Search This Blog

Thursday, 21 April 2022

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 


पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर, दि. 21 एप्रिल : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि. 21 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 5.30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन. सायंकाळी 6 वाजता  एन.डी. हॉटेल, चंद्रपूर येथे लोकमत वृत्तपत्राच्यावतीने आयोजित सुवर्ण महोत्सवानिमित्ताने स्नेहमिलन कार्यक्रमास उपस्थित. सायंकाळी 6.45 वाजता प्रिन्स सेलिब्रेशन लॉन दाताळा रोड, चंद्रपूर येथे विवाह सोहळ्यास उपस्थित. रात्री 8.30 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

शनिवार दि. 23 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 वाजता सिंदेवाही येथे आगमन व आजादी का अमृत महोत्सवानिमित्त ग्रामीण रुग्णालय, सिंदेवाहीकडून आयोजित महाआरोग्य मेळाव्यास उपस्थित. सकाळी 11:30 वाजता तहसील कार्यालय, सिंदेवाही येथे विकास कामांबाबत अधिकाऱ्यांची आढावा बैठक. दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे पदाधिकारी व नगरसेवक यांच्यासोबत चर्चा. दुपारी 1.30 ते 2 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे सावली, सिंदेवाही व ब्रह्मपुरी तालुक्यात हिंस्र वन्यप्राण्यांमुळे नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्याबाबत उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागाची आढावा बैठक. सायंकाळी 4 वाजता वासेरा ता. सिंदेवाही येथे आगमन व बौद्ध विहाराचे लोकार्पण सोहळ्यास उपस्थित. सायंकाळी 5.30 वाजता वासेरा ता. सिंदेवाही येथून गडचिरोली कडे प्रयाण.

रविवार, दि. 24 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 वाजता सावली येथे आगमन व सावली येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11:30 वाजता सावली येथून चंद्रपूरकडे प्रयाण. दुपारी 12.15 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 12.30 वाजता मातोश्री सभागृह, चंद्रपूर येथे सोनार समाजाच्या वधू-वर मेळाव्यास उपस्थित. सायंकाळी 4 वाजता नकोडा (घुग्गुस) येथे आगमन व एसीसी विजय क्रांती कामगार युनियनच्या वतीने आयोजित कामगार मेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी 6.30 वाजता राधाकृष्ण सभागृहासमोर ऊर्जानगर रोड, चंद्रपूर येथे आगमन व तुळशीनगर विकास समितीच्या 4 थ्या वर्धापन दिवस कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 7:30 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

सोमवार दि. 25 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, चिमूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11.35 वाजता काजळसर ता. चिमूर येथे आगमन व विवाह सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 1 वाजता नेरी ता.चिमूर येथे आगमन व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. दुपारी 3 वाजता चिमूर येथे आगमन व ग्रामगीता महाविद्यालयास भेट. सायंकाळी 4.30 वाजता चिमुर येथून नागपूरकडे प्रयाण.

00000

No comments:

Post a Comment