जात वैधता प्रमाणपत्राकरीता उमेदवारांनी
त्रुटीची पुर्तता करण्याचे आवाहन
चंद्रपूर दि.3 फेब्रुवारी : सन 2021-22 मध्ये वर्ग 12 वी विज्ञान शाखेमध्ये प्रवेशीत व व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले तसेच सेवा व निवडणुक विषयक अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर केलेले आहेत. परंतु अद्यापपावेतो अपुर्ण दस्तऐवजाअभावी प्रकरण त्रुटीमध्ये प्रलंबित आहेत अशा उमेदवारांनी व अर्जदारांनी 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्रूटीची पुर्तता करावी. असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.
अद्यापपर्यंत प्रकरण अपुर्ण असल्याने जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही. अशा अर्जदारांनी दि. 31 जानेवारी 2022 पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करण्यात आलेली सर्वच प्रकरणे समितीने तपासली असुन वैध प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत व त्रुटीमध्ये असलेल्या प्रकरणांना ई-मेल संदेश, पत्र व एस.एम.एस.ब्दारे त्रुटी कळविण्यात आली आहे. परंतु प्रकरण सादर केलेल्या दिनांकापासुन 45 दिवसांचा कालावधी लोटलेला असुन अद्यापपर्यंत अर्जदाराकडुन ऑनलाईन त्रुटीची पुर्तता केलेली नाही. अशा अर्जदार व उमेदवारांनी कार्यालयीन सुटटीचे दिवस वगळुन दि. 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्रकरणाची सद्यस्थिती प्रत्यक्षात येवुन जाणुन घ्यावी अथवा ऑनलाईन त्रुटीपुर्तता करुन घ्यावी.
ई-मेल व्दारे पाठविण्यात आलेल्या त्रुटीची पुर्तता करु शकत नसल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा. जेणेकरुन अर्जदारांना व उमेदवारांना त्यांच्या प्रकरणात आलेल्या अडचणी दुर करता येतील व ऑनलाईल दस्तऐवज सादर करता येईल. दि.25 फेब्रुवारी 2022 पर्यंत आपणाकडुन कुठलाच प्रतिसाद न मिळाल्यास आपणास जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे गृहीत धरुन प्रकरण नियमानुसार निकाली काढण्यात येईल.
तरी, दि. 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाईन आलेल्या त्रुटीची पुर्तता तात्काळ करुन घ्यावी. त्रुटीपुर्ततेअभावी आपला जातीदावा समितीकडुन फेटाळण्यात आल्यास तसेच शैक्षणिक प्रकरणी प्रवेशासाठी, निवडणुक आणि सेवेसाठी अपात्र ठरल्यास याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार व उमेदवारांची राहील. यांस समिती जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी. असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment