Search This Blog

Friday 30 November 2018

बल्लारपूरला महाराष्ट्रातील सर्वाधिक विकसित व सुंदर शहर बनवा : ना. सुधीर मुनगंटीवार


चंद्रपूर दि 30 :- महाराष्ट्रातील अभिनव उपक्रम व वेगवेगळ्या पायाभूत सुविधा बल्लारपूर शहर व आसपास उभ्या राहात आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये बल्लारपूर शहराची ओळख महाराष्ट्रातील सर्वाधिक विकसित शहर अशी झाली पाहिजे. यासाठी प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्‍न  करणे गरजेचे आहे. प्रत्येक वार्डाला स्वच्छ,सुंदर आणि नागरिकांना सुविधा पुरविणारा परिसर बनविण्‍याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी आवश्‍यक निधीची तरतूद करण्‍यात येईल. हे शहर राज्‍यातील सर्वाधिक विकसित व सुंदर शहर म्‍हणून लौकीकप्राप्‍त ठरावे हे आपले स्‍वप्‍न आहे. नागरिकांच्‍या सहकार्याच्‍या व प्रेमाच्‍या बळावर हे स्‍वप्‍न निश्‍चीतपणे पूर्ण होईलअसा विश्‍वास राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज व्‍यक्‍त केला.
बल्लारपूर येथील पेपर मिल काटा गेट येथे रस्त्याच्या विभाजकाच्या सौंदर्यीकरणाचे भूमीपूजन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेलजि.प. अध्यक्ष देवराव भोंगळेबल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मान. प. उपाध्‍यक्षा सौ. मिना चौधरीबल्लारपूरचे नपचे मुख्याधिकारी बिपीन मुग्धाअरूण वाघमारेआदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.
बल्लारपूर शहरानजीक अनेक मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. बॉटनीकल गॉर्डनसैनिकी शाळाअद्ययावत क्रीडा संकुलबसस्थानक उभे राहत आहे. रेल्वे स्थानकाचे नाव देशाच्या नकाशावर झळकले आहे. मात्र हे सर्व होत असताना बल्लारपूर शहर देखील स्वच्छसुंदर आणि देखणे झाले पाहिजेत्यामुळे राज्य शासनाच्या सर्व योजनांची मदत घ्या. तसेच आपल्या वार्डाला आवश्यक सुविधांनी परिपूर्ण करण्यासाठी योग्य प्रस्ताव सादर कराचांगल्या कल्पक प्रस्तावासाठी आवश्‍यक निधी उपलब्‍ध करण्‍यात येईलअशी घोषणा त्यांनी केली.
            यावेळी बल्लारपूर नगर परिषदेचे अरूण वाघमारेयेलय्या दासरफस्वामी रायबरनरेणुका दुधेकांता ढोकेभावना गेडाम,मिना चौधरीमहेंद्र ढोकेआशा संगीडवारस्वर्णा भटारकरपुनम मोडकसुमन सिन्हावैशाली जोशी आदींची उपस्थिती होती.
000

वृक्षलागवडीसाठी गायत्री पारिवारासोबत राज्य सरकार सामंज्यस्य करार करणार : ना. मुनगंटीवार


चंद्रपूर जिल्ह्यातील पंच-सरपंच मेळाव्याला मार्गदर्शन
चंद्रपूर दि 30 नोव्हेंबर :- गायत्री परिवाराने महाराष्ट्रमध्ये वृक्ष लागवड मोहीमेत यापूर्वीही मोठे योगदान दिले आहे. यापुढेही गायत्री परिवाराचे वृक्ष लागवडीच्या कामांमध्ये वनविभागामार्फत सहकार्य घेतले जाईल. त्यासाठी लवकरच परस्पर सामंजस्य करार करण्यात येईलअसे प्रतिपादन राज्याचे वित्तनियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केली. चंद्रपूर जिल्ह्यातील पंच-सरपंच मेळाव्याचे गायत्री परिवाराने आयोजन केले होते. या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते.
हरिद्वार येथील शांती कुंज गायत्री परिवार मार्फत चंद्रपूर मध्ये दाताळा रोड येथे जिल्ह्यातील पंच- सरपंच व युवा संगोष्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळेगायत्री परिवाराचे हरिद्वार येथील योगेंद्र गिरीयोगीराज बल्कीसुनील शर्माभास्कर पेरे पाटील,पर्यावरण तज्ञ सुरेश राठीमनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडेनगरसेवक सुभाष कासनगोट्टूवारनामदेव डाहुले आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पंच आणि सरपंच यांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबोधित केले. ते म्हणालेदेशाला बळकट करण्यासाठी प्रत्येक गावाचे दायित्व असले पाहिजे. प्रत्येकाला आपल्या देशात रामराज्य आले पाहिजे असे वाटते. मात्र यासाठी प्रत्येक गावाने नव्हेतर प्रत्येक गावातीलप्रत्येक व्यक्तीने आपले दायित्व देणे महत्त्वाचे आहे. मानवाच्या जन्मात आल्यानंतर त्याचे जगणे त्यागी वृत्तीचे असले पाहिजे. हा देश त्यागाची भूमी म्हणून ओळखली जाते. स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगण्याची जी संकल्पना गायत्री परिवाराने समाजात रुजविली आहेत्या संकल्पनेचा त्यांनी यावेळी गौरव केला.
000

शिक्षणातून नवनवीन समाजोपयोगी शोध पुढे आले पाहिजे : ना.मुनगंटीवार




पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विज्ञान प्रदर्शनीचा शुभारंभ

 चंद्रपूर दि.30 नोव्हेंबर : शिक्षण घेणे म्हणजे पुस्तकी ज्ञान लादने नव्हे. शिक्षण म्हणजे अंतरात्म्याच्या विकासाला चालना मिळणे होय. शिक्षणातून समाजाला काहीतरी देता आले पाहिजे. शिक्षणातून नवनवीन समाज उपयोगी शोध पुढे आले पाहिजे. त्यासाठी नव्या पिढीला तयार करा, असे आवाहन राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 
          बल्लारपूर येथे साईबाबा न्याज्ञपीठ कॉन्व्हेंट येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेलजिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळेबल्लारपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष हरिष शर्मासभापती गोविंद पोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकरपोंभूर्णा सभापती अलका आत्रामजिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवारमुख्याधिकारी बिपिन मुग्धागटविकास अधिकारी श्वेता यादवप्राचार्य किरण सिंग चंदेल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
          तालुक्यातील सर्व शाळांचे शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधतांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जापान मधील शिक्षण पद्धतीचा दाखला दिला. जापानमध्ये शिक्षणात प्रयोगशिलतेवर अधिक भर दिला जातो. ते म्हणालेशिक्षण म्हणजे केवळ पुस्तक वाचणे नव्हे. शिक्षण हे जबरदस्तीने ज्ञान वाटणे किंवा घेणे नव्हे. शिक्षण म्हणजे अंतरात्म्या सोबतचा संवाद हवाय. अंतरात्मा विकसित करणे शिक्षणाचे प्रथम ध्येय असले पाहिजे. विद्यार्थ्यांना न्यूटनएडीसन यांचा जन्म कधी झालान्यूटन कसा दिसत होतायांचा मृत्यू कधी झालाहे एकदाचे नाही शिकवले तरी चालेल. मात्र न्यूटन तुमच्या शाळेमध्ये कसा तयार होईल तुमच्या शाळेमध्ये विधार्थी कसा प्रयोग करायला शिकेल याबाबतच्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
           बल्लारपूर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेले नवनवीन प्रयोग लक्ष वेधणारे असल्याचे सांगून त्यांनी मुलांच्या वैज्ञानिक व सांस्कृतिक कलागुणांचे कौतुक केले. विज्ञान प्रदर्शनी ही दरवर्षीची खानापूर्ती होऊ नये. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्रामध्ये त्याच्यामध्ये शोधक वृत्ती वाढेल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनन त्यांनी यावेळी उपस्थित शिक्षकांना केले.
         केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी बांबूपासून इंधन बनविण्याचे आवाहन केलेले आहे. उद्या विमाने बांबूपासून तयार होणाऱ्या इंधनावर उडायला लागली तर मोठा बदल घडून येईल. प्रयोगामध्ये अशी ताकद असली पाहिजे. एखाद्या प्रयोगातून समाजाच्या सार्वजनिक उन्नतीला हातभार लागला पाहिजे. अशा प्रयोगांमध्ये विद्यार्थ्यांची अभिरूची वाढवाअसे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
         या कार्यक्रमाला पोंभुर्णा तालुक्यातील नागरिकही मोठ्या संख्येने होते. पोंभुर्णा येथील एमआयडीसीला ना.सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच मंजूरी दिल्याबद्दल त्यांचे पोंभुर्णा तालुक्यातर्फे नागरिकांनी स्वागत केले. यावेळी साईबाबा ज्ञानपीठ कॉन्हेंटच्या मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमाची देखील सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभा मडावी यांनी केले. तर संचालन शिक्षिका श्रीमती मुक्ता खुरानाविद्यार्थिनी साक्षी बनकरखुशबू घोडमोरे यांनी केले.
                                                                                0000

