Search This Blog

Monday 7 December 2020

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे

 शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे

प्रवेश प्रक्रियेसंदर्भात ऑनलाईन कार्यशाळा

चंद्रपूर, दि. 7 डिसेंबर : अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेकरीता घेण्यात आलेल्या पात्रता CET परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. य अनुषंगाने विद्यार्थी व पालकांना प्रवेश प्रक्रिये संदर्भातील अडचणी विशेष करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अभ्यास क्रमातील विविध शाखांची माहिती तसेच महाविद्यालया बद्दल व प्रवेश प्रक्रियेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांविषयीची माहिती देण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महावद्यालय चंद्रपूरतर्फे ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा गूगल मीट वर घेण्यात येत असून त्याची लिंक https://meet.google.com/kez-mapr-dwn अशी आहे. ही ऑनलाईन कार्यशाळा दिनांक १० डिसेंबर २०२० रोजी दुपारी ४:०० वाजता आयोजित केली आहे.

कार्यशाळेमध्ये अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेश परीक्षा, थेट द्वितीय वर्ष प्रवेश आणि इतर बाबींवर महाविद्यालयाचे तज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन करणार आहेत. तरी इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी प्रवेश प्रक्रीयेसंबधातील आपले  प्रश्न यावेळी विचारून या ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर आकोजवार यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment