Search This Blog

Monday 21 December 2020

रोजगाराच्या नव्या संधी’ विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन

 


रोजगाराच्या नव्या संधी’ विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन

कौशल्य विकास विभागाद्वारे 23 डिसेंबरला आयोजन

 

चंद्रपूर, दि. 21 डिसेंबर :  जिल्ह्यातील युवक व युवतींकरिता 'रोजगाराच्या नव्या संधी' या विषयावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या श्रीमती दहाटे या ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत.

            सदर वेबीनार कार्यक्रम जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास व मार्गदर्शन केंद्र यांच्यातर्फे संयुक्तरित्या दिनांक 23 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. इच्छुकांना meet.google.com/has-merp-fnr  या गुगल मीट लींकवर जॉईन होऊन कार्यक्रमाचा लाभ घेता येईल. अधिक माहितीकरिता दुरध्वनी क्रमांक 07172-252295, 270933 यावर संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment