Search This Blog

Monday 14 December 2020

‘व्यक्तीमत्व विकास’ विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन

 


‘व्यक्तीमत्व विकास’ विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन

Ø कौशल्य विकास विभागाद्वारे 17 डिसेंबरला आयोजन

चंद्रपूर, दि. 14 डिसेंबर :  जिल्ह्यातील युवक व युवतींकरिता व्यक्तीमत्व विकास या विषयावर रिनहान मल्टीबिानेस मॅन्युफ्रॅक्चरींग ॲन्ड सर्व्हिसेस प्रा. लि. चे कार्यकारी संचालक अशोक कासारवार हे ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत.  

सदर वेबीनार कार्यक्रम जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास व मार्गदर्शन केंद्र यांच्यातर्फे संयुक्तरित्या दिनांक 17 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. इच्छुकांना meet.google.com/wgf-uyeu-pjg या गुगल मीट वरील लींकवर जॉईन होऊन कार्यक्रमाचा लाभ घेता येईल. अधिक माहितीकरिता दुरध्वनी क्रमांक 07172-252295, 270933 यावर संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी कळविले आहे

No comments:

Post a Comment