Search This Blog

Saturday 12 February 2022

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा


पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

          चंद्रपूर, दि.12 फेब्रुवारी : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार, दि.13 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10:30   वाजता निमगाव ता. सावली येथे आगमन व कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वाजता पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत रामाळा तलावाची पाहणी. सायंकाळी 4 वाजता बगड खिडकी चांदा किल्ला स्वच्छता मोहिमेची पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समवेत पाहणी. सायंकाळी 4.15 वाजता इरई नदीची पाहणी. सायंकाळी 4.30 वाजता पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे जिल्हा पर्यटन विषयक संदर्भाने आयोजित बैठकीत उपस्थिती. रात्री 8 वाजता हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर येथे आगमन व मुक्काम.

सोमवार, दि. 14 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे जिल्ह्यातील हायब्रीड अॅन्युटी रस्त्याच्या संदर्भात आढावा बैठक. दुपारी 3 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

00000

No comments:

Post a Comment