महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा- 2021,
परीक्षा उपकेंद्र परिसरात 144 कलम लागू
चंद्रपूर दि. 1 एप्रिल: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा-2021, चंद्रपूर मुख्यालयाच्या ठिकाणी दि. 3 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान एकुण 20 उपकेंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा उपकेंद्राच्या ठिकाणी सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे.
परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसर व क्षेत्रातंर्गत परीक्षार्थी व्यतिरिक्त दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाहीत. सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नियमित व रोजच्या वाहतुकी व्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील. परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर क्षेत्रांतर्गत परीक्षेदरम्यान झेरॉक्स, फॅक्स, एसटीडी बूथ, पेजर, मोबाईल फोन, ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणत्याही कम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील.
या परीक्षा उपकेंद्रांना लागू राहतील आदेश:
विद्या विहार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, तुकुम, चंद्रपूर, रफी अहमद किदवाई हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, घुटकाळा वार्ड, सरदार पटेल महाविद्यालय गंजवार्ड, सेंट मायकेल इंग्लिश स्कूल नगीनाबाग, श्री. साई पॉलीटेक्निक नागपूर रोड, नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर, मुरलीधर बागला कॉन्व्हेंट हायस्कूल बाबुपेठ, जुबली हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर, लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, मातोश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आर्ट, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय तुकुम,एफ.ई.एस. गर्ल्स कॉलेज चंद्रपूर, हिंदी सिटी उच्च माध्यमिक शाळा आझाद गार्डनजवळ चंद्रपूर, लोकमान्य टिळक कन्या विद्यालय, एफ.ई.एस गर्ल्स हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, डॉ.आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चंद्रपूर, चांदा पब्लिक स्कूल, बि.जे.एम. कार्मल ॲकॅडमी तुकुम, राजीव गांधी महाविद्यालय मुल रोड, तसेच भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय मुल रोड, चंद्रपूर या परीक्षा उपकेंद्रांना सदर आदेश लागू राहतील.
सदर आदेश चंद्रपूर मुख्यालयातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा-2021 मधील परीक्षा उपकेंद्रांवर दि. 3 एप्रिल 2022 रोजीचे सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अंमलात राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती व इसम प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.
00000
No comments:
Post a Comment