद्धती, शासकीय जमीन विल्हेवाट, कलम 42 अ,ब,क,ड बाबत माहिती व तलाठयांची भूमिका या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले.

00000

Sunday 27 February 2022

रविवारी जिल्ह्यात 6 कोरोनामुक्त तर 3 बाधित

 

रविवारी जिल्ह्यात 6 कोरोनामुक्त तर 3 बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 32

चंद्रपूर दि. 27 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 6 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 3 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात रविवारी मृत्यु संख्या शुन्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र1 , बल्लारपूर 1 तर जिवती येथे 1 रुग्ण आढळून आला असून

चंद्रपूर,भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी,राजुरा, चिमूर, वरोरा ,कोरपना,  व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 931 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 332 झाली आहे. सध्या 32 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 77 हजार 395 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 76 हजार 734  नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 


पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर, दि.27 फेब्रुवारी : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार, दि. 28 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रम्हपुरी येथे आगमन.

दुपारी 3.15  वाजता उपजिल्हा रुग्णालय,ब्रह्मपुरी येथे अपंगांना प्रमाणपत्राचे वितरण. सायंकाळी 4 ते 5.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. सायंकाळी 6 वाजता देलनवाडी, ब्रह्मपुरी येथे आस्था हाॅस्पिटलच्या नविन इमारतीचे उद्घाटन. सायंकाळी 7 वाजता ब्रह्मपुरी येथुन गडचिरोलीकडे प्रयाण.

मंगळवार, दि.1 मार्च 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता मार्कंडा देवस्थान,गडचिरोली येथे आगमन व दर्शन. दुपारी 12 वाजता  देवटोक ता.सावली येथे सभागृहाच्या भुमीपुजनास उपस्थित. दुपारी 1 वाजता चक विरखल येथे सांत्वनपर भेट. दुपारी 2 वाजता सावली नगरपंचायत येथे आगमन.दुपारी 2.15 वाजता सावली नगरपंचायतीच्या नवनियुक्त नगरसेवकांसोबत बैठक. सायकांळी 4.30 वाजता सोनापूर ता. नागभीड येथील सातबहिणी देवस्थान पेरजागड येथे कार्यक्रमास उपस्थिती. सायकांळी 5 वाजता सोनापूर ता. नागभीड येथून नागपूरकडे प्रयाण.

00000

पल्स पोलिओ लसिकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

 





पल्स पोलिओ लसिकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

Ø 1 लक्ष 59 हजार 712 बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट

Ø 2 व 3 मार्च रोजी गृह भेटीद्वारे लस देण्याचे नियोजन

चंद्रपूर, दि. 27 फेब्रुवारी : जिल्ह्यात 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलियोची लस देण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय लसिकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जि. प. अध्यक्षा संध्या गुरनुले यांच्या हस्ते बालकास पोलिओ डोज पाजून करण्यात आला.

याप्रसंगी  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मित्ताली सेठी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, डॉ.गोवर्धन दुधे, निवासी वैद्यकिय अधिक्षक डॉ. हेमचंद कन्नाके उपस्थित होते.

सदर मोहीम जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. मोहिमेत सुटलेल्या बालकांना 2 व 3 मार्च रोजी गृह भेटीद्वारे पोलियोचा डोज पाजण्यात येणार आहे. जिल्ह्यात ग्रामीण, शहरी आणि महानगर पालिका क्षेत्रात 0 ते 5 वर्ष वयोगटातील एकूण 1 लक्ष 59 हजार 712 बालके आहेत. पल्स पोलियो लसीकरण मोहिमेसाठी ग्रामीण भागात 2059 बूथ, शहरी भागात 193 तर महानगर पालिका क्षेत्रात 302 असे एकूण 2554 बूथ करण्यात आले आहेत. बूथसाठी नेमण्यात आलेल्या पर्यवेक्षकांची संख्या 517 आहे. गृहभेटीकरीता एकूण 2867 टीमचे गठन करण्यात आले आहे. यात ग्रामीण भागात 2549 टीम, शहरी भागात 129 आणि महानगर पालिका क्षेत्रात 189 टीमचा समावेश आहे. तसेच ट्रांझिट व मोबाइल टीमची संख्या अनुक्रमे 164 आणि 117आहे.

प्रास्ताविक करतांना डॉ. गहलोत म्हणाले, भारतात 1995 पासून पल्स पोलियो लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. 27 वर्षापासून हा उपक्रम निरंतर सुरू आहे. भारतात पोलियोची शेवटची केस 14 जानेवारी 2011 रोजी आढळली होती. ही मोहिम देशात सुरुवातीपासून उत्कृष्टपणे राबविण्यात आल्यामुळे आजघडीला देशात एकही पोलिओचा रुग्ण नाही. 2014 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलियोमुक्त घोषित केले आहे. ही देशासाठी  गौरवाची बाब आहे.

गत वर्षी जगात पोलियोचे सहा रुग्ण आढळून आले. हे सर्व अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशातील आहे. अजूनही आपल्या आसपासच्या देशात पोलिओचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे पोलिओचे समुळ उच्चाटनाकरीता ही मोहिम राबविण्यात येत आहे.  सुदृढ बालके ही राष्ट्राची संपत्ती आहे. बालके निरोगी राहण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. याकरीता केंद्र व राज्य शासनातर्फे 27 फेब्रुवारी या दिवशी पोलिओ मोहीम संपूर्ण भारतात एकाच वेळी राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर मोहिमेदरम्यान पालकांनी आपल्या 5 वर्षाखालील बालकांना पोलिओचा डोज द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्यासह आरोग्य प्रशासनाने केले आहे.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. हेमचंद कन्नाके यांनी केले. यावेळी आरोग्य विभागाचे सुभाष सोरते, प्रेमचंद वाकडे, श्री. मोते, श्री. खांडरे, श्रीमती बावनकर, श्रीमती सुत्राळे आदी उपस्थित होते.

00000

Saturday 26 February 2022

ऑनलाईन पद्धतीनेही होणार राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

 

ऑनलाईन पद्धतीनेही होणार राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

Ø विधिज्ञ, पक्षकार व नागरिकांना उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपुर, दि. 26 : जिल्ह्यामध्ये शनिवार, दि. 12 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली, आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या सूचनेनुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा कविता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये ऑनलाइन पद्धतीनेसुध्दा राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे.

ज्यांना न्यायालयात येणे शक्य नाही अशा पक्षकारांना ऑनलाइन पद्धतीने लोक अदालतीत सहभाग नोंदविता येणार आहे. राज्य विधी सेवा प्राधिकरणाने यासाठी 'सामा' या कंपनीची मदत घेतली आहे. ऑनलाइन पद्धतीने लोकअदालतीत सहभागी होण्याची इच्छा असलेल्या पक्षकारांशी कंपनीचे प्रकरण व्यवस्थापक, संपर्क साधणार असून, एका लिंकद्वारे पॅनेल प्रमुख व पक्षकारांना ‘व्हर्च्युअली’ एकत्र आणणार आहेत. सुनावणीनंतर पॅनेल प्रमुखांनी दिलेला आदेश ‘व्हर्च्युअली’ पक्षकारांना पाठविला जाईल. यावर पक्षकारांच्या आधार कार्डवरील ई-सिग्नेचर घेतली जाणार आहे.

चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयामध्ये एकाच दिवशी घेण्यात येत असलेल्या या लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित दिवाणी, फौजदारी कलम 138 एन.आय.अॅक्ट ( धनादेश न वटणे), बँकांची कर्जवसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, जमीन अधिग्रहण अर्ज, कामगार कायद्याखालील प्रकरणे, घरमालक-भाडेकरू वाद, कौटुंबिक वाद, इलेक्ट्रिसिटी अॅक्टचे समझोता योग्य वाद तसेच न्यायालयात येण्याअगोदरची प्री-लिटिगेशन प्रकरणे, महसूल, पाणीपट्टी, विजबील आपसी समझोत्याकरिता ठेवून ती सामंजस्याने सोडविण्याबाबतचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी तसेच ज्या नागरिकांना आपली प्रकरणे सदर लोक अदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर येथे स्वतः येऊन किंवा 07172-271679 या हेल्पलाईन क्रमांक, किंवा 8591903934 या कार्यालयीन मोबाईल क्रमांकावर तसेच कार्यालयातील कनिष्ठ लिपिक श्री. उराडे 9689120265, श्री. सोनकुसरे 9325318616 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

00000

शनिवारी जिल्ह्यात 12 कोरोनामुक्त तर 7 बाधित

 

शनिवारी जिल्ह्यात 12 कोरोनामुक्त तर 7 बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 35

