चना खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी 16 फेब्रुवारीपासून
Ø खरेदी प्रक्रिया 15 मार्चपासून प्रस्तावित
चंद्रपूर दि. 17 फेब्रुवारी : पणन हंगाम 2021-22 मधील हमीभावाने चना खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याची प्रक्रिया दि. 16 फेब्रुवारी पासून तर खरेदी प्रक्रिया दि. 15 मार्च 2022 पासून प्रस्तावित करण्यात आली आहे.
हमीभावाने चना खरेदी सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. याकरिता दि. 16 फेब्रुवारी 2022 पासून हमीभावाने चना खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी करावी. नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड, वोटिंग कार्ड, शेतीचा सातबारा, बँक पासबुक इत्यादी संपूर्ण माहितीसह खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी.
ही आहेत खरेदी केंद्रे:
कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा (खरेदी केंद्र-वरोरा), कोरपना ता. खरेदी-विक्री सहकारी संस्था (खरेदी केंद्र -राजुरा) कोरपना ता. खरेदी-विक्री सहकारी संस्था, (खरेदी केंद्र-गडचांदूर) तर चंद्रपूर जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्था, चंद्रपूर (खरेदी केंद्र-चिमूर) ही ख्ररेदी केंद्रे असून शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगिरवार यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment