चंद्रपूर जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी विधी सेवा विशेष अभियान
चंद्रपूर, दि. 14 फेब्रुवारी : चंद्रपूर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व्दारे माहे फेब्रुवारी महिन्यात चंद्रपूर जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी विधी सेवा विशेष अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे सुचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती कविता बि. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा कारागृहाच्या सहयोगाने सदर विशेष अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
या अभियानात पॅनेल अधिवक्ता अँड. आर. एम. खोब्रागडे, अॅड ए. आर. डोलकर यांचेद्वारे चंद्रपूर जिल्हा कारागृहाला नियमित प्रत्यक्ष भेटी देवून कारागृह बंदी याच्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर कार्यालयाव्दारे नेमलेल्या पॅनेल अधिवक्ता यांची, त्यांच्या प्रकरणाचे न्यायालयीन सद्यस्थिती आदीची माहीती देण्यात येत आहे. तसेच त्यांच्या प्रकरणाचे न्यायालयीन सद्यस्थिती तपशिलाची माहीतीप्रत त्यांना देण्यात येत आहे. तसेच बंद्यांना आवश्यक असलेले विधी सेवा सहाय्य पुरविण्यात येत आहे. त्यासाठी विधीसेवा स्वयंसेवक यांचेसुध्दा सहकार्य घेण्यात येणार आहे.
कारागृह बंदीना देण्यात येणा-या मोफत विधी सेवा सहायासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क, खर्च करावयाचे नाही. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. सदर विधी सेवा विशेष अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे, कारागृहाचे अधिकारी व कर्मचारी आणि कारागृह बंदी यांचे सहकार्य लाभत आहे.
00000
No comments:
Post a Comment