Search This Blog

Thursday 31 December 2020

नगरपंचायतींच्या अंतिम प्रभाग रचनेस मान्यता

 नगरपंचायतींच्या अंतिम प्रभाग रचनेस मान्यता

चंद्रपूर, दि. 31 डिसेंबर : जिल्ह्यातील चिमुर, सावली, पोंभुर्णा, जिवती, कोरपना व गोंडपिंपरी या नगरपरिषद/नगरपंचायतीच्या अंतिम प्रभाग रचनेस विभागीय आयुक्त तथा प्रादेशीक संचालक, नगरपरिषद प्रशासन नागपूर यांनी दि. 24 डिसेंबरच्या आदेशान्वये मान्यता दिली आहे.

संबंधित नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी संबंधित शहराची विभागणी नवीन प्रभागामध्ये केली असून त्यांचे क्षेत्र दर्शविणारा नकाशा व सीमा प्रदर्शित केलेल्या अंतिम प्रभाग रचनेची अधिसुचना संबंधीत नगर पंचायतीच्या कार्यालयाच्या तसेच जिल्हाधिकारी, चंद्रपूर, यांच्या कार्यालयातील सुचना फलकावर 30 ‍डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द करण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासन अधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी कळविले आहे.

राखीव प्रभाग क्रमांकाची माहिती पुढीलप्रमाणे आहे. चिमुर नगरपरिषदमध्ये अनुसूचित जाती करिता प्रभाग क्रमांक 17, अनुसूचित जाती (स्री) करिता प्रभाग क्रमांक 3, अनुसूचित जमाती करिता प्रभाग क्रमांक 4, अ.ज.(स्री) करिता प्रभाग क्रमांक 9 व 12, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 7 व 11,   नागरिकांच्या मागास प्रवर्ग (स्री) करिता प्रभाग क्रमांक 1, 14 व 15, सर्वसाधारण करिता प्रभाग क्रमांक 5, 8, 10 व 13, सर्वसाधारण (स्री) करिता प्रभाग क्रमांक 2, 6 व 16.

सावली नगरपंचायतमध्ये अनुसूचित जाती करिता प्रभाग क्रमांक 1 व 15, अनुसूचित जाती (स्री) करिता प्रभाग क्रमांक 16 व 17, अनुसूचित जमाती करिता प्रभाग क्रमांक निरंक, अ.ज.(स्री) करिता प्रभाग क्रमांक 5, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 6 व 7,   नागरिकांच्या मागास प्रवर्ग (स्री) करिता प्रभाग क्रमांक 3, 10 व 11, सर्वसाधारण करिता प्रभाग क्रमांक 2, 4, 9 व 12, सर्वसाधारण (स्री) करिता प्रभाग क्रमांक 8, 13 व 14.

पोंभुर्णा नगरपंचायतमध्ये अनुसूचित जाती करिता प्रभाग क्रमांक 1, अनुसूचित जाती (स्री) करिता प्रभाग क्रमांक 3 व 15, अनुसूचित जमाती करिता प्रभाग क्रमांक 10, अ.ज.(स्री) करिता प्रभाग क्रमांक निरंक, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 11 व 17,   नागरिकांच्या मागास प्रवर्ग (स्री) करिता प्रभाग क्रमांक 4, 8 व 12, सर्वसाधारण करिता प्रभाग क्रमांक 5, 7, 9 व 14, सर्वसाधारण (स्री) करिता प्रभाग क्रमांक 2, 6, 13 व 16.

जिवती नगरपंचायतमध्ये अनुसूचित जाती करिता प्रभाग क्रमांक 1, अनुसूचित जाती (स्री) करिता प्रभाग क्रमांक निरंक, अनुसूचित जमाती करिता प्रभाग क्रमांक 10, अ.ज.(स्री) करिता प्रभाग क्रमांक 12 व 16, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 4 व 6,   नागरिकांच्या मागास प्रवर्ग (स्री) करिता प्रभाग क्रमांक 2, 7 व 15, सर्वसाधारण करिता प्रभाग क्रमांक 5, 9, 13 व 14, सर्वसाधारण (स्री) करिता प्रभाग क्रमांक 3, 8, 11 व 17.

कोरपना नगरपंचायतमध्ये अनुसूचित जाती करिता प्रभाग क्रमांक 16, अनुसूचित जाती (स्री) करिता प्रभाग क्रमांक 11, अनुसूचित जमाती करिता प्रभाग क्रमांक 10, अ.ज.(स्री) करिता प्रभाग क्रमांक 13 व 14, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 12 व 17,  नागरिकांच्या मागास प्रवर्ग (स्री) करिता प्रभाग क्रमांक 1, 2, व 8 सर्वसाधारण करिता प्रभाग क्रमांक 3, 5, 6 व 9, सर्वसाधारण (स्री) करिता प्रभाग क्रमांक 4, 7 व 15.

गोंडपिपरी नगरपंचायतमध्ये अनुसूचित जाती करिता प्रभाग क्रमांक 2, अनुसूचित जाती (स्री) करिता प्रभाग क्रमांक 4, अनुसूचित जमाती करिता प्रभाग क्रमांक 14, अ.ज.(स्री) करिता प्रभाग क्रमांक 9 व 13, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 1 व 17,   नागरिकांच्या मागास प्रवर्ग (स्री) करिता प्रभाग क्रमांक 8, 11 व 15, सर्वसाधारण करिता प्रभाग क्रमांक 3, 5, 7 व 16, सर्वसाधारण (स्री) करिता प्रभाग क्रमांक 6, 10 व 12.

०००००००

गत 24 तासात 58 कोरोनामुक्त

गत 24 तासात 58 कोरोनामुक्त

37 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू

 

Ø  आतापर्यंत 21,505 बाधित झाले बरे

Ø  उपचार घेत असलेले बाधित 437

 

चंद्रपूर, दि. 31 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 58 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 37 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 308 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 21 हजार 505 झाली आहे. सध्या 437 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 74 हजार 525 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 48 हजार 832 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शहरातील 52 वर्षीय व 40 वर्षीय दोन महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 366 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 334, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 10, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 37 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 12, चंद्रपूर तालुका दोन,  बल्लारपुर दोन, भद्रावती आठ, ब्रम्हपुरी एक, नागभिड एक, सिंदेवाही दोन, पोंभुर्णा एक, राजुरा एक, चिमुर पाच, वरोरा येथील दोन रुग्णाचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000

चंद्रपूरमधील 1788 गावांची अंतिम पैसेवारी 48 पैसे

 चंद्रपूरमधील 1788 गावांची अंतिम पैसेवारी 48 पैसे

Ø 50 पेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावांची संख्या 277

Ø 50 पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या 1511

  

चंद्रपूर, दि. 31 डिसेंबर :  सन 2020-21 या वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील 1788 गावांतील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी 48 पैसे असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जाहिर केले आहे. 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या 1511 असून 50 पेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावांची संख्या 277 आहे. तर पैसेवारी जाहिर न केलेल्या गावांची संख्या 45 आहे.

जिल्ह्यात एकूण गावांची संख्या 1836 गावे आहेत. त्यापैकी खरीप गावांची संख्या 1833 तर रब्बी गावांची संख्या 3 आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पीक नसलेल्या गावांची संख्या 45 आहे.

जिल्ह्यातील तालुक्यांची सरासरी अंतिम पैसेवारी पुढीलप्रमाणे आहे. चंद्रपूर तालुका 47 पैसे, बल्लारपूर 47 पैसे,  राजुरा 48 पैसे, कोरपना 47 पैसे, जिवती 47 पैसे, गोंडपिपरी 54 पैसे, पोंभुर्णा 61 पैसे, मुल 58 पैसे, सावली 48 पैसे, चिमुर 46 पैसे, सिंदेवाही 46 पैसे, ब्रम्हपुरी 45 पैसे, नागभीड 47 पैसे, वरोरा 45 पैसे व भद्रावती तालुक्याची सरारी 47 पैसे जाहिर करण्यात आली आहे.

००००००

Wednesday 30 December 2020

गत 24 तासात 41 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात 41 कोरोनामुक्त

25 नव्याने पॉझिटिव्ह ; एक मृत्यू

 

Ø  आतापर्यंत 21,447 बाधित झाले बरे

Ø  उपचार घेत असलेले बाधित 460

 

चंद्रपूर, दि. 30 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 41 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 25 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 271 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 21 हजार 447 झाली आहे. सध्या 460 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 72 हजार 730 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 47 हजार 377 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये गडचिरोली शहरातील 21 दिवसाच्या बाळाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 364 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 334, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ आठ, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 25 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील नऊ, चंद्रपूर तालुका दोन,  बल्लारपुर एक, भद्रावती दोन, ब्रम्हपुरी एक, नागभिड एक, मूल एक, चिमुर तीन, वरोरा एक, कोरपना दोन व इतर ठिकाणच्या दोन रुग्णाचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000

लॉकडाऊनला 31 जानेवारीपर्यंत मूदतवाढ

 लॉकडाऊनला 31 जानेवारीपर्यंत मूदतवाढ

चंद्रपूर, दि. 30 :   कोविड-19  संसर्गजन्य आजारामुळे राज्य सरकारने आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली असून या रोगाच्या नियंत्रणास्तव राज्यात साथरोग अधिनियमाची अंमलबजावणी सुरु आहे.

राज्याचे मुख्य सचिव यांच्या 29 डिसेंबर 2020 अधिसूचनेनुसार महाराष्ट्र राज्यात टाळेबंदीची (लॉकडाऊन) मुदत दिनांक 31 जानेवारी 2021 च्या मध्यरात्री पर्यंत वाढविलेली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी चंद्रपूर जिल्ह्याकरीता दिनांक 31 जानेवारी 2021 च्या मध्यरात्री पावेतो टाळेबंदीचा कालावधी वाढविण्याचे आदेश दिले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने यापूर्वी निर्गमित केलेले व सध्या अंमलात असलेले आदेश व मार्गदर्शक सुचना पुढील आदेशापर्यंत चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात लागू राहतील. सदरील आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम  आणि भारतीय दंड संहिता 1860 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमुद आहे.

०००००००

राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकातर्फे देशी दारू जप्त

राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकातर्फे देशी दारू जप्त

चंद्रपूर, दि. 30 डिसेंबर : राज्य उत्पादन शुल्क राजुरा कार्यालयाच्या भरारी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मौजा हरदोना-राजुरा मार्गावर पाळत ठेवून बोलेरो महिन्द्रा चारचाकी वाहन क्रमांक एमएच 34 बीजी 2592  या  वाहनातून रॉकेट देशी दारू संत्रा या ब्रन्डच्या 180 मिलीच्या एकुण 25 बॉक्स व वाहन जप्त केले. वाहनासह मुददेमालाची एकुण अंदाजे किंमत रूपये सहा लाख वीस हजार आहे.

 सदर गुन्ह्यातील आरोपी रात्री अंधाराचा फायदा घेवून फरार झाले असुन संबंधीत आरोपीचा फरार घोषित करून त्याच्या विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मारुती पाटील व त्यांची चमू करीत आहे .

माहे डिसेंबर महिन्यामध्ये चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क, विभागाने 68 गुन्ह्यात 50 आरोपींना अटक करून एकुण 33 लाख 76 हजार रूपयाचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे, असे राज्य उत्पादन शुल्क, राजुराचे निरीक्षक मारूती पाटील, यांनी कळविले आहे.

000

महाडीबीटी पोर्टल योजनाः- अर्ज एक,योजना अनेक


 महाडीबीटी पोर्टल योजनाः- अर्ज एक,योजना अनेक

Ø अर्ज करण्यासाठी आज अखेरचा दिवस

चंद्रपूर, दि. 30 डिसेंबर : कृषी विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. योजनांचा लाभ मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्याची अंतिम तिथी 31 डिसेंबर 2020 अशी आहे. तरी या योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.

·         योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधुनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे.

·          महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/हे संकेतस्थळ आहे.या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा.शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल.ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेलत्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

·         पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पुर्व संमती देणे,मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.

·         महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली आहे .यापूर्वीच अर्जदारांनी माहिती भरली असल्यास  पुन्हा  भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये  शेतकरी बदल करू शकतात .ज्या शेतकरी बांधवांनी महा डीबीटी पोर्टलवर कृषीविषयक योजनाचा लाभ मिळवण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल, त्यांनी दिनांक ३१/१२/२०२० अखेर पर्यंत आपले अर्ज पोर्टलवर भरावेत .या तारखेपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील. तरी आवाहन करण्यात येते कि, सर्व इच्छुक शेतक-यांनी  महा डीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

000

शेतकऱ्यांना हवामान आधारीत कृषी सल्ला


 शेतकऱ्यांना हवामान आधारीत कृषी सल्ला

  चंद्रपूर, दि. 30 डिसेंबर : चंद्रपूर जिल्हयात दिनांक ३० डिसेंबर  २०२० ते ०३ जानेवारी २०२१ या पाच दिवसात आंशिक ढगाळ ते निरभ्र हवामान राहून कमाल तापमान २८.५ ते २८.९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १३.८ ते १४.३ अंश सेल्सिअस राहण्याची   शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हरभरा -वाढीची अवस्था

१. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे शेतामध्ये लावावे.

२.घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी (१-२ प्रती मिटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे) पार केल्यास नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निबोंळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडीरेक्टीन प्रती ५० मि.ली. किंवा एच.ए.एन.पि.व्ही.(१X१०९) पिओबी/मिली) ५०० एल.ई/हे. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इसी २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

कापूस- बोंडे अवस्था

१.कपाशीचे फुटलेले बोन्डेची वेचणी ३१ डिसेंबर पूर्ण करून ते सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिवळसर, किडका, कवडीयुक्त तसेच पावसात भिजलेला कापूस वेगळा वेचून अलग साठवावा. वेचणी करतांना कापसाला पालापाचोळा चिकटणारा नाही याची काळजी घ्यावी.

२.गुलाबी  बोंड अळीच्या व्यवस्थापणासाठी कापसाची वेचणी झालेल्या क्षेत्रात खोडासह समूळ झाडाची काढणी करून खोल नांगरट करावी व काढलेल्या प-हाटया जाळून नष्ट करावे.

उन्हाळी धान – पूर्वमशागत नर्सरी आणि बीजप्रक्रिया

 १.धान रोपवाटीकेत पेरणीनंतर १५ दिवसांनी तण/कचरा काढून टाकावे व नंतर दर गुंठयास एक किलो युरिया दयावा.

२.रात्रीच्या वेळेस घटलेल्या तापमानाचा भात पिकाच्या रोपांच्या वाढीवर होणा-या विपरीत परिणाम टाळण्यासाठी रात्रीच्या वेळेस प्लास्टिक आच्छादन किंवा भाताचा तनसाचे आच्छादन टाकावे व सकाळी काढून घ्यावे जेणेकरून भाताच्या रोपांची वाढ चांगली  होईल.

३.रोपवाटिकेवर करपा व कडाकरपा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम + स्ट्रेफ्टोसायक्लीन ०.५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून लागवडीनंतर १० दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात.

४.उन्हाळी धान पिक रोपवाटीकेसाठी जमीन नांगरून व वखरून तयार करावे १०० से.मी. रूंद व १० ते २५ सें.मी उंच, योग्य त्या लांबीचे गादीवाफे तयार करून धान बियाणे पेरणीपूर्वी दर गुंठयास तीन क्विंटल चांगले कुजलेले शेणखत, १ किलो युरिया व ३ किलो एस.एस.पी. मिसळून दयावे.

५.संशोधीत धान वाणांचा वापर करावा. पेरणीसाठी बारीक  जातीकरिता ३५ ते ४० किलो आणि मध्यम व ठोकळ जातीकरीता ५० किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे.

६.धान बियाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी, त्यासाठी १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ (३ टक्के) या प्रमाणात द्रावण तयार करून त्यात बियाणे टाकावे, द्रावण स्थिर झाल्यावर तरंगणारे हलके रोगयुक्त बियाणे चाळणीने काढून जाळून टाकावे, व तळाखालील निरोगी बियाणे २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत २४ तास वाळवावे, पेरणीपूर्वी बियाण्यास (३ ग्रॅम/किलो) बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी

 

तूर – फुले व शेंगा अवस्था

            शेंगा पोखरणा-या अळीच्या नियंत्रणासाठी पिक ५० टक्के फुलावर आल्याबरोबर पहिली फवारणी  क्विनॉलफॉस २५ टक्के इसी १६ मि.ली. त्यानंतर १५ दिवसांनी दुसरी फवारणी इमामेक्टिन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

गहु-पेरणी-

१.ढगाळ हवामानामूळे गव्हावरील मावा किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तरी त्याच्या नियंत्रणासाठी थायोमिथाक्झाम २५ टक्के डब्ल्यूजी  १० ते १५ ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही इसी ४० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२.उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पाण्याच्या उपलब्ध साठयानुसार पिकाच्या गरजेनुसार ओलीत करावे. आवश्यकतेनुसार एक ते दोन निंदणी करून पीक तणविरहित ठेवावे.

३.गहु पिकाला पेरणीनंतर १८ ते २० दिवसांनी नत्र खताची दुसरी मात्रा (५० ते ६० किलो प्रती हेक्टरी) पहिल्या पाणी देतांना दयावी.

करडई –वाढीची अवस्था

१.पेरणीनंतर ३०, ५० आणि ६५ दिवसांनी ओलिताच्या तीन पाळया दयाव्या. जेथे एकाचा ओलिताची सोय आहे. तेथे ५० दिवसांनी, दोन ओलिताची सोय असल्यास ३० व ५० दिवसांनी ओलीत करावे. ओलीत करतांना पिकात जास्त वेळ पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

२.करडई पिकाच्या पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी विरळणी करून दोन रोपात २० ते ३० सें.मी. अंतर ठेवावे आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा निंदणी व डवरणी करावी.

३.मावा किडीचा प्रादुर्भाव (३० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे) आढळताच डायमेथोएट ३०  टक्के प्रवाही १३ मि. ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

मिरची-फुले ते फळ

       चुरडा मुरडा रोगाच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० ईसी १४ मिली किंवा फिप्रोनील ५ एससी २० मिली किंवा इथीओन ५० ईसी ४० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

टिप- रासायनिक तणनाशक व किटकनाशकाची फवारणी पावसाची उघडीप पाहूनच करावी. फवारणी करताना संरक्षक किटचा वापर आवश्य करावा.

                  असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उदय पाटील व कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही व यांचे मार्फत करण्यात येत आहे.

00000  

शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

 


शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Ø  मदतीसाठी 10 प्रकरणे पात्र

चंद्रपूर, दि. 30 डिसेंबर : नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्जपरतफेडीचा तगादा या कारणास्तव आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासकीय मदत देण्यासाठी जिल्ह्यातील एकूण 20 प्रकरणांपैकी 10 प्रकरणे पात्र ठरविण्यात आले असून नऊ प्रकरणे अपात्र तर एक प्रकरण प्रलंबित ठेवण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती. याअंतर्गत उपजिल्हाधिकारी गव्हाळ यांनी जिल्हास्तरीय समितीचा आढावा घेऊन प्रकरणे निकाली काढली.

पात्र प्रकरणात नागभिड तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त तुळशीराम पाथोडे, राजुरा तालुक्यातील नलफडी येथील अतुल धानोरकर, बोटगाव येथील नितेश ठावरी, येरगव्हाण येथील शत्रुघ्न बावणे, गोवरी येथील अनिल देवाळकर व सुमठाणा येथील प्रमोद मोरे, मूल तालुक्यातील नवेगाव येथील संदिप झाडे,  गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव येथील निळकंठ आमने तसेच चेकतळाधी येथील प्रदिप भोयर, वरोरा तालुक्यातील माढेळी येथील अशोक डंबारे आणि चिमूर तालुक्यातील टेकेपार येथील सौरभ कुळमेथे यांच्या प्रकरणांचा समावेश होता.

बैठकीला पोलीस विभाग, आरोग्य व कृषी  विभागाचे तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा अग्रणी बँक व कृषी विकास अधिकारी कार्यालयाचे संबंधीत अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

००००००

Tuesday 29 December 2020

गत 24 तासात 85 कोरोनामुक्त

गत 24 तासात 85 कोरोनामुक्त

36 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू

 

Ø  आतापर्यंत 21,406 बाधित झाले बरे

Ø  उपचार घेत असलेले बाधित 477

 

चंद्रपूर, दि. 29 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 85 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 36 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 246 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 21 हजार 406 झाली आहे. सध्या 477 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 71 हजार 281 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 46 हजार 352 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये बापू नगर, दिग्रस येथील 66 वर्षीय महिला व बल्लारशा शहरातील 65 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 363 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 334, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 17, यवतमाळ आठ, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 36 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 15, चंद्रपूर तालुका सात,  बल्लारपुर दोन, भद्रावती एक, नागभिड एक, सिंदेवाही एक, मूल एक, सावली एक, राजूरा एक, चिमुर एक, वरोरा दोन व इतर ठिकाणच्या तीन रुग्णाचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000

ग्रामपंचायत निवडणूक नामनिर्देशनपत्र पारंपारिक पध्दतीने स्वीकारणार

 ग्रामपंचायत निवडणूक नामनिर्देशनपत्र पारंपारिक पध्दतीने स्वीकारणार

 चंद्रपूर, दि. 29 डिसेंबर : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दि.30 डिसेंबर 2020 पर्यंत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे. मात्र दि. 28 डिसेंबर रोजी सायंकाळपासून इंटरनेट गती कमी, सर्व्हर अडचण इ. तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. सदर बाब विचारात घेता, इच्छूक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहून नये आणि त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपारिक पध्दतीने (offline mode) स्वीकारण्याचा तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळदेखील दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5.30 वा. पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

पारंपारिक पध्दतीने स्वीकारलेले नामनिर्देशन पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेमार्फत छाननीप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैध नामनिर्देशनपत्र संगणक चालकांच्या मदतीने, संगणक प्रणालीमध्ये भरुन घेण्यात यावे, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यांनी दिले असल्याचे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संपत खलाटे यांनी कळविले आहे.

0000

Monday 28 December 2020

गत 24 तासात 52 कोरोनामुक्त

गत 24 तासात 52 कोरोनामुक्त

31 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू 

Ø  आतापर्यंत 21,321 बाधित झाले बरे

Ø  उपचार घेत असलेले बाधित 528 

चंद्रपूर, दि. 28 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 52 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 31 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 210 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 21 हजार 321 झाली आहे. सध्या 528 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 70 हजार 75 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 45 हजार 376 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये राणी लक्ष्मी वार्ड बल्लारपुर येथील 60 वर्षीय पुरूष व गजानन महाराज चौक चंद्रपूर मुळ रा. गडचिराली येथील 57 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 361 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 333, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 17, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 31 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 16, चंद्रपूर तालुका चार,  भद्रावती एक, सिंदेवाही दोन, चिमुर तीन, वरोरा चार व इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे.

नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000

तुर खरेदीसाठी नोंदणी सुरू

 तुर खरेदीसाठी नोंदणी सुरू

चंद्रपूर, दि. 28 डिसेंबर : नाफेडच्या वतीने आधारभुत दराने हंगाम 2020-21 मध्ये तुर खरेदी करण्यासाठी चंद्रपुर, वरोरा, चिमुर, गडचांदुर व राजुरा येथील खरेदी केंद्रांवर 28 डिसेंबरपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

चंद्रपूर येथील खरेदी केंद्राला भद्रावती, पोंभुर्णा, सावली व मुल हे तालुके जोडण्यात आले आहेत. तसेच वरोरा केंद्रला वरोरा तालुका, चिमुर केंद्राला ब्रम्हपुरी, सिंदेवाही, नागभिड तालुके, गडचांदुर केंद्राला कोरपना व जिवती तालुके तर राजुरा खरेदी केंद्राला गोंडपिपरी हे तालुके जोडण्यात आले असून संबंधीत तालुक्यातील शेतकऱ्यांनी वरीलप्रमाणे दिलेल्या केंद्रावर तुर खरेदीसाठी नोंदणी करावी.

            शेतकऱ्यांनी आपले आधार  कार्ड, मतदार ओळखपत्र, शेतीचा 7/12, बँक खाते पासबुक, इ. संपुर्ण माहितीसह खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी ए.आ.गोगीरवार यांनी कळविले आहे.

0000

चंद्रपूर महानगरपालीका हद्दित रात्री जमावबंदी

 चंद्रपूर महानगरपालीका हद्दित रात्री जमावबंदी

चंद्रपूर, दि. 28 डिसेंबर : चंद्रपूर महानगरपालीका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने  यांनी निर्गमित केले आहेत. सदर आदेश दिनांक 5 जानेवारी 2021 पर्यंत लागू राहतील.

वैद्यकीय व आपातकालीन सेवेतील तसेच कर्तव्यावर असणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदरील आदेश लागू राहणार नाही.

            आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्याविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड सहिता, साथरोग कायदा व इतर संबंधीत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.  

000

स्मार्ट प्रकल्पांतर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

 स्मार्ट प्रकल्पांतर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

 

चंद्रपूर, दि. 28 डिसेंबर : जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातुन महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन प्रकल्पांतर्गत समुदाय आधारीत संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार यांचेकडून अर्ज मागविण्याची अंतिम मुदतीस आता दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. पुर्वी ही मुदत दिनांक 15 डिसेंबर पर्यंत होती.

 याप्रकल्पातुन सर्व-समावेशक आणि स्पर्धाक्षम मुल्यसाखळ्या विकसित करावयाचे उदिष्ट आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या समुदाय आधारीत संस्थांनी मुल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प ऑनलाईन सादर करावयाचे आहेत. यास चांगला प्रतिसाद मिळालेला असून आता पर्यंत सुमारे एक हजार अर्ज प्राप्त झालेले आहेत.

तरी शेतकऱ्यांची आणि खरेदीदार संस्थांची मागणी लक्षात घेवून अर्ज करण्यास दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी www.smart-mh.org या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.

000

Sunday 27 December 2020

जिल्हाधिकाऱ्यांकडून धान खरेदीची पाहणी




 जिल्हाधिकाऱ्यांकडून धान खरेदीची पाहणी

ब्रम्हपुरी व चौगान बाजार समितीला आकस्म‍िक भेट

 

चंद्रपूर, दि. 27 डिसेंबर : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने  यांनी ब्रम्हपुरी व चौगान येथील बाजार समितीला नुकतेच आकस्मिक भेट देवून धान खरेदी नियमानुसार सुरू आहे का, याची पाहणी केली. यावेळी त्यांनी धानाची ग्रेडीग व्यवस्थतीत करून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचे तसेच परराज्यातील व  व्यापाऱ्यांकडील धान स्‍थनिक बाजार समितीत खरेदी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी यावेळी बाजार समितीत धानविक्रीसाठी जमलेल्या शेतकऱ्यांशी मुक्तसंवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, नायब तहसिलदार योगेश शिंदे, मंडळ अधिकारी श्री. बोदे, संबंधीत सहाय्यक निबंधक, तलाठी, बाजार समितीचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाने राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावावर रुपये 700 बोनस जाहिर केला आहे. त्यामुळे परराज्यातील धान महाराष्ट्रात विक्री करून शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मागील महिण्यात तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नुकतेच संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याचेही निर्देश दिले होते.

0000

गत 24 तासात 77 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात 77 कोरोनामुक्त

44 नव्याने पॉझिटिव्ह

Ø  आतापर्यंत 21,269 बाधित झाले बरे

Ø  उपचार घेत असलेले बाधित 551

 

चंद्रपूर, दि. 27 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 77 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 44 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 179 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 21 हजार 269 झाली आहे. सध्या 551 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 69 हजार 945 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 44 हजार 831 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 359 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 332, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 16, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 44 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 17, चंद्रपूर तालुक्यातील तीन, बल्लारपुर एक, भद्रावती चार, नागभीड तीन, सिंदेवाही एक, राजूरा एक, चिमुर सहा, वरोरा चार, कोरपना तीन व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना अजून गेलेला नाही त्यामुळे नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000  

Saturday 26 December 2020

गत 24 तासात 84 कोरोनामुक्त


 गत 24 तासात 84 कोरोनामुक्त

64 नव्याने पॉझिटिव्ह ; एक मृत्यू

Ø  आतापर्यंत 21,192 बाधित झाले बरे

Ø  उपचार घेत असलेले बाधित 584

 

चंद्रपूर, दि. 26 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 84 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 64 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 135 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 21 हजार 192 झाली आहे. सध्या 584 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 68 हजार 556 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 44 हजार 131 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यांमध्ये सोमनाथपुर ता. राजुरा येथील 72 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 359 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 332, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 16, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 64 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 34, चंद्रपूर तालुका तीन, बल्लारपूर एक, भद्रावती एक, ब्रम्हपुरी एक, सिंदेवाही पाच, मूल दोन, गोंडपीपरी एक, राजुरा एक, चिमुर एक व वरोरा नऊ, कोरपना चार व इतर ठिकाणच्या एका  रुग्णाचा समावेश आहे.

नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000

Friday 25 December 2020

गत 24 तासात 64 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात 64 कोरोनामुक्त

50 नव्याने पॉझिटिव्ह

Ø  आतापर्यंत 21,108 बाधित झाले बरे

Ø  उपचार घेत असलेले बाधित 605

 

चंद्रपूर, दि. 25 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 64 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 50 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 71 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 21 हजार 108 झाली आहे. सध्या 605 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 68 हजार 118 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 43 हजार 536 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यांमध्ये जांभळघाट चिमूर येथील 71 वर्षीय पुरुष व बल्लारपूर शहरातील 64 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 358 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 331, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 16, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 50 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 28, चंद्रपूर तालुका 10, बल्लारपूर एक, भद्रावती चार, नागभीड एक, सिंदेवाही एक, मूल एक, चिमुर एक व वरोरा येथील तीन  रुग्णाचा समावेश आहे.

नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000