Search This Blog

Monday 21 December 2020

गत 24 तासात 23 कोरोनामुक्त

 


गत 24 तासात 23 कोरोनामुक्त

17 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू

 

Ø  आतापर्यंत 20,832 बाधित झाले बरे

Ø  उपचार घेत असलेले बाधित 684

 

चंद्रपूर, दि. 21  डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 23 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 17 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.

            जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 21 हजार 869 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 20 हजार 832 झाली आहे. सध्या 684 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 65 हजार 24 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 41 हजार 151 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

            आज मृत झालेल्यांमध्ये अभ्यंकर वार्ड, वरोरा येथील 57 वर्षीय पुरूष व शेगाव, चंद्रपूर येथील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 353 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 326, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 16, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

            आज बाधीत आलेल्या 17 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील सात, चंद्रपूर तालुक्यातील एक, बल्लारपुर एक, ब्रम्हपुरी एक,  मूल पाच, कोरपना एक व इतर ठिकाणच्या एक रुग्णाचा समावेश आहे.

            नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

 

0000

No comments:

Post a Comment