कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राद्वारे प्रशिक्षण सत्राचा उद्घाटन समारंभ
चंद्रपूर दि. 5 एप्रिल : आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राद्वारे पहिल्या प्रशिक्षण सत्राचा उद्घाटन समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे, कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणुन जिल्हा कोषागार अधिकारी प्रिती खरतुडे आणि प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन केद्रांतील पहिल्या प्रशिक्षण सत्रातील उमेदवार उपस्थित होते.
यावेळी, श्रीमती खरतुडे उमेदवारांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, स्वतःची ध्येये ठरवून पुढील वाटचाल केल्यास यशाची पायरी गाठणे शक्य होते. वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास, प्रयत्नांचे सातत्य, कठोर परिश्रम व समोरचे ध्येय निश्चित करूनच यश मिळविता येते. यावेळी भाग्यश्री वाघमारे यांनी केंद्राबद्दल सविस्तर माहिती देऊन उपस्थित उमेदवारांना मोलाचे मार्गदर्शन केले. तत्पुर्वी, कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी विजय गराटे यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक श्रीमती कन्नाके यांनी मानले.
00000
No comments:
Post a Comment