Search This Blog

Saturday 30 April 2022

संकटावर मात करून जिल्हा विकासाच्या वाटेवर अग्रेसर – पालकमंत्री विजय वडेट्टीवार









 

संकटावर मात करून जिल्हा विकासाच्या वाटेवर अग्रेसर – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø महाराष्ट्र दिनी मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम

Ø शिक्षण विभागाकडून ‘शिक्षक संवाद दिन’ उपक्रमाची सुरवात

चंद्रपूर दि. 1 मे : आज संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा 62 वा वर्धापन दिन आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोमहाराष्ट्र हे सुरवातीपासूनच विविध क्षेत्रात अग्रणी असलेले राज्य आहे. गत दोन वर्षात कोरोनाच्या तसेच नैसर्गिक संकटावर मात करून राज्य सरकार विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. यात जिल्हा प्रशासनाचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

पोलिस मुख्यालय येथे महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे आदी उपस्थित होते.

आज महाराष्ट्र दिनासोबतच आंतरराष्ट्रीय कामगार दिन तसेच चंद्रपूर जिल्हा परिषदेचा स्थापना दिन आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीन विकास करणा-या ‘मिनी मंत्रालयाला’ सुध्दा आज 60 वर्षे पूर्ण होत आहे. आजपासून शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी लाभाच्या नवीन 105 लोकसेवा लागू करण्यात येत आहे. तसेच लोकशाही दिनाच्या धर्तीवर शालेय शिक्षण विभागामार्फत आजपासून ‘शिक्षक संवाद दिन’ सुरू करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

जिल्ह्यात मागील वर्षभरात आदिवासी बांधवांना 85 वैयक्तिक वनहक्कांचा लाभ देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत एकूण 4249 वनहक्क दावे मंजूर करण्यात आले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात 2658 विद्यार्थ्यांना 8 कोटी 85 लक्ष रुपयांचा लाभ देण्यात आला. शिष्यवृत्ती योजनेंतर्गत डीबीटी पोर्टलद्वारे 31 हजार विद्यार्थ्यांना 30 कोटी 38 लाख रुपये वाटप करण्यात आले आहे. तसेच ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात दोन याप्रमाणे 72 नवीन वसतीगृह सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ऐवढेच नाही तर राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 2200 कोटी रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील पोंभुर्णा, मूल, ब्रम्हपूरी, सिंदेवाही आणि सावली येथे महिलांना रोजगार देण्यासाठी गालिचा तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.  या योजनेंतर्गत सुमारे 13 कोटी 50 लक्ष  रुपयांची प्रशासकीय मान्यता जिल्हा खनीज प्रतिष्ठानमार्फत मिळाली आहे. माविमच्या वतीने तेजश्री योजनेंतर्गत जिल्ह्यातील अत्यंत गरीब महिलांना जवळपास 2 कोटी 97 लक्ष 80 हजार रुपयांची आर्थिक मदत, कर्ज स्वरुपात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात 2 मे 2020 रोजी पहिला कोरोना रुग्ण आढळला होता दोन वर्षानंतर 7 एप्रिल 2022 रोजी जिल्ह्यात एकही ॲक्टीव्ह रुग्ण नसल्याची नोंद झाली. या दोन वर्षात संपूर्ण जिल्हा प्रशासन, पोलिस, आरोग्य तसेच इतर विभागांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून कोरोनाच्या संकटाचा सामना केला. आजघडीला जिल्ह्यात कोरोनाचा

प्रादुर्भाव नसला तरी दिल्ली, मुंबई व इतर ठिकाणी पुन्हा कोरोनाचे रुग्ण असल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे पुन्हा ते दिवस येऊ नये, म्हणून नागरिकांनी मास्क वापरावे, असे आवाहन त्यांनी केले.

               महाराष्ट्र दिनी यांचा झाला सत्कार : उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल कुणकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार, हेड काँस्टेबल किसन राठोड यांना जाहीर झालेले पोलिस महासंचालक पदक पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले. तसेच आदर्श तलाठी म्हणून मौजा चौगान (ता. ब्रम्हपूरी) येथील सी.आर. ठाकरे, ग्रामपंचायत निवडणुकीत यशस्वी काम केल्याबद्दल अव्वल कारकून अजय वाटवे आणि मारुती वरभे, वन प्रकल्पांतर्गत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रवीण सातपुते यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या विविध योजनांच्या स्टॉलचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन तसेच पुस्तिकेचे विमोचर करण्यात आले.

०००००००


व्यसनमुक्त व्हा, आरोग्याची काळजी घ्या – पालकमंत्री वडेट्टीवार








 

व्यसनमुक्त व्हा, आरोग्याची काळजी घ्या – पालकमंत्री वडेट्टीवार

Ø सावली येथे आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन

चंद्रपूर दि. 30 एप्रिल : आरोग्य हीच आपली खरी धनसंपदा आहे. कोरोनाच्या महामारीत अनेकांनी आप्तस्वकीय गमावले. ही परिस्थती पुन्हा येऊ नये म्हणून राज्य शासनाने आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर भर दिला आहे. आपल्या भागात कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. कॅन्सरची सुरुवात व्यसनाने होते. हे व्यसनच आपल्याला मृत्युच्या दारात घेऊन जाते. त्यामुळे नागरिकांनो व्यसनमुक्त व्हा आणि स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या, असे कळकळीचे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

सावली येथे तालुकास्तरीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी सावली नगर पंचायतीच्या अध्यक्षा लता लाकडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर, तहसीलदार परिक्षित पाटील, गटविकास अधिकारी सुनिता मरसकोल्हे, दिनेश चिटकुनवार, नंदू नगरकर, डॉ. प्रकाश साठे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विलास वाघधरे आदी उपस्थित होते.

खर्रा, तंबाखु, बिडी, सिगारेट, मद्य आदी व्यसनापासून तरुणांनी दूर राहावे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, आपले आरोग्य सांभाळणे ही आपली जबाबदारी आहे. सद्यस्थितीत उन्हाचा पारा 46 अंशाच्या पार गेला आहे. पुढील महिन्यात हा पारा कितीपर्यंत जातो, माहित नाही. त्यामुळे उन्हापासून स्वत:चे संरक्षण करा. आज येथे उपचार करण्यासाठी सावंगी (मेघे) येथील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात येथे उपचार होणार आहे. सावली येथे 50 बेडचे हॉस्पीटल मंजूर झाले आहे. त्यासाठी निधी उपलब्ध झाला असून पुढील 2 महिन्यात त्याचे काम सुरू होईल. तसेच डायलिसीस मशीनसुध्दा येथे लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी 85 नवीन रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आल्या असून जिल्ह्यात सध्या 150 च्या आसपास शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने रुग्णवाहिका उपलब्ध असलेला चंद्रपूर हा एकमेव जिल्हा आहे. अत्याधुनिक उपकरणे व रुग्णांना उपचारासाठी सोयीसुविधा देण्याचे काम सुरू आहे. सावली तालुक्यातील 70 गावांमध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी 45 कोटी रुपये मंजूर झाले असून शुध्द पिण्याचे पाणी सर्व गावांत मिळणार आहे. एकही गाव यापासून वंचित राहणार नाही. कारण आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर पिण्याचे पाणी स्वच्छ असायला हवे, असेही पालकमंत्री म्हणाले.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते दिव्यांगाना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यात मोहन थोरात, सक्षम राऊत, भरत गोहणे, रोहन आवडे, पियुष मेश्राम, उत्तम धुर्वे आदींचा समावेश होता. तर अजय राऊत, रजत गेडाम, सविता रामटेके, गीता गोहने यांना गोल्डन ई – कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना बॅटरी ऑपरेटेड सायकल देण्यात आली. यावेळी पालकमंत्र्यांनी आरोग्य संदर्भात लावण्यात आलेल्या विविध स्टॉलची पाहणी केली.

नगर पंचायत येथे अग्निशमन वाहनाचे लोकार्पण : सावली नगर पंचायत येथे उपलब्ध झालेल्या अग्निशमन वाहनाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सदर वाहन 85 लक्ष रुपये खर्च करून सावली शहरासाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

०००००००

Friday 29 April 2022

क्रीडा संकुलाच्या विकासासाठी खनिज विकास निधीतून 8 कोटी देणार - पालकमंत्री विजय वडेट्टीवार


क्रीडा संकुलाच्या विकासासाठी खनिज विकास निधीतून 8 कोटी देणार

-पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर दि. 29 एप्रिल : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली रवी भवन, नागपूर येथे चंद्रपूर, जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत चंद्रपूर, जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली.

या ठिकाणी मुला-मुलींचे वसतिगृह, जिम्नॅशियम, बॉक्सिंग हॉल, प्रशासकीय इमारत, तलवारबाजी प्रशिक्षण केंद्र आदी नव्याने करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले. सद्यस्थितीत असलेल्या जुन्या इमारती, ज्यामध्ये प्रशासकीय इमारत, मुला-मुलींचे वसतिगृह, जिम्नॅशियम या सर्व निर्लेखित (डीमालिश) करून त्याठिकाणी मल्टीलेव्हल सुविधा उभाराव्यात. याकरीता शासनाच्या 7 कोटीच्या तरतूदी व्यतिरिक्त 8 कोटी रुपये खनिज विकास निधीतून देण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

या बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, विभागीय उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रिडा अधिकारी अविनाश पुंड प्रामुख्याने उपस्थित होते.

00000

अक्षय तृतीयाचे दिवशी बाल विवाहावर राहणार प्रशासनाची नजर

 

अक्षय तृतीयाचे दिवशी बाल विवाहावर राहणार प्रशासनाची नजर

Ø बालविवाहाची पुर्वकल्पना असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 29 एप्रिल:  “अक्षय तृतीया 3 मे 2022 रोजी असल्याने अनेक विवाह या दिवशी पार पाडले जातात व यामध्ये बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बाल विवाहाबाबत सर्व नागरिकांनी दक्ष राहावे व बाल विवाहाबाबत माहिती असल्यास जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनास तात्काळ माहिती द्यावी असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी दिले आहे.

कोरोना महामारीच्या काळात समाजात अल्पवयीन बालकांच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या बनत आहेत. एप्रिल 2021 ते मार्च 2022 या एका वर्षाच्या काळात राज्यातील वेगवेगळ्या भागात एकूण 1338 बालविवाह रोखण्यात यश आले आहे. तसेच अध्यक्ष, राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने अक्षयतृतीया हा विवाहास शुभ मुहूर्त असल्याने जास्तीत-जास्त विवाह या दिवशी आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकंदरीत बालविवाहाच्या परिस्थितीचा विचार लक्षात घेता बालविवाहास प्रतिबंध करण्याकरिता उपाययोजना करणे आवश्यक आहे. दि. 3 मे 2022 रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी, तालुकास्तरावरील बाल संरक्षण समिती, अध्यक्ष तथा तहसीलदार व आपल्या अधिनस्त असलेल्या यंत्रणांना बालविवाह होऊ देण्याबाबत तत्पर राहण्याच्या सूचना द्याव्यात.

बाल विकास प्रकल्प अधिकारी (शहरी व ग्रामीण), शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक तसेच गाव बाल संरक्षण समिती सदस्य, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, बालविवाह प्रतिबंध अधिकारी व  ग्रामसेवक यांनी दक्ष राहणे आवश्यक आहे.

लग्न कार्यात सेवा देणारे पुरोहित, मंगल कार्यालय व्यवस्थापक यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी बालविवाह थांबविण्याकरिता त्याची पूर्वकल्पना असल्यास संबंधित जिल्हा बाल संरक्षण कक्षा शी संपर्क साधावा. संपर्काकरिता 8999048202, 9011097192, 7020656496 अथवा जवळचे पोलीस स्टेशन, ग्रामसेवक व 24 तास सेवा पुरविणारे चाईल्ड लाईन 1098 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून बालविवाह रोखण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. अशा सूचना जिल्हा बाल संरक्षण समितीच्या अध्यक्षा तथा प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी दिले आहे.

00000

मनुष्यबळाची त्रेमासिक माहिती नमुना ईआर-1 मध्ये विहित मुदतीत सादर करा


मनुष्यबळाची त्रेमासिक माहिती नमुना ईआर-1 मध्ये विहित मुदतीत सादर करा

Ø 30 एप्रिल माहिती सादर करण्याची अंतिम तारीख

चंद्रपूर दि. 29 एप्रिल: चंद्रपूर जिल्हयातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापणांना, सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा, 1959 व नियम 1960 च्या कलम 5(1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील  शासकीय, निमशासकीय, तसेच कलम 5(2)अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापणांना त्यांच्या आस्थापणेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची  सांख्यिकी माहिती, प्रत्येक तिमाहीस, विषयांकित कायद्यातील तरतुदीनुसार विहीत नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे. असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी कळविले आहे.

त्यानुसार मार्च 2022 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ई-आर-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन,पहिला माळा, हॉल क्र.5/6  चंद्रपूर या कार्यालयाद्वारे ऑनलाईन पध्दतीने चालू असून, या सर्व आस्थापणांनाकडून 100 टक्के प्रतिसाद मिळणे अत्यंत आवश्यक आहे. या सर्व आस्थापणांना या कार्यालयाकडून यापूर्वीच युझरनेम व पासवर्ड देण्यांत आलेले आहेतच. त्याचा वापर करुन प्रत्येकाने या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करावा व आपली अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी.  मार्च 2022 अखेरचे तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2022 ही आहे. याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी व हे तिमाही विवरणपत्र विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने सादर करावे व कायद्याचे अनुपालन करून सहकार्य करावे. 

प्रत्येक आस्थापणेने आपला नोंदणी (Employer Profile) तपशील देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्ययावत करावा, यासंदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य अथवा  माहिती आवश्यक असल्यास ई-मेल आयडी chandrapurrojgar@gmail.com /asstdiremp.chandrapur@ese.maharashtra.gov.in यावर तसेच दुरध्वनी क्रमांक 07172-252295 वर आपला उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर सर्व आवश्यक तपशीलासह संपर्क साधल्यास, आपणांस या कार्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. भैय्याजी येरमे यांनी  प्रसिद्धी पत्रकान्वये सुचित केले आहे.

00000

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने कलम 37(1) व (3) लागू

 

जिल्ह्यात कायदा  सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने कलम 37(1)  (3) लागू

चंद्रपूर, दि. 29 एप्रिल: जिल्ह्यात राजकीय पक्ष, कामगार संघटनांचे आंदोलन, जातीय सामाजिक संघटनांकडून करण्यात येणारे आंदोलन, निदर्शने, मोर्चा, अतिमहत्वाचे ्यक्तीचा दौरा तसेच दि. 3 मे रोजी रमजान ईद हा सण असल्यामुळे त्यानिमित्याने विविध कार्यक्रम, आंदोलने, निदर्शने  व  यात्रा  कार्यक्रमामुळे  कायदा    सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यात दि. 1 मे ते 15 मे 2022 चे रात्री 12 ाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)  (3) लागू करण्यात येत आहे. असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी  विद्युत वरखेडकर यांनी निर्गमित केले आहे.

या कालावधीत कायदा  सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने  िवक्षित कृतींना मनाई करणे  अव्यवस्थेला प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. तरी, सदर कालावधीत कोणतीही ्यक्ती शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी ापरता येईल अशी इतर कोणतीही स्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, ्यक्तीच्या आकृत्या, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, ाद्य ाजविणे, तसेच यामुळे सभ्यता आणि नीतिमत्ता यास धोका पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे किंवा आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा स्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे, त्याचा जनतेत प्रसार करणे इत्यादीस प्रतिबंध करण्यात येत आहे.

तहसिलदार तथा, तालुका दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणीही सभा, मोर्चा, उत्सव  मिरवणुका काढू नये. पाच किंवा त्यापेक्षा जास्त ्यक्ती सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. याची नोंद घ्यावी. सदर आदेश दि. 1 मे  ते 15 मे 2022 चे रात्री 12 ाजेपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्राकरीता लागू राहील. असे प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

00000

Thursday 28 April 2022

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 


पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि. 29 एप्रिल रोजी चंद्रपूर येथील विविध विषयांबाबत नागपूर येथे बैठक, शनिवार, दि. 30 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता  ग्रामीण रुग्णालय, सावली येथे आगमन व आरोग्य शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, दिव्यांग प्रमाणपत्र कार्यक्रमास उपस्थिती, तसेच जिल्हा समाज कल्याण विभाग चंद्रपूरच्या वतीने दिव्यांगांना तीन चाकी सायकल वितरण कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 12 वाजता सावली शहरातील रस्त्यांचे भूमिपूजन व अग्निशमन वाहनाचे लोकार्पण सोहळ्यास उपस्थित. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. दुपारी 2:15 वाजता व्याहाड बुज, ता. सावली येथे आगमन व सांत्वनपर भेट. दुपारी 2.30 वाजता कापसी ता. सावली येथे आगमन, सदिच्छा व सांत्वनपर भेट. दुपारी 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन. सायंकाळी 5 वाजता विठ्ठल रखुमाई सभागृह, ब्रह्मपुरी येथे समाज कल्याण विभाग, चंद्रपूरच्या वतीने दिव्यांगांना तीन चाकी सायकल वितरण कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 9:30 वाजता हिराई विश्रामगृहृ, ऊर्जानगर, चंद्रपूर येथे आगमन व मुक्काम.

रविवार दि. 1 मे 2022 रोजी, सकाळी 8 वाजता पोलीस मैदान, चंद्रपूर येथे महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9:30 वाजता चंद्रपूर येथून चातगाव ता. धानोरा जि. गडचिरोलीकडे प्रयाण. सायंकाळी 4:30 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन. सायंकाळी 5 वाजता सिंदेवाही शहरातील विविध विकास कामाचे भूमिपूजन व कार्यक्रमास उपस्थिती. (सिंदेवाही शहरातील मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण, सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन, विश्रामगृहाच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम भुमिपुजन, क्रीडा संकुलाचे भूमिपूजन , समाज कल्याण विभाग, चंद्रपूरच्या वतीने दिव्यांगांना तीन चाकी सायकल वितरण कार्यक्रम, स्मशानभूमी परिसरातील विकासकामाचे लोकार्पण तसेच आठवडी बाजार विविध विकास कामांचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती). रात्री 8 वाजता सिंदेवाही येथून नागपूरकडे प्रयाण.

०००००००

30 एप्रिल रोजी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षा

 

30 एप्रिल रोजी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षा

Ø प्रवेशपत्रावर संबंधित मुख्याध्यापकाची स्वाक्षरी आवश्यक

Ø स्वाक्षरी नसल्यास प्रतिज्ञापत्र भरुन देणे अनिवार्य

चंद्रपूर, दि. 21 एप्रिल :  जवाहर  नवोदय  विद्यालय, तळोधी (बा.) द्वारा वर्ग 6 वी, सन 2022-23 सत्राकरीता 30 एप्रिल 2022 रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेकरिता ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरलेले आहे, अशा विद्यार्थ्यांनी  https://cbseitms.nic.in या वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करावीत व डाऊनलोड केलेल्या प्रवेशपत्रावर संबंधित मुख्याध्यापकाची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. प्रवेश पत्रावर स्वाक्षरी नसल्यास विद्यार्थ्यांच्या पालकांना व विद्यार्थ्याला प्रतिज्ञापत्र भरून द्यावे लागेल. त्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेला बसता येणार नाही.

प्रतिज्ञापत्राचा नमुना परिक्षाकेंद्रावर उपलब्ध राहील. परीक्षा झाल्यानंतर सदर प्रवेशपत्र परीक्षा केंद्रात जमा करावे लागेल. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे जवाहर नवोदय विद्यालय तळोधी (बा.)च्या प्राचार्या मीना मणी यांनी कळविले आहे.

०००००

राज्यपालांच्या हस्ते चंद्रपूर जिल्ह्यातील 4 स्काऊट गाईडला पुरस्कार


 राज्यपालांच्या हस्ते चंद्रपूर जिल्ह्यातील 4 स्काऊट गाईडला पुरस्कार

चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : महाराष्ट्र राज्य, भारत स्काऊट आणि गाईड, मुंबई यांच्यावतीने सन 2018-19 व 2019-20 या दोन वर्षात राज्य पुरस्कार प्राप्त स्काऊट गाईड यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राज्य पुरस्कार प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. दि.26 एप्रिल 2022 रोजी स्काऊट गाईड पवेलियन, शिवाजी पार्क, दादर (प.) मुंबई येथे हा सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा महाराष्ट्र राज्य, भारत स्काऊट आणि गाईडचे अध्यक्ष सुनील केदार, राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्याचे मुख्य आयुक्त तथा क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यातून राज्य पुरस्कार उत्तीर्ण झालेल्या स्काऊट गाईडपैकी प्रतिनिधी स्वरूपात प्रत्येक जिल्ह्यातून 2 स्काऊट 2 गाईड उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने उत्तीर्ण स्काऊट 25-18, गाईड 28-28 अशी एकूण 43 स्काउट व 56 गाईड यांचे नेतृत्व सावली, रमाबाई आंबेडकर विद्यालयाचे स्काऊट दिशांत गुप्तराज ढेंगळे, जि. प. हायस्कूल चेकनिंबाळा येथील सम्यक सत्यविजय वाघमारे, प्रियदर्शनी कन्या विद्यालय, घुगुस येथील गाईड अश्लेषा विभिषण फुसाटे तर भवानजीभाई चव्हाण हायस्कूल चंद्रपूर येथील हर्षा दत्तात्रय रायपुरे तसेच स्काऊट गाईड यांचे नेतृत्व भवानजीभाई चव्हाण हायस्कूल, चंद्रपूरच्या गाईड कॅप्टन तथा कॉन्टीजन लीडर रंजना किन्नाके यांनी केले.

सर्व स्काऊट गाईड यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राज्य पुरस्कार प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील स्काऊट गाईड यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार मिळणे हे चंद्रपूर जिल्ह्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. पुरस्कार प्राप्त सर्व स्काऊट गाईड यांचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) दिपेन्द्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण तसेच चंद्रपूर भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयातील जिल्हा संघटक दीपा मडावी, नीता आगलावे, अर्पित कडू, अरुणा ठाकरे, वसंत विहीरघरे यांनी अभिनंदन केले आहे.

००००००