Search This Blog

Tuesday 8 February 2022

फिरत्या दवाखान्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा - पालकमंत्री वडेट्टीवार

 

फिरत्या दवाखान्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा - पालकमंत्री वडेट्टीवार

Ø ब्रम्हपूरी येथे लोकार्पण सोहळा

चंद्रपूर, दि. 8 फेब्रुवारी : आयसीआयसीआय बँकेच्या सीएसआर निधीतून ब्रम्हपुरीसिंदेवाहीसावली तालुक्यासाठी चार फिरत्या दवाखान्यांची सेवा उपलब्ध झाली आहे. या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांची मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे. नागरिकांनी या फिरत्या दवाखान्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमदत-पुनर्वसनबहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

ब्रम्हपुरी येथे आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज फिरत्या दवाखान्यांच (मोबाइल क्लिनीक व्हॅन) नुकतेच लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा बॅंकेचे संचालक संदीप गड्डमवार, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजेश कांबळेप्रमोद चिमुरकरस्मिता पारधीनगर परिषदेचे गटनेता विलास विखारनगरसेवक महेश भर्रेसोनू नाकतोडेमाजी सभापती नेताजी मेश्रामबंटी श्रीवास्तवतालुका आरोग्य अधिकारी दुधपचारे आदी उपस्थित होते.

फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून उच्च रक्तदाबमधुमेहडेंगीमलेरिया आदी संसर्गजन्य आजारांची चाचणी करून मोफत औषधोपचार केला जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार असल्याने नागरिकांनी सुध्दा तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

सदर उपक्रमाचे समन्वयक म्हणून कौस्तुभ बुटाला हे जबाबदारी पार पाडत असून रेव्हमॅक्स टेलिकॉम इन्फ्रास्ट्रकचर प्रा.लि.चे सारंग मोदीनरेश चौधरीप्रतिक आचार्य यांचे सहकार्य लाभले.

00000

No comments:

Post a Comment