Search This Blog

Thursday 24 December 2020

शेतकऱ्यांना थेटमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करण्याचे नियोजन करा

 शेतकऱ्यांना थेटमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करण्याचे नियोजन करा

‘विकेल ते पिकेल’ आढावा बैठकीत अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांचे निर्देश

चंद्रपूर, दि. 24 डिसेंबर : शेतकऱ्यांनी ग्राहकांच्या मागणीनुसार जाणीवपुर्वक उत्पादन घेणे आवश्यक आहे, मात्र त्यासोबतच प्रशासकीय यंत्रणेनेदेखील शेतकरी ते ग्राहक थेट माल विक्रीसाठी विविध ठिकाणी आठवड्यातील दिवस ठरवून जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी दिले.

विकेल ते पिकेल व संत सावता माळी रयत बाजार अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय समितीचा आढावा तसेच गुलाबी बोंडअळी नियंत्रणाबाबत आढावा सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वीसकलमी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी अपर जिल्हाधिकारी वरखेडकर बोलत होत्या.

बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शंभुनाथ झा प्रामुख्याने उपस्थित होते.

विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी गटांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे आवश्यक असून गरजेनुसार सामाजिक माध्यमांचा वापर करण्याचे तसेच बोंडअळी नियंत्रणासाठी फरदडमुक्ती मोहिम राबविण्याच्या सूचनाही अपर जिल्हाधिकारी वरखेडकर यांनी दिल्या. 

बैठकीला कृषी विकास अधिकारी श्री. लिंगे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. नागदेवते, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक जी.एस.कडस्कर, तंत्र अधिकारी जी.प.मादेवार, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व जिनिंग प्रेसींग मिल मालक उपस्थित होते. 

000

No comments:

Post a Comment