Search This Blog

Monday 7 December 2020

पोंभुणा येथे दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन कक्ष स्थापन

 पोंभुणा येथे दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन कक्ष स्थापन

             

चंद्रपूर, दि. 7 डिसेंबर :  दिव्यांग व्यक्ती व सर्व नागरिकांना दिव्यांग व्यक्ती संदर्भातील सर्व कायदे व  योजनांची माहिती सहज व सुलभ मिळावी याकरीता पंचायत समिती, पोंभुर्णा येथे नुमतेच दिव्यांग सल्ला व  मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आला आहे.  

            या कक्षाचा कामकाजाचा दिवस आठवडयातील प्रत्येक शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी असा असून इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले असल्याचे गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांनी कळविले आहे.

 

                                                                    *****

No comments:

Post a Comment