Search This Blog

Wednesday, 23 December 2020

मासेमारी साधनांसाठी अर्थसहाय्य : योजनेंतर्गत प्रस्ताव आमंत्रित

मासेमारी साधनांसाठी अर्थसहाय्य : योजनेंतर्गत प्रस्ताव आमंत्रित

चंद्रपूर, दि.23 डिसेंबर : मत्स्यव्यवसाय विभागातर्फे जिल्ह्यातील मत्स्यपालन सहकारी संस्थांच्या क्रियाशिल मच्छिमारांना सुतजाळे तसेच मासेमारी लाकडी नौका, डोंगा इत्यादि मासेमारीसाठी आवश्यक साधने खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 50 टक्के अर्थसहाय्य अनुदान देण्यात येत असून याकरिता इच्छुक मच्छिमारांकडून प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहे.

योजनेचा लाभ घेण्याकरीता संबंधित लाभार्थी सभासद मत्स्यपालन सहकारी संस्थेचा क्रियाशिल मच्छिमार असणे आवश्यक आहे. सदर योजनेमध्ये प्रत्येक क्रियाशील सभासद मच्छिमारास एका वर्षात जास्तीत जास्त 5 किलोग्रॅम सुतजाळे खरेदीवर अनूदान अनूज्ञेय आहे.

तरी जिल्हयातील मत्स्यपालन सहकारी संस्थांनी आपल्या मच्छिमार सभासदांना सदर योजनेबाबत अवगत करावे. इच्छुकांनी त्यांचे अर्थसहाय्य मागणी प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, चंद्रपूर तसेच मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, ब्रम्हपूरी या कार्यालयांकडे सादर करावा, असे मत्सव्यवसायचे सहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांनी कळविले आहे.

000

No comments:

Post a Comment