Search This Blog

Tuesday, 26 April 2022

28 एप्रिल रोजी जातवैधता प्रमाणपत्रासंबंधी मार्गदर्शन वेबिनारचे आयोजन

 


28 एप्रिल रोजी जातवैधता प्रमाणपत्रासंबंधी मार्गदर्शन वेबिनारचे आयोजन

Ø विद्यार्थी तसेच इतर उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 26 एप्रिल : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूरद्वारा जात प्रमाणपत्र पडताळणी बाबत ऑनलाइन वेबिनारद्वारे दि. 28 एप्रिल 2022 रोजी दुपारी 3 वाजता मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यावेळी मार्गदर्शक म्हणून समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर हे उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच इतर उमेदवारांनी या मोफत वेबिनारचा लाभ घ्यावा. यासाठी  https://meet.google.com/uic-hmnp-reu या गूगलमीट लिंकवरून ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूर येथे दि. 31 मार्च 2021 अखेर 4372 प्रकरणे व सन 2021-22 मधील प्राप्त 8880 प्रकरणे असे एकूण 13,252 प्रकरणांपैकी सन 2021-22 या वर्षात समितीने एकूण 12,672 प्रकरणे निकाली काढली आहेत. निकाली काढलेल्या प्रकरणांमध्ये 11,360 उमेदवारांना समितीने वैधता प्रमाणपत्र निर्गमित केले असून 71 प्रकरणांमध्ये उमेदवारांचा जातीदावा अवैध ठरविलेला आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचे औचित्य साधून सुरु केलेल्या समता सप्ताहामध्ये समितीकडून 358 प्रकरणे निकाली काढून उमेदवारांना वैधता प्रमाणपत्र निर्गमित केले आहे. सद्यस्थितीत समितीकडे 480 प्रकरणे प्रलंबित असून त्यामध्ये 364 त्रुटीची प्रकरणे आहेत. त्रुटीच्या प्रकरणामध्ये शैक्षणिक 344, सेवेची 8, निवडणुकीची 11 व इतर 1 अशा प्रकरणांचा समावेश आहे.

या प्रकरणामध्ये उमेदवारांना त्रुटी पूर्तता करण्याकरिता वारंवार ई-मेल, मोबाइल संदेश तसेच पत्रव्यवहार इत्यादी प्रकारे कळविण्यात येत आहे. परंतु उमेदवारांनी त्रुटीची पूर्तता न केल्यास ही प्रकरणे समितीला बंद करावी लागतात. त्यामुळे अशा उमेदवारांनी तातडीने त्रुटीची पूर्तता करावी.

दि. 28 एप्रिल 2022 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित मोफत वेबिनारमध्ये उमेदवारांनी दिलेल्या गूगल मीट लिंक वरून ऑनलाईन उपस्थित राहून अर्ज कसा करावा ? त्रुटीची पूर्तता कशी करावी ? आदीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी, जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच इतर उमेदवारांनी या मोफत वेबिनारचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment