Search This Blog

Wednesday, 20 April 2022

आयटीआय उत्तीर्ण शिकाऊ उमेदवारांकरीता भरती मेळाव्याचे आयोजन

 


आयटीआय उत्तीर्ण शिकाऊ उमेदवारांकरीता भरती मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूरदि. 20 एप्रिल : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आय.टी.आय उत्तीर्ण उमेदवारांकरीता कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचंद्रपुर येथे 21 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय अप्रेंटीसशीपशिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यामध्ये चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहे.

फिटरडिझेल मेकॅनिकमोटर मेकॅनिक,टर्नरमशिनिस्टवेल्डरइलेक्ट्रिशियनटूल अँड डाय मेकरप्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटरट्रॅक्टर मेकॅनिकसिओई ऑटोमोबाईलपेंटरइलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिककार्पेंटरशीट मेटल वर्करबॉयलर अटेंडंटस्टेनोआर.ए.सीफ्रूट प्रोडक्शनॲडव्हान्स मशीन स्टुल आदी ट्रेड व्यवसायातील उमेदवारांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार तथा शिकाऊ उमेदवारांसाठी जागा उपलब्ध आहेत.

या भरती मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी आधार कार्डपॅन कार्डसंबंधित ट्रेड प्रमाणपत्र तथा शालेय प्रमाणपत्रासह  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कौशल्यम सभागृहात दि. 21 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार श्रीमती प्र.ही. दहाटे यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment