Search This Blog

Wednesday, 30 December 2020

लॉकडाऊनला 31 जानेवारीपर्यंत मूदतवाढ

 लॉकडाऊनला 31 जानेवारीपर्यंत मूदतवाढ

चंद्रपूर, दि. 30 :   कोविड-19  संसर्गजन्य आजारामुळे राज्य सरकारने आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली असून या रोगाच्या नियंत्रणास्तव राज्यात साथरोग अधिनियमाची अंमलबजावणी सुरु आहे.

राज्याचे मुख्य सचिव यांच्या 29 डिसेंबर 2020 अधिसूचनेनुसार महाराष्ट्र राज्यात टाळेबंदीची (लॉकडाऊन) मुदत दिनांक 31 जानेवारी 2021 च्या मध्यरात्री पर्यंत वाढविलेली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी चंद्रपूर जिल्ह्याकरीता दिनांक 31 जानेवारी 2021 च्या मध्यरात्री पावेतो टाळेबंदीचा कालावधी वाढविण्याचे आदेश दिले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने यापूर्वी निर्गमित केलेले व सध्या अंमलात असलेले आदेश व मार्गदर्शक सुचना पुढील आदेशापर्यंत चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात लागू राहतील. सदरील आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम  आणि भारतीय दंड संहिता 1860 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमुद आहे.

०००००००

No comments:

Post a Comment