Search This Blog

Monday, 4 April 2022

अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष श्री. अभ्यंकर व अल्पसंख्यांक आयोगाचे सचिव शशांक बर्वे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा


 अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष श्री. अभ्यंकर व

अल्पसंख्यांक आयोगाचे सचिव शशांक बर्वे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर, दि. 4 एप्रिल: महाराष्ट्र राज्य, अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर व अल्पसंख्यांक आयोगाचे सचिव शशांक बर्वे 7 व 8 एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि. 7 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 5.45 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन, राखीव व मुक्काम.

शुक्रवार, दि. 8 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 ते 11 वाजता अल्पसंख्यांक व अनुसूचित जाती जमातीच्या संघटना व व्यक्तींची निवेदने स्विकारुन चर्चा. सकाळी 11 ते 1 वाजता जिल्हा परिषद, चंद्रपूर येथील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदेतील सर्व खातेप्रमुख यांच्यासोबत अनुसूचित जाती-जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा. दुपारी 1 ते 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मा. पंतप्रधानांचा पंधरा कलमी कार्यक्रम आणि केंद्र व राज्य शासनांच्या योजनांचा संबंधित जबाबदार अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा. दुपारी 2 ते 3 वाजता जिल्हा परिषद, चंद्रपूरच्या सभागृहात आदिवासी प्रकल्प अधिकारी यांच्यासोबत आदिवासी विभागाकडून अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेबाबत आढावा बैठक. दुपारी 3 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

00000

No comments:

Post a Comment