Search This Blog

Thursday 24 December 2020

विहित मुदतीत काम न करणाऱ्या कंत्राटदारांवर कडक कारवाई करणार – राहुल कर्डिले

 विहित मुदतीत काम न करणाऱ्या कंत्राटदारांवर कडक कारवाई करणार – राहुल कर्डिले

21 बंधाऱ्याचे बांधकामाचे करारनामे रद्द


 चंद्रपूर, दि. 24 डिसेंबर : जे कंत्राटदार विहीत मुदतीत बंधाऱ्याचे काम पुर्ण करीत नाही अशा कंत्राटदाराबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी  राहुल कर्डिले यांनी कडक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असता जिल्हा जलसंधारण अधिकारी (ल.पा.) यांनी अशा कंत्राटदाराकडील एकुण 21 बंधाऱ्याचे बांधकामाचे करारनामे मागील दोन महिण्यात रद्द केलेले असून सुरक्षा ठेव व अनामत रक्कम शासनखाती जमा करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद, लघुपाटबंधारे विभाग, चंद्रपूर येथील सिमेंट प्लग बंधारे, को.प. बंधारे बांधकाम व दुरुस्तीचे कामे मोठ्या प्रमाणात घेण्यात आले होते. बांधकामाचे कंत्राट घेण्याकरीता कंत्राटदार, मजुर सहकारी सेवा संस्था, तसेच सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी बांधकामाचे कंत्राट मोठ्या प्रमाणात मिळविलेले असून करारनामा सुद्धा करण्यात आले होते. परंतु सदर बांधकामे विहित मुदतीत सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे शासनाचा निधी खर्च होत नाही व बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण होत नाही. त्यामुळे ग्रामिण भागातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीपासुन वंचित राहावे लागत असुन शासनाचा शेतकऱ्याप्रती असलेला उद्देश सफल होत नसल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी नाराजी व्यक्त केली होती.

करारनामे रद्द करण्यात आलेल्या कंत्राटदाराला यापुढे दोन वर्षाकरीता कामे घेता येणार नाही व भविष्यात अश्या प्रकारच्या पुनरावृत्ती झाल्यास कंत्राटदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. तसेच जी कामे अद्यापही सुरु करण्यात आलेली नाहीत, अशा कंत्राटदारांना नोटीस तामील करण्यात आली असून मार्च 2021 अखेर पावेतो कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जे कंत्राटदार दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण करणार नाहीत अश्या कंत्राटदारांचे करारनामे रद्द करण्याबाबतची कार्यवाही लवकरच करण्यात येणार असल्याचे जिल्हा जलसंधारण अधिकारी, (ल.पा.) जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी कळविलेले आहे.

0000

No comments:

Post a Comment