Search This Blog

Thursday 17 February 2022

गुरुवारी जिल्ह्यात 37 कोरोनामुक्त,28 बाधित तर 2 मृत्यु


गुरुवारी जिल्ह्यात 37 कोरोनामुक्त,28 बाधित तर 2 मृत्यु

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 230

चंद्रपूर दि. 17 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 37 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 28 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. तर गुरुवारी जिल्ह्यात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 2, चंद्रपूर 1, बल्लारपूर 1, ब्रह्मपुरी 3, नागभीड 2, मुल 1, गोंडपिपरी 1, चिमूर 15, तर वरोरा येथे 2 रुग्ण आढळून आले असून भद्रावती, सिंदेवाही, सावली, पोंभूर्णा, राजुरा, कोरपना, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे. आज मृत झालेल्या मध्ये ब्रम्हपूरी तालुक्यातील एका पुरुषाचा तर राजूरा तालुक्यातील एका महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 859 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 62 झाली आहे. सध्या 230 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 67 हजार 576 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 66 हजार 513 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment