युक्रेनमध्ये अडकलेल्या सहा विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांचा प्रशासनाशी संपर्क
Ø सर्व जण सुखरुप असल्याची माहिती
चंद्रपूर,दि. 25 फेब्रुवारी : सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत युक्रेनमध्ये, चंद्रपूर जिल्ह्यातील जे नागरिक अडकले आहेत, त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाशी संपर्क करण्याचे आवाहन केले होते. आतापर्यंत सहा विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला असून ते सर्वजण सुखरूप असल्याची माहिती आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या सहा जणांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील हर्षल बलवंत ठावरे, ऐश्वर्या प्रफुल्ल खोब्रागडे, नेहा शेख, आदिती अनंत सायरे, धीरज बिस्वास आणि दीक्षाराज अकेला या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यांच्याव्यतिरिक्त जे कोणी युक्रेनमध्ये अडकलेले असतील त्यांच्या नातेवाईकांनी त्वरीत जवळच्या तहसील कार्यालयात किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयातील 07172-251597 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 7666641447 या मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment