Search This Blog

Tuesday 15 December 2020

असमान निधी योजनेंतर्गत शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव आमंत्रित

 असमान निधी योजनेंतर्गत शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव आमंत्रित

            चंद्रपूर, दि. 15 डिसेंबर : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता, यांच्या असमान निधी योजनेंर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या  सर्वांगिण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. याअंतर्गत सन 2020-21 करिता शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाकडून 8 जानेवारी 2021 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.      

असमान निधी योजनेअंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वंयसेवी संस्थांना साधन साम्रगी, ग्रंथ, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी अर्थसहाय्य, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्‍ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य, महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य तसेच बाल ग्रंथालयासाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्‍ठान बाल कोपरा स्थापन करणे इ. योजनांसाठी अर्थसहाय्य करण्यात येते.

राजाराममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनांबाबत इच्छुकांनी संबंधित जिल्हाच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संर्पक साधावा. तसेच या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. अर्जामध्ये नमुद केलेल्या आवश्यक त्या सर्व कागदापत्रांसह इंग्रजी /हिंदी  भाषेमधील परिपूर्ण प्रस्ताव चार प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी, ज्युबली हायस्कुलजवळ, चंद्रपुर, यांचे कार्यालयास दि. 8 जानेवारी 2021 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन जिल्हा ग्रंथपाल नि.त्र्यं. सोनोने यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment