Search This Blog

Friday 18 December 2020

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा दौरा

 

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा दौरा

चंद्रपूर, दि. 18 डिसेंबर : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            दिनांक 20 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 11.45 वा. पालकमंत्री जनसंपर्क कार्यालय, ब्रम्हपुरी येथे नागपूरहून आगमन व राखीव. दुपारी 12 वा. स्वागत मंगल कार्यालय, ब्रम्हपुरी, येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 4 वाजता ब्रम्हपुरी येथून गडचिरोलीकडे प्रयाण.

            दिनांक 21 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 1.30 वाजता व्याहाड खुर्द, ता. सावली येथे गडचिरोलीहून आगमन व आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 6 वा. व्याहाड खुर्द येथून गडचिरोलीकडे प्रयाण.

            दिनांक 22 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10.45 वाजता श्रवन लॉन, सिंदेवाही येथे गडचिरोलीहून आगमन व आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता सिंदेवाही येथून नागपूरकडे प्रयाण.

0 0 0

No comments:

Post a Comment