Search This Blog

Sunday 27 December 2020

जिल्हाधिकाऱ्यांकडून धान खरेदीची पाहणी




 जिल्हाधिकाऱ्यांकडून धान खरेदीची पाहणी

ब्रम्हपुरी व चौगान बाजार समितीला आकस्म‍िक भेट

 

चंद्रपूर, दि. 27 डिसेंबर : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने  यांनी ब्रम्हपुरी व चौगान येथील बाजार समितीला नुकतेच आकस्मिक भेट देवून धान खरेदी नियमानुसार सुरू आहे का, याची पाहणी केली. यावेळी त्यांनी धानाची ग्रेडीग व्यवस्थतीत करून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचे तसेच परराज्यातील व  व्यापाऱ्यांकडील धान स्‍थनिक बाजार समितीत खरेदी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी यावेळी बाजार समितीत धानविक्रीसाठी जमलेल्या शेतकऱ्यांशी मुक्तसंवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, नायब तहसिलदार योगेश शिंदे, मंडळ अधिकारी श्री. बोदे, संबंधीत सहाय्यक निबंधक, तलाठी, बाजार समितीचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाने राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावावर रुपये 700 बोनस जाहिर केला आहे. त्यामुळे परराज्यातील धान महाराष्ट्रात विक्री करून शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मागील महिण्यात तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नुकतेच संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याचेही निर्देश दिले होते.

0000

No comments:

Post a Comment