Thursday 29 November 2018

जिल्हयातील बाल विवाह प्रतिबंधासाठी समाजातील सर्व स्तरातील मान्यवरांनी पुढे यावे - जिल्हाधिकारी


चंद्रपूर, दि.29 नोव्हेंबर  राज्यामध्ये बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी अनेक कायदे करण्यात आले आहे. तथापि, काही सामाजिक चालिरीती व अशिक्षित कुटुंबामध्ये अनेकवेळा हा प्रकार सामाजिक स्तरावर रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनासोबतच सामान्य जनतेचा संबंध येणा-या समाजातील मान्यवरांनी देखील पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी विविध समाजातील धर्मगुरुंची तसेच या क्षेत्रात काम करणा-या सर्व शासकीय यंत्रणांची बैठक घेण्यात आली.
            या बैठकीमध्ये बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अंतर्गत जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणेने कार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. सोबतच मुले, मुली यांचा सर्वाधिक संबंध येणा-या शिक्षण विभागाने शिक्षकांनी यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. ही समस्या शैक्षणिक, सामाजिक सुधारणांची असल्यामुळे मागासलेल्या वसाहतीमध्ये काम करणा-या सर्व यंत्रणांनी यासाठी प्रयत्न करावे, असेही त्यांनी सांगितले. सर्व यंत्रणांना या संदर्भातील कायदे व अंमलबजावणीची आणीव असावी यासाठी प्रशिक्षण मोठया प्रमाणात घेण्यात यावे, अशी सूचना जिल्हाधिका-यांनी यावेळी केली.
            या बैठकीला महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे व अन्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
                                                                        0000  

भारत सरकारच्‍या फिल्‍ड आउटरीच ब्‍यूरोचे आयोजन


निरोगी जीवनासाठी स्‍वच्‍छता आवश्‍यक – महापौर अंजली घोटेकर

चंद्रपूर दि. 29 नोव्‍हेंबर 2018: निरोगी जीवनाकरिता व्‍यक्तिगत आणि सार्वजनिक स्‍तरावर स्‍वच्‍छतेचे पालन करणे गरजेचे आहे. भारत सरकारच्‍या स्‍वच्‍छता अभियानात सहभागी होवून स्‍वच्‍छतेचा संदेश घराघरात पोहचविण्‍याकरिता चंद्रपूर महानगरपालिकेने अनेक पाऊले उचलली आहेत. या अभियानात शहर आणि गावातील लोकांचा सहभाग आणि सहकार्य अपेक्षित आहेअसे प्रतिपादन चंद्रपूर महानगरपालिकेच्‍या महापौर श्रीमती अंजलीताई घोटेकर यांनी केले. त्‍या भारत सरकारच्‍या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत फिल्‍ड आउटरीच ब्‍यूरोच्‍या वतीने सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालयचंद्रपूर येथे आयोजित स्‍वच्‍छ भारत अभियान कार्यक्रमात अध्‍यक्ष म्‍हणून बोलत होत्‍या. यावेळी मंचावर चंद्रपूर महानगर पालिकेचे अपर आयुक्‍त भालचंद्र बेहरेमहात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयवर्धाचे जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगेमनपा चे मानव संसाधन अधिकारी बंडुपंत हिरवेनगरसेवक ज्‍योती गेडामफिल्‍ड आउटरीच ब्‍यूरोचे अधिकारी बी. पी. रामटेके उपस्थित होते.
या व्‍याख्‍यानात बी.एस.मिरगे यांनी स्‍वच्‍छतेचे महत्‍व सांगून स्‍वच्‍छता आणि आरोग्‍याचा जवळचा संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. त्‍यांनी स्‍वच्‍छतेविषयी राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्‍या ग्रामगीतेतील अध्‍यायांचा तसेच संत गाडगे महाराज यांच्‍या संदेशांचा उल्‍लेख केला. मनपाचे  अपर आयुक्‍त भालचंद्र बेहरे म्‍हणाले कीस्‍वच्‍छ भारत अभियान हे भारत सरकारचे महत्‍वाचे अभियान आहे. यात सर्व सरकारी आणि इतर संस्‍थांनी सहभागी होऊन स्‍वच्‍छतेचा संदेश आम जनतेपर्यंत पोहचविण्‍याची गरज आहे. यावेळी बंडोपंत हिरवे यांनीही संबोधित केले.
कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्‍ज्‍वलनाने करण्‍यात आला. कार्यक्रमाचे  प्रास्‍ताविक आणि आभार प्रदर्शन बी.पी.रामटेके यांनी केले. तर संचालन अर्चना धुर्वे यांनी केले. फिल्‍ड आउटरीच ब्‍यूरोच्‍या वतीने 27 व 28 रोजी  स्‍वच्‍छता व आरोग्‍य विषयावर रांगोळी व चित्रकला स्‍पर्धा घेण्‍यात आली आणि स्‍वच्‍छता रैली काढण्‍यात आली होती. स्‍पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी करण्‍यात आले. त्‍याआधी मूल येथील कलापथकाने स्‍वच्‍छतेचा संदेश दिला. कार्यक्रमाला राजेश मड़ावीराजदीप राठोड यांच्‍यासह शाळेचे विद्यार्थीशिक्षक-शिक्षिका तसेच शहरातील गणमान्‍य नागरिक मोठया संख्‍येने उपस्थित होते.
                                                                                0000

Tuesday 27 November 2018

जिल्हयातील एकही बालक गोवर रुबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही : देवराव भोंगळे



गोवर रुबेला लसीकरणाला जिल्हयात उत्साहात सुरुवात

चंद्रपूर, दि.27 नोव्हेंबर- चंद्रपूर जिल्हयातील एकही बालक गोवर रुबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची खात्री आरोग्य यंत्रणेच्या तयारीवरुन व शिक्षण विभागाच्या पाठबळावरुन दिसून येते. प्रत्येक पालकांने आपले पाल्य निरोगी राहावे, यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहीम शंभर टक्के यशस्वी होईल, याची मला खात्री असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आज दूर्गापुर येथील जनता विद्यालयात जिल्हास्तरीय शुभारंभाच्या कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले. 
            यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोडजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश साठेजिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.संदिप गेडामनागपूर येथील कुटुंब कल्याण विभागाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गोगुलवार, डॉ.मंगेश गुलवाडेनागपूरचे डब्ल्युएचओचे डॉ.श्रीधर,डॉ.शैलेश बागला, डॉ.तरपचंद भंडारी, जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सुर, डॉ.माधुरी मेश्राम, डॉ.अमित जयस्वाल आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात आजपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. राज्यात 9 महीने ते 15 वर्षाखालील सुमारे 3 कोटी 38 लक्ष बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हयामध्ये चंद्रपूर जिल्हयाची शहरी व ग्रामिण क्षेत्र मिळुण एकूण लोकसंख्या  22,31,090 आहे. सदर लसीकरण मोहिमेअंतर्गत 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील ग्रामीण/अर्बन भागातील 4,43582 व कार्पोरेशन भागातील 83,870 असे एकूण 5,27,452 मुलां-मुलींना  3244 शाळेच्या माध्यमातून तर 2306 अंगणवाडी/बाहयसत्रअंतर्गत मिळून असे एकूण 5550 सत्राचे नियोजित करुन लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
यावेळी बोलतांना महाराष्ट्राला गोवर रुबेला सारख्या घातक आजारापासून मुक्त्त करण्यासाठी आज राज्यभर या मोहिमेची सुरुवात होत आहे. यामध्ये चंद्रपूर मागे राहता कामा नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. बालकांमध्ये लहान वयातच प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हयातील सर्व यंत्रणा हातात हात घालून हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या अनेक महिण्‍याची यंत्रणाची ही मेहनत असून यातून शंभर टक्के लसीकरण हेच उद्दिष्ट साध्य झाले पाहीजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलतांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी वीस राज्यामध्ये ही मोहीम राबविली जात असून महाराष्ट्र यामध्ये शंभर टक्के लसीकरण करेल अशी खात्री असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बालकांशी संवाद साधतांना त्यांनी तुम्ही लसीकरण केले. इंजेक्शन घेतले. ही माहिती आपल्या जवळच्या तीन मित्रांना देवून त्यांनी लसीकरण करुन घेण्याची प्रेरणा दयावी, असे आवाहन केले.
आजपासून सुरु झालेल्या या मोहिमेत संपूर्ण जिल्हयामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली असून शहरात महानगरपालिका तर जिल्हयामध्ये जिल्हा परिषद व ठिक ठिकाणच्या नगरपालिकांमार्फत कार्यवाही होणार आहे.  यावेळी आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांचे कौतुक पापळकर यांनी केले.  
कार्यक्रमाचे संचालन जनता विद्यालयाच्या शिक्षिका सुनीता पोटे यांनी केले. लसीकरणाला या विद्यालयातील चिमूकल्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला.
                                                            0000

Monday 26 November 2018

आजपासून जिल्हयामध्ये गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला सुरुवात


100 टक्के लसीकरण करण्याचे
जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांचे आवाहन
  
चंद्रपूरदि.26 नोव्हेंबर- चंद्रपूर जिल्हयामध्ये उदया दिनांक 27 नोव्हेंबर मंगळवारपासून गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला सुरुवात होत आहे. उद्या दुर्गापूर येथे दुपारी 12 वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते तर महानगरपालिका हद्दीमध्ये नेताजी चौकातील सावित्रीबाई फुले शाळेमध्ये महापौर अंजलीताई घोटेकर व मनपा आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ होणार आहे. 
चंद्रपूर जिल्हयातील गोवर रुबेला लसीकरणाच्या 100 टक्के अमंलबजावनीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.  यामध्ये 100 टक्के शाळापालक व वैदयकिय व्यवसायिकांनी सहभागी होणार असून जिल्हयातील  9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील मुले-मुंली गोवर, रुबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
भारत सरकारने सन 2020 सालापर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण  करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.  त्यानुसार 27 नोव्हेंबर  2018 पासून महाराष्ट्रात गोवर रुबेला लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व मुलां-मुलींना लसीकरण करण्याचे लक्ष निर्धारीत केले आहे. सदर मोहिम 5 आठवडयाच्या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. यात जिल्हातील सर्व शाळा,सरकारी, निमसरकारीखाजगीअनुदानित, विनाअनुदानित, आश्रम शाळामदरसेसिबीएससीआयसीएससी, केंद्रीय विदयालय इत्यादी शाळामध्ये पहिल्या दोन ते तिन आठवडयात व त्यानंतर अंगणवाडी केंद्र व सर्व सरकारी आरोग्य संस्थेत मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. अशा प्रकारे 5 आठवडे सदर मोहिम जिल्हयात राबविण्यात येणार आहे. सदर मोहिम आरोग्य विभागासोबतच, शिक्षण विभाग, एकात्मिक बालविकास विभाग यांचे समन्वयाने राबविण्यात येत आहे. याकरीता लायन्स क्लब, रोटरी क्लबआयएएम, आयएपी,  निमा, युनानी या संस्थांचे सहकार्य लाभत आहे.
चंद्रपूर जिल्हयाची शहरी व ग्रामिण क्षेत्र मिळुण एकूण लोकसंख्या  22,31,090 आहे. सदर लसीकरण मोहिमेअंतर्गत 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील ग्रामीण/अर्बन भागातील 4,43582 व कार्पोरेशन भागातील 83,870 असे एकूण 5,27,452 मुलां-मुलींना  3244 शाळेच्या माध्यमातून तर 2306 अंगणवाडी/बाहयसत्रअंतर्गत मिळून असे एकूण 5550 सत्राचे नियोजित करुन लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून या मोहिमेत 100 टक्के लसीकरणाचे करण्याचे  निर्धारीत केले आहे.
                                                            000  

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांची नोंदणी करा : ओमप्रकाश यादव



महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार
कल्याण मंडळातर्फे सुरक्षा साधनांचा वाटप

चंद्रपूर, दि 26 नोव्हेंबर : आपल्या मनातली घरे बांधणारे, आपल्या निवाऱ्याची सोय करणारे, इमारत व इतर बांधकाम करणारे कामगार यांना शासन विविध सोयी सुविधा देण्यासाठी तत्पर आहे. त्यामुळे आपल्या अवतीभवती असणाऱ्या गरजू व गरीब कामगारांना राज्य शासनाच्या कामगार कल्याण मंडळाकडे आपल्या नावाची नोंदणी करायला सांगा,असे आवाहन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओम प्रकाश यादव यांनी आज येथे केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील नोंदणीकृत झालेल्या बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप करण्याचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जिल्हाभरातील शेकडो कामगार उपस्थित होते. त्यांच्याशी संवाद साधतांना ओमप्रकाश यादव म्हणाले, राज्य शासन कामगारांना घरे, सुरक्षा आणि आरोग्यदायी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी तयार आहे. 28 प्रकारच्या विविध सामाजिक योजना कामगारांसाठी सज्ज आहेत. तथापि, त्यासाठी कामगारांची नोंद होणे गरजेचे आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ अंतर्गत विविध योजना तयार केलेल्या आहेत. मात्र नोंदणी नसल्यामुळे अनेक जण यापासून वंचित आहेत. त्यामुळे जे खरोखर बांधकाम कामगार आहेत, त्यांना या योजनेची माहिती देण्याचे आवाहन देखील यावेळी जमलेल्या  कामगार बांधवांना त्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर चंद्रपूरचे आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूरच्या महापौर अंजलीताई घोटेकरजिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकरसहायक कामगार आयुक्त उज्वल लोया, उपमहापौर अनिल फुलझेलेदिशा सदस्य खुशाल बोंडेमहाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार समितीचे सदस्य ॲड. शैलेश मुंजेइमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे सदस्य अशोक भुताळ आदी उपस्थित होते.
2014 पासून कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत मोठ्या प्रमाणात राज्यात नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत 12 लाख कामगारांची नोंद झाली आहे. त्यांच्यासाठी विविध योजना असून या योजनेचा लाभ लोकांपर्यंत जावा, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
चंद्रपूरचे आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी यावेळी चंद्रपूरमध्ये या कामगारांची मोठी संख्या असताना देखील नोंदणी कमी आहे. त्यामुळे या नोंदणीला गती देण्याबाबत संबंधित विभागाने प्रयत्न करावेअसे आवाहन यावेळी केले. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळेमहापौर अंजलीताई घोटेकरयांनी देखील सर्व संबंधित यंत्रणांनी नोंदणीकडे लक्ष वेधण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या नोंदणीला गती दिली जाईल असे आश्वासन दिले.
या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते नोंदणीकृत कामगारांना पाच हजार रुपयांचे धनादेश प्रातिनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आले. अन्य नोंदणीकृत कामगारांच्या बँक खात्यामध्ये हा निधी जमा केला जाणार आहे. याशिवाय या वेळी कामगारांना सुरक्षा साहित्याचे देखील वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बांधकाम  कामगार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक कामगार आयुक्त उज्वल लोया यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ज्योती तोहगावकर यांनी केले.

चंद्रपूरमध्ये प्रशासकीय भवनात नोंदणी !

चंद्रपूर जिल्हयातील इमारत व इतर बांधकाम कामगारांना केवळ पंचवीस रुपयांमध्ये स्वतःच्या नावाची नोंदणी करू शकतात.  यासाठी 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्रवयाचा पुरावारहिवासी पुरावाछायाचित्रासह ओळखपत्रबँक पासबुकची प्रतपासपोर्ट आकाराची तीन छायाचित्रे आवश्यक आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील यासंदर्भातील कामगार नोंदणी कार्यालय हे प्रशासकीय भवनामध्ये तळ माळ्यावर बस स्टँड पुढे आहे. या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये कोणत्याही कामगार आपल्या नावाची नोंद करू शकतो. राज्य शासनातर्फे 28 योजना कामगारांसाठी सध्या कार्यरत असून याचा लाभ घ्यावा, असे आव्हान करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कामगार कार्यालयाच्या 07172-252028 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

                                                       000

Friday 23 November 2018

छत्रपती चिडे यांच्या परिवाराला मुख्यमंत्री सहायता निधीतून 10 लाखाचा धनादेश सुपूर्द


चंद्रपूर दि 23 नोव्हेंबर : महाराष्ट्र शासनातर्फे नागभिडचे ठाणेदार दिवंगत पोलीस उपनिरिक्षक छत्रपती चिडे यांच्या परिवाराला मुख्यमंत्री सहायता निधीतून दहा लाखाचा धनादेश काल  दि. 22 नोहेंबर रोजी देण्यात आला.
       राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार  यांच्या  सूचनेवरून काल गुरुवारी रात्री महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी  डॉ. कुणाल खेरणार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेशकुमार रेड्डी, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, सुहास अलमस्त, आदींच्या उपस्थितीत चिडे यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून  हा धनादेश देण्यात आला.
             पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे यापूर्वीच कुटुंबीयांची भेट घेऊन जाहीर केले आहे. महापौर, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या उपस्थितीत राज्य शासनातर्फे चिडे यांचा निवास असणाऱ्या तुकूम येथील शिवनगर अपार्टमेंटमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये जाऊन ही मदत करण्यात आली. महापौर अंजलीताई घोटेकर  व जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेरनार यांनी सन्मानपूर्वक हा धनादेश चेक मधुरीताई छत्रपती चिडे यांना सुपूर्द केला आहे. यावेळी अमिन शेख, राजू गोलिवार .संजय मुसळे, शीला चव्हाण, गणेश कुळसंगे, प्रदीप गडेवार ,पुरुषोत्तम सहारे आदी उपस्थित होते.
0000

Thursday 22 November 2018

चंद्रपूर जिल्हयातील 100 टक्के बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचे आवाहन



जिल्हातील सर्व यंत्रणा सज्ज 27  नोव्हेंबर पासुन प्रत्यक्ष लसीकरण

चंद्रपूर, दि.22 नोव्हेंबर- चंद्रपूर जिल्हयातील गोवर रुबेला लसीकरणाच्या 100 टक्के अमंलबजावनीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. या मोहिमेचा शुभारंभ 27 नोव्हेंबर पासून संपूर्ण चंद्रपूर जिल्हयात करण्यात येणार आहे. यामध्ये 100 टक्के शाळा, पालक व वैदयकिय व्यवसायिकांनी सहभागी होणार असून जिल्हयातील  9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील मुले-मुंली गोवर, रुबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही डॉ.कुणाल खेमनार यांनी प्रत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, मनपाचे अतिरीक्त आयुक्त भालचंद्र बेहेरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश साठे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.संदिप गेडाम, आयएमएचे अध्यक्ष डॉ.प्रमोद राऊत, डॉ.एम.जे.खान, डॉ.मंगेल गुलवाडे, नागपूरचे एसएमओ डॉ.श्रीधर, शैलेश बागला आदी उपस्थित होते.
भारत सरकारने सन 2020 सालापर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण  करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.  त्यानुसार 27 नोव्हेंबर  2018 पासून महाराष्ट्रात गोवर रुबेला लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व मुलां-मुलींना लसीकरण करण्याचे लक्ष निर्धारीत केले आहे. सदर मोहिम 5 आठवडयाच्या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. यात जिल्हातील सर्व शाळा, सरकारी, निमसरकारी, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित, आश्रम शाळा, मदरसे, सिबीएससी, आयसीएससी, केंद्रीय विदयालय इत्यादी शाळामध्ये पहिल्या दोन ते तिन आठवडयात व त्यानंतर अंगणवाडी केंद्र व सर्व सरकारी आरोग्य संस्थेत मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. अशा प्रकारे 5 आठवडे सदर मोहिम जिल्हयात राबविण्यात येणार आहे. सदर मोहिम आरोग्य विभागासोबतच, शिक्षण विभाग, एकात्मिक बालविकास विभाग यांचे समन्वयाने राबविण्यात येत आहे. याकरीता लायन्स क्लब, रोटरी क्लब, आयएएम, आयएपी,  निमा, युनानी या संस्थांचे सहकार्य लाभत आहे.
चंद्रपूर जिल्हयाची शहरी व ग्रामिण क्षेत्र मिळुण एकूण लोकसंख्या  22,31,090 आहे. सदर लसीकरण मोहिमेअंतर्गत 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील ग्रामीण/अर्बन भागातील      4,43, 582 व कार्पोरेशन भागातील 83,870 असे एकूण 5,27,452 मुलां-मुलींना  3244 शाळेच्या माध्यमातून तर 2306 अंगणवाडी/बाहयसत्रअंतर्गत मिळून असे एकूण 5550 सत्राचे नियोजित करुन लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून या मोहिमेत 100 टक्के लसीकरणाचे करण्याचे  निर्धारीत केले आहे.
या लसीकरण मोहिमेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना गोवर-रुबेला या दोन्ही आजाराचे नियंत्रणाकरीता एक इंजेक्शन व्दारे लसीकरण केले जाणार आहे. गोवर हा अत्यंत संक्रामक आजार आणि घातक आजार आहे. हा मुख्यता लहान मुलांना होतो असून या आजारानंतर होणा़-या गुंतागुंतीमुळे बालकाचा मृत्यू होउ शकतो. तसेच रुबेला हा सौम्य संक्रामक आजार असला तरी गर्भवती स्त्रियांना रुबेला आजाराचा संसर्ग झाल्यानंतर अचानक गर्भपात किंवा नवीन जन्म झालेल्या बाळास जन्मजात दोष अंधत्व, बहिरेपणा,  मतीमंदत्व, हृदय विकृती होवू शकते. या करीता गोवर-रुबेला आजारापासून संरक्षणाकरीता सर्व मुलां, मुलींना लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. या पासुन कोणताही धोका नाही.
गोवर रुबेला मोहिम ( पार्श्वभूमी )
लहान वयाच्या मुलांच्या त्यसाठी गोवर हा आजार एक प्रमुख कारण आहे गोवर या आजाराची बाजारामध्ये किफायतशीर सुरक्षित लस उपलब् असली तरी लहानवयाच्या मुलांमध्ये या आजारामुळे त्यखी पडण्याचे प्रमाण खुप मोठे आहे.
सन 2015 मध्ये जगभरात जवळपास 1.35 लक्ष त्य हे केवळ गोवर या आजारामुळे झाली आहेत म्हणजे दररोज 367 त्य किंवा दर तासाला 15 त्यजगभरात होत आहेत.
गोवर लसीकरणामुळे सन 2000 ते 2015 या कालावधीमध्ये जगभरात गोवर या आजारामुळे त्यखी पडण्याचे प्रमाण 79 टक्के पर्यंत कमी झाले आहे सन 2016च्या जागतिक कडेवारीनुसार गोवर आजारामुळे होणा-या त्यपैकी अंदाजे 37 टक्के त्य हे भारतामध्ये झाले हेत.
गोवरच्या लसीकरणामुळे सन 2000 पासून सन 2015 पर्यंत सुमारे 2 करो गोवर मुळे होणा-या त्यूं प्रतिबंध लागला.
रुबेला हा एक संक्रामकसामान्यत सौम्य व्हायरल संसर्ग असून तो मुख्यत मुले आणि तरुण पिढीमध्ये होतो.
गर्भवती स्त्रीयामध्ये रुबेला या आजाराच्या संसर्गामुळे गर्भाचा मत्यु किंवा जन्मत दोष, (जसे अंधत्वबहिरेपणा आणि ह्रदय विकती ) होऊ शकत हे बालकजन्मजात रुबेला सिन्ड (सिआरएस) म्हणून ओळखले जाते.
जगभरातदरवर्षी एक लाखापेक्षा जास्त बालकांचा सिआरएस सह जन्म होतो रुबेला साठी विशिष्ट उपचार उपलब्ध नाही परंतु हा रोग लसीकरणाने प्रतिबंधित करता येतोदर वर्षी अंदाजे 40 ते 50 हजार जन्मजात रुबेला सिन्डोम (सिआरएस) केसेस भारतामध्ये होतात.मोहिमेसाठी लक्ष्य करण्यात आलेला वयोग 9 महिने ते 15 वर्षापर्यंतची मुले मुलीफक्त एकदा मोहिमेमध्ये लसीकरण रुन गोवर आणि रुबेला या दोन आजारापासून आपल्या बालकांना सुरक्षित करु शकता (जरी यापुर्वी देखील आपण आपल्या बालकासगोवर रुबेला चे लसीकरण  केले असेल तरी मोहिमेमध्ये लसीकरण करणे अनिवार्य आहे.
भारतामध्ये गोवररुबेला लसीकरणाची सुरुवात फेब्रुवारी 2017 पासून सुरु करण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत 30 मे 2018 पर्यंत एकूण 19 राज्य केंद्र शासितप्रदेशामध्ये मोहिम यशस्वीरित्या राबविण्यात आली आहे  यामध्ये वळपास 9 कोटीहून अधिक बालकांचे यशस्वीरित्या लसीकरण करण्यात आले महाराष्ट राज्यात हीमोहिम 27 नोव्हेंबर 2018 पासून सुरु होणार आहे.लसीकरण 9 महिने ते 15 वर्षाखालील पात्र लाभार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण करण्याचे उदिदष्ट आहे.
                                                            0000