चंद्रपूर दि. 26 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 12 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 7 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात शनिवारी मृत्यु संख्या शुन्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये ब्रह्मपुरी 2, सावली 1, पोंभूर्णा 1 तर चिमूर येथे 3 रुग्ण आढळून आले असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, चंद्रपूर, बल्लारपूर भद्रावती, नागभीड, सिंदेवाही, मुल, गोंडपिपरी, राजुरा, वरोरा ,कोरपना, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 928 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 326 झाली आहे. सध्या 35 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 76 हजार 592 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 75 हजार 944 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

राज्य सरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करणार- आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार

 



राज्य सरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करणार

                          - आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार

Ø मदतीसाठी राज्य नियंत्रण तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा

चंद्रपूर,दि.26 : सध्या रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून राज्यातील  अंदाजे 1200 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यातील 300 विद्यार्थ्यांशी पालकांचा संपर्क झाला आहे. राज्य नियंत्रण कक्ष विद्यार्थ्यांच्या संपर्कात असून महाराष्ट्र शासनाकडून या विद्यार्थ्यांना तसेच अडकलेल्या नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न  सुरू आहेत,  अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी  दिली.

श्री. वडेट्टीवार म्हणालेयुक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती जिल्हास्तरावर देखील संकलित करण्याचे काम सुरू आहे. सर्व जिल्हाधिका-यांनी देखील हेल्पलाईन नंबर जाहीर केलेले आहेत.  राज्याचा नियंत्रण कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर, मोबाईल तसेच व्हॉटस क्रमांक ९३२१५८७१४३ आणि controlroom@maharashtra.gov.in या ईमेलवर संबंधितांनी संपर्क साधावा.  महाराष्ट्रातील किती लोक युक्रेनमध्ये अडकले आहेत, याची माहिती विभाग घेत आहे. तात्काळ संपर्क केंद्रही सुरू केले आहे. आवश्यक सर्व मदतीसाठी राज्य सरकार  देण्यास तयार आहे. केंद्र सरकारने उपाययोजना केल्या आहेत. कदाचित युक्रेनमधून विमान उडू शकणार नाही. बाजूच्या देशातून विमान घेण्याची तयारी सरकारने दर्शविली आहे. काही लोकांशी संपर्क होण्यात अडचणी येत आहेत. तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालयाने,  नवी दिल्ली येथे  हेल्पलाईन्स कार्यन्वित केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालयनवी दिल्ली येथील क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.

 टोल फ्री - 1800118797

 फोन 011-23012113 / 23014104 / 23017905

 फॅक्स 011-23088124

 ईमेल situationroom@mea.gov.in या हेल्पलाईनवर संपर्क

साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००००

ई-पीक पाहणी व नवीन सातबारा वाटप योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा - महसूल मंत्री थोरात

 



ई-पीक पाहणी व नवीन सातबारा वाटप योजनांची

प्रभावी अंमलबजावणी करा - महसूल मंत्री थोरात

Ø पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात कोरोनामध्ये चांगले काम

चंद्रपूर,दि. 26 फेब्रुवारी : शेतक-यांना स्वत:च्या पिकांची नोंद स्वत: घेता यावी, यासाठी शासनाने ई-पीक पाहणी हा अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी हा उपक्रम भविष्यात महत्वाचा ठरणार आहे. तसेच सरकारने नवीन स्वरुपात सातबारा आणला असून अनावश्यक नोंदी कमी केल्या आहेत. या दोन्ही उपक्रमांबाबत शेतक-यांमध्ये जनजागृती करून त्याची प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सुचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या.

            नियोजन सभागृहात महसूल विषयक आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सर्वश्री अभिजित वंजारी, सुभाष धोटे, प्रतिभा धानोरकर, किशोर जोरगेवार, भास्कर लोंढे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

            दोन वर्षे कोरोनात गेल्यानंतर महसूल विभागासंदर्भात ही पहिलीच बैठक आहे, असे सांगून श्री. थोरात म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासनाने कोरोनात चांगली कामगिरी केली आहे. अनेक विभागांची कामे महसूल विभागाशी निगडीत असतात. त्यामुळे आपल्या मूळ विभागाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. महसूल विषयक बाबींचा प्रशासनाने नियमित आढावा घ्यावा. ई – पीक पाहणीच्या माध्यमातून सरकारने शेतक-यांना संधी उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्राचा हा उपक्रम राजस्थानने त्वरीत स्वीकारला असून देशपातळीवर सुध्दा या उपक्रमाची दखल घेतली जाईल. या उपक्रमासाठी कृषी विभागाची मदत घ्यावी. तसेच ई-पीक पाहणी हा शेतक-यांचा सवयीचा भाग झाला पाहिजे, यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे.

            नवीन स्वरुपातील सातबाराबाबत महसूल मंत्री म्हणाले, जुन्या सातबारामधील अनावश्यक नोंदी कमी करण्यात आल्या असून नवीन सातबारा प्रत्येकापर्यंत पोहचला पाहिजे. तसेच नागरिकांना तो मिळाला की नाही, यासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींनी विचारणा करावी. दुर्गम व आदिवासी बहुल असलेल्या जीवती तालुक्याबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे श्री. थोरात म्हणाले.

            फेरफार व महसूल अभिलेख दुरुस्तीवर लक्ष केंद्रीत करा – पालकमंत्री वडेट्टीवार   

            जिल्ह्यात रिक्त पदांचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होतो. आता प्रत्येक तालुक्यात राजस्व अभियान घेऊन नागरिकांचे प्रश्न स्थानिक स्तरावर सोडविणे आवश्यक आहे. याबाबत प्रशासनाने नियोजन करावे. विशेष म्हणजे फेरफार व महसूल अभिलेख दुरुस्ती प्रकरणे प्रलंबित राहात असल्यामुळे नागरिक त्रस्त होतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने फेरफार व अभिलेख दुरुस्तीवर लक्ष केंद्रीत करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

            पुढे ते म्हणाले, फेरफार प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी आदींनी पुढाकार घ्यावा. पुढील 15 दिवसांत फेरफारची प्रकरणे प्रलंबित राहता कामा नये. तसेच अतिक्रमणधारकांना नझुल पट्टे देण्याबाबत शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकमंत्र्यांनी केली.   

            सादरीकरण करतांना जिल्हाधिकारी म्हणाले, खरीप हंगामात जिल्ह्यात ई-पीक पाहणीचे 93 टक्के काम झाले. त्यासाठी गावागावात तरुणांच्या टीम तयार करून त्यांना प्रशिक्षित केले. या उपक्रमाबाबत थोड्या अडचणी असल्या तरी जनजागृतीचे काम सुरू आहे. तसेच फेरफार संदर्भात प्रत्येक तालुक्यात अदालत घेण्यात आली असून महिन्याच्या दुस-या मंगळवारी फेरफार अदालत अनिवार्य करण्यात आल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

             यावेळी महसूलमंत्र्यांनी जमिनीची ई – मोजणी, पांदणरस्ते मोकळे करणे, वाळूघाट लिलाव आदी विषयांचा आढावा घेतला. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विशाल मेश्राम यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

00000

Friday 25 February 2022

शुक्रवारी जिल्ह्यात 20 कोरोनामुक्त तर 7 बाधित


शुक्रवारी जिल्ह्यात 20 कोरोनामुक्त तर 7 बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 40

चंद्रपूर दि. 25 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 20 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 7 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात शुक्रवारी मृत्यु संख्या शुन्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र 3, भद्रावती 2, सावली 1 तर पोंभूर्णा येथे 1 रुग्ण आढळून आला असून चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा ,कोरपना, जिवती  व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 921 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 314 झाली आहे. सध्या 40 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 75 हजार 508 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 74 हजार 827 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर


महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर, दि.25 फेब्रुवारी : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार तसेच राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि. 26 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता वरोरा येथे आगमन व वरोराच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट. दुपारी 12:30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 1:30 वाजता चांदा क्लब, वरोरा नाका, चंद्रपूर येथे आगमन व स्पोर्ट्स अकॅडमी उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.45 वाजता खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्या लोकमान्य विद्यालयासमोरील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित.

दुपारी 2 वाजता शकुंतला लॉन येथे कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता जिल्ह्यातील विविध विषयासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 4 30 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

00000

युक्रेनमध्ये अडकलेल्या सहा विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांचा प्रशासनाशी संपर्क

युक्रेनमध्ये अडकलेल्या सहा विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांचा प्रशासनाशी संपर्क

Ø सर्व जण सुखरुप असल्याची माहिती

चंद्रपूर,दि. 25 फेब्रुवारी : सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत युक्रेनमध्ये, चंद्रपूर जिल्ह्यातील जे नागरिक अडकले आहेत, त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाशी संपर्क करण्याचे आवाहन केले होते. आतापर्यंत सहा विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला असून ते सर्वजण सुखरूप असल्याची माहिती आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या सहा जणांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील हर्षल बलवंत ठावरे, ऐश्वर्या प्रफुल्ल खोब्रागडे, नेहा शेख, आदिती अनंत सायरे, धीरज बिस्वास आणि दीक्षाराज अकेला या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यांच्याव्यतिरिक्त जे कोणी युक्रेनमध्ये अडकलेले असतील त्यांच्या नातेवाईकांनी त्वरीत जवळच्या तहसील कार्यालयात किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयातील 07172-251597 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 7666641447 या मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

00000 

Thursday 24 February 2022

युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी प्रशासनाकडून टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित


 

युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी प्रशासनाकडून टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित

Ø संबंधितांच्या नातेवाईकांना त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 24 फेब्रुवारी: सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून रशिया या देशाने युद्ध घोषित केले आहे. या परिस्थितीत युक्रेनमध्ये, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक अडकले असल्यास संबंधित नागरिकांच्या नातेवाईकांनी तात्काळ जवळच्या तहसील कार्यालयात संपर्क करून कळवावे. जेणेकरून अडकलेल्या नागरिकांना सुखरूपपणे परत सुरक्षित ठिकाणी आणण्याबाबत कार्यवाही करता येईल.

युक्रेनमध्ये अडकलेल्या संबंधितांच्या नातेवाईकांनी त्वरित जवळच्या तहसील कार्यालयात किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयातील 07172-251597 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 7666641447 या मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे चंद्रपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी कळविले आहे.

00000

विधवा महीला व बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा व पात्र लार्भार्थ्यांना योजनांचा लाभ प्राधान्याने द्या -अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर



 

विधवा महीला व बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा व पात्र लार्भार्थ्यांना योजनांचा लाभ प्राधान्याने द्या -अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर

Ø कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाबाबत अंतर्गत तक्रार निवारण समिती

        स्थापन करण्याच्या दिल्या सूचना

चंद्रपूर, दि. 24 फेब्रुवारी: कोविड-19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची काळजी व संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून विधवा झालेल्या महिलांना त्यांचे न्याय्य हक्क व पात्र लार्भार्थ्याना योजनांचा लाभ प्राधान्याने द्या, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात, कोविड-19 च्या पार्श्‍वभूमीवर बालकांची काळजी व संरक्षणासाठी कृती दलाची बैठक अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, यावेळी त्या बोलत होत्या.

            यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. जाधव, मनपाच्या सहाय्यक आयुक्त विद्या पाटील, महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अॅड. वर्षा जामदार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, शासकीय अपंग मुलांचे बालगृहाचे अधीक्षक श्री. करनेवार, महिला व बालकल्याण विभागाच्या सहाय्यक प्रशासन अधिकारी कांचन वरठी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राखुंडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

कोविड काळात विधवा झालेल्या महिलांना योजनांचा लाभ देताना सर्व महिलांना प्राधान्य द्यावे, असे सांगून अपर जिल्हाधिकारी श्रीमती वरखेडकर म्हणाल्या, तालुक्यातील सर्व पीडितांना आर्थिक मदत, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ, तसेच योजनेस आवश्यक कागदपत्रे तयार करून देण्यासाठी तालुकास्तरावर कॅम्प घेण्याचे आयोजन करावे. जेणेकरून त्या लाभार्थ्यांना विहित कालावधीत अत्यावश्यक कागदपत्रे प्राप्त होतील.

कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील विधवा झालेल्या 150 महिलांना सह्याद्री फाऊंडेशन नागपूरतर्फे 30 हजारांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तर उर्वरित महिलांना निधी प्राप्त झाल्यानंतर आर्थिक मदत देण्यात येईल. आर्थिक मदत देताना गरजूंना प्रथम प्राधान्य द्यावे. असे त्या म्हणाल्या.

श्रीमती वरखेडकर पुढे म्हणाल्या, मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत महिला व बालविकास कार्यालयाकडून देण्यात आलेल्या गुगल फार्मवर माहिती भरण्यासाठी तालुक्यांना अवगत करावे.कोविड काळात बालकांच्या संरक्षण व संगोपनासाठी महिला व बालविकास विभागाच्या संपूर्ण टीमने पहिल्या दिवसापासूनच खुप मेहनत घेतली असून उत्कृष्ट कार्य केले आहे. असेही त्या म्हणाल्या.

जिल्ह्यात आतापर्यंत 648 मुलांना बालसंगोपन योजनेचा आर्थिक लाभ देण्यात आला आहे. तर कोविड काळात विधवा झालेल्या 305 महिलांपैकी 135 महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. बैठकीमध्ये बालगृहे, बालसंगोपन योजना, मिशन वात्सल्य योजना, कोविड काळात विधवा झालेल्या महिला, कोविडमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची शालेय फी, लागणारी अत्यावश्यक कागदपत्रे आदींबाबत महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी माहिती सादर केली.

तत्पूर्वी, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाबाबत अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. ज्या कार्यालयांनी अद्याप समिती स्थापन केली नाही, त्या संबंधित कार्यालयावर 50 हजाराची दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

000000

गुरुवारी जिल्ह्यात 26 कोरोनामुक्त तर 3 बाधित

 


गुरुवारी जिल्ह्यात 26 कोरोनामुक्त तर 3 बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 53

चंद्रपूर दि. 23 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 26 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 3 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात गुरुवारी मृत्यु संख्या शुन्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र 1, राजुरा 1 तर वरोरा येथे 1 रुग्ण आढळून आला असून चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, चिमूर,  कोरपना,  जिवती  व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 914 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 294 झाली आहे. सध्या 53 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 74 हजार 437 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 73 हजार 728 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

दिव्यांग व्यक्तींना मदत व सहकार्यासाठी महाशरद पोर्टल कार्यान्वित


दिव्यांग व्यक्तींना मदत व सहकार्यासाठी महाशरद पोर्टल कार्यान्वित

Ø पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 24 फेब्रुवारी : दिव्यांग व्यक्तींना सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महाशरद पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना त्यांच्या दिव्यांगत्वानुसार मदत मिळवून देणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. तरी, जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी www.mahasharad.in या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांनी केले आहे.

पोर्टलरुपी अभियान म्हणजे राज्यातील दिव्यांगासाठी सहाय्य उपलब्ध होण्याची संधी असून ज्यामध्ये ते थेट शासनाच्या मंचाद्वारे मागणी करू शकतात. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमातील विशेषत्वाने नमूद केलेल्या दिव्यांग व्यक्ती शासनाच्या मंच्यावर विस्तृतपणे नोंदणी करून त्यांना आवश्यक ती मदत व सहकार्य मिळवू शकतात. महाशरद पोर्टलवर नोंदणीसह सर्व प्रक्रिया विनामूल्य असून या माध्यमाद्वारे राज्यातील अनेक घटक एकत्र येऊन दिव्यांगांना मदत व सहकार्य करू शकतील. त्याकरिता दिव्यांग बांधव www.mahasharad.in या पोर्टलद्वारे आवश्यक बाबीसंदर्भात मागणी नोंदवू शकतात. हे पोर्टल म्हणजे दिव्यांग व्यक्ती, समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था ‌व कंपन्या यांना जोडणारा दुवा आहे. तरी,जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींनी याचा लाभ घेण्यासाठी सदर पोर्टलवर तात्काळ नोंदणी करून घ्यावी. असे जिल्हा समाज कल्याण कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

00000

Wednesday 23 February 2022

इरई नदीच्या खोलीकरणाचे काम त्वरीत सुरू करा - उपमुख्यमंत्री अजित पवार

 




इरई नदीच्या खोलीकरणाचे काम त्वरीत सुरू करा -उपमुख्यमंत्री अजित पवार

Ø ‘वढा’ तीर्थक्षेत्र व इरईसाठी निधी उपलब्ध करून देण्याची पालकमंत्र्यांची मागणी

चंद्रपूर, दि. 23 फेब्रुवारी : इरई नदी ही चंद्रपूर शहरालगत असून सरासरी सात किलोमीटर ती शहराला समांतर वाहते. नदीचे पात्र रुंद झाल्यामुळे पावसाळ्यात अनेकदा पूर परिस्थिती निर्माण होते. ही बाब जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी निदर्शनास आणून दिली आहे. प्रशासनाने पहिल्या टप्प्यात तात्काळ उपाययोजना म्हणून नदीच्या खोलीकरणाचे काम सुरू करावे, अशा सुचना वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

जिल्ह्यातील इरई नदी व वढा तीर्थक्षेत्राच्या विकासासंदर्भात मुंबई येथे आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते.

पुढे उपमुख्यमंत्री म्हणाले, इरई नदीचे खोलीकरण, सौंदर्यीकरण व संवर्धन करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे सतत पाठपुरावा करीत आहेत. शासनही यासाठी सकारात्मक आहे. पहिल्या टप्प्यात नदीचे पात्र मोकळे केले तर पाणी कुठे थांबते, कुठून निघून जाते, पूर परिस्थिती कशामुळे निर्माण होते, या बाबींचा अंदाज येईल. त्यामुळे नदीचा गाळ काढून खोलीकरण करणे आवश्यक आहे. या कामाकरीता विदर्भ सिंचन महामंडळाकडील मशीन उपलब्ध करून दिल्या जातील. जिल्हा नियोजन समिती मधून डीझेलसाठी निधीची तरतूद करावी. जेणेकरून सदर मशीनद्वारे कामाला तात्काळ सुरवात होईल. पुढील वर्षी इरई नदीच्या संवर्धनासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले. 

निधी उपलब्ध करून देण्याची पालकमंत्र्यांची मागणी : इरई नदी ही शहरातून वाहत असून नदीचे पात्र रुंद झाल्यामुळे पुराचा धोका निर्माण होतो. त्यामुळे पहिल्या टप्प्यात नदीच्या पात्रातील झाडे-झुडपे, अतिक्रमण, गाळ काढणे आणि खोलीकरणासाठी तर दुस-या टप्प्यात सुशोभिकरण, सौंदर्यीकरण, संवर्धन, बंधारे आणि विकासासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. यावेळी ते म्हणाले, पुराच्या प्रतिबंधासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे पैसे देण्याची तरतूद आहे. ते त्वरीत दिले जाईल. तर गॅबियन बंधा-यासाठी जलसंपदा विभागाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

वढा तीर्थक्षेत्राच्या विकासाबाबत पालकमंत्री म्हणाले, वर्धा आणि पैनगंगा नदीच्या संगमावर असलेले वढा हे ‘ब’ दर्जाचे तीर्थक्षेत्र होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. ग्रीन बिल्डींग संकल्पनेवर आधारीत या तीर्थक्षेत्राचा विकास होणार असून त्यासाठी जांभा दगडाचा वापर केला जाईल. वढा तिर्थक्षेत्र व पर्यटन विकासाच्या याप्रकल्पासाठी 44 कोटी रुपये प्रस्तावित आहे. दोन वर्षात 25 कोटी रुपये उपलब्ध करून दिल्यास उर्वरित निधी खनीज विकास निधी व नियोजन समितीतून देता येईल. वढा येथे साक्षात ‘प्रति पंढरी’ साकारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असेही ते म्हणाले. 

नदीच्या संपूर्ण लांबी मधील स्वच्छता व खोलीकरणासाठी (17 किमी.) अंदाजीत 25 कोटी, नदीच्या डाव्या किंवा उजव्या बाजूने एक किमीपर्यंत नदीतट विकास व सौंदर्यीकरण व सुशोभिकरणाची कामे अंदाजित किंमत 200 कोटी, दाताळा पुलाखालील भागात 228 मीटर लांबीच्या बंधा-याचे बांधकाम अंदाजित किंमत 20 कोटी, नदीच्या डाव्या व उजव्या तिरावरील सहा किलोमीटर संरक्षक आधार भिंत व माती भिंतीच्या बांधकामाकरीता अंदाजित 320 कोटी व इतर करावयाची कामे 7 कोटी असे एकूण अंदाजित 572 कोटींचा  प्रकल्प प्रस्तावित असल्याची माहिती अधिक्षक अभियंता (पाटबंधारे) पद्माकर पाटील यांनी दिली.

 बैठकीला व्हीसीद्वारे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे (सा.बा.विभाग), पद्माकर पाटील (पाटबंधारे विभाग), जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, कार्यकारी अभियंता एस.बी. काळे, श्री. कुंभे, उपविभागीय अभियंता दि.ना. मदनकर आदी उपस्थित होते.

00000

बुधवारी जिल्ह्यात 30 कोरोनामुक्त तर 3 बाधित

 

बुधवारी जिल्ह्यात 30 कोरोनामुक्त तर 3 बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 76

चंद्रपूर दि. 23 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 30 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 3 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात बुधवारी मृत्यु संख्या शुन्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर 1, मुल 1 तर सावली येथे 1 रुग्ण आढळून आला असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, पोंभुर्णा, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर,  वरोरा, कोरपना,  जिवती  व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 911 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 268 झाली आहे. सध्या 76 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 73 हजार 429 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 72 हजार 574 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

‘ते’ तांदूळ प्लास्टिकचे नसून जीवनसत्त्वयुक्त फोर्टीफाईंड तांदूळ


‘ते’ तांदूळ प्लास्टिकचे नसून जीवनसत्त्वयुक्त फोर्टीफाईंड तांदूळ

चंद्रपूर, दि.23 फेब्रुवारी : शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पात्र शाळेतील इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना पोषण शक्तीसाठी ऑगस्ट 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत तांदूळ व धान्य आदी साहित्य शाळा स्तरावर वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे. शासनाच्या निर्देशानुसार तांदूळ हा भारतीय खाद्य महामंडळाकडून प्राप्त करून वखार महामंडळातून उचल करून वितरीत करण्यात येतो. तांदूळ दर्जाबाबत काही शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. मात्र, ते तांदूळ प्लास्टिकचे नसून जीवनसत्वयुक्त फोर्टिफाइड तांदूळ आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे यांनी दिली.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत फोर्टिफाइड तांदुळ प्रथमच दिला जात असून सदर तांदूळ विद्यार्थ्यांना, पालकांना वितरित केल्या जात आहे. पुरवठा करण्यात आलेल्या तांदळामध्ये काही प्रमाणात तांदूळ हा फोर्टिफाइड आहे. फक्त नियमित तांदळापेक्षा थोडासा पिवळसर आहे. त्यामुळे पालकांच्या मनामध्ये सदर तांदूळ याबद्दल संभ्रम निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्या अनुषंगाने नागरिकांना फोर्टिफाइड तांदळात बद्दल अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे.

फोर्टिफाइड तांदळाबद्दलची माहिती:

पुरवठा करण्यात येणाऱ्या तांदळामध्ये फोर्टिफाइड तांदूळ व नियमित तांदूळ यांचे प्रमाण 1:100 आहे. म्हणजेच पुरवठा करण्यात आलेल्या तांदळामध्ये फोर्टिफाइड तांदळाचे प्रमाण 1 किलोमध्ये 10 ग्रॅम या प्रमाणात आहे.

विद्यार्थ्यांच्या आहारातील सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्याकरीता फोर्टिफाइड तांदूळ देण्यात येत आहे. या तांदळामध्ये आयरन, फोलिक आणि विटामिन बी-12 तसेच झिंक, विटामिन ए, विटामिन बी-1,बी-2, बी-5, बी-6 या पोषक घटकांचा समावेश करून फोर्टिफाइड तांदूळ बनविण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक पोषकतत्वे मिळण्याच्या दृष्टीने हा तांदूळ अत्यंत उपयुक्त आहे. प्रक्रिया करण्यात आलेल्या फोर्टिफाइड तांदळाचे वजन हे नियमित तांदूळापेक्षा कमी असते. त्यामुळे सदरचा तांदूळ पाण्यामध्ये वर तरंगताना दिसून येतो. या योजनेअंतर्गत पुरवठा करण्यात आलेल्या तांदूळ, यापैकी काही तांदूळ पिवळसर रंगाचा दिसत असेल आणि पाण्यामध्ये तांदूळ भिजू घातल्यानंतर, त्यापैकी काही तांदूळ पाण्यावर तरंगत असल्याचे निदर्शनास आल्यास गैरसमज करून घेऊ नये.

फोर्टिफाइड तांदूळ नियमित पद्धतीने शिजविण्यात यावा, याकरीता कोणत्याही प्रकारची वेगळी कार्यपद्धती अवलंबण्याची आवश्यकता नाही. फोर्टिफाइड तांदळाबाबत अधिकची माहिती केंद्रशासनाच्या फूड सेफ्टी आणि स्टॅंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया (एफएसएसए) च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी, फोर्टिफाइड तांदुळाबाबत शिक्षक, पालक तसेच शाळा व्यवस्थापन समितीने त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होणार नाही, याबाबत नोंद घ्यावी. असे  शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे यांनी कळविले आहे.

00000