जवाहर नवोदय विद्यालयातून “परीक्षा पे चर्चा”
कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण
Ø 517 विद्यार्थी व 45 कर्मचाऱ्यांचा सहभाग
चंद्रपूर, दि. 4 एप्रिल: “परिक्षा पे चर्चा” कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जवाहर नवोदय विदयालय, तळोधी येथील शाळेच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आले होते. नवोदय विदयालयाने या कार्यक्रमासाठी नोडल स्कूल म्हणून कार्य केले. जवाहर नवोदय विद्यालय तळोधीसह, विश्वज्योती कॉन्व्हेंट शाळेतील विद्यार्थी, कर्मचारी व पालक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे, शाळेतील बहुउद्देशीय हॉलमध्ये प्रदर्शित स्क्रीनवर सुमारे 517 विद्यार्थी व 45 कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणात सहभाग नोंदविला होता. यावेळी जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्या मीना मणी, विश्वज्योती कॉन्व्हेंटचे प्राचार्य, शिक्षकवर्ग, पालक, तालुक्यातील पत्रकार, प्रतिनिधी उपस्थित होते.
तणावमुक्त आणि उत्साहाने परीक्षा देण्यावर या कार्यक्रमाचा भर होता. परीक्षा एक प्रकारचा उत्सव असून तिला संधी बनवण्यासाठी पंतप्रधानांनी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मौल्यवान टिप्स देऊन त्यांचे मार्गदर्शन केले. त्यांनी एकाग्रतेच्या गरजेवर भर दिला आणि तरुणांना ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रॉजेक्ट करण्यासोबतच आपल्या अंतरमनात डोकावण्याचा सल्लाही दिला. पालकांनी त्यांच्या मुलांवर त्यांच्या अपेक्षांचे ओझे टाकू नये. ज्या त्यांना त्यांच्या मुलांद्वारे पूर्ण करायच्या आहेत. त्यासोबतच मा. पंतप्रधानांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 वर प्रकाश टाकला आणि ते नवीन भारत, आत्मनिर्भर भारत आणि कुशल भारताच्या गरजा कशा पूर्ण करता येणार आहेत, हे सुद्धा त्यांनी कार्यक्रमा दरम्यान सांगितले. स्पर्धा या उत्कृष्टतेचा मार्ग कसा मोकळा करतात याकडे त्यांनी लक्ष वेधले. या कार्यक्रमाचे जिल्हाभरातील विविध शाळांमध्ये थेट प्रक्षेपण करण्यात आले.
यामध्ये जिल्हयातील जेसस स्कुल, ट्विंकल इंग्लिश स्कुल, एकलव्य स्कुल, केंद्रीय विद्यालय, सेंट मॅरीस स्कुल, विद्या निकेतन स्कुल, फेरीलँड स्कुल व मॅकरुन स्टुडंट अकॅडमी या शाळा थेट प्रक्षेपणात सहभागी झाल्या होत्या.
00000
Sri Lanka mein adhi raat ko poore Cabinet ne diya Isteefa
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete