Search This Blog

Friday 11 December 2020

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणकींचा कार्यक्रम जाहीर

 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणकींचा कार्यक्रम जाहीर

Ø आचारसंहिता लागू

Ø 15 जानेवारी 2021 रोजी मतदान

चंद्रपूर, दि. 11 डिसेंबर :  माहे जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामंपचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगा मार्फत दिनांक 11 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द करण्यात आलेला आहे. माहे जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत चंद्रपूर जिल्हयातील एकूण 629 ग्रामपंचायतींची मुदत संपलेली आहे, सदर निवडणूकांसाठी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी आवश्यक असल्यास मतदान घेण्यात येणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींमध्ये दिनांक 11 डिसेंबर 2020 पासून आचारसंहिता अंमलात आलेली आहे.

सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणकीकृत (Online) पध्दतीने नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येणार आहे, नामनिर्देशन पत्र भरण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाचे वेबसाईट (https://panchayatelection.maharashtra. gov.in/) वर उपलब्ध आहे.  

 नामनिर्देशन पत्र दिनांक 23 ते 30 डिसेंबर 2020 (दिनांक 25, 26 व 27/12/2020 ची सार्वजनिक सुट्टी वगळून) या कालावधीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत स्विकारण्यात येणार आहे. संगणकीकृत (Online) पध्दतीने नामनिर्देशन पत्राची प्रत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment